लेखकचन्द्रशेखर गोखलेयांनी शुक्रवार, 10/06/2011 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
फव्वारा सुगंधी
लावतो शरिरा
आणि त्याचा तोरा
मिरवितो...
तरी येइ घाम
थांबवू हा कसा..?
किती जरी पुसा
घमघमे..
असे किती लेप
माझ्या मुखावरी
गंध पावडरी
भस्म माझे..
पुटावरी पुटे
सत्यासंगे खोटे
समागमे खाटे
लाज आली....
लेखकJAGOMOHANPYAREयांनी गुरुवार, 09/06/2011 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
मुन्नी बदनाम हुई
रंग काळा बाबाच्या दाढीचा
रंग खाकी पोलिसांच्या सदर्याचा
रंग भगवा बाबाच्या लंगोटचा
रंग हिरवा गांधीबाबाच्या नोटेचा
रंग सावळा त्या रात्रीचा
रंग पिवळा 'सोनिया' काविळीचा
रंग लाल डोक्यावरच्या जखमेचा
रंग निळा पाठीवरल्या वळेचा
रंगात सार्या रंगुनी रात्र होई सुन्नी*
बिचारा बाबा ! दुपट्ट्यात झाला मुन्नी
* सुन्नी म्हणजे सुनी
लेखकचन्द्रशेखर गोखलेयांनी बुधवार, 08/06/2011 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
चित्त आणि वृत्ती
व्हावी एकरूप
अहंकार लोप
होवो माझा
देव आहे नाही
ठावे नसे मज
माझे हितगुज
मज पाशी
मीच मला केले
उभे न्यायालयी
आत्माराम होई
न्यायाधीश
अलिप्तता ऐसी
तैसी नाही सोपी
किती बहुरूपी
अंतरंगी
परी नाही आता
उपाव दुसरा
अखंड पहारा
चित्तावरी.....!!
लेखकविजुभाऊयांनी बुधवार, 08/06/2011 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
रोज रोज संध्याकाळी ; टिंब रंगते एक होळी
आडरानी पंक्चरणार्या टायराची रांगोळी
मर्तीकेची गर्दभे येती चढवुनी कैफ गोळी
येती सारी येकजात देता एक साधी हाळी
चिवडा आणि अंडी उकडली ; फेकूनी द्या ती भाजी पोळी
संपवुनी चखणा आणि चोखुनी नळी
गडी पहुडले तर्र झोकुनी ; हाती घेवूनी रात्र काजळी
उजेड फुटतो भल्या सकाळी
आड भिंतीपलीकडे ओकलेली पित्तनळी
उभे रहाता पाउले पकडती दिशा वेगवेगळी
ओघळे ढेरी खेळती डोळे कोशिंबीर आंधळी
बंद पाकीटाला ओढ एक तारखेची आगळी
दुर्दम्य घायाळ आशावाद; जात नाही कधी काळी
स्पर्श पहिल्या धारेचा ;चमके मुद्रा बावळी
घेताना नांदते ओठावरी नवनवी लाखावळी
जीवनात रंग भरे सृजनतेची
लेखकविश्वेशयांनी बुधवार, 08/06/2011 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
सुचते बरेच काही, पण लिहिणे होत नाही ...
दिसते बरेच काही, पण पाहणे होत नाही ...
छळते तुझीच साद, सखे पण येणे होत नाही ...
साठवले बरेच काही, पण देणे होत नाही ...
तुझ्या घरावरून सखे , हल्ली जाणे होत नाही
पूर्वीची ती युगुलगीते, आता गाणे होत नाही ...
स्वच्छंद मनस्वीतेने आता जगणे होत नाही
जाहलो भ्याड इतका आता मरणे होत नाही ...
आजही यमुनातीरावर राधा कदंबाखाली उभी
अगदी नेहमीसारखेच
आजही प्रतिक्षा; ठाऊक आहे कान्हा गोकुळात नाही तरीही
अगदी नेहमीसारखेच
कसे युगान्तीत प्रेम हे
अवघे निळे आभाळ काजळले
अमर प्रेमाचे चमचमते थेंब ओघळलेले
कदंबाच्या पानापानात ते गच्च दाटलेले
राधेचे उत्तरीय त्या प्रेमात चिंब जाहलेले
राधा कशी पुरती बावरलेली
इतक्यात दुरून एकतारीचे सूर घुमले
नितांत आर्त विरहगीत त्यामागून आले
राधेचे नेत्र त्याचा उगम शोधू लागले
दूरवर एका वडाखाली एक सात्विक सौंदर्य, वल्कले नेसलेले
राधा धावत सुटली त्या वडाकडे
त्या सौंदर्याला गाठायला
अचानक ती मध्येच अडखळली, वेडावली, मुळातून हादरली
अजरामर प्रेमाचा वर्षाव त्या कदंबापली
लेखकअज्ञातकुलयांनी मंगळवार, 07/06/2011 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
तिची कापरापरी दृष्टभेट घडते
द्विधा पाडसांच्या मनी स्पष्ट होते
मनांची व्यथा सांगते ही कथा
हास्य ओठांतले लपवुनी नाहि लपते
लपंडाव हा पोरका जीवघेणा
कळी काजळातून ओथंबते
उधाणून येते नि माया दुधारी
पापणीतळी स्वप्न ओसांडते
इथे अन तिथेही रमल पाशतंतू
दूरस्थ दोघे दिशांना परंतू
जिथे मेघवारा तिथे साद संकल्प
अढळ ध्रूव दोन्ही सदाही प्रवाही
...........................अज्ञात
लेखकअज्ञातकुलयांनी मंगळवार, 07/06/2011 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
रात्र काळी पावसाळी भावना उमलून येई
चक्षुरंध्रांपटलपाठी यातना अस्वस्थ कांही
थेंब पोटी वलयं मोठी काठ त्यांना ज्ञात नाही
तुंबलेले हो प्रवाही ना दिशा ना गोत त्यां ही
गुंतले रेशीमधागे गाठ पण पडलीच ना ही
स्पर्श हळवेला दंवाचा कमळदळ निर्लिप्त राही
स्थान परि त्यांचे जळातच श्वास श्वासांतून वाही
व्यापलेले अर्थ सोबत याच देही पण विदेही.. !!
.....................अज्ञात