कलादालन
भारत बंद
Primary tabs
उद्या भारत बंद आहे..
तर मग उद्या ची काय तयारी...
महाराष्ट्रात शिव सेना अणि मनसे ने महाराष्ट्र बंद च आवाहन केला आहे
तुम्हाला काय वाटे याचा फायदा होइल का..अणि जर नाही तर मग काय केला पाहिजे सरकार वर दबाव टाकायला?
उद्या दुकाने बंद करायला जाणारा (अक्षय)
हो रे , काय भाणगड आहे ही ? उद्या मुंबैला ऑफिसला निघायचंय पुण्याहुन !! सुटी आहे की नाही ते कळत नाहीये :(
कृपया पटकन मार्गदर्शन करा कोणीतरी :)
-(सुट्टीप्रेमी) सुटसुटीत
सरकारवर नेमका कशासाठी दबाव टाकायचा आहे, हे तुमच्याबरोबर 'उद्या दुकाने बंद करायला' जाणार्या किती जणांना नक्की माहिती आहे हो?
आणि या बंदमुळे 'सरकार'चं किती, आणि तुमच्या-आमच्या सारख्या सर्वसामान्यांचं किती नुकसान होणार आहे, गैरसोय होणार आहे, याचाही काही विचार झाला असेलच, त्याची ही माहिती वाचायला आवडेल. यात कुत्सितपणा मुळीच नाही, पण 'बंद' करायला पुढाकार घेणार्यांची मानसिकता काय असते ते नक्कीच जाणून घ्यायचं आहे.
'भारत बंद'च्या कालावधीत सामान्यांचे, वृद्धांचे, महिलांचे, मुलांचे, रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून काय ठोस उपाय करणार आहात तेही सांगा. (असे हाल होतातच, असा अनुभव कित्येक वर्षे आपण घेतो आहोत.)
लोकशाही हक्कांसाठी असते, तशीच जबाबदारीसाठीही असते, आणि ही 'जबाबदारी' मुख्यतः आंदोलनांच्या नेत्यांची असली तरी आंदोलन-कर्त्यांनाही त्याची जाणीव असायलाच हवी. तुम्हाला स्वतःला ती जाणीव कशी आहे ते सोदाहरण सांगितलंत तर वाचायला आवडेल.
टारझन लवकर निघ अणि काम संपव...
सरकारवर नेमका कशासाठी दबाव टाकायचा आहे, हे तुमच्याबरोबर 'उद्या दुकाने बंद करायला' जाणार्या किती जणांना नक्की माहिती आहे हो?
==>
माल सांगा टैक्स भारनाराया सगळ्याना माहिती असता का, की त्या पैसाचा काय होता ते?
मागे सर्वोच्च न्यायालयाने राजकिय पक्षांतर्फे वेळोवेळी आयोजित केलेले बंद घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहेत असा निर्णय दिला होता. तसेच शिवसेना-भाजपने २००३ मध्ये आयोजित केलेल्या मुंबई बंद बद्दल त्यांना २० लाख रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला होता.
इतके होऊनही पुन्हा बंदचे आवाहन करणे म्हणजे थेट न्यायालयालाच आव्हान नाही का? भारतात कायद्याचे राज्य चालते की नाही? उठल्यासुटल्या कोणीही कायद्याला आणि न्यायव्यवस्थेला धमक्या कशा देऊ शकतो? कायद्याचे राज्य राखायची जबाबदारी सरकारची असते. तेव्हा स्वत:च्या राजकिय स्वार्थासाठी सामान्य लोकांना वेठिस धरू पाहणाऱ्या आणि रेल्वे-बसची तोडफोड करणे, दुकाने बळजबरीने बंद पाडणे अशी कृत्ये करणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे. ही तद्दन रिकामटेकड्या लोकांची कामे आहेत. अशांपुढे सरकार वेळोवेळी झुकते ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. तापलेल्या वातावरणाचा फायदा घेऊन गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हिंसाचार केला तर त्याची जबाबदारी कोणावर?
ही बंदची प्रवृत्ती कायमची बंद होऊन work culture भारतात रुजेल तो दिवस सोन्याचा असेल.
अवांतर: सर्व विरोधी पक्षांनी उघडपणे भारत बंदची हाक देऊन सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे असे म्हटले तर त्यात काय बिघडले? अशा पक्षांवर निवडणुक आयोगाने नोटिसा का बजावू नयेत?
