Skip to main content

मांडणी

बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री - अक्कामहादेवी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 10/04/2010 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
अक्कामहादेवी! एक बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री! बाराव्या शतकातील एक अत्युच्च भक्तीच्या मार्गाचा प्रसार करणारी, आगळी वेगळी स्त्री! कन्नड संत साहित्यात तिने आपल्या भक्ती वचनांची जी अनमोल भर घातली आहे त्यासाठी ती कायम स्मरणात राहील. शिवाय ज्या अनोख्या पद्धतीचे आयुष्य ती त्या काळात जगली ते पाहता तिच्या धैर्याची, निश्चयाची, भक्तीची व अलौकिकतेची दादच द्यावी लागेल! तिला बसवण्णा,चेन्न बसवण्णा, किन्नरी बोम्मय्या, अल्लमा प्रभू, सिद्धराम ह्यांसारख्या इतर लिंगायत/ वीरशैव संतांनी ''अक्का'' म्हणजे मोठी बहीण ही उपाधी देऊ केली ते तिच्या सन्मानाचेच प्रतीक आहे.

मिपा अस का झाल?

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 07/04/2010 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा अस का झाल? हो आज खुप दीवसांनी मिपावर आलो आणि काय मजा नाही आली!!शप्पथ वैतागायला झाल.......हे पहील अस नाही व्हायच.हा व्ययक्तिक अनुभव असु शकतो पण काहीजण सहमत असतील अस वाट्त. हे लिहण्यात उद्देश वगैरे काही नाही.सहज लिहतोय,जे जानवल ते.पहील प्रतिसाद वाचायला पण मजा यायची.आज ते लेख काय आणि काय त्या प्रतिक्रिया!!सर्वच पचपचीत वाटल. आणि ते युयुत्सु असे लेख कोणत्या उद्देशाने लिहतात ते काय कळत नाही.आज 'नवे लेख' मधली दोन पाने वाचली व हे लिहावसे वाटले. आपल्याला मंगे..पाव...

युध्दाचा कलाविष्कार

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 02/04/2010 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
आजच मला एक ईमेल आले. वाचताना टचकन डोळ्यांत पाणीच आले. असे काय होते त्या ईमेलमध्ये? कसली होती ती शोकवार्ता? ती वार्ता होती युध्दाने आक्रसलेल्या जीवनाची..... घायाळ झालेल्या लाखो जीवांची....

'आई'[एस.एम.एस.]

लेखक डावखुरा यांनी गुरुवार, 01/04/2010 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता मी रचलेली नाही पण मला ह्या कवितेचा कवी पण माहीत नाही.... ही कविता मला सरळ मोबाईल संदेश[एस.एम.एस.] द्वारे आलेली आहे पण खुप आवडली म्हणुन मिपा रसिकांसाठी देण्याचा मोह आवरला गेला नाही ...... आवड्ली तर अवश्य प्रतिक्रिया द्या.... "आई आहे मंदिराचा उंच कळस... अंगणातील पवित्र तुळस... भजनात गुणगुणावी अशी संतवाणी... वाळवंटात प्यावं असं थंडपाणी.... आई म्हण़जे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी... आणि वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी..."

"चेलुवी"[भारतीय लोककथेच्या सुगन्धाची कहाणी]

लेखक डावखुरा यांनी सोमवार, 29/03/2010 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
"चेलुवी"म्हणजे लावण्यवती तरुणी. 'कथासरित्सागर' या कर्नाटकच्या लोककथासंग्रहातील कथेवर आधारित एक अप्रतिम ह्रदयस्पर्शी हिंदी चित्रपट.(भावलेला) चेलुवी ही एक गरीब कुटुंबात आपली म्हातारी आई आणि बहिणीसह राहत असते. चेलुवीच्या हाती एक विलक्षण रहस्य येते.......ते म्हणजे 'सुंदर,दिव्य गंधाच्या फुलांचे झाड होण्याचे,अन् पुन्हा मानवी रुप धारण करण्याचं.' थोडं मोठं झाल्यावर चेलुवी हे रहस्य आपल्या बहिणीस सांगते, फक्त फांद्या तोडु नकोस असे बजावते.

अमृत महोत्सवासाठी काढण्यात आलेले भित्तिचित्र...

लेखक डावखुरा यांनी सोमवार, 22/03/2010 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
सर जमशेटजी जीजीभाई उपयोजित कला महाविद्यालय्, किल्ला[फोर्ट], दा.नौ.मार्ग, मुम्बई.४००००१.