Skip to main content

कविता

माणसान्चा देव

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 08/05/2011 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
माणसान्चा देव रात्र झालि बाप्पा झोपला,माणसान्वरति भरपुर कोपला, दिवसभर देतात त्रास,काढुन ठेवतात एकच घास.
काव्यरस

लोकल शोध-

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 07/05/2011 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
आंबिवली ठाकुर्ली डोंबिवली विक्रोळी ढुंडाळली चिंचपोकळी दातीवली कळंबोली आयरोली घणसोली उमरोली धाव घेतली कांदीवली खोपोली डोळावली केळावली आंबिवली बघून झाली घुमुन घुमुन मायला इज्जत गमावली छोकरी हाती नाय आली पुरब पश्चिम भेंडी पालथी घातली लोकलची गुंतावळी हार्बर मार्गावर कुणी नव्हतीच मुळी आपलेवाली घरवाली लोकल पोरगी शोधायला दरदर भटकलो चारो ओर मरमर भोईसर दहिसर अगदी पार खारघर वरी देख्खानी उल्हासनगर कोंबून लोकलमधे चिंबून खारावली पांढरी पॅन्ट झाली काळी आंबिवली ठाकुर्ली डोंबिवली विक्रोळी नव्हतीच अपल्या साली भाळी
काव्यरस

Two Friends

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 07/05/2011 06:02 या दिवशी प्रकाशित केले.
Two Friends
Little John was thin and boney; His fat friend had a name Tony ||1|| Once both were gone in the woods; They had school bags without any food ||2|| Tony feels hungry in the after noon; John said I'll get the food very soon ||3|| John climbs on a Mango tree as he saw; a watchman came while plucking up mangoes raw ||4|| John jumped down and ran away fast; Watchman caught Tony at the last ||5|| - Pashanbhed (Stone breaker) 07/05/2011 4:15AM
"अर्रर्रर्रर्र...
काव्यरस

जर तू असता तर

लेखक नगरीनिरंजन यांनी शुक्रवार, 06/05/2011 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
जर तू असता तर तुला दिसले असते सुरे घेतलेले हात कल्ले कापलेलं शरीर निळ्याशार पाण्यातला लाल ढग तुला दिसले असते अजस्त्र शरीरावरचे निर्जीव भासणारे डोळे दिसलीही असती त्यात वेदना पण नसती दिसली दया याचना जर तू असता तर तुला दिसले असते काळे पिवळे पट्टे आणि त्यावर लाल जखमा भेदरलेले गोड बछडे आणि जमिनीवर आपटलेली शेपटी दिसले असते तुला थंड भासणारे हिरवे-पिंगट डोळे क्रोधाचा पेटलेला त्यात वणवा पण तुझ्या प्रार्थनेची वानवा जर तू असता तर तुला दिसले असते कुर्‍हाडीचे घाव सोसणारे महाकाय मूक वृ़क्ष चूड घेतलेल्या हातांनी पेटवलेले भीषण वणवे उघडे बोडके डोंगर त्यावरचे तुझे मंदिर आणि हातापाया न पडता समोर कोसळणारी झाडे

तुझी आठवण येते....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी गुरुवार, 05/05/2011 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण येते.... कितीही विसराव अस म्हणालो तरी, का..? कुणास ठाऊक पण...। तुझी आठवण येते.... एकट्यानेच चालताना वाटेवरूनही, तू सोबत असल्याची खोटी जाणीव होते आणि मग...। का..? कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते.... अचानक येऊन जातो एखादा मिस कॊल ह्या मोबाईलवर, आणि तो तुझा नसल्याची खंत वाटून जाते आणि मग...। का..? कुणास ठाऊक पण-तुझी आठवण येते.... कुठून तरी एखादा आवाज कानी येतो खोलवर जाऊन ह्या हृदयाला भिडतो, आणि तूच पलीकडे असल्याचे तो भासवून जातो आणि मग...। का..?

