Skip to main content

कविता

लाजाळू नि गुलाब

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 30/10/2015 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
लाजाळूच्या झाडापुढे गुलाबाच फूल नको स्पर्शाविना मिटण्याची त्याला नवी भूल नको! गुलाबाच फूल भारी लाजाळूला खेटलेल लाजाळूच झाड वेड येता जाता मिटलेल! कुणी द्या रे रंग-वास लाजाळूला मिरवाया तोरा नवा दाखवून ताटव्याला फुलवाया! - संदीप चांदणे

फुल सांगे काट्याला ………

लेखक एकप्रवासी यांनी गुरुवार, 29/10/2015 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
फुल सांगे काट्याला किती आनंद देतो मी सगळ्यांना माझ्या रूपाच, रंगाच अन सुगंधाच किती ओढ साऱ्या जणांना गोड गाण्यांत, केसांच्या वेणीत किती गुंफतात मला देवाच्या चरणाशी वाहण्याच भाग्य मिळेल काय तुला? थोडस हसून काटा बोलला फुलाला मी असताना सहज कोण छेडील बरं तुला एक काजळाचा ठिपका समज तू मला लागो ना नजर कुणाची तुला कुणाच्या चरणाशी वाहण्याच भाग्यं कधी नाही मिळणार मला ह्या कळ्याफुलाचं, वेलीपानाचं सौदर्य पाहण्याचं भाग्य काय कमी आहे मला.

एक माणूस मिशी काढून..............

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 29/10/2015 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
एक माणूस मिशी काढून शाळेमध्ये पोहचला बघता बघता खिडक्यांमधून वर्गात जाऊन बसला. वर्ग भरला मुलामुलींनी सुरेख हसणे पानांमधूनी हळूच पाही शाई सांडूनि, बघते का ती मान वळवूनी! हातचा राखून गणित चुकले नजर चकवून भाषा हुकली कितीक राजे आले गेले इतिहासाच्या पानोपानी.... छंद जीवाला एकच लागे रिबिनीमागचे भोळे कोडे! इकडे तिकडे बघून झाले मास्तर सगळे येऊन गेले मधली सुट्टी चिंचा बोरे मैदानावर सुटली पोरे..... वर्गासहित उठून गेले साधेभोळे हळवे कोडे! भान आले, बाहेर आला.... एक मुलगा मिशी लावून शाळेबाहेर पडला हरवलेले हळवे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिला .

।। बरे झाले स्वातंत्र्य मिळाले ।।

लेखक सचिन जाधव यांनी गुरुवार, 29/10/2015 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
बरे झाले आपणास स्वातंत्र्य मिळाले ते गोरे साले रस्त्यामध्ये थूंकू देत नव्हते वेड्यासारखे रोज पाण्याने... रस्ते धूत होते. आपण किती भाग्यवान गुटका पान तंबाकू खाऊन रस्त्यात कुठेही थूंकू शकतो. छान झाले स्वातंत्र्य मिळाले ते इंग्रज साले धान्यामध्ये भेसळ करू देत नव्हते मूर्खासारखे रेशनवर सकस धान्य देत होते. आपण किती पुण्यवान दूध अन्न औषधामध्ये बेमालूम भेसळ करू शकतो. बेस्ट झाले स्वातंत्र्य मिळाले ते ब्रिटीश साले शिक्षणाचा धंदा करू देत नव्हते अडाण्यासारखे दर्जेदार शिक्षण फुकटामध्ये देत होते आपण किती विद्वान शिक्षणाचा बाजार मांडून पिढ्या बरबाद करू शकतो चांगले झाले स्वातंत्र्य मिळाले ते जुलमी साले अनाथ

