काथ्याकूट

उत्तर द्या

Primary tabs

या जगातिल १००% घड्णारि गोश्ट कोणती ?
माझे उत्तर उद्या देतो

प्रेमसाई

वरदा

उद्या कायम असतोच्...दुसरा दिवस नेहेमी येतोच्....त्याची आशा असणं हीच १००% घडणारी गोष्टं....

विसोबा खेचर

१००% घड्णारि गोश्ट कोणती ?

मृत्यू!

तो अटळ आहे. एखादी व्यक्ति जन्माला आली की ती डॉक्टर होईल, की इंजिनियर होईल, की हमाल होईल, तिला मानसन्मान मिळतील का?, तिचं आयुष्य कसं जाईल, खडतर की सुखी?, ती रसिक असेल का?, ती इतरांना प्रेम देईल का? इत्यादी इत्यादी इत्यादी कशाबद्दलच काहीही सांगता येत नाही.

मात्र ती व्यक्ति 'मरेल' एवढी एकच गोष्ट मात्र तिच्याबाबत निश्चित सांगता येते!

कारण मृत्यू ही एकमेव गोष्ट १००% घडणारी आहे, अटळ आहे, शाश्वत आहे!

आपला,
(मॉर्टल!) तात्या.

गोट्या (verified= न पडताळणी केलेला)

शंभर टक्के सहमत.
खुपच उत्तम व योग्य असा प्रतिसाद.

मृत्यु हीच एकमेव गोष्ट आहे जी १००% होणार म्हणजे होणारच, अमर असा कोणीच नाही.... (ह्या जगात जेथे परमेश्वराला देखील मरण टाळता आले नाही तर सामान्यांची काय गोष्ट )

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

देवदत्त

मृत्यू ही एकमेव गोष्ट १००% घडणारी आहे, अटळ आहे, शाश्वत आहे!
पूर्णतः सहमत. हेच उत्तर मी ही देईन.

विजुभाऊ

तात्या हे म्हणजे अस्सल एल आय सी एजन्टाने द्यावे तसे उत्तर आहे......शंकाच घेतली तर जगातली कोणतीही गोष्ट चुकु शकते....विश्वास असेल तर बर्‍याचशा गोष्टी १००% घडत असतात

विसोबा खेचर

विश्वास असेल तर बर्‍याचशा गोष्टी १००% घडत असतात

या वाक्याशी ५० टक्के असहमत! :)

तात्या.

१०० % होणारी गोष्ट : मला दिवसातून एकदातरी परसाकड्याला जावे लागते.
(ह.घ्या.)

पुण्याचे पेशवे

दुसरे काय?

१००% घडल्याशिवाय घटना घडूच शकत नाही.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत,
वियोगार्थ मीलन होते नेम हा जगाचा...
जिवासवें जन्मे मृत्यु, जोड जन्मजात
>
>
नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..

स्वताला आर शात पाहणे न चुकता प्रत्येकजन न विसरता करतो १००% दररोज

सुर्योदय आणि सुर्यास्त, नदिच वाह्ता प्रवाह, सागराच्या लाटा, बाळाच हसन्,ह्रदयाच धड्धड, रोज एक प्रेमगाट तयार होते [माझी नाही ], रोज एक नवा जिव जगात जन्म घेतो, भरपुर अजुन आहे परन्तु वेळ कमि आहे

सुर्योदय आणि सुर्यास्त, नदिच वाह्ता प्रवाह, सागराच्या लाटा, बाळाच हसन्,ह्रदयाच धड्धड, रोज एक प्रेमगाट तयार होते [माझी नाही ], रोज एक नवा जिव जगात जन्म घेतो, भरपुर अजुन आहे परन्तु वेळ कमि आहे

सुर्योदय आणि सुर्यास्त, नदिच वाह्ता प्रवाह, सागराच्या लाटा, बाळाच हसन्,ह्रदयाच धड्धड, रोज एक प्रेमगाट तयार होते [माझी नाही ], रोज एक नवा जिव जगात जन्म घेतो, भरपुर अजुन आहे परन्तु वेळ कमि आहे

उदय सप्रे

या जगात १००% एकच गोष्ट घडत असते : "बदल" , या क्षणासारखा पुढचा क्षण असत नाही - काही ना काही "बदल" असतोच !

प्रेमसाई

मृत्यू!

(मॉर्टल!) तात्या.
तुमचे उत्तर अचुक

प्रेमसाई