स्थिरचित्र
झणझणीत
नमस्कार मंडळी!
आज रंगपंचमीच्या निमित्ताने माझे हे रंगीत उद्योग.
घनगड: नववर्षाचा पहिला ट्रेक
च्यायला,
सगळी दुनिया "A" म्हणाली की आम्ही "Z" म्हणणार.
वीर धरण परिसरातले पाहुणे पक्षी: "बार हेडेड गीज"
पुण्याजवळच सासवडजवळ वीर नावाचे गाव आहे. पुणे जिल्ह्यातील बऱ्याच कुटुंबांचे वीरचा नाथ म्हस्कोबा हे कुलदैवत आहे. त्या मंदिरापासून जवळच म्हणजे १ किमीवर वीर धरण आहे. सासवडला पाणीपुरवठा याच धरणातून होतो. त्याचा जलाशय आम्हा भटक्यांमध्ये प्रसिद्ध आहे तो हिवाळ्यात येणाऱ्या पाहुण्या पक्षांसाठी. विशेषतः सायबेरियातून येणाऱ्या "बार हेडेड गीज" (मराठी नाव माहीत नाही) या पक्षांचे हे वीर धरण आश्रयस्थान आहे. परवा तिकडे एक चक्कर टाकली. पाहुणे आलेले असले तरी अजूनही हव्या तेवढ्या संख्येने नाहीत.
(नाक भरून येते पण रुमाल काही पुरत नाही)
(छायचित्र जालावरून साभार)फोटोगॅलरी: मुळशी-ताम्हिणीत लपलेला स्वर्गीय तलाव
पुण्यात राहण्याचा अजून एक फायदा म्हणजे मुळशी धरण आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर. कितीही वेळा या परिसरात फिरलो असलो तरी प्रत्येक वेळी गेल्यावर काही तरी नवीन गवसल्याचा आनंद मिळाला आहे. म्हणूनच कुठेच ट्रेकचा प्लॅन नसतो तेव्हा मी वीकेंडला मुळशीमध्ये सापडतो. मुळशीमध्येच ताम्हिणी घाटाच्या आधी (प्लस व्हॅलीच्या आधी) एक सुंदर, अनटच्ड तलाव आहे, जो बऱ्याच तथाकथित भटक्यांना माहीत नाही.
तो तलाव, दरी, असंख्य पक्षी, डोंगर, लहानसे खेडेगाव, शाळेत जाणारी मुले, बकऱ्या-गुरे चारणारे लोक असे काही भन्नाट फोटो मिळतात की विचारूच नका. या संधीसाठी मी गेल्या १५ दिवसांत तीन वेळा गेलो आहे.
भिगवणचे परदेशी पाहुणे
मागल्या आठवड्यात खबर लागली की पुण्यापासून १०० किलोमीटरवर असणाऱ्या भिगवणला नवीन पाहुणे आलेत: रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो ऊर्फ अग्निपंख. मग काय केले दोन लोक तयार आणि गेलो डायरेक्ट तिकडे. पण काही कारण नसताना ट्राफिक जाम लागले पुणे-सोलापूर रोडवर आणि १०० किमी अंतर कापायला चार तास लागले. पहाटे पाच वाजता निघालो होतो, पण साडेनऊला पोचलो तिथे. काही बरे फोटो मिळाले. त्यातलेच दोन मिपासाठी.
सर्व हक्क सुरक्षित.
पदरगडावरील गुहेचा पॅनोरमा
अधिक सविस्तर माहिती इथे लिहिली आहे.
पदरगड: एक भैसटलेला ट्रेक

(माझ्या हेमाचे तीन लोचट)
सर्व छायचित्रे जालावरून साभार.
मिसळपाव

