Skip to main content

कविता

पत्राचे दिवस ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 21/04/2011 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी कसे छान दिवस होते तारुण्याचे कसे एक गाणे होते पत्र येईल येईल म्हणून मन वाट बघायचे निळ्या पत्रात मन हरवून जायचे शब्दांची रांगोळी कशी छान वाटायची निळ्या निळ्या आभाळात कशी पाखरे उडायची तिच्या घरासमोरचा पिंपळ सळसळताना दिसायचा संध्याकाळी ती खिडकीतून दूरवर नजर टाकीत वाट बघायची [अशी कल्पना त्याच्या डोक्यात यायची] नुसत्या आठवणीने किती बहरून जायचे मन जुनी पत्र चाळताना किती हरवून जातेय मन ...! पोस्टमनची वाट बघता बघता कसा दिवस हरवून जायचा स्वप्नात तिचा भास छळत राहायचा ..!! पत्राची एक निराळीच गंमत होती तिच्या लिहिलेल्या शब्दाशब्दावर जीव फुलत होता अधून मधून चोरून पत्र वाचत र
काव्यरस

वासंतिका‏

लेखक स्पंदना यांनी बुधवार, 20/04/2011 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
स्वागता पुन:र्मिलनाच्या उत्तरा अन रविच्या घेऊन बहार साचा आला वसंत आला || विरह तो सहा मासांचा तिज शुष्क थंड शिशिराचा गर्भात फुलवीत आशा पुन:रुपी वसंत आला || रंगेल सोहळा आता विरहीत दोन जीवांचा उभारीत गुढ्या पर्णांच्या विलासी वसंत आला || लेऊन गर्द हिरवाई कोरून पुष्प काशिदाही रसरशीत फळे ही पदरी मिलनास अधिर अवनी ही || आला वसंत आला .......... __/\__ अपर्णा
काव्यरस

भातुकलीचा खेळ ...

लेखक विश्वेश यांनी बुधवार, 20/04/2011 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच वर्षांची आपली निस्सीम मैत्री "संपवून" ठरवले करूयात दोनाचे चार हात ... वरवरून सगळे छान होते सगळा आनंद होता ...

पावसात भिजतांना

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 20/04/2011 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
बरसणार्‍या मेघधारांना वार्‍यावर पेटतांना पहायचेय तिला एकदा या पावसात भिजतांना सरीवर सर कोसळून हे कृष्ण मेघ गडगडतांना पहायचेय तप्त धरेसह माझ्या मनास निवतांना रुसलेल्या गुलाबाच्या कळीला हलकेच उमलतांना पहायचेय क्षितिजावरील इंद्रधनुष्यातील सप्तरंगांना ग्रीष्माचा दिवस सारून श्रावणसांज अवतरतांना पहायचेय जाईवेलास फिरुनी तरुण होतांना ओलेत्याने तिला माझी कविता गुणगुणतांना पहायचेय मोहरून तो कोकीळकंठ पालवतांना पहायचेय तिला एकदा या पावसात भिजतांना पहायचेय तिने मला एकदा, मी तिला चिंबून पाहतांना |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२०/०४/२०११)
काव्यरस

सावकारी ही अशी की...

लेखक बन्या बापु यांनी बुधवार, 20/04/2011 03:52 या दिवशी प्रकाशित केले.
सावकारी ही अशी की, कुणी कुणाचा नाही, हसलो जरी मी, ते हसू मात्र माझे नाही. खिडकी माझी रिती आज, चांदणे मात्र नाही, चंद्र आहे नभात तो, झेंड्यात माझ्या नाही.. तोच म्हणतो कि मी, सूर्य आहे उद्याचा.. जाणीव अस्तिवाची, काजव्यास उरली नाही .. तू आलास तर परत जाशील, रित्या हाताने आज इथे, बड्व्याच्या गर्दीमध्ये विठ्ठल माझा तु नाही.. इथे आहेत सगळे शहाणे, वेडा मात्र कोणी नाही, आहेत हिंदू मुस्लीम सगळे, माणूस मात्र कोणी नाही .. राहुन वाटते हे, का जगलो असा मी ? आयुश्यात मला, सावकारी जमलीच नाही. घेऊन जा आता, मज तुझ्या संगे म्रुत्यु , ज्यांना म्हंटले आपले, ते सगे ( कोणी ) माझे नाही.
काव्यरस

प्रेरणा (शिर्षक बदल).

लेखक निनाव यांनी मंगळवार, 19/04/2011 03:01 या दिवशी प्रकाशित केले.
***नवीन शिर्षक कवितेच्या संदर्भास अधिक जवळ आहे असे वाटले, म्हणून हा बदल.*** तु आलीस? - चला बरं वाटलं कुठे गेली होतीस मला असंच सोडून? कल्पना तुला काही? दमलो किती मी होतो तुला इथं तिथं शोधून! प्राणच गेले होते जणु माझे निघून थांग पत्ता नव्हता ठाउक कुणा - पुरता थकलो होतो विचारून!! मात्र, देव कॄपेनं माझ्या परतलीस पुन्हा - हायसं वाटलं तु आलीस!! - चला बरं वाटलं माझे हातच सुटले होते हाता मधुन आणिक श्वास सुटले होते श्वासा मधुन नसती आलीस पुन्हा तु जर आलीच नसती कधी पुन्हा तु परतण्यासाठी अगं वेडे सापडलो तरी असतो का इथे तुला? कल्पनाच नव्हती तु अशी येशील परत करशील मजवर प्रेम तसंच काही-का-होईना.. असो!!