Skip to main content

मौजमजा

तात्या शिंचा अमेरीकेला निघाला...! :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 18/11/2008 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
पासपोर्ट, व्हिसा दाखवून आता अगदी विमानतळाच्या आतल्या कक्षात शिरणार तो मायभूत खाल्लेल्या शेवटच्या जाफरानी १२० पानाची पिचकारी विमानतळावरच्याच त्या छान छान नी सुंदर सुंदर फ्लोअरवर पऽऽचाककन मारावी की काय असं तात्याला वाटत होतं, पण दारावरच्या करड्या अधिकार्‍यामुळे ते शक्य झालं नाही.. तात्याला अपमान गिळावा तसा तो मुखरस गिळून टाकावा की काय, असंही क्षणभर वाटून गेलं! छ्या! अमेरीकेला जायच्या आधीच अपमान सुरू? 'नाही!

राजकुमार (?) साठ वर्षांचा झाला!

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 15/11/2008 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
"परीकथेतिल राजकुमारा स्वप्नी माझ्या येशिल कां ? भाव दाटले मनी अनामिक साद तयांना देशिल कां ?" अशी अस्फुट लकेर नवयौवनांत प्रवेश केलेल्या मुलींच्या मनात उठत असते. बालपणी वाचलेल्या परीकथांमधले राजकुमार झगमगते चिलखत अंगावर चढवून, रत्नजडित मुकुट डोक्यावर धारण करून, अबलख घोड्यांवर स्वार होऊन दौडत येतात, हातातल्या समशेरीने दुष्ट चेटकिणीला मारून तिच्या तावडीत सापडलेल्या राजकुमारीची मुक्तता करतात आणि तिला आपल्यासोबत घेऊन जातात. हे झाले परीकथेतले राजकुमार. आजच्या जगातला एक प्रत्यक्षातला राजकुमार जन्माला आला तेंव्हा त्याचे आजोबा जगातल्या सर्वात मोठ्या साम्राज्याचे सम्राट होते.

माझा काऊ.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 13/11/2008 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा.. माझी माऊ :) माऊवरून प्रेरणा घेऊन आम्हीही एक काऊ पाळला आहे त्याची चित्रे इथे टाकत आहोत... काय? एकदम स्मार्ट दिसतो की नाही आमचा काऊ? :) तर सादर करत आहोत आमचा काऊ. आज आमचा काऊ तुमच्याशी थोडा संवादही साधणार आहे! :) १) मी आहे तात्याचा काऊ! त्याच्यासारखाच अंमळ वेडझवा! :) २) साला, हा मराठी माणूस आंतरजालावरही जास्त करून भांडतांनच दिसतो!

आम्ही आणी क्रेडिट कार्ड वाली कन्या !!

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 12/11/2008 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
आपण कुठल्या ना कुठल्या कामात असताना ह्या क्रेडिट कार्ड वाल्यांचा फोन येत नाही असे होत नाही. आधि मला सुध्दा संताप यायचा पण मग आता आम्ही ह्याचा आनंद घ्यायला शिकलो आहे, आणी आता तर आमची खात्रीच झाली आहे कि हे फोन आम्हाला तणावमुक्त करण्यासाठीच येतात. आपल्यालाहि ह्यातुन काही फायदा व्हावा ह्या सदहेतुने आमचे संभाषण येथे देत आहोत. (ह्यात कोणालाहि दुखवायचा हेतु नाही.) वेळ :- दुपारी २.१५ (गरगरित जेवण करुन नुकतेच आडवे झालो आहोत) कन्या :- गुड आफ्टरनून सर, आय एम कॉलींग फ्रॉम दरोडा बॅंक. आम्ही :- जय महाराष्ट्र !

