Skip to main content

प्रवास

जंगलाशी संवाद

लेखक chaitralic यांनी शनिवार, 17/04/2010 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
जंगलाशी संवाद ..... ब र्ड वॉचिंग'च्या ग्रुपबरोबर गेल्या महिन्यात आम्ही "फणसाड' अभयारण्यात गेलो होतो. भारीतला कॅमेरा, ट्रायपॉड, दुर्बीण.. प्रत्येकाने जय्यत तयारी केली होती. प्राणी दिसण्याची अपेक्षा ठेवली, की ते कधीच दिसत नाहीत. अर्थात ते आपल्याला लपून पाहत असतात; पण दर्शन देत नाहीत. या वेळी आमचा उद्देश एकच होता, अतिशय दुर्मिळ झालेल्या पांढऱ्या गिधाडांना पाहायचे. तिथला मित्र वनअधिकारी हरिश्‍चंद्र नाईक आमची वाट पाहत होता. गिधाडांचे घरटे सहा किलोमीटरवर असल्याने गाडीतूनच जायचा निर्णय झाला.

घोराडेश्वर

लेखक झकासराव यांनी शुक्रवार, 16/04/2010 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसानी इकडे चक्कर मारु मारु म्हणत रहातच होत. एका रविवारी जमवलच आणि निघालो. घरुन उरकुन जायल १० वाजुन गेले होतेच. उन्हाचा तडाखा भारीच जाणवत होता. निगडीतुन हे ठिकाण एकदम जवळ आहे. देहुरोड क्रॉस केला की सोमाटणे फाट्याच्या अलिकडेच घोराडेश्वराचा डोंगर आहे. पावसाळ्यात मस्त हिरवेगार डोंगर बघुन मजा वाटत असते पण आता ओकेबोके डोंगर. 1 तिकडे गेलो. दुचाकी सावली बघुन लावली. (हो नायतर नंतर पोळुन कोण घेणार?? ;) ) पायर्‍या बसवल्या आहेत आता. पण दुतर्फा झाडी नाहिये.

श्री दशभुज लक्ष्मीगणेश - हेदवी

लेखक योगेश२४ यांनी गुरुवार, 15/04/2010 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
वल्ली यांनी काढलेली हेदवी आणि परिसराचे अतिशय सुंदर प्रकाशचित्रे आपण पाहिलीत. त्याच हेदवी गावातील श्री दशभुज लक्ष्मीगणेशाची हि कथा आणि परिसराची भटकंती.
महाराष्ट्रातील जागृत अष्टविनायकांसारखेच कोकणातही काही जागृत गणेशाचे मंदिर आहेत ज्यांना अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे.

अंटार्टिका एक अविस्मरणीय अनुभव

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 14/04/2010 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
कालच अंटार्टिका एक अविस्मरणीय अनुभव या शांतिलाल सुरतवाला यांच्य पुस्तकाच्य प्रकाशनाला गेलो होतो. जाताना पक्क ठरवल होत की पुस्तक अजिबात विकत घ्यायच नाही. साली दरवेळी खिशाला चाट बसते अन घरी कचरा वाढतो.

भटकंती निळकंठेश्वर परीसराची

लेखक योगेश२४ यांनी सोमवार, 12/04/2010 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या महाराष्ट्रात बरीचशी धार्मिक स्थळे अशी आहेत की, ज्यांना अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे. परंतु त्यातली बरीच ठिकाणे आपल्या जवळ असुनसुद्धा आपल्याला माहित नसतात. पाश्चात्य देशातील लोक वेगवेगळे धबधबे, सरोवरे, नद्या शोधून काढतात आणि मग आपण ते पहायला जातो; परंतु आपल्याला मात्र अशी सौंदर्यस्थळे शोधायला जाण्याची प्रेरणा होत नाही. त्यामुळे अगदी आपल्या जवळ असलेली सुंदर ठिकाणेही आपल्याला माहित होत नाहीत. असेच एक पुण्या-मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आणि पानशेत धरणाच्या परिसरात असलेले एक सुंदर ठिकाण म्हणजेच आजच्या आपल्या भेटीचे "निळकंठेश्वर".

गर्द हिरवाईतील श्री केशवराज

लेखक योगेश२४ यांनी रविवार, 11/04/2010 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
"घर सोडा घर आणि जरा बाहेर निघा, जग किती सुंदर आहे थोडं तरी बघा परदेश राहिला दूर तरी देश आपला छान, किती रंग! कसे रूप! पाहुनी हरते भान."
लहानपणी वाचलेल्या शांता शेळके यांच्या कवितेचा अर्थ आता पूर्णपणे समजु लागला आहे. भटकंतीची आवड ज्यांना लागली आहे त्यांना "घर सोडा" असे सांगावे लागत नाही. त्यांची पाऊले आपोआपच बाहेर वळतात. डिसेंबर महिन्यात आलेल्या सलग सुट्टींचा फायदा उचलत आम्ही दापोली भटकंतीचा कार्यक्रम आखला. तालुक्याचे ठिकाण असलेले हे शहर थंड आणि आल्हाददायक वातावरणामुळे "कोकणचे महाबळेश्वर" म्हणून ओळखले जाते.

