Skip to main content

मौजमजा

मिपा ओळख २

लेखक चेतन यांनी सोमवार, 03/11/2008 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग दुसरा : मिपाचे सदस्य होउन पंधरा एक दिवस झालेत. भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय. बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित. काय म्हणालास? नाही काही नाही हे आपलं खुदं के साथ बातां. हे ही मिपावरुनच ढापलेलं बर का मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो. तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा दादा मिपावर दुसरर्‍याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना!

चाळ नावाची भूताळ वस्ती

लेखक मूखदूर्बळ यांनी रविवार, 02/11/2008 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल खूप सारे भयपट घाबरत घाबरत का होईना पाहील्यामूळे म्हणा किंवा भूताच्या गोष्टी वाचल्याने म्हणा ही भय-कल्पना सुचली. . मुंबईतल्या कुठल्याश्या एका चाळीत काही भूत रहातात. चाळ तशी एक मजलीच. अजून सुदैवाने कुण्या बील्डरची नजर ह्या चाळीवर गेली नाही. त्यामूळे चाळ अजून टीकून आहे. चाळीच्या तळमजल्यावरच्या जीन्याजवळची खोली ही चाळ सेक्रेटरीची हे वाचकांनी ओळखले असेलच. किंबहुना ह्या मोक्याच्या खोलीमुळेच सेक्रेटरी-पणाची माळ (लिंबू-मिरच्यांची अर्थात ) ह्यांच्या गळ्यात पडली आहे. आजचा दिन विशेष आहे. आज दिवाळी निमीत्त काही सांस्कृतिक कार्यक्रम ठरवण्यासाठी मुद्दाम चाळीची विशेष बैठक बोलवण्यात आलेली आहे.

मिपा ओळख

लेखक चेतन यांनी शनिवार, 01/11/2008 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंगः एक नविन मराठी माणसाला मिपाबद्दल सांगताना पुलंनी ज्यांच्यापुढे करं जोडावेत अशी महाराष्ट्रातील तीन गावं सांगितली. त्यानंतर असेच कर जोडण्यासारखे एक गाव म्हणजे मिपा. येथे (---^---) असे काहितरी कर जोडावे लागतात. तशी इतरही अनेक संस्थळ आहेत पण पुलंच्या भाषेतच सांगायचे तर ज्यांच्यपुढे करं जोडावे असे फक्त मिपाच त्याची सर इतरांना नाही. इथल्या माणसांची नावेदेखील गावचा, साहित्याचा बाज असणारि अर्थात काही अपवाद म्हणून ढोले पाटिल पॅरडाइस् सारखी इंग्रजाळलेली ब्रिटिश टिंग्या सारखी नावं पण आहेत.

"झुंजुमुंजु" चा दिवाळी अंक.

लेखक रामदास यांनी बुधवार, 29/10/2008 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
आपले मिपा सदस्य श्री.उदय तानपाठक यांचा दिवाळी अंक "झुंजुमुंजु" प्रकाशीत झाला आहे.श्री. तानपाठक केवळ हौशीपोटी आणि मराठीच्या प्रेमापोटी दरवर्षी हा अंक प्रकाशीत करतात.(दिवाळी अंकाचे अर्थशास्त्र सर्वसाधारणपणे तूटीच्या अंदाजपत्रकाचे असते). आपली नोकरी सांभाळून वेळच्यावेळी ,चुका टाळून,(मराठीतील एका लोकप्रिय दिवाळी अंकात प्रकाशक एक पान घालायचे विसरले आहेत.),रास्त किमतीत हा दिवाळी अंक त्यांनी आणला आहे. आता या अंकाच्या खास गोष्टी.

दिवाळी अचानक मिपा कट्टा..!

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 26/10/2008 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचल्यावरच काही लोकांच्या कपाळाला आठ्या पडल्या असणार याची कल्पना आहे! "साले हे मिपाकर कट्ट्याव्यतिरिक्त दुसरं करतात काय? एकत्र जमून खाणे-पिणे एवढंच यांना ठाऊक आहे! त्यापेक्षा एकत्र जमून एखादं समाजोपोयोगी काम का नाही करत?" वगैरे वगैरे ताना काही लोकं घेतील याची कल्पना आहे! :) अहो पण मी काय म्हणतो, आधी मुळात मिपाकर हे एकमेकांना आपुलकीने भेटतात, एकत्र जमतात, हे काय कमी आहे? करतील की काही चांगली कामंही! गेल्या वर्षभरापासून नुकतीच कुठे कट्ट्यांना सुरवात झाली आहे.

