Skip to main content

कविता

कविता ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 21/03/2011 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
चला मस्त तारुण्य फुललेय जरा मजेत जगूया कसे जगायचे त्याचे स्वातत्र्य घेऊया कशे प्रेम करायचे त्याचे गणित आपणच ठरवूया कशाला करायची कुणाची कॉपी आपण आपल्या पद्धतीने जगूया चला जरा मस्त सूर लावूया शोभादर्शक नि त्यात रंगीत काच तुकडे कसे छान शोभादर्शक बनते तसे काही तरी करुया प्रेमाचे क्षण आपल्याला हवे तसे आपल्या मनात मांडूया जमेल [?] खरेच जमेल ..! प्रयत्न करुया ..!! कशासाठी कुणाला लाजून प्रेमाचे सूर लपवायचे कुणावर असेल प्रेम तर कशासाठी दडवायचे ? ती आली त्या दिवशी कसे ढग भरून आले होते निळ्या निळ्या साडीमध्ये तिचे मन फुलत होते काळेभोर डोळे नि मस्त चेहरा तारुण्याचे एक
काव्यरस

असेच काही

लेखक निनाव यांनी सोमवार, 21/03/2011 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
पाहाता वाट तुझी विचार वेडे येत राहिले फुले उमळली चंद्र सरकले पहाट झाली तु येशीलच आता असेच वाटतच राहिले वेडे प्रेम! वेडा मी. जग हसतच राहिले. तु येशील का खरंच? प्रश्न पडत राहिले ज्ञात असुन उत्तर, तरी विचारत राहिले उजाडण्याची वाट कशी बघतात सुर्यफुले मन माझे टक्क तुझी वाट बघत राहिले तु बघतच असशील चंद्र आकाशतले म्हणून व्हावे मी चंद्र असे वाटत राहिले आभाळात बसून मग तुला पाहात राहावे असेच अजुन न कळे पण बरेच काही...! पाहाता वाट तुझी विचार वेडे येत राहिले फुले उमळली चंद्र सरकले पहाट झाली तु येशीलच आता असेच वाटतच राहिले वेडे प्रेम! वेडा मी. जग हसतच राहिले.

प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी शनिवार, 19/03/2011 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या मते सांग माला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ? मनाने मनावर केलेल प्रेम.... की नजरेच सौंदर्यावर असलेल प्रेम हे प्रेम असतं ? खर पाहता प्रत्येक जण प्रेमात, ह्या दोन्ही गोष्टींना महत्व देत असतो । प्रत्येकाच्या दृष्टीने फक्त... दिलेल्या'इम्पॉर्टन्स'च्या'पर्सेंटेज'मध्ये थोडासा फरक असतो । तुझ्या मते सांग माला प्रेम म्हणजे नक्की काय असतं ? आईने-मुलावर,नवऱ्याने-बायकोवर,मित्राने-मैत्रिणीवर केलेल प्रेम.... की माणसाने माणसावर केलेल प्रेम हे प्रेम असतं ? खर पाहता प्रेमात नात्याला फारस महत्व नसतं । कारण प्रेमाच्या ओलाव्याने नात फुलत असतं... पण नात असल्याने त्यात प्र

रोज कौतुकात दंग बायको जरी ,

लेखक विदेश यांनी शनिवार, 19/03/2011 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
( चाल: आज गोकुळात रंग खेळतो हरी - ) रोज कौतुकात दंग बायको जरी , लाटणे जरा जपून आज बघ करी |धृ | तोच मित्र रोज सिगारेट ओढतो थेट खिशातून तुझ्या नोट काढतो , गुंतवुनी बोलण्यात चहा उकळतो - सावध केले मी तुला कितीदा तरी |१| सांग मित्रमंडळास काय जाहले ? कुणी गंडविल्याविना कुणा न सोडले ! ज्यास त्यास लुटण्याचे चंग बांधले - एकटाच वाचशील काय तू तरी |२| तू कधीच रंगढंग नाही उधळला ! मित्रमंडळात तरी कसा गुंगला ? तो पहा - चंडिकेस पत्ता लागला ... हाय, धावली धरून लाटणे करी |३|
काव्यरस