लावणी : मुंबईची सहल

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 10/04/2010 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईची सहल
नागपुर पाहून झालं , नांदेड पाहून झालं , अमरावती पाहून झाली, लातूर पाहून झालं.... अहो इकडे बीड झालं, नगर झालं, नाशिक झालं, पुणं पाहून झालं.... तिकडे कोलापूर पाहून झालं, सांगली झाली, सोलापुर ही पाहून झालं.... आख्खा महाराष्ट्र पाहून झाला..... कोरस : आसं का? व्ह्यय तर मग.... अहो नागपुर पाहून झालं, नाशिक झालं, पुणं झालं ठाणं झालं, आता पाळी हाये मुंबईची इथं फिरून फिरून अंग माझं दमलं सवय नाही घामाची उपाय करा काही लाज राखून या गोड हुकूमाची अन मला चाखवाना कुल्फी

चांदोबाच्या जगात... राजमाचीला

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 09/04/2010 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र ह्या प्रत्येक वेळेचा एक वेगळा सुर असतो... डोंगर-द्ऱ्यां मधून भटकताना हा सुर अगदी सहज जाणवतो... एकांत, शांतता, रातवा, घुबड, दरी मधून वाहणारा वारा ह्यांच्या स्वरांनी रात्रीचा सुर सजलेला असतो... रात्रीच जग जसं आपल्याला गुढ वाटतं अगदी तसाच रात्रीचा सुर देखील फार गुढ असतो... पण ही गुढता अनुभवण्यात वेगळाच रोमांच आहे... मध्यरात्र उलटून गेली होती आणि आम्ही चौघे राजमाचीच्या दिशेने चालत होतो... मंद चंद्रप्रकाशात रात्रीच जग वेगळच भासत होतं... मेघा-हायवे मागे टाकला आणि लहानसा चढ चढून आम्ही तुंगार्ली तलावाजवळ पोहचलो... रात्रीच्या उजेडात तळ्यातलं पाणी मस्त चमकत होतं...

उन्हाळी वर्षाविहार : कॅनियॉन / उल्हास व्हॅली ट्रेक

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 08/04/2010 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम मनःपूर्वक आभार : एक उत्साही मायबोलीकर यो रॉक्स उर्फ योगेश कानडे, ज्याने या ट्रेकचा वृत्तांत माबोवर टाकला आहे. मी त्याच्या अनुमतीने त्या वृत्तांतातील काही वाक्ये जशीच्या तशी उचलून इथे टाकली आहेत, लिहीण्याचा कंटाळा दुसरे काय ;-) त्या 'यो'चे आणि अर्थातच सुनील गावडे उर्फ सुन्या ज्याच्या मदतीशिवाय हा ट्रेक शक्यच झाला नसता. एप्रिल उजाडला नि सुर्य अधिक प्रसन्नतेने तळपु लागला.. घामाच्या धारा वाहु लागल्या.. अशा गरमीचा वैताग कोणाला नाही येणार.. नि अशा नकोश्या उकाड्यात जर कोणी विचारले "चल ट्रेकला येतोस का ? " तर नक्कीच नकारार्थी उत्तर मिळेल..

झोप आणि डुलकी

लेखक सुचेल तसं यांनी बुधवार, 07/04/2010 04:39 या दिवशी प्रकाशित केले.
झोप हे एक आपल्याला मिळालेलं वरदान आहे असं मला कायम वाटत आलंय. कुठेतरी वाचल्याच आठवतंय की गांधीजी फक्त तीन तास झोपायचे - १२ ते ३. एवढ्या कमी वेळात तर माझी डुलकी पण होत नाही. उगीच नाही त्यांना महान म्हणत. डुलकी वरून आठवलं की काही लोकं डुलकीला "डूकली " म्हणतात. ते पण एवढ्या आत्मविश्वासाने की आपल्यालाच शंका यावी की खरा शब्द डूकली आहे की काय. असो, झोप आणि डुलकीमधला फरक म्हणजे डुलकी ही उभ्या उभ्या, बसल्या जागी घेता येते. तुम्ही बसमध्ये किंवा लोकल मध्ये प्रवास करताना, हापिसात जेवण झाल्यावर बसल्या जागी काढता ती डुलकी. झोप म्हणजे पंखा फुल स्पीडवर लावून, जाड पांघरूण घेऊन १०-११ तास घेता ती खरी झोप.