Skip to main content

प्रवास

'अविस्मरणीय' उटी कोडाई

लेखक स्मिता. यांनी रविवार, 15/05/2011 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूचना: या लेखातले सर्व अनुभव १००% सत्य घटना असून त्यात काल्पनिक असे काहीही नाही. त्यात काही काल्पनिक वाटल्यास ते आमचे दुर्दैव समजावे. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ कधी कधी असे अनुभव येतात की वाटते एखाद्या गोष्टीचा विचार करताना जर ती अयोग्य, चुकीची किंवा करू नये अशी वाटत असल्यास ती न केलेलीच उत्तम! तसा माझा शकुन-अपशकुन, दैवी संकेत, इ. गोष्टींवर विश्वास नाही पण जिथे आपलं मनच नाही म्हणतं तिथे उगाच शहाणपणा करूच नये.

सुट्टीच्या दिवशी ऑफिसच्या दिशेने

लेखक जागु यांनी सोमवार, 02/05/2011 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ऑफिसच्या परिसरात भरपुर झाडे आहेत. ऑफिसच डोंगराळ भागावर आहे. शिवाय थोडे पुढे गेल्यावर जंगल आहे. रोज ऑफिसला जाताना अनेक झाडं न्याहाळते. पण रुखरुख लागायची की एवढी सगळी झाडे मी पाहते पण फोटो काढता येत नाही. म्हणुन गुडफ्रायडेच्या दिवशी नेमकी पर्यावरण दिवस होता. आदल्यादिवशीच नणंदेला येशीलका म्हणुन विचारले. ती अतिउत्साहात तयार झाली. सकाळी ६ लाच नणंदेला घेउन ऑफिसच्या एरियात गेले आणि खालील फोटो कॅमेर्‍यात कैद केले. १) धामणीचा रानमेवा.

रतनगड..(छायाचित्रांसह)

लेखक शैलेन्द्र यांनी मंगळवार, 26/04/2011 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवसांपासुन कुठे डोंगरात फिरायला जायचा योग आला नव्हता. रवीवारी संगमनेरवरुन डोंबिवलीला येता येता, अचानक, मामाच्या गावी, राजुरला जाणं झाल. राजुरला पोहचायलाच रात्र झाली होती. शेवटी पहाटे लवकर निघु म्हणत, मुक्कमाचा बेत ठरला. जेवण झाल्यावर सहज, मामेभावाबरोबर बोलता बोलता, दुसर्‍या दिवशी कुठेतरी भटकायला जायचा प्लॅन ठरला, ऑफीसच कस मॅनेज करता येईल, हे कोड पाच मिनीटात सुटल. राजुरसारख्या ठीकाणी असल्याने प्रचंड चॉईस होता. पाबरगड, कात्राबाई, अस्वल्या डोंगर, कुमशेत, आजोबा, हरिश्चंद्र, रतनगड व सांदण असे मस्त पर्याय होते (कळसुबाई मला फारसं नाही आवड्त उन्हाळ्यात ;-) ).