उकाड्याची रात्र, भिजलेली दुपार
उकाड्याची रात्र :
एक दोन तुर्की चित्रपटांत आपल्या घराजवळचा माळ दिसेल म्हणून काही ऑनलाईन लिस्ट्स चाळतोय.
वारा येतोय का हे पहायला सिमेंट-पाईपच्या कोनाड्यात उगवलेल्या पिंपळाकडे नजर जायची.
स्ट्रीटलाईट्सचे पिवळट प्रकाश तेव्हढे मंदसे घरा-दारांतून वाहताहेत.
खिडकीबाहेर आपली उकाड्याची अस्वस्थता जात नाही आणि बाहेरून एखादी आठवण वाहून येत नाही.
दाराबाहेर रिकाम्या कॉरिडॉरला पावलं हवीत.
मिसळपाव