Skip to main content

मांडणी

पारतंत्र्यदिन!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 15/08/2009 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
mask (खालील लेख हा आठ दिवस सर्व मनोरंजन बंद असल्याने भोगाव्या लागलेल्या मनस्तापाचा झालेला उद्रेक आहे. त्यातून "स्वाइन फ्लू'सारख्या जीवघेण्या समस्येबाबत गांभीर्य नसल्याची भावना झाल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा!) ---- पारतंत्र्यदिन! छ्या! वैताग आलाय नुसता! कुठे जाणं नाही, येणं नाही. नुसतं घर एके घर नि ऑफिस एके ऑफिस.

परिक्षण-गंध (छोटा डॉन स्टाईल)

लेखक विनायक पाचलग यांनी शनिवार, 15/08/2009 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
अखेरीस सात तारखेला 'गंध' प्रदर्शित झाला. अनेक महोत्सवातुन गाजल्यानंतर त्याला प्रेक्षकांपुढे यायला बराच वेळ लागला खरा, पण आता त्याने प्रेक्षकांच्या अपेक्षा पुर्ण केल्या का नाहीत ते येत्या काही दिवसात कळेलचं. पण, माझ्या अपेक्षा पुर्ण झाल्या की नाही ते मात्र मी लिहित आहे.कदाचित माझ्या या लिखाणातुन लोकांनाही हा चित्रपट कसा आहे ते समजेल म्हणुन हा लिखाण प्रपंच. * पहिला प्रश्न म्हणजे 'गंध' हा चित्रपट मी का पाहिला? - 'गंध' हे नांव अनेक फेस्टिवलमधून गाजत होतेच.

मी आणि श्रावण..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 28/07/2009 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण सुरू झाली की, घराघरांतून नॉनव्हेज, अंडी, हेच नव्हे तर काही घरातून कांदा-लसूण सुद्धा हद्द्पार होते. आमच्या घरी कधी श्रावणाच अथवा चातुर्मासाचं स्तोम माजलं नसलं तरी माझी आजी मात्र श्रावण पाळायची. पाळायची म्हणजे कांदा-लसूण खायची नाही. आणि श्रावणात होणार्‍या एकेका सणाची चर्चा सुरू व्हायची. कोणा नवविवाहीतेची मंगळागौर. श्रावणातला सोमवार म्हणजे मंगळागौरीच्या आदलेदिवशी केलेली शिवलिंगाची पूजा. आणि मग उपास. घरात आजी उपास करायचीच सोमवारी तिच्यामुळे खिचडीसारखा अद्वितिय आणि अवर्णनिय पदार्थ दर सोमवारी मिळायचा खायला.

चित्रपट (डॉक्युमेंटरी) परीचयः झेटगिस्ट (Zeitgeist)

लेखक सुचेल तसं यांनी शनिवार, 25/07/2009 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात मित्राने झेटगिस्ट (Zeitgeist) नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्म पहायला दिली. ही फिल्म २००७ मधे पीटर जोसेफ नावाच्या माणसाने बनवली. झेटगिस्ट एक जर्मन शब्द आहे. ज्याचा डिक्शनरीप्रमाणे अर्थ होतो - the spirit of the time; general trend of thought or feeling characteristic of a particular period of time. जवळपास दोन तासांची ही फिल्म खालील तीन भागात मांडली आहे. भाग १. आत्तापर्यंत सांगितली गेलेली सर्वोत्कृष्ट कथा (येशूच्या अस्तित्वाचा शोध): पुरातन काळापासून (धर्म अस्तिवात यायच्या आधीपासून), सूर्याला लोक प्रचंड मानतात.

अटॅचमेंट!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 19/07/2009 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
मनस्वीच्या आयुष्यातील पहिली शाळा संपून एक वर्ष झालं. गेल्या वर्षी मार्चमध्ये तिची शिशु गटाची शाळा संपली. पहिल्या दोन-तीन दिवसांचा अपवाद वगळता ती कधी रडली नाही. नव्या शाळेत गेल्या वर्षी बालवाडीसाठी प्रवेश घेतला, तिथेही रमली. आता नव्या शाळेहून येताना बऱ्याचदा आम्ही तिच्या पहिल्या म्हणजे शिशु गटाच्या "पाखर' शाळेवरूनच बरेचदा जातो. अनेकदा त्यामागचा उद्देश असतो - तिच्या शाळेच्या आठवणी कायम ठेवणं! हा आजार "अटॅचमेंट'चा! भावनिक जवळिकीचा. अशा भौतिक वस्तूंशी माझी कदाचित प्रत्यक्ष नात्यांपेक्षाही जास्त अटॅचमेंट आहे. आणि मुलीचीही तशी असावी, अशी (अनाठायी) अपेक्षा आहे.