एक पहाट गावाकडची ………

लेखक एकप्रवासी यांनी बुधवार, 28/10/2015 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
चमकून गेली वीज, भिजवून गेल्या सरी माळरानांनी पांघरली हिरवी शाल अंगावरी पक्षांची किलबिल कोकिळेची शीळ, निसर्गाच संगीत लई भारी उडती पक्षी एकामागून एक, आभाळी जशी पंढरीची वारी सारं गाव जाग करी भूपाळीन, वासुदेवाची स्वारी मधुर स्वरांना साथ चिपळीची, घेऊन चालली दारोदारी बुजगावण्याच्या भेटीला चालला शेतात शेतकरी वाऱ्यासंगे झुले किती तांदूळ अन बाजरी घंटानाद आला कानी, पोहचला देवपूजेला पुजारी भगवा झेंडा फडकत आहे राउळाच्या कळसावरी लाल रंग वाढला समोर पूर्वेच्या क्षितीजावरी दिसे एका अंगणात कोणी सूर्याला अर्घ्य करी

आई.........

लेखक एकप्रवासी यांनी मंगळवार, 27/10/2015 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
पावसात भिजली लाकड जमवत होती आई काम अर्ध सोडून, घरात शिरली घाई घाई शाळेतून भिजून आल तिचं बाळ, दारात उभी होती दुर्लक्ष करून तो निघून गेला, जशी ती कोणी नव्हती दिलं दफ्तर फेकून त्याने, जेवायला वाढ म्हणाला करपलेली भाकरी त्याने फेकून दिली बाजूला काही जमत का तुला? चवच नाही हाताला ताट भिरकाउन बोलला, नाही जेवायचं मला गेला पावसात खेळायला, नाही वाटली फिकीर त्याला सांडलेले जेवण शांतपणे आई लागली उचलायला रात्री झोपताना अंग त्याचं तापू लागलं सकाळी डोक्यावर पट्टी बघून आश्चर्य त्याला वाटलं शाळेला उशीर झालाय, काय बनवलं डब्याला?

रक्त पिपासू

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 27/10/2015 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
१९६० - ६५ मधले नाशिक आठवले. आता तिथेच काय, पण इतर शहरात देखील बहुदा, ढेकूण औषधाला देखील सापडत नसावेत. चांगलेच आहे म्हणा! पण साधारण दोन वर्षापूर्वी अमेरिकेत देखील ढेकणाचा (गावाचे नाव आठवत नाही) सुळसुळाट झाल्याची बातमी वाचली होती. म्हणजे काय, हे चिवट प्राणी कुठेना कुठे दबून रहात आपले रक्त शोषण करीत असतात. त्यां बोचऱ्या आठवणीसाठी शांता शेळके ह्यांची क्षमा मागून, एका गोड गीताचे विडंबन देत आहे.
काव्यरस

द गडू शेट द गडू शेट ......:)

लेखक दमामि यांनी मंगळवार, 27/10/2015 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
द गडू शेट द गडू शेट भरले का हो तुमचे पेट? तुम्ही म्हणे उडवून लावता भल्या भल्यांचे जम्बो जेट? इकडून सूड तिकडून अभ्या बॅट्या टक्या किसन प्यारे उचकायाचा मामिला उगा का रे लावता नेट? व्यासपीठ हे विरंगुळ्याचे मामू , मामे, फरक काय? पदर खोचून उभा/भी आहे तुमच्या समोर मामि थेट.:) काय सांगू कस्सं सांगू खरं काय खोटं काय कधी तरी कुठेतरी कट्ट्यामध्ये होइल भेट. ( ट ला ट लावून पाडलेली कविता:))
काव्यरस

बालपण

लेखक एकप्रवासी यांनी सोमवार, 26/10/2015 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी जाऊया आपल्या गावी, आठवणींनी भिजलेल्या वाटा धुंडाळत लपंडाव, विटी दांडू, सागरगोटीचे खेळ खेळत, आंबा फणसाच्या, चिंच आवळ्याच्या झाडात आपलं बालपण शोधत, कधीतरी जाऊया आपल्या गावी………… हिरवळीत जीर्ण झाडात लपलेली आपली शाळा शोधत, खेळाचे मैदान, शाळेची घंटा, फळ्यावरचे सुविचार वाचत, आपला वर्ग, आपली जागा, रंग उडालेला फळा अंधुक झालेल्या आठवणीत आपले सवंगडी शोधत, कधीतरी जाऊया आपल्या गावी…………