Skip to main content

संस्कृती

कुंडलिनी

लेखक शरद यांनी सोमवार, 30/12/2013 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
कुंडलिनी कुंडलिनी ही एक शरीरात वास करणारी शक्ती आहे. निरनिराळ्य़ा लोकांना तिचा साक्षात्कार निरनिराळ्या प्रकारे झाल्याने तिच्या व्याख्या नानाविध प्रकारांनी केल्या आहेत. तंत्रसाहित्यात कुल व अकुल हे शब्द शक्ती व शिव वाचक आहेत. कुलकुंडलिनी वा कुंडलिनी म्हणजे वेटोळ्या घातलेल्या स्वरूपातील शक्ती. या शक्तीचे चित् व अचित् असे दोन भेद आहेत.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-५

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 30/12/2013 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः- http://misalpav.com/node/25626 ...पुढे चालू धार्मिक कार्यक्रमाच्या दिवशी, यांच्या घरी केटरर कडून पायात चपला घालून आणलेलं(पार्सल) जेवण सोवळ्यात देवाला नैवेद्य दाखवून आंम्ही(ही) जेवतो.. हा काळानुसार केलेला बदल, ते कसा विसरले ते काही कळलं नाही.....! ========================================== आपण धार्मिकपणा फारच पाळतो असा दृढं (गैर)समज असणार्‍या अश्या लोकांची काही व्यवच्छेदक लक्षण आहेत. त्यात प्रचंड तात्विक असणं.. हे आद्य लक्षण.. म्हणजे तत्व पाळलं गेलं कि व्यवहार आपोआप पाळला जातोच! असा एक हटकून गैरसमज.

रेजोल्यूशन

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 27/12/2013 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
२०१३ आता संपेल. आपण हॅप्पी न्यू इयर म्हणत सगळ्यांना शुभेच्छा देऊ, पार्ट्या होतील, दारूचे पाट वाहतील, टीव्ही वर अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम प्रसारित होतील, त्याच धुंदीत जमल्यास गेल्या वर्षीचा जमाखर्च मांडत आपण पुढच्या वर्षाला आलिंगन देऊ. व्हॉट्सॅप्प, फ़ेसबुक, इत्यादी माध्यमातून जगाला विश केलं जाईल, विविध ‘रेजोल्यूशन्स’ केली जातील, जगाशी शेअर केली जातील.

कुणी घडवून आणले 'महाभारत'?

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 26/12/2013 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
मदनकेतु उवाच: श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदीतून मुक्त केलेल्या स्त्रियांना द्वारकेपर्यंत सुखरूप घेऊन जाण्याची कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडल्यामुळे मी देवलोकाचा कायमचा निवासी झालो. मला फिरण्याची फार आवड, त्यामुळे मी नित्य नवनवीन जागी फिरत असतो. नारदमुनिंनी मला दिलेल्या ‘गगनगामी परिभ्रमण सूचना’ यंत्राचा मला फार उपयोग होतो. (याला भूतलावर ‘जीपीएस’ असे म्हणतात, म्हणे). एकदा फिरताना एका घरातून मला मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकू आला. खिडकीतून डोकावून बघतो, तो आत दोन किरीटधारी द्यूताचा पट मांडून बसलेले दिसले.

शतशब्द कथा: म्हादा

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 26/12/2013 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
सक्काळच्यान दादू कावलावता. तंबाकू नाय का च्या नाय. कळकाच्या पाटया वळू वळून बोटं पाक सोलवटली व्हती. पाटलाच्या वाड्यावनं सांगावा आलावता. उद्याच्याला येरवाळी वाजान्त्री पायजेल. आता मानसं हाताशी नायती तर कोन वाजीवनार? गाडवं? मायला . . गाडाव म्हनल्यावर ध्येनात आलं. . हौसा कुटाय? मास्तरच्या घरला इटा लगीच पायजील हाईत. गाडवं मोकळी हुबी र्हाऊन जमंल व्हय ? यो म्हादा बी आयकंना झालाय.. हितं बा कामानं मरतुया आन ह्यो साळंत जातुया ! भेटला की गुर्जीला इचार्तूच आता. बाबारं, पोरगं प्वाट भरनार का शिक्शान करनार ? -------- म्हादा आला. बाला बगून हाराकलाच. दादा . .