बंदचे आवाहन हा राजकीय विरोधाचा वैध मार्ग आहे. तो जगात बहुतेक सर्वत्र वापरला जातो . त्यावर न्यायालयाने टाच आणणे हाच मुळात चुकीचा प्रकार आहे.
उघडपणे बंदची हाक देणे यात सवोच्च न्यायालयाचा अपमान असेल तरीही तो जरूर केला जावा असे माझे मत आहे. सर्वोच्च न्यायालय कधीच चूक करीत नाही हे खरे नाही.
बंद च्या निमित्ताने होणारी हिंसा, दगडफेक मालमत्तेचे नुकसान आणि सामान्यांना होणारा त्रास या गोष्टी होऊ नयेत हे मान्य. पण लोकशाहीत आवाज उठवण्यालाच तात्त्विक बंदी असता कामा नये.
(फ्रेंच राज्यक्रांतीनंतर कामगारांच्या संपावर बंदी घालण्यात आली होती कारण संप भांडवलदारांच्या नफा कमावण्याच्या हक्कावर अतिक्रमण करतात- असे वाचल्याचे स्मरते).
पेट्रोलचे वाढवलेले दर हे या बंदचे तात्कालिक कारण असले तरी महागाईचा भडका हेही या बंदचे कारण आहे. सामान्यतः महागाईवाढ या विषयावर आवाज उठवणारे शिक्षित मध्यमवर्गीय गप्प आहेत कारण ते अशा स्थितीला पोचले आहेत की भाज्या, तांदूळ, साखर २० रु किलो असले किंवा १०० रु किलो असले तरी त्यांच्या जीवनात फार/काहीच फरक पडत नाही.
बाजारातली तरलता कमी करून महागाईवर नियंत्रण आणायच्या ऐवजी सरकार १०% विकासदरावर डोळे लावून मंदीवरचा उपाय म्हणून दोन वर्षांपूर्वी सुरू केलेले स्टिम्युलस पॅकेज मंदी संपल्यावरही (कॉर्पोरेटसच्या नादाने) बंद करायला तयार नाही.
अशा परिस्थितीत ज्यांना महागाईची झळ बसते त्यांच्या दृष्टीने हे आवश्यक पाऊल आहे.
(संसदेत हे प्रश्न उठवायला हवे वगैरे बरोबर आहे आणि तेथे विरोधकांचे वागणे हुल्लडबाजीचे असते हे खरे आहे).
नितिन थत्ते
प र फे क्ट प्र ति सा द !!
प र फे क्ट प्र ति सा द !!
-दिलीप बिरुटे
एकदम सहमत आहोत
वेताळ
स्वयंस्फुर्तीने बंद पाळला गेला आहे का? दगडफेक हिंसा झाल्याशिवाय बंदला ग्लॅमर नाही. नाही तर तो मिळमिळीत बंद वा अयशस्वी बंद मानला जातो. आपले विधान तात्त्विक दृष्ट्या योग्य असले तरी व्यावहारिक परिणामाला थोपवणारे नाही.
निषेध व्यक्त करायचा अन्य सनसनाटी मार्ग कुठला हा प्रश्न उरतोच आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
नितिन रावांच्या प्रतिसादाशी पूर्ण सहमत.
याचा अर्थ कुठल्याही गुंडगिरीला पाठींबा आहे असे नाही. तशी जर झाली, तर गेल्यावेळपेक्षा दसपटीने अधिक दंड त्याला कारणीभूत असलेल्या पक्षाला करावा.
बाकी क्लिंटन यांच्या काही मुद्यांसंदर्भातः
अशांपुढे सरकार वेळोवेळी झुकते ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.
सरकार नमते घेते असे मला वाटत नाही. बर्याचदा त्यातून दोन्ही बाजूचा राजकारणी आणि पक्ष काहीतरी हित साधू शकतो. कधी कधी तर वरच्या पातळीवर, "तू मला मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो" असे वागले जात असते...असो.
ही बंदची प्रवृत्ती कायमची बंद होऊन work culture भारतात रुजेल तो दिवस सोन्याचा असेल.
