एका प्रेमाची गोष्ट
विचार तुझा मनी येता , आठवणींच्या उठल्या लाटा,
झाल्या जाग्या तरल भावना , उजळल्या पुन्हा विसरल्या वाटा.
आठवतो मज दिवस तो पहिला ,जेव्हा आपला परिचय झाला ,
परिचयाच्या या वाटेवरुनी ,प्रेमाचा अंकुर उमलला.
मावळत्या या संध्याकाळी ....मावळत्या या संध्याकाळी, पुन्हा फिरून पहाताना.... क्षितिजावरती दिसते ती अंधाराची दाट कड़ा. मावळत्या या संध्याकाळी, सूर्य बिम्ब ते लाल गुलाबी, क्षणभर ते रंग उधली आण हळूच होई क्षितीजाखाली. मावळत्या या संध्याकाळी, पुन्हा फिरून पहाताना... क्षितिजावरती दिसते ती अंधाराची दाट कड़ा. मावळत्या या संध्याकाळी, काय वाटे त्या सुर्याला, उगावत्यास नमस्कार मावळत्यास पाठ करी हीच जगाची रित खरी. मावळत्या या संध्याकाळी, पुन्हा फिरून पहाताना... क्षितिजावरती दिसते ती अंधाराची दाट कड़ा. - स्वागत