Skip to main content

नाट्य

विहंग नायक, आदरांजली...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 09/06/2008 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी व इंग्रजी रंगभूमीवरचे एक ज्येष्ठ कलावंत विहंग नायक यांचे अपघाती निघन झाल्याची बातमी आत्ताच कळली. बारामती येथे चित्रिकरणासाठी जाताना पनवेल येथे कळंबोलीजवळ हा अपघात झाला. अत्यंत डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व असलेला, रंगभूमीवरचा एक हरहुन्नरी आणि अतिशय गुणी कलाकार अकाली हरपला आहे. संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे या थोर कलावंताला विनम्र आदरांजली! तात्या.

चाहूल.... नाटक...

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 06/06/2008 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
चाहूल चंद्रलेखा प्रकाशित चिरंतन निर्मित दोन अंकी नाटक... चाहूल.. लेखक : प्रशांत दळवी दिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी कलाकार : तुषार दळवी सोनाली कुलकर्णी कथासूत्र : मकरंद आणि माधवी या तथाकथित आधुनिक, शहरी जोडप्याची एका रात्रीत घडणारी ही गोष्ट...मकरंद ऒफ़िसमधून घरी आलाय आणि चिडचिड करतोय , नंतर त्यामागचं कारण असं कळतं की त्याच्या बॊसनं माधवीला एक रात्र त्याच्याबरोबर लोणावळ्याला पाठवण्याची विनंती केलीय... मग एकमेकांवर दोषारोप ( तूच जास्त नटतेस वगैरे आणि ती म्हणते तिथेच त्याला ठणकावून शिव्या देऊन नकार का नाही कळवलास वगैरे)... मग चर्चेलाच तोंड फ़ुटते....

साठेचं काय करायचं?? ... नाटक...

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 05/06/2008 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
साठेचं काय करायचं... लेखक : राजीव नाईक... दिग्दर्शक संदेश कुलकर्णी कलाकार : निखिल रत्नपारखी, अमृता सुभाष निर्मिती :समन्वय पुणे... ( मौज प्रकाशनाच्या आताची नाटकं या नाईक यांच्या नाट्यसंग्रहात हे नाटक आहे.) हे नाटक पाच सहा भाषांमध्ये भाषांतरित झालं...समन्वयने साठच्या आसपास प्रयोगही केले.. क्रोएशियन रंगभूमीवरही त्याचे प्रयोग झाले... मी या नाटकाचा प्रयोग पाहू शकलो नाही तरी केवळ वाचूनही ते मला फ़ार आवडते..

विजय तेंडुलकर लेखन कार्यशाळा...

लेखक भडकमकर मास्तर यांनी सोमवार, 19/05/2008 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
२००५ च्या डिसेंबरात पुण्याच्या महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फ़े नाट्य लेखन कार्यशाळा होणार असे जाहीर झाले आणि स्वत: तेंडुलकर त्यात निवडक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असे जेव्हा कळले तेव्हा आपले स्क्रिप्ट तरी पाठवून देऊ, पुढचे पुढे बघू, या विचाराने एक एकांकिका पाठवून दिली आणि विसरून गेलो ... मे २००६ मध्ये लेखन कार्यशाळेसाठी माझी निवड झाल्याचे कळले. चार दिवस तेंडुलकरांचे मार्गदर्शन लाभणार या कल्पनेनेच एकदम तरंगल्यासारखे वाटत होते... या कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून सुमारे ८० संहिता आल्या होत्या आणि त्यामधून १६ लेखकांची निवड झाली होती... २० मे ते २४ मे २००६...

विजय तेंडुलकरांना आदरांजली.

लेखक नीलकांत यांनी सोमवार, 19/05/2008 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतील एक दिग्गज व्यक्तीमत्व, जेष्ठ नाटककार तसेच पटकथाकार विजय तेंडुलकर यांचं वृध्दापकाळानं आज पुण्यात निधन झालं आहे. ते ८० वर्षाचे होते. त्यांच्या गाजलेल्या नाटकांत ' श्रीमंत ' , ' गिधाडे ', ' शांतता कोर्ट चालू आहे ', ' सखाराम बाईंडर ', ' घाशिराम कोतवाल ', ' कमला ' यांचा समावेश होतो. मराठीतील गाजलेले ' सामना ', ' सिंहासन ', ' आक्रित ', ' उंबरठा ' हे त्यांनी लिहिलेले चित्रपट अजरामर ठरले आहेत. समस्त मराठी साहित्यविश्वातून आज शोक व्यक्त होतोय. मिसळपाव परिवार सुध्दा विजय तेंडुलकरांना आदरांजली वाहत आहे.

अथर्व थिएटर्स चा विक्रम स्थापित होणार....