बंद हा वर्षातून एखाद दिवशीच होतो. तो देखील नोकरदार व्यक्ती आणि उद्योग पुकारत नसतात. अगदी वर्षभरात वेगवेगळ्या वेळेस आणि स्थ़ळास/कारणास धरून महीनाभर बंद झाला तरी ११ महीने कामे करणारे करू शकत असतात. त्यांना वर्क कल्चर सांभाळण्यापासून कोणी आडवत नसते.
सर्व विरोधी पक्षांनी उघडपणे भारत बंदची हाक देऊन सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे असे म्हटले तर त्यात काय बिघडले? अशा पक्षांवर निवडणुक आयोगाने नोटिसा का बजावू नयेत?
हा मुद्दा चांगला आहे, मात्र कायद्याच्या दृष्टीने अचूक आहे का या बद्दल शंका आहे. जिथे तुरूंगात गेलेले, खटला चालू असलेले निवडून येऊ शकतात आणि निवडणूक आयोग काही करू शकत नाही, तेथे अशा घटनांमधे कुणाचेही अपराधित्व सिद्ध झालेले नसताना आधीच त्यावरून action घेणे हे कुठल्याही सरकारी खात्यास झेपणार नाही, अगदी पोलीसांना देखील, असे वाटते.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
याचे कारण म्हणजे उद्या आपल्यावरही विरोधी पक्षात बसायची वेळ आली तर आपणही रचनात्मक विरोध करायचे सोडून अशीच तोडफोड करणार आहोत अशी सत्ताधारी पक्षालाही खात्री असते. म्हणूनच ’तेरीभी चुप मेरीभी चूप’ असे म्हणत सत्ताधारी पक्ष अशा गुंडगिरीवर काही कडक कारवाई करताना दिसत नाही. हीच तर दुर्दैवाची गोष्ट आहे.
आय.आय.एम मध्ये आल्यापासून पूर्वीपेक्षा काम करायची क्षमता अनेक पटींनी वाढली आहे त्यामुळे मी work culture च्या मुद्द्याविषयी जास्त आपुलकीनी बोलू शकतो.असा फुकट घालवलेला एक दिवस म्हणजे कामाचा गेलेला एक दिवस नव्हे तर २४ पैकी १७ तास असेच आम्ही समजतो. मिपा आणि इतर गोष्टींसाठी (झोप, खाणे, आंघोळ धरून) दररोज सरासरी ७ तास असे गणित असते.त्यामुळे जर माझ्या कामाचे १७ तास कोणी माझ्यावर सक्ती करून फुकट घालवू पाहात असेल तर मात्र त्याचा संताप आल्याशिवाय राहणार नाही.
ज्या व्यक्तीला कोणत्याही गुन्ह्यासाठी न्यायालयाने दोन वर्षे किंवा अधिक शिक्षा केली आहे त्या व्यक्तीला निवडणुक लढवता येत नाही. जयललितांना २००१ ची विधानसभा निवडणुक याच कारणासाठी लढवता आली नव्हती. आपल्या न्यायव्यवस्थेत खटले संपून शिक्षा व्हायला इतका वेळ लागतो की अनेकदा संबंधित व्यक्ती परलोकवासी झालेली असते. तेव्हा तांत्रिकदृष्ट्या दोषी सिध्द होऊन शिक्षा ठोठावली न गेल्यामुळे निवडणुक आयोगाला याविषयी काही करता येत नाही.
इथे तर उघडउघड सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली खुलेआम होत आहे. खरे तर न्यायालयानेच या गोष्टीची स्वत:हून दखल घेतली तर ते चांगले होईल.तेव्हा निवडणुक आयोगाला या बाबतीत अगदी काहीच करता येणार नाही असे वाटत नाही.
लोकशाहीत स्वत:चे मत शांततापूर्ण पध्दतीने मांडायचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यावर कोणाचीही टाच येता कामा नये यात काही दुमत व्हायचे कारण नाही. ज्यांना सरकारचा निषेध करायचा आहे त्यांना योग्य वाटल्यास जरूर स्वत:पुरता बंद पाळू दे.काहीही हरकत नाही. १९१९ मध्ये रॉलेट ऍक्ट विरोधात ३० मार्च रोजी असा हरताळ पाळायचे आवाहन गांधीजींनी केले आणि जनतेने तो उत्स्फुर्तपणे पाळला. त्या दिवशी दिल्लीत कडकडीत हरताळ पाळण्यात आला होता. यासाठी कोणत्याही प्रकारची सक्ती केली नव्हती. असा बंद स्वखुशीने ज्यांना पाळायचा आहे त्यांना जरूर पाळू दे.