एक संध्याकाळ अशी....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी गुरुवार, 05/05/2011 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
एक संध्याकाळ अशी...., गजबजाटात हरवलेली । गप्पा-टप्पांमध्ये मित्रांसोबत, हसत-खेळत घालवलेली । एक संध्याकाळ अशी...., दुःख सारे ते विसरलेली । सुखद साजिऱ्या क्षणांनी, तुडूंब भरून वाहिलेली । एक संध्याकाळ अशी...., डोळ्यां मध्ये ह्या साचलेली । मिटूनयेत म्हणता डोळे, ओघळुन खाली ती सांडलेली । एक संध्याकाळ अशी...., खाण्या-पिण्यात गुंतलेली । टेर खेचत एक-मेकांची, हास्य-विनोदात गुंगलेली । एक संध्याकाळ अशी...., रंगात साऱ्या ह्या रंगलेली । रंग..संगतीत मिसळून असे हे, चित्र देखणे ते साकारलेली । एक संध्याकाळ अशी....,

खेळ काळाचा....

लेखक हर्षद प्रभुदेसाई यांनी गुरुवार, 05/05/2011 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
थोडासा विचार केलात तर तुमच्या एक गोष्ट लक्ष्यात येईल... की... आपलं हे आयुष्य फक्त, तीन कोनांच्या कोनाड्यात कोंडलेलं असतं । जसं भूत आणि भविष्या मध्ये, हे वर्तमान घुसमटत असतं । ह्या तिघां मध्ये चालू असतो एक अजबच खेळ... वर्तमान धावत असतो जणू, भविष्यास त्या गाठण्या साठी । पण भूत अडवून धरतो त्यास..., भविष्यात त्याने ह्याला विसरूनये ह्यासाठी । पुढे-पुढे जरा जास्तच रंगत जातो हा खेळ... वर्तमान जातो थकून, धावता-धावता त्या भाविष्या कडे । मग भूत येऊन म्हणतो त्यास..., थकला असशील तर..

किल्ली हरविली

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 05/05/2011 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
हरवली आहे एक किल्ली मनाच्या कपाटात बंद केलेली गुपिते ओरखडे न पाडता बाहेर काढणारी हरवली आहे एक किल्ली बंद केलेल्या कानांचे कुलूप उघडून वादविवादात मूकपणे आक्रोशणारे सत्य ऐकणारी हरवली आहे एक किल्ली अपचनानंतर देखील उफ़ाळलेली भूक शमवून दयेची कोठारे उघडणारी हरवली आहे एक किल्ली अन्यायाच्या वणव्यात विझलेली वाणी चेतवून क्रांतीचा वणवा धडधडा बाहेर पाडणारी हरवली आहे एक किल्ली प्रौढत्वाच्या बेडयांमधे जखडलेले शैशवाचे निरागसपण मुक्त करणारी

चोरून चोरून, हो ना?

लेखक उदय के'सागर यांनी बुधवार, 04/05/2011 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी हलकासाच पेपर उचलून मुद्दाम त्यावरच भाजी चिरून कधी उगाच रद्दी निट रचून नि रचेलेली रद्दी मुद्दाम पाडून        चोरून चोरून तू वाचतेस, हो ना? कधी धूळीवर, झाड़त असतांना कधी भांडयांवर, ते घासतांना काचेवर खिडक्या पुसतांना तर पानांवर पाणी घालतांना        चोरून चोरून तू लिहितेस, हो ना ? कधी ते "तेलकट रंग" भिंतींच्या अडून कधी त्या "पेंसिल" तिरक्या डोळ्यातुन कधी ती "पुस्तकं" अरशाच्या नजरेतून तर कधी "वह्या" फरशिच्या प्रतिबिम्बातुन        चोरून चोरून तू बघतेस, हो ना? बापरे!
काव्यरस

वाडा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 04/05/2011 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
वाडा
जुन्या जाणत्या भल्या थोरल्या गोष्टी सार्‍या सरल्या खोबणीत पांढरे झाले डोळे, जाणीवा जणू मेल्या ||१|| काळोखाच्या गर्दीमध्ये हरवले त्याचे दिसणे कुठे पाहुनी कसे वदावे, वर्णन या मुखाने ||२|| डोळ्यांत घातले अंजन जरी, न दिसे जमीन खाली कुरकुरणार्‍या दरवाजांवर कड्याकुलूपांनी नक्षी केली ||३|| ओट्यावरचे दगड कालचे, चालले पायात खाली खांबांवरची कोरीवकामे अजगरासम सरपटली ||४|| ओलावलेल्या भिंती ल्याल्या रंगांचे उडते पोपडे कंदील नाही उजेडाला म्हणून काळवंडले कोनाडे ||६|| डुगडुगणार्‍या जिर्ण पायर्‍या जिना वर घेवू
काव्यरस