Skip to main content

स्थिरचित्र

काळा राजहंस, गोरा मोर आणि इतर

लेखक विकास यांनी रविवार, 24/05/2009 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
काल आम्ही एका जवळच्या प्राणिसंग्रहालयात गेलो होतो. "साउथविक्ज झू" असे त्याचे नाव आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे न्यु इंग्लंड (अमेरिकेतील उत्त्तरपूर्व भागातील ६ राज्ये) मधील हे सगळ्यात मोठे प्राणिसंग्रहालय आहे. खरे खोटे माहीत नाही. पण त्यात काढलेली काही छायाचित्रे येथे दाखवत आहे. मी काही छायाचित्रकार म्हणून तज्ञ नाही पण एखादे आवडणारे दृश्य तात्काळ टिपायचा प्रयत्न करतो. हा त्याचाच भाग आहे. फक्त वरील शिर्षकाच्या अनुक्रमाने हे फोटो नाहीत... तर हा खालील २-३ छायाचित्रे आहेत ती चिडलेल्या सिंह आणि सिंहीणीची. एका चित्रात ती केवळ जाळीच्या मागे दिसेल ज्यात ती उठण्याच्या पोज मधे आहे (खाउ की गिळू).

मोगरा फुलला...

लेखक सुनील यांनी गुरुवार, 09/04/2009 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला दिवस... दुसरा दिवस... तिसरा दिवस... स्थळ - घरचा बगिचा दिनांक - ७. ८ आणि ९ एप्रिल, २००९ कॅमेरा - एका जगप्रसिद्ध कंपनीचा १.३ मेगा पिक्सलचा मोबाइल!!!!!!!

पुलावरचा न्हावी

लेखक विसुनाना यांनी मंगळवार, 17/03/2009 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमनाचे तेलः माझी बायको ऑईल, वॉटर आणि पोस्टरकलर अशा माध्यमात चित्रे काढत असते. तिची काही चित्रे इथे तुम्ही पाहिली होतीच. इतकी वर्षे तिची चित्रकारी पाहता-पाहता मलाही रंगांशी खेळायची हुक्की आली. आमच्या गावात एक आर्किटेक्ट/लेखक/कवि/नाट्यकर्मी कलाकार आहेत - प्रकाश धर्मा म्हणून. अत्यंत हरहुन्नरी माणूस. स्वतः उत्कृष्ट चित्रकार. त्यांनी एक प्रयोग म्हणून नवशिक्या, अर्धशिक्षित आणि अनुभवी चित्रकारांना वॉटरकलर चित्रकला शिकवायला सुरुवात केली.

इ.स. २१७९ - लॉस अँजलिसवर परग्रहवासीयांचा हल्ला

लेखक घाटावरचे भट यांनी शनिवार, 31/01/2009 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
परवा ग्रिफिथ ऑब्झर्व्हेटरी नावाच्या एका जागेवरून लॉस अँजलिस डाऊनटाऊनचा फोटो काढला. त्या फोटोवरून मला ही कल्पना सुचली. मूळ फोटो आणि संपादित केलेला फोटो खाली देत आहे. संपादनासाठी जिंप ही मुक्तस्रोत प्रणाली वापरली आहे. कृपया आपले अभिप्राय कळवावेत. मूळ चित्र - बदल केलेले चित्र - -भटोबा

छोट्यांसाठी वॉलपेपर

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 22/01/2009 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या दीड वर्षाच्या मुलीला आतापासून संगणकाचा लळा लागला आहे. बालगीते मस्त एन्जॉय करते. तिच्यासाठी बालगीतातील/ नर्सरी रिम्स सिडी तील तयार केलेले काही वॉलपेपर तीला खुप आवडतात. ही घ्या काही तुमच्या कडील छोट्यांसाठी.

राऊरकेला

लेखक SwanandSolanke यांनी बुधवार, 21/01/2009 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
दिड वर्षांपूर्वी मला स्वप्नात देखिल वाटले नव्हते की, मी एम् टेक करण्यासाठी ओडिसा राज्यात जाईल. ज्या राज्याचा उल्लेख फक्त महानादीच्या पुरापूरता आणि रथ यात्रेपूरता येतो, त्याच राज्यात एक भारत सरकारच्या कायद्यानुसार राष्ट्रीय महत्वाचे इंजीनियरिंग महाविद्यालय आहे, राष्ट्रीय तंत्रद्न्यान संस्था, राऊरकेला , हे त्याचे नाव. असो, मी मिसल पावचा नुकताच सदस्य झालो, भटकंती हा माझ्या अनेक छंदान्पैकी एक, म्हणुन सुरुवात करतांना या राज्याचे सौंदर्य मी आपल्या समोर ठेवत आहे. ओडिसा राज्य जितके निसर्गसुन्दर तितकेच कमालीचे विरोधाभासी आहे.

"नात॑......!!!!"

लेखक डोम्बिवली फास्ट यांनी शनिवार, 17/01/2009 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
:D ;;) नात॑......!!! एक नात॑ जन्माच॑, ते फक्त असत॑ आईच॑, अस्तित्व असत॑ ममतेच॑, वात्सल्याच॑, येथे स्वार्थाला मात्र स्थान नसत॑.... !! एक नात॑ रक्ताच॑, जे फक्त असत॑ भाऊ-बहिणीच॑, ज्यात फक्त राज्य असत॑ मायेच॑, आपुलकीच॑.... !! एक नात॑ कर्माच॑, ज्यात असते कसोटी साठी निष्ठा, जेथे कामाला येते धैर्य, विरता.... !! एक नात॑ प्रेमाच॑, जिथे असतो एक विश्वास, दोन शरीर॑ अन् एक श्वास....!! एक नात॑ मैत्रीच॑, महत्त्व यात आहे वेळेच॑, पड्त्या वेळेला लागणारया आधाराच॑....!!

'गिंप' सोबत खेळण्याचा एक प्रयत्न.

लेखक घाटावरचे भट यांनी शनिवार, 10/01/2009 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे हे जास्वंदीच्या फुलाचे साधारण छायाचित्र होते. फारसे काही आकर्षक वाटत नव्हते. त्याच्यासोबत गिंप वापरून थोडी छेडछाड केली आहे.
कसे वाटते ते कळवावे. (हे फूल स्वेटर घातलेल्या गणपतीबाप्पाच्या चरणी अर्पण!) - भटोबा

कोकणवारी

लेखक घाटावरचे भट यांनी बुधवार, 17/12/2008 04:30 या दिवशी प्रकाशित केले.
दोन वर्षांखाली कोकणात गेलो होतो. तेव्हा काढलेले काही फोटो इथे डकवत आहे. तेव्हा काही फोटोग्राफीमधली फार अक्कल नव्हती (आताही आहे अशातला भाग नाही), पण आता तांत्रिक बाबी जरा अधिक समजतात (त्यामुळे मी अजून वाईट फोटो काढतो ;)).