पण राजकिय पक्ष जेव्हा बंदचे आवाहन करतात तेव्हा ते आवाहन असे असते का? बंदमधून दूध, पाणीपुरवठा, औषधे आणि इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील असे जाहिर करण्यात येते. याचाच गर्भितार्थ इतरांनी आम्ही सांगतो तेच करावे नाहीतर त्याची सक्ती होईल असाच असतो. त्यापेक्षा ’ज्यांना बंद पाळायचा नाही त्यांना बंदतून वगळण्यात येईल’ असे का जाहिर केले जात नाही? लोकशाहीत स्वत:चे मत मांडायचा जसा प्रत्येकाला अधिकार आहे त्याचप्रमाणे त्या अधिकाराबरोबर जबाबदारीपण येते याचे भान ठेवायला पाहिजे. लोकशाहीत कोणत्याही प्रकारच्या सक्तीला स्थान नाही त्याचे काय?
वर मी एक मुद्दा मांडला आहे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. विरोधी पक्षांना जर महागाईचा इतका कळवळा असेल तर ते पेट्रोलियम पदार्थांवरील राज्य सरकारच्या पातळीवरील कर त्यांची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये कमी का करत नाहीत?असे करणे म्हणजे विरोध करण्याबरोबरच रचनात्मक पध्दतीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होणार नाही का? आजपर्यंत सगळे पक्ष कधीनाकधी विरोधी पक्षात होते. कोणत्याही विरोधी पक्षाने कधीही असे कर कमी केलेले नाहीत.
तेव्हा महागाईविरोधी आवाज उठविणे वगैरे सगळी बकवास आहे. विरोधी पक्षांना स्वत:ची पोळी भाजून घ्यायची असते आणि त्यासाठी ते सामान्य जनतेवर सक्ती करतात आणि स्वत:च्या राजकिय स्वार्थासाठी बसगाड्या जाळणे, काचा फोडणे यापध्दतीचे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतात. आक्षेप या गोष्टीला आहे.
>>ज्यांना सरकारचा निषेध करायचा आहे त्यांना योग्य वाटल्यास जरूर स्वत:पुरता बंद पाळू दे.
असा स्वतःपुरता बंद पाळणे म्हणजे काय हे कळत नाही. मी निषेध म्हणून एकटाच कामावर गेलो नाही तर ती संघटित कृती होणार नाही आणि मग ती बहुसंख्यांची कृती ठरत नाही. त्याची दखल घेण्याची गरज सरकारला वाटत नाही. संघटितपणे बंद पाळण्यासाठी कुणीतरी तशी कल्पना मांडावी लागते आणि ते कल्पना मांडण्याचे काम राजकीय पक्ष करीत असतात.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातली आक्षेपार्ह बाब म्हणजे असा बंद पाळण्याची हाक देण्यावरच टाच आणली आहे. बंदमुळे होणार्या मालमत्तेच्या नुकसानास जवाबदार असल्याचे सिद्ध होऊन मग दंड केला तर ते ठीक आहे. पण तुम्ही बंदची हाक दिली (नुकसान कोणी केले याच्याशी घेणेदेणे नाही) म्हणून दंड हे योग्य नाही.
(अवांतर : आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर सिंघानिया हॉस्पिटलची नुकसानी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी केल्याची वदंता होती).
राजकीय पक्षांऐवजी बंद पाळण्याचे आवाहन समजा अण्णा हजारे (फक्त उदाहरण) यांनी केले तर मग ते स्वीकारार्ह आहे का?
पेट्रोलचे दर ही महागाई वाढण्यातली एक बाब आहे. पेट्रोलचे भाव सबसिडाईज करावे अशी माझी मुळीच इच्छा नाही. त्याला केलेला विरोध चुकीचाच आहे. पण महागाईला कारणीभूत असलेली इतर कारणे (ग्रोथच्या नावाखाली सोडलेली बाजारातील अतिरिक्त तरलता, टंचाई, कमोडिटी मार्केट म्हणून केली जाणारी सट्टेबाजी) यांवरही उपाय करणे भाग आहे.
