Skip to main content

कविता

मी आहे एक सामना

लेखक मुक्तसुनीत यांनी बुधवार, 30/03/2011 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी आहे मी आहे एक सट्टा पाच हजार कोटींचा (सगळे खेळाडू नि बुकी मिळून) मी आहे एक कमांडो स्क्वाड काही डझनांचा (पोलीस बिलिस चिल्लर सोडून ) मी आहे एक खेळ बावीस जणांचा (बदनाम झालो युद्ध युद्ध म्हणून) मी आहे एक झिंग मी आहे शिव्यांचा पाऊस मी आहे टाळ्यांचा कडकडाट मी आहे एक ईर्षा मी आहे चढलेला त्वेष मी आहे दडपलेला द्वेष मी आहे एक भोळसट प्रार्थना मी आहे एक करोडोंची संधी मी आहे एक जिंकल्यावर मारलेली आरोळी मी आहे एक हरल्यावर केलेली आत्महत्या मी आहे एक दिवस काल आणि आजसारखाच. मी आहे एक सामना. एकशे चाळीस कोटी लोकांनी पाहिलेला (कामधाम बाजूला ठेवून )

साखळीतल्या कुत्र्यावर -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 29/03/2011 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
साखळीतल्या कुत्र्यावर - ते खूपच माया करती ; ' माया ' नसल्या नात्यावरती ते का डाफरती ? त्यांच्या भ्रष्ट संपत्तीची उधळण होते सगळीकडे ! माझी नजर मात्र वळते - माझ्या गळक्या खिशाकडे ? रस्त्यावरून जाताना , एक भिकारी दिसतो ; उपहासाने माझ्याकडेच पाहून का हसतो ? धडपड माझी चालू आहे - पतंग उडवण्यासाठी ! दोर राहू द्या - रीळहि साधे नाही , सध्या हाती ! एकेकटा 'मी ' रस्त्यामध्ये गर्दी करीत असतो ! गर्दीच्या खिजगणतीमध्ये कुठेच 'मी ' का नसतो ?
काव्यरस

मज्जा आहे बुआ ....

लेखक विश्वेश यांनी मंगळवार, 29/03/2011 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मुलाची एक मैत्रीण आहे खास, एका कामवाल्या बाईची गरिबाघरची पोर आहे ... दोघांचे छान जुळते . मला नेहमी वाटायचे कि काय बोलत असतील हे एकमेकांशी ?

कधी सरणार ही सांज

लेखक निनाव यांनी मंगळवार, 29/03/2011 02:51 या दिवशी प्रकाशित केले.
कधी सरणार ही सांज कधी निजणार मन आज मंद सुलगते आहे ओल्या धुराखालची आग वाहते आहे भरुन इतुके मनी झरेच झाले आज पाउल पुढे पडतांना दिशा गुंतत आहेत आज धुकेच धुके आहे समोर न दिसते आहे काही आज अशी हरविले आहे मी न ओळखे आज मज कुठली वाट न मावे पदरात माझ्या आज एकटीच वाढे हि अंधारी रात्र सरकते आठवणींचे थेंब अलगद काजळ पुसते मी पसरते आज कधी सरणार ही सांज कधी निजणार मन आज मंद सुलगते आहे ओल्या धुराखालची आग

श्वास श्वासात...

लेखक गणेशा यांनी सोमवार, 28/03/2011 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
श्वास श्वासात... कोण कोणात... जीवनाची धावाधाव !! भासांचाच भास... मनाची आरास... पायांचा भ्रमन नाच घातावर मात... लढणारी पात... मरणावर जीवन सरशी अंतरीचा नाद... ह्रदयाची साद... घे आयुष्याची गिरकी !! -- शब्दमेघ

समाजाच प्रतिबिंब

लेखक स्वर भायदे यांनी सोमवार, 28/03/2011 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
मी असा मी तसा मी कसा जसा भित्रा ससा मी स्वार्थी हो मी स्वार्थी करतो फक्त तेजाची आरती देश माझा मी नाही देशाचा ना मी माझ्या पेशाचा मी शिख, मी हिंदू मी पारशी झाले सगळेच स्वार्थी

आयुष्य साधेपणे जगत गेला ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 28/03/2011 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
तो आयुष्य अगदी साधेपणे जगत गेला उगाच खर्च नको म्हणून नुसता काटकसरीने जगला स्वताच्या पोटाला चिमटा घेत ह्याचे त्याचे करीत गेलां मध्यम वर्गातला असा शिक्का स्वताच मारून घेतला शेव-पुरी पाणी पुरी घरीच करून खायचे काटकसर करून करून आयुष्य जगायचे लग्न झाले बायको पण साधी सुधी मिळाली हनिमूनला न जाता घरीच गात बसली डोहाळे डोहाळे लागले फक्त चिंचा खाण्याचे स्वप्न त्याना कधी पडायचे एकादशीचे खरे म्हणजे बर्यापैकी पगार होता त्याचा पगार झाला म्हणजे घरी पेढे आणायचा देवापुढे ठेऊन घरी प्रसाद वाटायचा कधीतरी चार आण्याचा गजरा आणायचा नवरा मात्र उदार असे वाटून ती सुखावून जायची चालण्यासा
काव्यरस

भाकीत

लेखक दीपा माने यांनी रविवार, 27/03/2011 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
का असा लोपला हा चंद्र मेघडंबरी का शांत झाल्या अवखळ लाटा किनारी कुठे मंद पवन हळू गुप्त झाला का फुले पानाशी धरतात हा अबोला? दूर देऊळाची समाधी जणु लागलेली तिची शांतता पसरली ही आसमंती की भाकीतसे ह्या नीरव नीरव वेळी कालमानाचे गणित ते चंद्र्मौळी!

फुलपाखरू माझ्या मनीचे....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी रविवार, 27/03/2011 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
मन माझे जणू एक फुलपाखरूच होते.., असंख्य फुलांमधुनी..ते आपला मार्ग काढीतं होते । इतक्यात त्यातले एकच फ़ूल का.. त्यास इतके आवडिले, की त्या फुलावरी जाउनी मग ते.. विराजमान झाले । घेता गंध चाखता मध.. त्यास ते अपुलेसे वाटिले, आता विसावे इथेच आपण.. हे स्वप्न त्याने पाहिले । इतक्यात कुणीतरी येउनी फ़ूल ते.. तोडूनिया नेले, विसाविले पाखरू क्षणी त्या.. धरतीवर पडले । खाली पडता असे अचानक.. स्वप्न सारेते मोडूनी गेले, भान येता मग कळले त्यास.. फ़ूल आपुलेते कधीच नव्हते । हे सारे कळल्या वर मगते.. सैरा-वैरा उडू लागले, फुटल्या वाटी जाउनी तेथे.. त्याच फुलास ते शोधू लागले । वणवण फिरले शोधूनी थकले..

शत्रु समोरून थेट वार करुन गेला -

लेखक विदेश यांनी रविवार, 27/03/2011 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
शत्रु समोरून थेट वार करुन गेला - मित्र मिठित पाठीवर वार करुन गेला ! मैफिलीत हास्यरंग उधळण्यास आला सुतकी चेहऱ्यांस नमस्कार करुन गेला ! सुखाचाच शोध घेत रडत जन्म झाला - तिरडीवर मात्र आज छान हसुन गेला ! पौर्णिमेस गोल चंद्र पाहण्या विसरला , अवसेला काजवाच चकित करुन गेला ! भ्रष्टांचा देवळात सुळसुळाट झाला सचोटिचा देव तिथुन कधिच पळुन गेला !