दाहीरची यमदिक्षा
चुका वांझोट्या नसतात
कधीनाकधी त्या
प्रसवतात
भूतकाळातील पातके
मग
सारे जगणे
यातनामय होवून जाते.
गलितगात्र असे जगणे
मोहपाशात गुरफटलेले,
सतत भूतकाळाची
सावली घेवून नाचणारे,
सारे थरारून जाते
अन
सुन्न पडते.
बाणासारखा अंधार
छेदुन चिवडलेला काळोख
त्याच्या चित्रविचित्र
मुर्त्या होवून नाचतात
अन घेवून जातात
त्या अनाकलनीय जगात
जिथे
मानवाचे प्रथम वंशज
प्रत्येक भयाण वस्तूला
देवत्व देत होते.
मग संस्कृतीपाठोपाठ
हाव आली
त्याचाच परिपाक
आक्रमणे,
प्रत्येक संस्कृतीवर
बलात्कार होवून
अनौरस वंशाचे ओझे
वाढत राहिले,
त्यात शेवटची आहुती
दाहीरची पडली
मग
सारेच दाहीर होत राहिले.
मिसळपाव