त्या दृष्टीने हा बंद फक्त पेट्रोलच्या दरवाढीऐवजी एकूण भाववाढी विरोधात आहे हे चांगले आहे आणि मी साधारणतः काँग्रेससमर्थक असूनही या बंदला माझा पाठिंबा आहे.
(आपण नेहमी राजकारण्यांना दोष देतो आणि आर्थिक वगैरे बाबी तज्ञांवर सोडायला हव्या असे म्हणतो. पण आज अर्थतज्ञ असलेले पंतप्रधान असूनही या बाबींवर नियंत्रण ठेवणे त्यांना जमत नाहीये किंवा अर्थतज्ञांमधल्या ग्रोथ-ट्रिकलडाऊन विषयक अंधश्रद्धेचे ते बळी झाले आहेत असे म्हणायला हवे).
पेट्रोलच्या दरवाढीला आणि नियंत्रणमुक्तीला माझा पाठिंबा आहे.
नितिन थत्ते
मी आधीच स्पष्ट केले आहे की आक्षेप स्वत:ची बाजू मांडण्यावर नाही तर बंदमध्ये सहभागी व्हायची सक्ती केल्यावर आहे.
वर दिलेले उदाहरण अधिक तपशीलात देतो. रॉलेट कायद्याविरूध्द ३० मार्च १९१९ रोजी हरताळ पाळावा असे आवाहन गांधीजींनी केले. त्याकाळी संदेशवहनाची साधने आजच्याइतकी प्रगत नसल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात हे आवाहन वेळेत पोहोचणार नाही हे लक्षात घेऊन हरताळाची तारीख ६ एप्रिल करण्यात आली. तरीही दिल्ली आणि उत्तर भारताच्या बऱ्याच भागात हरताळ ३० मार्चलाच पाळण्यात आला. दिल्लीतील ३० मार्चचा हरताळ हा कडकडित होता. कोणावरही कसलीही सक्ती न करता जनतेने उत्स्फुर्तपणे हा हरताळ पाळला. या हरताळामुळे ब्रिटिश सरकार खवळले आणि १३ एप्रिलच्या जालियॉवाला बाग हत्याकांडाला ही पार्श्वभूमी होती.
समजा नितीन गडकरी आणि इतर विरोधी पक्षातल्या नेत्यांनी जनतेने असा उत्स्फुर्त हरताळ पाळावा असे आवाहन केले आणि कोणत्याही प्रकारची सक्ती न होता तुमच्यासारखे बहुसंख्य लोक त्यात सामील झाले तर त्या गोष्टीचाही सरकारवर दबाव पडणार नाही असे म्हणायचे आहे का? भारतातल्या कोट्यावधी लोकांनी इतरांवर सक्ती न करता असा सरकारचा वैयक्तिक पातळीवर निषेध केला तर मला वाटते ते अधिक प्रभावी ठरेल.
आपले म्हणणे मान्य करायचे तर त्यातही एक खोच आहे. अनेकदा अशी सक्ती केल्यामुळे समाजाचे झालेले नुकसान किती याची मोजदाद करता येणे अशक्य असते. उदाहरणार्थ अशा बंदच्या सक्तीमुळे ट्रक बंद राहिल्यामुळे अनेक टन भाज्या मुंबईत वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे खराब झाल्या तर ते झालेले नुकसान किती किंवा लोक कामावर जाऊ न शकल्यामुळे अनेक व्यवहार लांबणीवर पडल्यामुळे झालेले नुकसान किती याची मोजदाद कशी करणार? फारफार तर १० बसगाड्या जाळल्या तर त्यामुळे झालेल्या नुकसानीची गणती करता येईल आणि त्यासाठी नुकसान भरपाई घेता येईल. त्यातही अशी जाळपोळ करणारे लोक आमचे नव्हतेच अशी हाकाटी करायला राजकिय पक्ष मोकळे राहतील हा भाग वेगळा. तेव्हा याची जबाबदारी नक्की कोणाची? ही सगळी परिस्थिती बंदची हाक दिल्यामुळे उद्भवली म्हणून या गोष्टीची जबाबदारी त्याच राजकिय पक्षाची असे म्हटले तर काय बिघडले?
अवांतर: आपण लावता त्याच न्यायाने बाबरी पाडल्याची जबाबदारी भाजप झटकू पाहात असेल तर ते पण योग्यच म्हणायला हवे.
