Skip to main content

विडंबन

गुर्जीSSS……कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 23/04/2015 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा - https://www.youtube.com/watch?v=mz4bTkh9elg इशेश ईणंती - गुर्जी (http://www.misalpav.com/comment/685412#comment-685412) आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे अवधूत गुप्ते यांची माफी मागून… ---------------------------------------------------------- सकाळच्याSSS पारी मिळेना वाट होSSS…सकाळ

पप्पू माझा लेकुरवाळा

लेखक लॉर्ड फॉकलन्ड यांनी शुक्रवार, 17/04/2015 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
'विठू माझा लेकुरवाळा' या गीताच्या चालीत खालील गीत सावकाश गुणगुणावे. _____________________________________________________ पप्पू माझा लेकुरवाळा संगे खांग्रेसींचा मेळा दिग्गीराजा खांद्यावरी खुर्शिदाचा हात धरी पुढे चाले राज बब्बर मागे नगमा ही सुंदर कपिल आहे मांडीवरी अंबिका, गिरीजा बरोबरी अहमद आहे कडेवरी शीला करांगुली धरी रे़णुका म्हणे राहुला करी खांग्रेसीं‍चा सोहळा

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

किती सांगू मी सांगू कुणाला - युवराजान्च्या पुनरागमनाच्या आनन्दाप्रीत्यर्थ

लेखक लॉर्ड फॉकलन्ड यांनी गुरुवार, 16/04/2015 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला मोर्चा काढू चला, अधिवेशन घेऊ चला आला आला ग पप्पू आला द्वादशीच्या राती ग, यमुनेच्या काठी ग, राहुलबाबा अवतरले गोड हसू गालांत, नाचू गाऊ तालात, झेन्डे थरथरले पप्पू दिसतो उठून, खान्ग्रेसी आले नटून शपथविधीचा शृंगार केला मूर्ति अशी साजिरी ग, गालावरी खळी ग, भुलले पप्पूला कुणी म्हणा राहुल, कुणी म्हणा युवराज, पप्पूला नावे किती लपूनछपून, परदेशी जावून सांजसकाळी अभ्यास केला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला मोर्चा काढू चला, अधिवेशन घेऊ चला आला आला ग पप्पू आला
काव्यरस

कुक्कुट शर्विलक-विलाप

लेखक चलत मुसाफिर यांनी बुधवार, 15/04/2015 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
(किंचित्कवी समजून चू.भू.द्या.घ्या.) मालवणातिल सागरलहरी मला खिजविती अष्टौप्रहरी बाण लागता नको तिथे हा पर झाली 'कनका'ची नगरी 'कुक्कुट गेले साथ सोडुनी 'विकास' दिसता दुज्या अंगणी चोचीमधला दाणा जपती नख्या आपुल्या तीक्ष्ण परजुनी 'वाघ' लागला मागावरती 'वांदरे'हि किलकारा करती वनवासातुन सुटका या हो कधी व्हायची? घटिका सरती.. 'सोनिया'सम ते दिन ना उरले 'घड्याळा'तलेही क्षण सरले ठेवावे हे मस्तक ऐसी दिसतिल का चरणांची 'कमले'?
काव्यरस

फणा

लेखक मित्रहो यांनी बुधवार, 15/04/2015 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
(कवि कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर यांची माफी मागून) ओळखलत का सर मला, दारात आला कोणी केस नव्हते विस्कटलेले, डोळ्यात नव्हते पाणी क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला छाती काढून, ‘इनकम टॅक्सची धाड आली, गेली मान वाढवून’ कैदाशिनीसारखी नुसती कागदी घोडी नाचली, सारी खाती गोठविली, स्वीस बँक मात्र वाचली. कॅश वेचली, लॉकर सील केली, दागिणेही नेले गादीखाली म्हणून प्रॉपर्टीचे पेपर तेवढे वाचले वकीलाला घेउन संगे सर आता लढतो आहे एकेक मुद्दा काढतो आहे, चिखलफेक करतो आहे फोनकडे हात जाताच हसत हसत उठला ‘ओळख नको सर’, जरा कोडगेपणा वाटला. काढून घेतले पद, तरी अजूनही काढतोय फणा, पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त चर
काव्यरस

पुरुशाचे अस्तित्व...!

लेखक संदीप डांगे यांनी सोमवार, 13/04/2015 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
एका महान कवितेवर तितकेच टुकार विडंबन... मंडळी गोड माणुन घ्या. कर्तव्याच्या नावाखाली छळ मांडलाय पुरुषांचा. जन्मापासुन ते मृत्युपर्यंत कर्तव्याच्या दोरखंडाने बांधलंय त्याला. या दोरखंडातुन कधी सोडवण्याचा प्रयत्न केलाय कुणी? नाही! कारण प्रत्येक मनुष्याला फक्त आणि फक्त घेणंच माहीत आहे. एक पुरुष जेव्हा लहान कोंब असतो, तेव्हा आईच्या पोटातच त्याला इंजिनेर, डॉक्टर होण्याचे फर्मान सोडले जाते. कसा तरी करत जन्म घेतलाच त्याने, तर आई-बापाची स्वप्ने पुरी करायच्या बोझाखाली कोमेजुन टाकले जाते. आणि मोठेपणी हुंड्यापायी आईवडिलांना हवी असलेली मुलगी पुढ्यात आणून टाकली जाते.

स्मायली जीवन माझे

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 12/04/2015 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
स्मायली जीवन माझे http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy004.gif ताजे...स्मायली जीवन माझे! http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif धागा असो प्रति साद असू दे सावकाश किंवा घाई असू दे कुणी हसो अथवा तो रुसु दे, देत पुढे मज जाणे ! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-happy-smileys-312.gif स्मायली...

एक विचारवंत -शतशब्दकथा

लेखक तिमा यांनी गुरुवार, 09/04/2015 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
एक विचारवंत आणि त्याची बायको विहीरीच्या कांठावर बोलत बसले होते. अचानक तोल जाऊन बायको आंत पडली. विचारवंत घाबरला. त्याला पोहता येत नव्हते.

दोन वात्रटिका (मार्च १५)

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 15/03/2015 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
झाडूने स्वच्छ केला कचरा कमळ फुलांचा स्वच्छता अभियानाचा राजा तोच ठरला. फ्रीची वीज फ्रीचे पाणी. रात्र अंधारी घाघर रिकामी. (मी जिथे राहतो त्या गल्लीत पाणी येत नाही, पुढील ५ वर्षे पाणी येण्याची संभावना ही नाही- कारण पाणी देण्याचा वादा केलेला नाही -२.५० कोटीच्या दिल्लीत १ कोटी लोकांच्या घरी पाणी येत नाही, अर्थातच पाणी मिळाले तरी लोकांच्या घरी पोहचवता येणार नाही या साठी जवळपास पूर्ण यंत्रणा दुरुस्त करावी लागेल किंवा नवीन यंत्रणा उभारावी लागेल अंदाचे दहा बारा हजार कोटी खर्च येईल.