Skip to main content

संस्कृती

विवाह मुहुर्ताच्या निमिताने!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 22/04/2014 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
या विषयावर अंतरजालावर किती लेखन झालय हे मला अपरिचित आहे. मी स्वतः सुद्धा,मिपावर अश्या प्रकारचे लेखन कमीच केले आहे. पण पूर्वी हे असले लेखन तुरळकपणे का होइना..पुणे..पिंपरी चिंचवड अश्या एरियातल्या २/३ (लोकल) मासिकांमधुन केले होते. (माझी वहिनी..साप्ताहीक-गगनझेप..वगैरे) काही कारणानी ती लिंक ८ वर्षांपूर्वीच तुटली.पण लिहिण्याची भूक शाबूत होती. तो चान्स पंधरा एक दिवसांपूर्वीच मिळाला. चान्स असं म्हणतो... कारण की एकतर ते दिवस अठवले. आणि दुसरं म्हणजे यावेळी चक्क साप्ताहिक सकाळ मधून फोन आला..म्हणून!

पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये......

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 20/04/2014 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा... सांगायलाच पाहिजे का? पिठ पाडण्या साठी कोणी जातं वापरु नये...... (आजकाल त्या साठी पिठाच्या गिरण्या असतात तिकडे जावे. जात्यावर पिठ काढण्याची परंपरा आता जूनी झाली आहे म्हणून.) (पूर्वी जात्यावर पिठ काढताना बायका ओव्या म्हणायच्या, देवाचे नाव घ्यायच्या. आजकाल पिठाच्या गिरणीत जोरजोरात "गन्नम स्टाईल" लावलेले असते. त्याच तालावर गिरणीवाला धान्य दळत असतो. तोच संस्कार कदाचीत त्या पिठावर होत असेल. पण तरी सुध्दा, उगाच संस्कार वगेरे करण्यासाठी म्हणून, बळेच स्वतःचे कंबरडे मोडून घेउ नये....

आर्र....राजकुमार

लेखक तिमा यांनी रविवार, 20/04/2014 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
आर्र... राजकुमार पुणे-मुंबई वोल्वो प्रवासात बरेचदा हिंदी चित्रपट बघावे लागतात. तर आमचे महतभाग्य असे की, काल आम्हाला एक अद्वितीय, 'आर्..राजकुमार' नांवाचा चित्रपट बघायला मिळाला. आधी, थोडावेळ आम्ही त्याकडे बघण्याचे टाळून खिडकीबाहेर बघत होतो. पण मारधाडीचे आवाज, जबरदस्त संवाद आणि गुलजारला घरी बसायला लावतील अशा ग्रेट काव्याची गाणी कानावर आदळू लागली. त्यांत बाहेरुन ऊन यायला लागले. मग पडदा बंद करुन चित्रपट बघायचे ठरवले. जुन्या जमान्यातले असल्याने हिरो-हिरॉईन ना नुसते बघून त्यांची नांवे माहित असणे हे गृहीत नव्हतेच.

ओवाळणी

लेखक मीराताई यांनी बुधवार, 09/04/2014 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्यासारखंच मुलांना बालमंदिरात सोपवून आम्ही मैत्रिणी घरी निघालो. सकाळच्या धावपळीनंतर हे मैत्रिणींसोबत गप्पा करत, हसत-खिदळत घरची वाट चालणं म्हणजे सगळा शीण घालवून उत्साहाची ओंजळ भरून घेणं असायचं. त्या दिवशीच्या गप्पांत विषय दिवाळीचा होता. सण तोंडावर आलेला. सुटीचे बेत, सणाची खरेदी. एकेकीचा उत्साहा उतू चालला होता. त्यातच एकजण हसत सांगू लागली, काल मी यांना विचारलं, 'दिवाळीची ओवाळणी काय घालणार तुम्ही मला?' तर हे म्हणाले 'लाथ!' तिच्या हसण्याला इतरांनीही साथ दिली. मला मात्र त्या क्रूर विनोदाचं हसू आलं नाही. तिच्यावर झालेल्या त्या वाराने माझंच मन विध्द झालं, पार विस्कटलं.