पहिला दक्षिण कॅलिफोर्निया मिसळपाव कट्टा - ८ नोव्हेंबर २००८

लेखक नंदन यांनी मंगळवार, 11/11/2008 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, या शनिवारी ८ नोव्हेंबरला दक्षिण कॅलिफोर्नियातील पहिला मिसळपाव कट्टा - मराठी वाहिन्यांच्या भाषेत सांगायचे तर - मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. काही दिवसांपूर्वी डांबिसकाका सॅन डिएगो मुक्कामी आले असताना त्यांची प्रथम भेट झाली होती. तेव्हाच मुंबई, पुणे, बंगळूर, जर्मनी, अमेरिकेचा पूर्व किनारा आणि बे एरियातील मिपाकरांप्रमाणेच लॉस एंजेलीस - सॅन डिएगो परिसरातही लवकरच एक कट्टा भरवावा अशी मनीषा पिडांकाकांनी बोलून दाखवली होती. त्याप्रमाणे मिपावर हाळी देऊन घाटावरचे भट, भाग्यश्री आणि मी यांनी काकांच्या घरी भेटायचं असं ठरवलं.

(धोरण) देवद्वार छंद

लेखक चेतन यांनी सोमवार, 10/11/2008 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
अजुन एक प्रयत्न देवद्वार छंदातला (ह. घ्या हे वे न सा) कडक नियम शुद्धलेखनाचे धोरण मिपाचे ठरतसे || मिपाचे मालक विसोबा खेचर मारी फाट्यावर दुढ्ढाचार्या || करी अट्टाहास जर कोण येथे जावे त्याने तेथे खुशालच || मिपा नाहि तोटा कधी प्रतिभेचा कट्टा हा सर्वांचा वाढतसे || छंद उपक्रम सुंदर वाटता सांगाति असता धोंडोपंत || कवितेस सोपा देवद्वार छंद 'चेतन'ही छंद जोपातसे || एक प्रश्नः जोडअक्षर एक गणले जाते की दीड (दीड असेल तर वरची रचना चुकीची आहे) तज्ञांनि मार्गदर्शन करावे
Taxonomy upgrade extras

वारी, गिरगावातील समर्थ भोजनालयाची!

लेखक संताजी धनाजी यांनी बुधवार, 05/11/2008 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, एक दीड आठवडयापूर्वी तात्यांनी "आजची खादडी" मध्ये एक मस्त माश्यांच्या थाळीचे चित्र [म्हणजे फिश बरं का ;) ] टाकले होते. आणि खाली ब्लॉगचा दुवा होता. तो वाचुन झाल्यावर समर्थ भोजनालयाला भेट देण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. पाणी सुटले होते हो तोंडाला! आणि दिवाळीत सासुरवाडीला [दादर] चाललोच होतो तर म्हटले जावूनच येवूयात. म्हणुन शुक्रवारी सकाळी ११:३० ला हिंदमाता वरुन ६६ पकडली. तसे बसने फिरणे कमीच. बस वाहकाला सांगितले की बाबा कांदेवाडी आली की सांग. तो काहीतरी बडबडला.

अमेरिकेत मराठी बाणा

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 03/11/2008 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
बघता बघता मला अमेरिकेत येऊन एक महिना उलटूनसुध्दा गेला. एवढ्या काळात मी कितीसा अमेरिकाळलो आहे याचा विचार करीत बसलो होतो. इथे आल्यानंतर रोजच्या बोलण्यात आणि लिहिण्यावाचण्यात मी सत्तर पंच्याहत्तर टक्के मराठी भाषेचा उपयोग करतो आहे. मुंबईत हा आकडा कधी पन्नासावर गेला नव्हता. जेवणाखाण्यात आमटी, भात, पोळी, भाजी, शेव, चिवडा, पोहे, शिरा इत्यादी ऐंशी पंच्याऐंशी टक्के मराठी पदार्थच असतात. ते सुध्दा मुंबईपेक्षा जास्त झाले. अंगावरचे शंभर टक्के कपडे मुंबईहूनच आणलेले आहेत. घरातले सामान सुमान, अडगळ आणि पसारा इथे कांकणभर जास्तच आहे. कारण आम्हाला इकडच्या वस्तूही हव्यात आणि तिकडच्याही लागतात.