Skip to main content

कविता

अस्साच आहे तो!

लेखक निनाव यांनी रविवार, 13/03/2011 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
तो नं? - अस्साच आहे पडतो धडतो पण नाही रडत तो उभा राहातो तो पुन्हा उठून भरारी घेतो पुन्हा दम भरुन धरा करते धरशायी त्यास कधी घेतात उंच लाटा त्यास पाशात अग्निबाणच घेतात कधी परिक्षा त्याची पण तो नाही होत अनुत्साहीत खरं तर होते त्याचे मग 'फिनिक्स' अन आगितून जन्मते नव-जीवन तेवढ्याच उस्ताहानं नव्या जोमानं सर्व उभे करण्याच्या जिद्दीनं अस्साच आहे तो...जिद्दी!!

अंगडाई घेतेस तु जेंव्हा

लेखक निनाव यांनी रविवार, 13/03/2011 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
अंगडाई घेतेस तु जेंव्हा हात उचलून मी बघताच वीज भिरभिरते अंगभर जणु लपतेच चंद्र तुझ्या हातात लाजाळुच बसते जशी अंग दुमडून चढत्या श्वासांना तु दाबतेस कसून बावरलेल्या ओठांना चावतेस हसुन हात शोधतात पदर हातातला मग अधिकच मोहक येतेस तु दिसून उडावे केस मोकळे तुझे मग विसरुन उठाव्या नजरा तुझ्या हळुच ठरवून असह्य होते माझेच मला तुझे दिसणे मग पडावे मजवर तुझे मधु यौवन कोसळुन जणु यावी कशी चाल गाण्याची चालुन आरस्यातली छवी यावी बाहेर निघुन गझल उतरावी माझी नश्यात भिजुन आलीस पौर्णिमे ची रात्र मज दिसून अंगडाई घेतेस तु जेंव्हा हात उचलून मी बघताच वीज भिरभिरते अंगभर जणु लपतेच चंद्र तुझ्या हातात लाजाळुच बसते जशी अं

नव्या यमांची नवीन भाषा

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 13/03/2011 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
नव्या यमांची नवीन भाषा मला कळाली पुन्हा नव्याने, नव्या पिकांची नवीन भाषा कठीण मातीत रूजणार्‍या, नव्या बियांची नवीन भाषा पुन्हा नव्याने नवीन फुटली, अबोलतेला नवीन वाचा नवीन दृष्टी, नवे इरादे, निरक्षरांची नवीन भाषा नभात झेपावण्यास देती, ढगांस टक्कर, विजेस चटके नवीन किलबिल, नवीन कुजबुज, नव्या पिलांची नवीन भाषा नशीब आहे विचित्र मोठे, कुणास रुजण्यास खडक-धोंडे कठोर पाषाण भेदणार्‍या, नव्या मुळांची नवीन भाषा अता मुखातून शोषितांच्या, ज्वलंत हुंकार बोलताहे नवीन शस्त्रे, नव्या मशाली, अहिंसकांची नवीन भाषा कुणास बाहूत घेत मृत्यू, विभागतो देह चिंधड्यांनी यमास थोडी दया न उरली, नव

हत्तीदादा हत्तीदादा -

लेखक विदेश यांनी शनिवार, 12/03/2011 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
हत्तीदादा हत्तीदादा कसला आहार घेतो रे ? अगडबंब शरीर बघून शत्रू गार होतो रे ! ससेभाऊ ससेभाऊ कुठला साबण वापरतो ? शुभ्र रेशमी अंगाला डाग एकही ना पडतो ! अस्वलकाका अस्वलकाका कोणते तेल लावतो रे केस नेहमी दाट काळे गुपित काय सांग बरे ? हरणा हरणा - थोडं थांब कसले बूट घालतो सांग ? उड्या मारत चपळाईने लांब लांब टाकतो ढांग ! माकड माकड - हूप हूप कुठली फळे खातो खूप ? फांदीवरच्या कसरतीने आम्हाला तू करतो चूप ! सिंहराज सिंहराज - कोणत्या चघळता गोळ्या ? त त प प करतो आम्ही ऐकून तुमच्या डरकाळ्या !