कंदिल बनविणे: एक आनंददायी कला

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 25/10/2008 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी हा सर्वार्थाने घरातल्या प्रत्येकाचा सण. दिवाळी आली की वेगवेगळ्या आघाड्यांवर सगळं घर तयारीला लागतं. एकीकडे घराची साफसफाई, रंगरंगोटी चालु असते. तर दुसरीकडे फराळाचे मस्त पदार्थ चालू असतात. लहानांना सुट्ट्या असतात. पुर्वी किल्लेही बनवले जात. एकत्र कुटंबांमधे तर आपेष्ट जमलेले असतात. मनसोक्त हास्य विनोदात आठवडा कसा जातो ते कळतही नाहि. आज दिवाळीचा पहिला दिवस. वसुबारस! आमच्या घरी आज दिव्यांची रोषणाई आणि कंदिल लागतो. त्यामुळे गेला विकांत कंदिल बनविण्यासाठी राखून ठेवला होता. अजूनहि मी कंदिल घरीच बनवतो. दर तीन वर्षांनी तर कंदिलाचा सांगाडाहि नवा बनतो.

आगंतुक पाहुणा

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 24/10/2008 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री झोपायला म्हणुन खोलीत आलो. पलंगपोस बदलावा म्हणुन घातलेला पलंगपोस काढणार तेव्हढ्यात लक्ष बिछान्यावर विराजमान झालेल्या पाहुण्याकडे. पाहुणा घर आपलच समजुन मस्त मजेत बिछान्यावर फिरत होता. हिरवेगार तुकतुकीत अंग, पंखांना तपकिरी काठ, साधारण एक सेंटिमिटर आकार, पंख मिटुन घेतलेले असा पाहुणा सोयिस्कर जागेची पाहणी करत असावा हा प्रकार जरा वेगळाच दिसला. म्हटल पाहुणे आले आहेत तर त्यांची छबी टिपावी. लगबगीन कपाटातला कॅमेरा काढला, भिंगसंच बदलला.

नावात काय नाही?

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 24/10/2008 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच मला काही कामानिमित्त वासिलिकी नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधायचा होता (ह्या व्यक्तीचे आडनाव देवनागरीत टंकणे हे माझ्या आवाक्यापलीकडचे आहे!). ही व्यक्ती अमुक एका कंपनीत, अमुक एका विभागात, अमुक एका हुद्द्यावर काम करते आणि त्यामुळे मला हवी असलेली माहिती ही व्यक्ती देऊ शकते, इतकीच माहिती मला देण्यात आली होती. आता वसिलिकी ही बाई आहे की बुवा याचा कुणालाच काही अंदाज नव्हता. अर्थात त्यामुळे कामात काही फरक पडत होता असे नाही, पण उगाच एक उत्सुकता होती. माझ्या पुढे होता त्या वसिलिकीचा फोन नंबर आणि इमेल. मी फोन लावला. फोन काही वेळ वाजला आणि वॉइस मेसेजवर गेला.

आणि सावकार स्वर्गात गेला....

लेखक आगाऊ कार्टा यांनी शनिवार, 18/10/2008 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
फार वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. एक छोटेसे गाव होते. त्या गावात एक सावकार राहत होता. तो सावकार महाधूर्त, महाचतूर आणि मोठा डांबिस होता (पिवळा डांबिस नव्हे). गावातले लोक तसे गरीबच. त्यामुळे ते अडीनडीला सावकाराकडे पैसे मागायला येत असत. सावकार दामदुप्पटीने व्याज आकारुन पैसे देत असे. त्याची हिशेब करण्याची निराळीच तर्‍हा होती. कितिही पैसे दिले तरी सावकाराचे व्याज काही फिटत नसे. काही जणांनी त्याच्यावर पंचायतीत दावा लावून त्याला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो सावकार सगळ्यांचे बारसे जेवलेला होता. त्याच्या हिशेबाच्या वह्या आणि तो हिशेब पाहून भल्याभल्यांच्या मेंदूला झिणझिण्या येत.