अण्णा हजारे तर गांधीजींच्या मार्गाचा अवलंब करतात आणि गांधीजींचे म्हणणे होते की सत्यावर निष्ठा असलेल्या एका माणसातही अपरंपार सामर्थ्य असते (संदर्भ: रॉबर्ट पेन यांनी लिहिलेले गांधीजींचे चरित्र). गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहासाठी विनोबा भाव्यांची निवड केली होती. तेव्हा या गोष्टीत विरोधाभास वाटतो. समजा तो भाग बाजूला ठेवला तरी जनतेवर विलक्षण पकड असलेल्या नेत्याने सरकारविरूध्द हरताळ पाळायचे आवाहन केले तरी अनेक लोक त्यात उत्स्फुर्तपणे सामील होतील यात शंका नाही. अलिकडच्या काळात अटलबिहारी वाजपेयींची जनमतावर अशी पकड काही प्रमाणावर होती.आज त्या तोडीचा एकही नेता विरोधी पक्षांकडे नाही. उद्या नितीन गडकरींनी असे हरताळ पाळायचे आवाहन केले आणि त्यांचा पोपट झाला तर पुरतीच शोभा व्हायची. ती नामुष्की नको म्हणून अशी सक्ती करायची वेळ बहुदा येत असावी.
अगदी असेच.विरोधी पक्षांनी या कारणांचा अभ्यास करून जनतेत जरूर जाऊन आपली बाजू मांडावी आणि सरकारविरूध्द वातावरण बनवावे. त्यांना कोणी अडविले आहे? पूर्ण कमोडिटी मार्केटमध्ये नाही तरी निदान अन्नधान्ये आणि डाळी यासारख्या वस्तूंसाठी तरी स्पेक्युलेशनसाठी (हेजिंगसाठी नव्हे) केलेल्या डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्टवर बंदी असावी असे माझे मत आहे. तसेच मत विरोधी पक्षांचे असेल तर त्यांनी जरूर जनतेत जाऊन ते मांडावे. पण असे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून जनतेत जाऊन आपली बाजू मांडायचे कष्ट घेणार कोण? म्हणून करा बंदची सक्ती असा प्रकार दिसतो तो समर्थनीय नाही.
अवांतरः माझ्या आठवणीत इंदिरा गांधींच्या काळात एकदा पंजाबात भिषण ह्त्याकांड झाले होते ज्यात (आता आकडा खूपच कमी वाटेल) पण ८-१० शेतकर्यांना का सामान्य शिखेतरांची बसमधून काढून हत्या केली गेली होती. त्यावेळेस आता अती होत आहे म्हणत विरोधकांनी बंद पुकारला आणि त्याला संपूर्ण देशातून खर्या अर्थाने उस्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. तो आता देशाच्या मानसिकतेचा टिपिंग पॉईंट होता का असे वाटू शकेल.... बाकी इंदिरा हत्येच्या दिवशी आमच्या येथे एक बिल्डींगमधील बायकांनी ठरवलेले डोहाळजेवण पण उगाच नटलेल्या बायका वगैरे दृष्टीपथात येऊ नयेत म्हणून रद्द करावे लागले आणि त्यानंतर आठवड्याच्या आत असलेले एक लग्न देखील लग्नातील उत्साह न दाखवता त्याच भितीने साधेपणाने करावे लागले होते. असो.
बाकी, मला वाटते नितीन, मी अथवा इतर येथे "कालच्या बंदचे" समर्थन करत आहेत असा मर्यादीत अर्थ आपण घेत नसावात. कारण आमचा मुद्दा हा हक्कांसंदर्भात आहे आणि तो देखील जबाबदारीने कायदा पाळून वापरण्यासंदर्भात. जेंव्हा उद्योगांच्या हिताच्या विरोधात सरकार निर्णय घेते, तेंव्हा स्वतःच्या थैल्या मोकळ्या करून निर्णय बदलता येतात.
सामान्यांना ते करता येणे शक्य नसते. म्हणून बंदचे आणि अजून कुठलेही निषेधाचे हत्यार पाहीजेच. ते कसे वापरावे या संदर्भात वाद नाही. त्याशिवाय राजकारण्यांनी इतर अनेक गोष्टीत लक्ष घातले पाहीजे हा देखील मुद्दा आहे, जो मान्यच आहे. त्या संदर्भात वेगळी चर्चा देखील करता येईल.
