Skip to main content

कविता

आसमंतात तारे सर्व निळेच , नाहि का?

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 08/04/2011 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
आसमंतात तारे सर्व निळेच , नाहि का? नजरेत भरतील मात्र सर्वेच, तसे नाही. पानं झाडांवर किती तरी हिरवे, बघ जरा पण सुखावतील नजरांना सर्वे, तसे नाही. मग प्रेम तरी का व्यक्त व्हावे माझे मग का मी वेड्या सारखे वागावे माझे वेडेपण आवडेलही कुणाला पण तुलाच आवडेल, तसे नाही. प्रेमाच्या परिभाषेत बसणारे शब्द सारे बसतील तुझ्या-माझ्या भाषेत, तसे नाही. हातात धरून हात कदाचित धरु ती वाट अन मन माझे शोधेल एक घर पाखरांचे फुलतीलही स्वप्न कदाचित त्या बागेत पण येईल वास त्या फुलांस, तसे नाही. आसमंतात तारे सर्व निळेच , आज ही. चमकतील मात्र सर्वेच रात्री, तसे नाही.

<पेयनिष्ठ पेताडाचा कर्मदरिद्री बाटलीभंग>

लेखक लंबूटांग यांनी गुरुवार, 07/04/2011 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा बसे उकिडवा बाटली उघडून चखणा खातो कर्रम कुर्रम प्रचंडकुंथी वायूप्रदूषण धडाम धुडूम्म धडाम धुडूम्म शेव न चकली उडतो फन्ना पेला भरीतो आणिक एक आता जगाची सोडून चिंता फाड फाडतो इंग्लिश भेदक ग्लेन्मोरेन्जी यथेच्च ढोसून निरर्थ काही बर बर बरळीत शिग्रेट बीडी ओढून ओढून वूक्खु विक्खी खोकत खोकत खरडत खुरडत सावरि धोत्रा त्रेधा तिरपिट विचित्र मुद्रा बाथरूमचा कडाकोयंडा जाईजाईस्तो घडे अभद्रा आकाशातील सप्तढगावर ह्याला फाट्यावर त्याला फाट्यावर मग खंबा तो संपेस्तोवर टांगा पलटी घोडे फरार Disc

जा हसत दूर जा

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 05/04/2011 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
जा हसत दूर जा आसवांची अखंड धार नको आशेचा एक आणखीन नविन किरण नको जा हसत दूर जा त्रासलेला तुझा होकार नको घाव घातलेल्या ओंडक्यासम ह्रदयावर प्रेमाचा पुन्हा नवा अंकुर नको जा हसत दूर जा सोडणार्‍या साथीचा आधार नको परत परतण्याचा विचार नको ह्रदयावर नवीन वार नको जा हसत दूर जा मनाशी आता कुठला ही धागा नको तुटणार्‍या या नात्याला आशेचा आणखीन एक बंध नको जा हसत दूर जा आसवांची अखंड धार नको आशेचा एक आणखीन नविन किरण नको ---- शब्दमेघ

एक त्रागा सुनेचा

लेखक विदेश यांनी मंगळवार, 05/04/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : एक धागा सुखाचा -) एक त्रागा सुनेचा , शंभर त्रागे सासूचे - घरोघरी हे चित्र माणसा , तुझिया संसाराचे ! तू असशी जरी कर्ता तगडा , सासू सुनेचा बघशी झगडा - सुटकेसाठी करशी नाटक - तूच आजारांचे ! उचलबांगडी बालपणाची , धुळीत स्वप्ने तारुण्याची - जीर्ण माय मग उरे शेवटी - अजीर्ण अर्धांगीचे ! सासू सुनातें बघतो कोणी , एक सारखी बसती फुगोनी - कुणा न दिसले , भांडणात त्या - हाल बिचाऱ्याचे !
काव्यरस

मोज्-माप किती...

लेखक निनाव यांनी मंगळवार, 05/04/2011 03:33 या दिवशी प्रकाशित केले.
बघत आभाळा कडे गेल्या निघून प्रहर किती आले किती गेले किती मनी माझ्या भाव किती मोजलेच कुणी श्वास मिळाले कुणास किती घेतले जितुके मिळाले, सोडले कुणास ठाउक किती स्वप्नांच्या प्रवासात काढले का डोळ्यांचे कुणी तिकिट कधी गेले किती, भिजले किती, परतले किती, विसरले किती वाटांनी मोजले का कधी अंतर पार केले किती थांबले किती, आले किती, गेले किती, न परतले किती कुणाची लागली चाहुल, लागली झोप कुणास किती जागले कोण, झोपले कोण, प्रश्न आहेत अनुत्तरित किती प्रेम झाले, राग आले, क्लेश झाले, द्वेश झाले किती झुकले मन किती, वाकले मन किती, तुटले किती, जुडले किती