तुझे येणे

लेखक निनाव यांनी शनिवार, 12/03/2011 02:39 या दिवशी प्रकाशित केले.
चांदण्या राती पाहाता वाटे असे उशीत मी चंद्रच व्हावे तुझे कुशीत तुझ्या बनावे तरंग हसणार्या लाटाच नदीत जैसे तुझ्या नजरांत बोलतात ती पाने माझ्या प्रेमाच्या गातात ती गीते तुझ्या श्वासांत आहे अशी जादू मोहतात चाफ्याची कोमल फुले येताच तु जीवन होते संमोहीत घेतो मन माझे वसंता चा झोके पाहातो मी आभाळात जेंव्हा कधी दिसतात मज नुसते तुझेच चेहरे मिठित माझ्या यावीस तु असे मध पाण्यात विसावे जैसे बहरावे जीवन माझे तुज परि तारुण्यास लागावे मोहोर जैसे चांदण्या राती पाहाता वाटे असे उशीत मी चंद्रच व्हावे तुझे कुशीत तुझ्या बनावे तरंग हसणार्या लाटाच नदीत जैसे

सुटले हात

लेखक निनाव यांनी शनिवार, 12/03/2011 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
आज असे वाहिले वारे, नाहीच बघीतले तिने वळुन हात सुटले नकळत अमुचे, मन माझे हाय गेले जळुन न दिसली ती तिथे ही, मी गेलो कठिण वाटा पार करुन सुख माझे एवढेच मनी, होतो मी गेलो सर्व तिला हरून भरकटलोच तिचा शोध घेत मी, असा आलो लांब निघुन टाकता पाउल पुढे, पाउलखुणा गेल्या मागच्या मिटून एकत्रच होतो आम्ही निघालो , हातात हात धरून सुटले हात तुझे जेथे प्रवास माझे तिथे गेले संपुन

पैलतीर ...

लेखक विश्वेश यांनी शुक्रवार, 11/03/2011 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
केले अथक परिश्रम गाठाया पैलतीर ... नाही ओलांडू शकलो सखे तुझ्या नयनीचे नीर सोडून सगळे मागे चाललो नव्या देशात ... गुंतले हात सखये मात्र तुझ्या मोकळ्या केसात पुसले सारे संकेत पुसल्या त्या आठवणी ... ओठावर पण अजून रेंगाळती तुझी मोहक गाणी वाटले झालो मोकळा तोडले सगळे पाश वाटले सरले धुके अन झाले मोकळे आकाश पाऊले पुढे नेत होती ... मन म्हणत होते .... मागे फिर नाही ओलांडू शकलो .... सखे तुझ्या नयनीचे नीर

दुखात सुखाची धून असते ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 11/03/2011 07:05 या दिवशी प्रकाशित केले.
सगळेच संपून गेलेले असते ती धडपड ... जागरणे .... धावपळ ... धडधडणे ....!! नि उरतो फक्त एक न मिटणारा आवंढा आई गेली नि फक्त उरले निव्वळ अश्रू न कळत ....न जुमानणारे ...! सगळे बधीर ..!! ते क्षण …. ते वातावरण .... सगळे सुन्न... अबोल ... अश्रू फक्त सोबत ...कधीपण ...! एका नंतर दुसर्याचे घनघोर टाहो....
काव्यरस

आलो असा मी नजरेत

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 11/03/2011 03:03 या दिवशी प्रकाशित केले.
आलो मी असा नजरात कुणाच्या न मी आलो तुझ्या प्रकाशात आज मी असा लपुन राहिलो रक्ताळलो, खरचटले किती, किती मी पडलो वस्त्रच तुझ्या वाटेस, असा त्यास चिटकलो तो म्हणाला मंदिरात जा तु , देव तेथेच भेटतो राहिलो उभा समोर मी, तरी न त्यास दिसलो प्रतिक्षेच्या लाटांवरी सवार, असा मी वाहिलो बुडालो-उभारलो असा, किनारी न मी लागलो!

उठवू नका मज आता

लेखक निनाव यांनी गुरुवार, 10/03/2011 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
उठवू नका मज आता, मी उरलो जिवंत नाही करू नका चर्चा माझी, कुणाच ज्याची खंत नाही उकरा न शोधा राख माझी, मी अजुन थंड नाही सोबत माझ्या जळले ह्रदय आता ते शिल्लक नाही कैदेतुन वेदनांच्या सुटले आजवर कुणीच नाही नाहीच मी मज आठवण्यात काही एक अर्थ नाही भेटु असे पुन्हा कधी तरी वेगळे आपले मार्ग नाही तुझ्या वरी निष्ठेचे परिणाम कुणासही वेगळे नाही रस्त्यावर उडलो धूर होऊनी आता सावली नाही दिसलो कुठे भासच असावे मी उरलो जिवंत नाही