Skip to main content

संस्कृती

माज़ा अस्तित्वा - तंजावर मराठीतून पॉडकास्ट

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 21/02/2014 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, 1 मराठी भाषेचा अभिमान आपल्याला महाराष्ट्रात राहून साहजिक वाटतो. तसाच किंबहुना त्यापेक्षा काकणभर सरस अभिमान व कामगिरी 'जया' यांनी 'माज़ं अस्तित्व' या नावाने पॉडकास्ट सुरू करून केली आहे. आपली बोली भाषा टिकवून त्यातील विविध भाग रंजक व अभिनव प्रकारे कशी वापरता येतील असे सुचवणारे पर्याय शोधले आहेत.

सीकेपी खाद्य जत्रा आणि डोंबिवलीत भरलेले, अभिजीत आर्टस आयोजीत, "आफ्रीकेतील जंगली प्राणी व पक्षी यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन" ... कट्टा

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 17/02/2014 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
, प्रिय मिपाकरांनो, कसे आहात? गेले ७/८ दिवस सीकेपी हॉल्,ठाणे इथे सीकेपी खाद्य पदार्थांची जत्रा आहे, असे तुम्हाला समजावे आणि आम्ही काही मिपाकर मंडळी पण तिथे जाणार आहोत, अशा अर्थाचा एक धागा मी काढला होता. तशी लहानपणा पासून मला ह्या ना त्या निमीत्ताने, ह्या पदार्थांची चव घ्यायला मिळत असे.मित्र तर सीकेपी होतेच पण आमचे शेजारी पण सीकेपी होते.आम्ही करतो ती करंजी आणि सीकेपी लोक करतात ते कानोले.हा फरक फार पुर्वीच लक्षांत आला होता. एकदा एका सीकेपी मैत्रीणीला, तुमच्या करंज्या

मिस्टर प्रामाणिक

लेखक तिमा यांनी शनिवार, 15/02/2014 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी अत्यंत प्रामाणिक आहे बरं! आपल्या देशातलाच काय, या जगातला सर्वात प्रामाणिक माणूस आहे मी! त्यामुळेच तर या भ्रष्टाचारी राक्षसांकडून सामान्य जनतेची सुटका करण्यासाठी मी पक्ष स्थापन केला. माझा पक्ष मोठ्या संख्येने निवडून आल्याबरोबर लगेच सत्तेचे दलाल सावध झाले. सगळ्यांनी माझ्याविरुद्ध कट केला. मला माहितच होते ते. ते आतून कसे एक आहेत, हेच तर मला जनतेला दाखवून द्यायचे होते. माझे सरकार स्थापन झाल्याबरोबर मला आणि माझ्या माणसांना किती काम करु आणि किती नको असे झाले. रोजच्या रोज आम्ही कामांचा फडशा पाडायला सुरवात केली. सरकारी नियम हे आपणच केलेले असतात नं? मग ते वाकवले, मोडले तर एवढी बोंबाबोंब का करायची ?

आधी शरीर कि मन? योगाच्या दृष्टीकोणातुन - अंतिम

लेखक Atul Thakur यांनी शुक्रवार, 14/02/2014 05:39 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग म्हणजे मनाच्या सहाय्याने अंतिम ध्येयाप्रत जाण्याचा मार्ग. हे अंतिम ध्येय योगाच्या परिभाषेत समाधी म्हणुन ओळखलं जातं. राजयोग शब्दाबाबत अनेक मतं प्रचलित आहेत. मात्र या मार्गात मन हेच उपकरण प्रामुख्याने वापरलं जातं हे जवळपास सर्वमान्य आहे. राजयोगाच्या अष्टांग मार्गात यम, नियम हा एक महत्वाचा भाग मानला जातो. सर्वसाधारणपणे माणसं जरी आसन, प्राणायामात विशेष रस घेणारी असली तरी राजयोग परंपरेत यम, नियमांचं महत्व अपार आहे.