लेखक कलंत्री यांनी शुक्रवार, 09/05/2008 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
अथर्व थिएटर्स ही संस्था पुणेकरांना बर्‍यापैकी परिचीत आहेच. या संस्थेतर्फे ११ मेला रामकृष्ण सभागृह, पिंप्री येथे एकाच दिवसात ४ नाटके सादर करण्याचा विक्रम घडणार आहे. रुपरेखा खालील प्रमाणे, ०९.०० सकाळी शांतेचं कार्ट. १२.३० ला मोरुची मावशी ०४.०० वाजता औपचारिक समारंभ ०५.०० वा तो मी नव्हेच ०९.३० वा तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क एकाच दिवशी एकाच संस्थेकडून आणि एकाच नाट्य कलाकारातर्फे ४ प्रयोग असा विक्रम घडणार आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. या संस्थेची वाटचाल आणि माहिती दुसर्‍या सत्रात, तर चला भेटु या ११ तारखेला रामकृष्ण सभागृहात.

व्योमक्षेमं वहाम्यहम्

लेखक हेरंब यांनी गुरुवार, 08/05/2008 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
'मिपा' च्या वाचकांना 'प्रेमाची गोष्ट' वर लिहिलेले आवडले, म्हणून अजुन एक प्रायोगिक नाटक पाहिले होते, त्यावरचे लिखाण पाठवत आहे. आमची प्रायोगिक नाटकांची आवड तशी खूप जुनी. अगदी छबिलदास चळवळीपासून. त्यामुळे ,प्रायोगिक नाटक लागले की पाय तिथे आपोआप वळणारच! कधी फजितीही होते, सगळं डोक्यावरुन जातं. मग डोक्याला ताप. ह्याला विचार, त्याला विचार, असं चालतं, आपण इतके निर्बुद्ध कसे असे वाटून स्वतःचाच राग येतो. तरी पुढली वारी काही चुकत नाही. दहा नाटके डोक्यावरुन गेली तरी चालेल, पण एखादंच असं आनंद देऊन जातं की बस! 'अमृता सुभाष' , ही एक अत्यंत हुशार अभिनेत्री!

प्रेमाची गोष्ट

लेखक हेरंब यांनी शनिवार, 03/05/2008 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
कांही वर्षांपूर्वी "प्रेमाची गोष्ट" हे नाटक आलं होतं. लागू आणि निळु फुले ही नांवे पहाताच आम्ही ग्रुपने ते बघायला गेलो. पण नाटक फार वरच्या पातळीवरचे असल्यामुळे आमच्या डोक्यावरुन गेले .दोन दिवस अस्वस्थपणाने काढले मग ठरवलं, जसं दिसलं तसं लिहून काढायचं, कोणी जाणकार सांगेल समजावून! पण कसलं काय हो, अजून कोणी भेटलं नाही. तर वाचाच त्याबद्दल...... प्रेमाची गोष्ट म्हणजे कॉय ? के.बी. साठे, बी.सी. साठे आणि तात्या पाटील हे तिघे कॉलेजातले जिवलग मित्र. नाटकांत अभिप्रेत असलेल्या काळात, कोणालाच आपल्या जातीची लाज वाटत नसावी, किंवा ते तिघे खिलाडु वृत्तीचे असावेत.

इप्रसारण.कॉम येथे कादंबरी वाचन- प्राजक्ता पटवर्धन

लेखक सुवर्णमयी यांनी बुधवार, 02/04/2008 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या गुरुवार दिनांक ३ एप्रिल पासून दर गुरुवारी अर्धा तास इप्रसारण. कॉम येथे प्राजक्ता पटवर्धन 'आवली' या तुकारामांची पत्नी आवली हिच्यावर लिहिलेल्या कादंबरीचे वाचन करणार आहेत. याविषयी अधिक माहिती http://www.manogat.com/node/12713 येथे वाचता येईल. (तुकयाची आवली- लेखक- सौ मंजुश्री गोखले मेहता प्रकाशन, पुणे ) त्या कार्यक्रमावर, त्या कादंबरीवर आणि आवलीविषयी मिसळपावकरांना असणार्‍या माहितीची देवाण घेवाण करता येथे यावी म्हणून ही चर्चा सुरु केली आहे. प्राजुला आम्हा सर्वांच्या शुभेच्छा.

काही वादविवाद...("का रे भुललासि " या आमच्याच आगामी दीर्घांकातील एक भाग)

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 02/03/2008 04:18 या दिवशी प्रकाशित केले.
[ एका कोलेज च्या एका मोठ्या क्रीडांगणाचा एक कोपरा.त्या ground चं कुंपण, भिंत, गेट आणि त्यामागचा रस्ता...प्रेक्षकांसमोर एक दोन बेंच आणि त्यासमोरून गेलेला जोगिंग ट्रॆक...ground ला चालत चक्कर मारणार्या स्त्रिया, मध्यमवयीन माणसे आणि काही खेळाडू अधून मधून दिसावेत...groundवर क्रिकेट सामना चालू आहे.पडदा उघडतो तेव्हा मनीष आणि माधवी स्टेजवर दिसतात....] >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>माधवी - मनीष्चे लग्न ठरले आहे, आणि मनीषने अधिक चांगल्या पगाराची नोकरी धरली पाहिजे असा सतत आ