रंगताना रंगामध्ये

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 18/03/2011 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
रंगताना रंगामध्ये यमुनेच्या तिरावर, आवळीच्या झाडावरी दडुनिया बसला गं, नटवर गिरिधारी पाहुनिया राधिकेला, गुपचिप कान्हा आला घेऊनिया पिचकारी, नेम धरितो मुरारी सोडीयेली धार कशी? सररररर रंगताना राधा बोले अररररर बावरता राधा पळे, असे कान्हुला तो छळे तरी चुकेचिना लळे, सावळ्याच्या चाळ्यामुळे मग राधा करुणेने, बोलू पाहे केविलवाणे रंगलेले रूप म्हणे, आहे मला घरी जाणे आतातरी थांब ना रे.....! कान्हा, आतातरी थांब ना रे.....! अरे थांब गिरिधारी नको मारू पिचकारी, रंगामध्ये भिजविशी किती रे मुरारी ...IIधृ०II माळ तुटली कशी?

चित्त रमले हरिपायी ....

लेखक विश्वेश यांनी शुक्रवार, 18/03/2011 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
चालीवर लिहिण्याचा पहिला प्रयत्न ... सोडली जुनी वहाणे .... चाललो पंढरीचे ठायी .... चित्त रमले हरिपायी .... चित्त रमले हरि पायी .... आला न्यानियाचा गाव .... जमले सारे रंक नि राव .... हरिनामाच्या घोषात ... उभा आसमंत न्हाही चित्त रमले हरिपायी .... चित्त रमले हरि पायी .... रूप पाहता लोचनी .... तृप्त जाहलो ध्यानीमनी .... पाहून सावळा मनोहर .... भान हरपून जाई .... चित्त रमले हरिपायी .... चित्त रमले हरि पायी .... विसरुनी रोजचा रहाट .... झाली नवीन पहाट झालो कधी मोकळा .... माझे मलाच कळले नाही ... चित्त रमले हरिपायी .... चित्त रमले हरि पायी ....

वय

लेखक शुचि यांनी गुरुवार, 17/03/2011 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
वरील मंडल श्रेयअव्हेर - सौजन्य जाल नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई आपल्याला उमजते? नक्की कोणतं वय असतं जेव्
काव्यरस

प्रलय

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 17/03/2011 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
प्रलय निनादतो शंख कुणाचा डमडमतो डमरू संगे महारुद्राने का उघडला तिसरा नेत्र नि:संगे विखार तो डंख शेषाचा कडकडतो दामिनी संगे सागराने का बुडवला भयभीत मित्र अंतरंगे पसरतो पंख तमाचा घणघणतो मृदुंग संगे कालाग्नी का चेतवला भाजूनी आकाशछत्र दुभंगे ढळतो पंथ पृथ्वीचा धडधडतो उल्काप्रपात संगे हलाहल तो पचवलेला कंठही लालीत आज रंगे |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१७/०३/२०११)
काव्यरस

स्वप्नसखी

लेखक अनंत भावे यांनी गुरुवार, 17/03/2011 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी कविता लिहू लागलो,तुला मनात ठेउन भारावून गेलो मी,प्रिये,तुला प्रत्यक्ष पाहुन ते रुप,ते लावण्य कसे मनात साठवावे तुझ्या नशिल्या डोळ्यातून किती मद्य प्यावे तुझ्या मोहक चेहरयात गेलो मी न्हाउन भारावून गेलो मी,प्रिये.......................!!१!! तुझी चाल,तुझ्या बोलण्याला तोड नाही गर्व,स्वार्थीपणा याची जरासुध्दा जोड नाही कसा जगू आता मी क्षणभर जरी विसरुन भारावून गेलो मी,प्रिये.......................!!२!! माझ्या जीवनातील आता तूच प्रकाश आहे केवळ तुझ्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ आहे तुझ्या प्रकाशाने गेले माझे जीवन उजळून भारावून गेलो मी,प्रिये.......................!!३!!