मंत्र - सामर्थ्य आणि अनुभव

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 11/02/2014 03:51 या दिवशी प्रकाशित केले.
(श्री शरद यांच्या http://www.misalpav.com/node/26963 या धाग्यावरील अवांतर प्रतिसाद इथे हलवून नवा धागा तयार केला आहे. एखाद-दुसरा संदर्भ त्या धाग्यातील चर्चेबद्दल असू शकतो. - संपादक मंडळ) _____________________________________ मंत्रादि गोष्टींवर लिटरली विश्वास ठेवणे अन कोणी चेष्टा केली की पोरकटपणे आरडाओरडा करणे, इ.

आधी शरीर कि मन? योगाच्या दृष्टीकोणातुन - भाग ३

लेखक Atul Thakur यांनी रविवार, 09/02/2014 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
हठप्रदीपिकेत पाच उपदेश आहेत. ज्यात योगातील चार अंगांचा विचार केला आहे. आसन, प्राणायाम, मुद्रा व समाधी याबद्दल तपशीलवार माहिती पहिल्या चार उपदेशात मिळते. पाचव्या औषधीकथन उपदेशात योगाभ्यास करताना काही शारीरिक उपद्रव झाल्यास काय उपाय करावे याचा उहापोह आहे. योगाभ्यासाच्या फलप्राप्तीचे जागोजाग उल्लेख आहेत. यातील तांत्रिक भाग जरी क्षणभर बाजुला ठेवला तरी हठप्रदीपिकेचे ग्रंथकर्ते स्वात्माराम यांनी राजयोग, हठयोगाबद्दल केलेल्या काही मार्मिक विधानांचा विचार येथे करणे भाग आहे.

दुर्योधन,: महाभारतातला

लेखक शरद यांनी शनिवार, 08/02/2014 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्योधन : महाभारत काय म्हणते ? श्री.मृत्युंजय यांचा दुर्योधनावरील लेख वाचून थोडी निराशा झाली.. रामायण व महाभारत हे आपले नुसते धार्मिक ग्रंथच नव्हेत तर सांस्कृतिक धन आहे. त्यावर आपले विचार अवष्य मांडावेत पण तसे करतांना " ग्रंथात असे आहे पण मला त्यातून हा अर्थ लावावा असे वाटते " असे लिहले पाहिजे. दुर्गा भागवत वा इरावती कर्वे या महाविदुषी देखील हाच मार्ग चोखाळतात. याने दोन गोष्टी साधतात. वाचकाला ग्रंथात काय आहे व मग तुम्हाला काय म्हणावयाचे आहे ते सापेक्ष कळते. नच, तुम्ही मांडता ते ग्रंथात आहेच अशी चुकीची समजुत होऊं शकते. श्री.

काही व्हेलेंटाईनी चारोळ्या

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 07/02/2014 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
(१) कट्यावरच्या मुलांसाठी (कालेज तरुणासाठी) धोक्याची सूचना - पाहून कुणी हसली तर दोस्ती दुष्मनीत बदलण्याची शक्यता. तिरछी नजर फेकुनी ती मंदमंद हासली जन्माची दोस्ती आमुची तत्क्षणी खलास झाली. (२) माझ्या बरोबर कित्येकदा असेच घडले आहे. गेले ते दिन गेले ... मी तिला गुलाब तिले तिने काटे परत केले तिच्या डोळ्यांत हंसू माझ्या डोळ्यांत आंसू. (३) एकांती भेटण्यापूर्वी विचार करा, जमाना खराब आला आहे. व्हेलेंटाईन दिनी ती एकांती भेटली रात्री आनंदी झोपलो सकाळी कस्टडीत उठलो. (४) प्रेमाची फलश्रुती बहुतेक अशीच असते...

जीवती

लेखक रामदास यांनी गुरुवार, 06/02/2014 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
क्रि. विनायक प्रभू यांची नॉन क्रिप्टीक कथा "जीवती " ही त्यांनी लिहीलेल्या आणि मला आवडलेल्या कथांपैकी एक आहे. सोबत या कथेचे ध्वनीमुद्रण जोडत आहे.