कोबडी ती कोंबडी

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 13/07/2009 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिकुल परिस्थीतीवर विजय मिळवण्याकरता लागणारे धैर्य , साहस आणि बुद्धी हा माणसाचा अंगभुत गुण असतो. युद्ध सदृश परिस्थितीत हा हाताला लागला तर विजय नक्की. १९९९ साली कुक्कुट पालन क्षेत्रात मला ३ वर्ष झाली होती. ह्या ३ वर्षात मी रस्त्यापेक्षा मी लीटर्(शिटवडा)वर जास्त फिरलेलो होतो. मी जमा केलेला विदा हा वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस मधे चर्चेचा विषय होता. हा विदा मी रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शेतकर्‍याना वाटायचो. कोंबड्यानी खाल्लेले अन्न, प्राशन केलेले पाणी आणि बाहेरचे हवामान ह्यांची सांगड घातलेला विदा वापरल्यास शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ व्हायची.

जडण घडण २

लेखक सरपंच यांनी शनिवार, 11/07/2009 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव हे सतत बदलत जाणारं संकेतस्थळ आहे. नव्याने आवश्यकता भासलेल्या सोई येथे जोडल्या जात असतात. नवीन सोईंची घोषणा, ओळख करून देण्यासाठी हा धागा दुसर्‍या भागात सुरू करीत आहोत. या आधीचा धागा येथे आहे. सदस्यांना काही अडचणी असतील तर त्या येथे मांडू शकतात.

आणखी एक धरण ??

लेखक पाऊसवेडी यांनी शुक्रवार, 10/07/2009 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत मेधा पाटकर यांच्या कार्याचा आणि त्यांच्या विविध आंदोलनाच्या बातम्या फक्त पेपर किंवा दूरदर्शनवर पाहत होते पण या वर्षी त्यांचा सापळी धरणग्रस्तांसाठी सुरु केलेला लढा जवळून पाहण्याची संधी मिळाली आणि त्याबद्दल मिपाच्या वाचकांना सांगावे म्हणून हा माझा पहिलाच प्रयत्न. माझ्या M.Sc. नंतर मी एका कार्यालयात काम करायला सुरुवात केली आणि त्यच मुले मला हे संधी मिळाली कि मी मेधातायींचा हा सुरु असलेला लढा अनुभऊ शकले.

अगं अगं बशी..! - (अंतिम)

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 16/06/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्रीणींचं नशिब चांगलं .. त्यांच्यामुळे मला बस मिळायची. मी एकटी मैत्रीणींशिवाय उभी असले स्टॉपवर तर आजूबाजूच्या लोकांना माझ्यामुळे बस मिळायची नाही. आमचं वाकडंच ना!! म्हणजेच काय.. तर आम्हा दोन समांतर रेषांना जोडणारी तिसरी रेषा कंपल्सरी हवीच!! *** *** *** *** *** *** एकदा कोणीतरी सांगत होतं की, एका मुजोर कंडेक्टरने कुठल्यातरी स्टॉपवर बस खूप वेळ थांबवून ठेवली . लवकर घंटी मारेना.. त्यामुळे इंजिनियरिंगच्या मुलांनी, ती घंटीची दोरी हळूच सोडवून, पुढे पुढे सरकवत ती ओवलेली घंटी बसच्या बाहेर फेकून दिली.

एफ. एम.

लेखक विनायक पाचलग यांनी रविवार, 14/06/2009 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे एक जुना रेडिओ आहे .झाली असतील त्याला घेवुन एक २६ - २७ वर्षे .आजही चांगला चालतो बापडा !.पण काय करणार, दोन वर्षापुर्वी आमच्या कोल्हापुरात २ खाजगी रेडिओ वाहिन्या(शुद्ध मराठीत चॅनेल) आल्या आणि हा बिचारा रेडिओ काहीही झाले तरी ती चॅनेल आपल्यावर लागु देईना ,मग काय तो गेला माळ्यावर!! आणि तेथे नवीन एक झकास रेडिओ आला. अहो काय भाग्य होत कोल्हापुरचं....इथे एकाच दिवशी दोन रेडीओ चॅनेल आली आणि तीही वेगवेगळ्या समुहांची आणि महत्वाचे म्हणजे दोन्ही प्रींट मीडीयातले. पुर्वी पुण्याला येणे म्हणजे मजा वाटायची.