हे आणि ते - १: पाहुणचार

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी गुरुवार, 26/12/2013 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात एक गंमतीदार अनुभव आला. माझी एक आजी तिच्या भाचीच्या मुलाच्या लग्नानिमित्त तिच्याकडे उतरली होती. लग्नघर असल्याने आणि अर्थातच वार्धक्यामुळे आजीला माझ्या घरी येणं शक्य नसल्याने तिनेच सुचवल्याप्रमाणे तिला भेटायला मी तिथे गेलो. तिच्या माहेरच्या मंडळींशी ख्यालीखुशाली विचारणार्‍या गप्पा झाल्या. त्यांचा आधीपासून परिचय होताच, त्यामुळे गप्पांना वैयक्तिक संदर्भही लाभला. पण त्या बोलण्याला गप्पा असं म्हणणं म्हणजे विंदू दारा सिंगला अभिनेता म्हणण्यासारखं आहे. मी बहुतेक अत्यंत चुकीच्या वेळेला तिथे पोहोचलो होतो.

मुलुंड कट्टा… केल्याने पंडितमैत्री !!!

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी बुधवार, 25/12/2013 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक महिने झाले मुंबईत कट्टा असा झाला नव्हता. काही वेळा ठरतो आहे असे वाटेपर्यंत रद्द झाला होता आणि सलग २-३ डोंबिवली कट्टे झाल्याने पुढील कट्टा खुद्द मुंबईत व्हावा अशी मंडळाच्या काही कार्यकर्त्यांची इच्छा होती. ही इच्छा मंडळाचे तरुण सळसळते रक्त मुवि काकांच्या कानावर घातली होती आणि तसे करण्याचे आश्वासन पण मिळवले होते. वाट बघत होतो ती संधीची. काही दिवसांपूर्वी अशी संधी चालून आली. एके दिवशी सकाळी सकाळी मिपावर आल्यावर डॉक्टर खरे यांचा धागा दिसला, कट्ट्याच्या आमंत्रणाचा.

हठयोग- कुंडलिनी (१)

लेखक शरद यांनी मंगळवार, 17/12/2013 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
कुंडलिनी...हठयोग मागे पातंजल योगशास्त्रावर लेख लिहला होता तेव्हा कांही जणांनी कुंडलिनी बद्दल विचारणा केली होती. आज आपण त्या संबंधी थोडी माहिती पाहू. सर्व जण मान्य करितात की ब्रह्माचा-परमात्म्याचा अंश प्रत्येक जीवात वास करत असतो. पण जीवाला त्याची जाणिव नसते. अद्वैत तत्वज्ञान सांगते की मायेचा पडदा जीवावर अज्ञानाचे झापड घालतो. हा पडदा दूर केला की जीवाला आपण ब्रह्मच आहो याची जाण होते. हठयोगात हे जरा निराळ्या पद्धतीने सांगितले आहे. त्यांनी "कुंडलिनी" नावाची एक शक्ती प्रत्येकाच्या शरीरात वास करीत असते असे मानले. ही शक्ती निद्रित असते.

हरवले मधुमुरलीचे सूर.........

लेखक तिरकीट यांनी गुरुवार, 12/12/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
"शेठ, निलेश बोलतोय...काय चाललय?" "अरे वा!.....बोला.....मी मस्त, तु काय म्हणतोयस..?" बोलण्यात कुठलाही अभिनिवेश नाही...समाधानी आवाज ऐकला की खुप बरं वाटायचं.. खरं तर त्याने फोन उचलुच नये असंही वाटायचं...त्याला फोन केला की छान बासरी ऐकु यायची, त्यानेच कुठल्यातरी मैफिलीत वाजवलेली....मधुकंस असेल बहुतेक..त्याचा आवडता राग.... उणीपुरी ५-७ वर्षांची ओळख आमची....कॉलेजमधल्या कुठल्याश्या स्पर्धेमधे झाली असेल......तेव्हा १-२ वेळेला भेटलो असु.