बडोदा येथे "मी राज्य करण्यासाठी आलो आहे"

लेखक आयुर्हित यांनी बुधवार, 09/04/2014 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
फर्जंद ए खास ए दौलत ए इंग्लीशिया, श्रीमंत महाराजा सर, सेना खास खेल शमशेर बहादूर महाराजा गायकवाड बडोदेकर अशी पदवी धरण करणारे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव श्रीमंत गोपाळराव गायकवाड, (मार्च १०, इ.स. १८६३ - फेब्रुवारी ६, इ.स. १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.

अनाम वीरा...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 05/04/2014 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
अनाम वीरा.... एखादे शब्द मनावर गारुड का करून जातात? जेंव्हा जीवनाची ठराविक एक अशी काहिही समज आलेली नसते,तेंव्हाही.आणि जेंव्हा ती आलेली आहे,असा भास होत असतो,तेंव्हांही!!! हे गाणं मी पूर्विही ऐकलय...आज घरी येता येता सहज ऐकलं. आणि ते तितक्याच सहजतेनी विसरलंही गेलं! आणि अत्ता कानात परत वाजू लागलं? का??? ही रात्रीची वेळ शांत असते म्हणून? की अणखि काही? मृत्यु..हा जिवनातला अविभाज्य भाग किंवा त्याचा शेवटचा परिणाम असला,तरी तो सहज/नैसर्गिक असेल तर नकोसा(च) वाटतो!

शैक्षणीक वळण

लेखक रामदास यांनी बुधवार, 26/03/2014 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
साक्षात्कार वगैरे मला कधीच होत नव्हते पण गेल्या शुक्रवारी आमच्या एचआर डिपार्ट्मेंटनी एका एक दिवसीय झंझावाती कार्यशाळेला मला पाठवल्यानंतर हे असं काहीतरी मला व्हायला लागलं आहे. आयुष्यात शिकायचं थांबू नका-आयुष्य तुम्हाला रोज काहीतरी शिकवत राहील असं काहीतरी एक मुलायम कोमलांगी सांगत होती. आता खरं सांगायचं तर हे दिवस काही शिकण्याचे आहेत यावरून विश्वास उडलेल्या लोकांसाठी ही कार्यशाळा होती, म्हणजे आमच्या कंपनीने "पुढील शिक्षणास निकामी" असा शेरा मारलेल्या लोकांचा एक जथ्था या कार्यशाळेला पाठवला होता.

विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ३

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 25/03/2014 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग ३ विपश्यना केंद्रात भुताटकी?
....अहो सुरवातीला अशी काही माझी बोबडी वळली की काही विचारू नका! आधीच विविध प्राण्यांच्या कळपांच्या आवाजांनी मनात धडधड व्हायची! अहो अगदी त्या निरुपद्रवी मोरांच्या केकाटणाऱ्या आवाजाने भिती वाटायची राव! अहो पहिले काही दिवस मी या शिबिराला कोसत होतो! ...त्यात काही डाव होता की काय? ... चोरदरोडेखोरांना देखील शिबिरातून साधना करायला देतात म्हणून ऐकलं होतं. ...माझा पक्का संशय झाला होता! … …. कोण? ...

अथ:वांगे पुराण

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 20/03/2014 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
अथ: वांगे पुराण ७-८ वर्षांपूर्वी मामे बहिणीच्या लग्नात भंडाऱ्याला गेलो होतो. सीमांतपूजेच्या दिवशी रात्री भरपूर तेल असलेलीजहाल वांग्याची भाजी ताटात होती. एवढा जबरदस्त झणका होता कि जीभे बरोबर मेंदू ही सी सी करू लागला. नंतर कळले पाहुणे मंडळी पुणे, मुंबई, दिल्लीची असल्यामुळे तिखट थोड कमीच टाकल होत. वांग्यांना हिंदीत ‘थालीचे बैंगन ही म्हणतात वांग्याच्या भाजी शिवाय कुठलीही थाली पूर्ण होत नाही.