Skip to main content

कविता

अन्तर्नाद

लेखक पूनम १ यांनी सोमवार, 07/03/2011 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
रातीच्या अंधारात, खुणावती वेणुची साद, सुरांनी तिच्या जागला , जागला अन्तर्नाद, धुक्याची ही वाट नेते, कालिंदीच्या तीरी, वाट पाहतो ग तिथे , माझा श्रीहरी तो श्याम सावळा, मी बावरी ग राधा, पाहण्या श्रुन्गार चोरुन, चांद उगवला आधा, गळले देहाचे बन्धन, खुण अंतरीची पटे, श्याम झाला राधा, राधा श्यामच वाटे, माझी गोरी ही काया, श्याम रंगात न्हाली, सावळ्या हरीच्या स्पर्शाने, राधा सावळी झाली.

date

लेखक अभिषेक९ यांनी सोमवार, 07/03/2011 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
फोनवर मंजूळ आवाजाने हळुवारपणे संध्याकाळी date ठरली मी वेळेवर तयारीत पोहचलो ती तयारच होती मला पाहताच गोssड हसली अनं माझा हात हातात घेतला माझा हात तसाच हातात ठेऊन तिने तिचे नेत्र मिटले विचारात कुठेतरी हरवून गेली ते सुरेख नेत्र उघडून म्हणाली 'तुझे डोळे बघू!' खुपवेळ ती माझ्या अनं मी तिच्या डोळ्यात बघत होतो एकटक, निरखून !! परत तिने माझा हात हातात घेतला हळूच घड्याळ बघून हसली.. अचानक माझ्या छातीलाच तिने कान लावले छाती धडधडली, श्वास वेगावला पण ती शांतपणे माझे चुकलेले ठोके ऐकत होती अगदी मन लावून!! एक निश्वास सोडून ती तिच्या जागेवर बसली पेन हातात घेऊन गुलाबी कागदावर लिहू लागली मी धडधडतचं होतो धक्यात
काव्यरस

मी घर बदललंय ...

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 07/03/2011 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
दर आठवड्याला ठरल्याप्रमाणे देवळात गेलो .... अन ह्या २ ओळी सुचल्या ..... देवभोळा नसण्याची permission मी देवाकडूनच घेतली आहे ... अन आमच एकमेकाला status reporting weekly आहे ... पुढे त्याचा विस्तार एका वेगळ्याच कवितेत झाला .... कुठे गेली माझ्या घरावरची तुझी सावली... कुठे गेला तो मेघ, कुठे गेली ती कृपावृष्टी ... आता सगळच सरलंय .. मला काळात नाही देवा ...

मशाल क्रांतीची...

लेखक अभिषेक९ यांनी रविवार, 06/03/2011 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
उडाला भडका वाजवा डंका पेटवा लंका पेटली मशाल क्रांतीची सर्वत्र विखारी नाग धुमसली आंतरिक आग भडकला सार्वजनिक राग पेटली मशाल क्रांतीची स्फुरले तारुण्य सळसळले रक्त हादरले मदांध तख्त पेटली मशाल क्रांतीची काव्य केलेने शस्त्राने रक्त सांडली लेखणीने भूमीस लाल-अभिषेक पेटली मशाल क्रांतीची धरणी दुभंगली आकाश विस्फारले भास्कराने डोळे मिटले पेटली मशाल क्रांतीची सृष्टी-पुत्रांनीचं पुकारला प्रती-सृष्टीचा उष:काल भास्कराने पुनश्च: डोळे उघडले आकाश सारे मुक्त झाले हसले डोंगर आनंदिली सरिता पेटली मशाल क्रांतीची आता, तुचं तुझा चित्रकार तुचं तुझ
काव्यरस

श्वानमित्र...एक हास्यकविता.?????

लेखक कानडाऊ योगेशु यांनी रविवार, 06/03/2011 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्यासाठी मी माझा .. नेहेमीचा रस्ता बदलला.. ती काही भेटली नाही..कळाले.. तिने आपला पत्ता बदलला.. प्रेमासाठी मात्र मी.. निवडला मार्ग नेकीचा होता.. ती तिथेही भेटली नाही.. काय करणार पत्ताच जर चुकीचा होता.. तिच्या गल्लित जाणे म्हणजे.. एक मोठे दिव्य होते.. मनेका गान्धीन्च्या मित्रान्चे.. तिथे जणु अभयारण्यच होते.. तिच्यासाठी मित्रानो.. काय काय नाहि मी केले सान्गा..? खाम्बासारखा उभा तिच्याघरासमोर.. हरेक कुत्रे गेलेय वर करून दोन्ही टान्गा.. तिच्यासाठी तिच्याघराबाहेर रोज मी असा लागलो ताटकळु माझ्या दु:खाचा गहिवराने गल्लीतली कुत्री रोज लागली व्हिव्ह्ळू ती जालीम दुसर्याची झाली.. फुटके माझे नशीबच शे
काव्यरस

ते क्षण जे त्यानं दिले

लेखक निनाव यांनी रविवार, 06/03/2011 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
त्यानं ओतले जाता जाता ओंजळीत माझ्या चांदणे निसटले ते, विझले सारे - मग मीच मज वेचले असे दिले त्याने मज ते क्षण मीच होते बहरले सावत्र जरी दुखं, जपले मी होते त्यानं दिले तहान राहीली तशीच, अन होडी सागरा मधेच वारं सगळं घेउन गेला तो, होते त्याने वाहिले गोष्टी वाचते मी पुन्हा-पुन्हा त्याच्या पुस्तकातल्या शोधते ते, शब्द सारे - माझेच ते हरवले!

सोनेरी पानं

लेखक निनाव यांनी शनिवार, 05/03/2011 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
सोनेरी पानं उगीच का होतात सोनेरी ? हिरवाईचे दिवस जपतात ते कितीतरी अखेर गळतात.. एक दिवस ते ही स्वागत पडुन नव्याचे करतात तरुणाई चे जल्लोषात आगमन मग करते फुटलेले नवे कोंब मुसमुसलेले वळते अखेर त्यांचे ही वय एक दिवस अटळ सत्यच ते सांगुन जातात सोनेरी झाले म्हणून नव्याची नाही अवहेलना अवमानात नाही कुठलीच प्रेरणा उन-पावसाचे वाचलेच संपुर्ण पुस्तक न बोलता बरेच काही सांगुन जातात ती सोनेरी पानं.

पाहून सयीला माझ्या....

लेखक अज्ञात यांनी शुक्रवार, 04/03/2011 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
हळुवार पावलांनी श्रावण आला अंगणी... सयेची पैन्जने मन तारा झ्हन्कारती... ओशाळतो पारिजातही पाहुनी सयेला माझ्या... अन्थरुनी नक्षत्रांचे देणे लगडतो तिच्या पाया... चिंब कुंतले तिची घेती चुंबने गालाची घुटमळतो अल्लड वारा उडणार्या तिच्या पदराशी... ......छान पाऊस पडतोय, खिडकीत आपण उभे, आणि समोर पारिजात चिंब न्हाऊन निघतोय त्या पावसाच्या सरीत, हळुवार पाणी ओघळतय पानावरून,.....अगदी तसच जस न्हाऊन आल्यावर सयेच्या गालावरून ओघळत... पाहून सयीला माझ्या मनी तारा झ्हन्कारती.
काव्यरस