प्राजुच्या "फुलांची आर्जवे" कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ
मी रविवार दिनांक ९ मे रोजी सकाळी ११ वाजता चित्तरंजन वाटीकेमध्ये पोहोचलो. "आर्जवे फुलांची " हया प्राजक्ता ( प्राजु ) च्या पहिल्या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ. कार्यक्रमाला सुरवात होऊन जवळपास अर्धा-पाऊण तास झाला होता. विशेष म्हणजे प्रकाशित होणार्या कवितासंग्रहाची कवयित्री - प्राजक्ता - काही कारणामुळे समारंभाला उपस्थित राहू शकली नाही.
कार्यक्रम चित्तरंजन वाटिकेत झाडांच्या दाट सावलीत घेण्यात आला होता. मान्यवर पाहुण्यांसाठी टेबल-खुर्च्या आणि इतर उपस्थितांसाठी खुर्च्या ठेवण्यात आलेल्या होत्या. झाडांवर स्पिकर्स लावण्यात आलेले होते. एकूण व्यवस्था अतिशय चांगली झालेली होती.
मिसळपाव