Skip to main content

प्रवास

निमंत्रण - इंक्रेडीबल फोर्टस ऑफ इंडिया !

लेखक मालोजीराव यांनी मंगळवार, 19/04/2011 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्गअभ्यासक प्रमोद मांडे यांनी टिपलेल्या देशभरातील दुर्गांच्या छायाचित्र प्रदर्शनाला शुक्रवारपासून बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात सुरवात होत आहे. येत्या २२ ते २७ एप्रिल च्या दरम्यान सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. सर्व दुर्गप्रेमी,शिवप्रेमींनी याचा लाभ घ्यावा. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील दुर्गम किल्ल्यांच्या छायाचित्रांसह कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, केरळ अशा विविध राज्यांतील किल्ल्यांची चारशेहून अधिक छायाचित्रे प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

कार्ट्यांस...

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

चेरी ब्लॉसम , वॉशिंग्टन डी सी आणी ओबामा

लेखक प्रभो यांनी सोमवार, 11/04/2011 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
चेरी ब्लॉसम म्हटलं की गेल्या २-३ वर्षा आधीपर्यंत एकच गोष्ट आठवायची.....बूट पॉलिश...त्याच्या त्या जाहिरातीतला चार्ली चॅप्लीन आणी त्याच्या करामती.. पण हे सगळं २-३ वर्षा आधीचं. मित्र या त्या कारणाने अमेरिकेला जाउ लागले आणी त्यांच्या फेसबुक - पिकासा अल्बम्स मधे दिसू लागले 'चेरी ब्लॉसम्स'. जपानने अमेरिकेला दिलेल्या चेरीच्या झाडांना मार्च अखेरीस येणारा बहर...

सुटलेली सुटकेस

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 08/04/2011 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
खूप वर्षांपुर्वी घडलेली एक सत्यघटना- चित्राच्या लहान बहिणीचे लग्न ठरल्याचे कळले, आणि आमची नागपूरला जाण्याची जोरदार तयारी सुरू झाली. मुले त्या वेळी साधारणत: सोळा आणि बारा वर्षे वयाची होती. त्यामुळे त्यांचे आपापले लग्नात धमाल दंगामस्ती करण्याचे प्लान्स होते. हा सगळा उत्साह पाहून मी लगेच चांगली दोन आठवड्यांची सुट्टी घ्यावी लागणार असे सुतोवाच ऑफ़ीसमधे करून ठेवले. बॉसने आंबट चेहऱ्याने, तोंडातल्या तोंडात पुटपुटत संमति दाखवल्यासारखे केले होते. तीच पडत्या फ़ळाची आज्ञा मानून मी लगेच मुंबईची चार तिकिटे बुक करून टाकली. ताबडतोब त्याला तसे सांगून देखील टाकले.

स्वित्झ्रलंड-स्वप्नांच्या देशात भाग -१

लेखक जातीवंत भटका यांनी सोमवार, 28/03/2011 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
स्वित्झ्रलंड-स्वप्नांच्या देशात भाग -१ झर्मित-मॅटरहॉर्न : जगातील सर्वोच्च ग्लेशियर पॅलेस जिनिव्हा मधे येऊन आठवडा होत आला होता तरी माझ्या कॅमेर्‍यामधे एक सुध्दा फोटो नव्हता. ऑफिसच्या कामामुळे स्टुडीओबाहेर पडायला पण वेळ मिळत नव्हता. शुक्रवारी सकाळी मी आणि माझ्याच बरोबर युनायटेड नेशन्स साठी काम करणारा कोल्हापूरचा प्रशांत सुर्यवंशी आम्ही दोघांनी शनिवारी झर्मितला जाण्याचा बेत आखला.

सांदण दरी - एक प्रवास वेगळाच.

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 17/03/2011 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
भुमाता अजुन वाट पाहते आहे आपल्या लेकीची, तिच्यावर झालेला अक्षम्य अन्याय पाहिलाय तिनं, त्या कष्टांना दुर करुन त्या लाडाच्या लेकीला पुन्हा एकदा काळजाशी लावुन घेउन झोपवायचं आहे तिला. त्या पराक्रमी राजाच्या वंशाच्या दिव्यांना जोजवुन निजवताना तो प्रचंड पाळणा हलवुन हलवुन थकलेले हात आपल्या हातात घेउन काळजातुन वाहणा-या गार पाण्यात त्या हातांच्या जखमा थोड्या शांत करायच्या आहेत. या साठी त्या आईनं आपल्या काळजाची वाट उघडुन ठेवली आहे, आता फक्त वाट आहे ती लाडकी लेक येण्याची.