Skip to main content

संस्कृती

भटकंती - ५ लग्नाला गेले मी ओसाकापुरा

लेखक इन्ना यांनी बुधवार, 19/03/2014 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
भटकंती -५ लग्नाला गेले मी ओसाका पुरा.. माझ्या भटकेपणात मौज आणणारी, काही अनपेक्षित दिसलेली इंद्रधनुष्ये आहेत. उन पावसाचा खेळ पहाताना ,ओल्या मातीचा वास घेत , अचानक दिसलेली कमान , अजूनही 'हैला कस्ल भारी' अस वाटवते, तसेच हे भटकंतीत अचानक ठाकलेले प्रसंग !! जपानात नविन काम मिळालं होते आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून तोक्यो हून ,ओसाका नावाच्या शहरात जायच होत. आदला आठवडा कामानी पिट्ट्या पडला होता, म्हणून ओसाकात पोचले की गुमान पडी मारायची अस ठरवल होतं. पण शिंकान्सेन नी जाताना सहज खिडकीतून पाहिले तर फुजी सान !

संस्कारनगरी वडोदरा

लेखक संतोषएकांडे यांनी रविवार, 16/03/2014 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मोदक यांचा वडोदरा (बडोदा) प्रवासाचा लेख मिपावर आला होता. वडोदरा बद्दल ओढ असणारे बरेचशे मिपाकर त्या लेखाच्या प्रतिक्रीयेत दिसले. म्हणूनच वडोदराची जवळून ओळख करून देण्यासाठी हा लेख. संस्कारनगरी,विध्यानगरी,साहित्यनगरी किंवा कलानगरी अशी विश्वात कीर्ती मिळवून देण्याबद्दल वडोदरा संस्थान श्रीमंत सयाजीराव गायकवाड ३रे यांचं सदैव ऋणी आहे. स्वातंत्र्याआधी वडोदरा संस्थान निझामाच्या हैद्राबादा नंतर भारताचं दूसरं भव्य राज्य होतं. तरीही वडोदराला इंग्रजां कडून जास्तच महत्व मिळालं होतं. श्रीमंतांनी बरीचशी स्थापत्य व महालांचं राज्यात निर्माण केलं.

कान्हेरी लेणी, प्लॅस्टिक, ब्लफमास्टर वगैरे

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 15/03/2014 09:07 या दिवशी प्रकाशित केले.

प्लॅस्टिकबाबत सूचना
.

सूचना फलकांवरची प्लॅस्टिकबाबत जागरुकता
.

मुबलक प्रमाणात प्लॅस्टिक मिळण्याची उद्यानातली अधिकृत जागा
.

प्लॅस्टिक इथे मिळेल घरून मात्र आणू नका

होळी, धूळवड, रंगपंचमी

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 14/03/2014 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, होळी, धूळवड, रंगपंचमीच्या शुभेच्छा. या निमीत्ताने विकिपीडिया करता लागणार्‍या मुक्त छायाचित्रांच्या विकिमीडिया कॉमन्स या ऑनलाईन संग्रहाचा थोडक्यात परिचय करून द्यावा असा उद्देश आहे. उदाहरणार्थ होळी हा लेख इंग्रजी आणि भारतीय भाषा आणि इंग्रजी विकिपीडियावर आहेच पण त्या सोबत अगदी कोरीयन नॉर्वेजीयन अशा भाषात देखील आहे. आपण विकिमीडिया कॉमन्स या संयुक्त प्रकल्पात एखादे छायाचित्र चढवले की प्रत्येक भाषेतील विकिपीडियात वेगळे चढवावे लागत नाही. त्यामुळे अजून नवीन इतर नवीन भाषेत लेख अनुवादीत झाला तर त्या भाषेत त्या देशात आपली संस्कृती माहिती होण्यास हातभार लागतो.

लोकायत आणि चार्वाक

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 11/03/2014 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
लोकायताचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकमेव दर्शन आहे की ज्यात वेद, परलोक व देव या तिघांनाही फेटाळून लावले आहे. चेतनावाद हा सर्व धर्मांचा व दर्शनांचा अविभाज्य भाग आहे. शरीर ह्या हाडा-मांसाच्या गोळ्यापेक्षा चेतन जीव हा निराळा आहे हा झाला चेतनावाद.

ब्लॅक अँड व्हाईट-एक फसव द्विभाजन आणि (अर्धे) भरलेले ग्लास

लेखक माहितगार यांनी रविवार, 09/03/2014 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
व्यक्ती, कुटूंब, व्यवसाय, ते असंख्य सामाजिक, जातीय, धार्मीक, राजकीय, केवळ माझच (आमचंच खर) म्हणणार्‍या टोकाच्या भूमीका; व्यक्तीगत आणि समुहांच्या हिताची गणित अनेक संघर्षांना टोकाला नेत असतात. half filled glass ग्लास रिकामाच आहे अथवा भरलेलाच आहे या ह्ट्टांची टोकांची लोकानुनयाने मांडणी करत टोकाची नेतृत्व पुढे येतात.

पौरुषी...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 08/03/2014 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्त मोहिनी श्यामल नयनी सुंदर साधी पवित्र तू ही तुझ्या उदरीचे पवित्र फल मी बीजानेही तुझाच मी ही कधि भासिशी सुंदर शीला कधि मोहिनी तू मधुशाला तुझ्याच साठी आसुसलेला मी ही येथे रिताच प्याला धाक तुझाही हवा वाटतो पत्नी म्हणूनी माता म्हणूनी प्रेम तुझेही हवे वाटते कधि सखी तू कधी कामिनी धर्माचेही तुटले बंधन संस्कृतिचेही सुटले कोंदण अंगण झाले कधि नभी ते नभही झाले कधी..च अंगण आता आहे पुढेच सारे जिंकायाचे...चाखायाचे स्वातंत्र्याचे मिळता सोने जपून ते हि राखायाचे.
काव्यरस

आदिशक्ती....

लेखक स्मिता श्रीपाद यांनी शुक्रवार, 07/03/2014 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या नवरात्री मद्धे अचानक सुचलेली ही कविता... आज अचानक हाती आली.... माझे आयुष्य घडवणार्या, माझ्या प्रत्येक सुखदुखात सहभागी होणार्या स्त्री शक्तीला.... उद्याच्या महिला दिनासाठी माझ्याकडुन....प्रेमपुर्वक..... नऊ नावे नऊ रुपे नऊ तुझे अवतार, संकटहारिणी भवभयतारिणी तुला नमस्कार..!! आईच्या रुपात भासतो प्रेमाचा सागर, माया ममता किती लुटु मी, त्याला अंत ना पार...!! आज्जीचे हे रुप असे जणु समईच्या वाती, उधळुन देइ अमुच्यावरती संस्कारांचे मोती...!! कन्या रुप हे असे भासते जणु भाग्याचा ठेवा, किती लोभस किती गोंडस,पाहिजे तितका लुटावा...!! बहिण लाडकी हक्काची,ठेव जशी बालपणीची, कधी भांडणे कधी प्रेमाने जपून
काव्यरस