बर्याचदा आपण जे काही व्यवस्थापन शास्त्रात शिकतो, ते अमेरिकेत तयार झालेले असते असे वाटते. त्यात काही गैर नाही कारण ते शास्त्र चांगले-वाईट जे काही असेल त्या दोन्ही अर्थाने वापरले गेले आहे आणि यशस्वी ठरले आहे. आणि त्यात शिकण्यासारखे खूपच आहे. पण म्हणजे सगळे आदर्शही नाही...
म्हणूनच थोडे या संदर्भात अमेरिकेचा विचार करावा लागतो - अमेरिकेत लॉबिंग हा प्रकार जबराच आहे. २०व्या शतकाच्या सुरवातीस फेडरल ट्रेड कमिशन तयार केले त्या संबंधीचा कायदा हा ८ पानी होता, नंतर १९३५ साली सोशल सिक्यूरीटिचा कायदा आला तर तो २८ पानी आणि आता २०१० साली लॉबिस्टच्या मदतीने तयार केला गेलेले फायनान्स रिफॉर्म बिल हे २३१९ पानी! अर्थात शेवटच्या कायद्यात अनेक पळवाटा या लॉबिस्टच्या करवी "फायनान्स" करता आल्या. काय गंमत आहे, अमेरिकेसारख्या अतिप्रगत राष्ट्रात व्यक्तीगत हक्क म्हणून हव्यातितक्या बंदूका घेयला टाच येता कामा नये असे येथले सुप्रिम कोर्ट आजही म्हणत आहे. पण तेच जर अन्यायाच्या विरोधात बंदचे हत्यार उपसले तर मात्र घटनेच्या विरोधात ठरते.
पाश्चिमात्य देशात बंद हा प्रकार भरभराटीच्या काळात पूर्णपणे अस्ताला गेला होता. तरी देखील आता पोटाला चिमटे बसतात म्हणता क्षणी ब्रिटीश एअरवेज सारख्यांना पण संपचे (बंदचे) हत्यार पुकारावे लागले.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
आपण इंग्लंड-अमेरिकेचे उदाहरण दिले आहे म्हणून माझ्या आवडत्या दुसऱ्या महायुध्दासंदर्भातील एक उदाहरण देऊन ते या संदर्भात कसे लागू होते ते सांगतो.
हिटलरने फ्रान्सचा पाडाव केल्यानंतरची गोष्ट आहे. हिटलरला पश्चिमेकडे जास्त जाण्यात तसा फारसा रस नव्हता. माईन काम्फ मध्येही त्याने जर्मन राईशचा विस्तार पूर्वेकडे असावा असे म्हटले होते. (संदर्भ: नाझी भस्मासुराचा उदयास्त पुस्तकात शेवटी असलेले ’माईन काम्फ’ ची ओळख हे प्रकरण). तसेच ब्रिटिश साम्राज्याविषयीसुध्दा हिटलरच्या मनात वैरभावना नव्हती हे कॉनरॅड एल्स्ट यांच्यासारख्या Indologist नी म्हटले आहे. पण पोलंड प्रकरणावरून फ्रान्स आणि इंग्लंडने जर्मनीविरूध्द युध्द पुकारले आणि त्यामुळे हिटलरचे लक्ष (त्याच्या दृष्टीने) विनाकारण पश्चिमेकडे वळले. मग फ्रान्सवर हल्ल्यासाठी Launching pad मिळावे म्हणून बेल्जियमसारख्या देशांवर हल्ले करणे असे प्रकार त्याला करावे लागले.
२ जून १९४० रोजी म्हणजे फ्रान्सचे युध्द चालू असताना हिटलरने जर्मन सेनानी रुडस्टेन्डला म्हटले, "Now that Britain will presumably be willing to make peace, I will begin final settlement of scores with Bolshevism". तसेच १० जून रोजी फ्रान्सचा पाडाव दृष्टीपथात आल्यानंतर इटलीने संधीसाधूपणा करत युद्धात उडी घेतली. त्याची घोषणा जर्मन सरकारने पुढीलप्रमाणे तयार केली होती,"German and Italian soldiers will now march shoulder to shoulder and not rest until Britain and France have been beaten". हिटलरने स्वत:च्या हस्ताक्षरात बदल करून लिहिले ,"... and will not rest until those in power in Britain and France are prepared to respect the rights of our two peoples to exist". हे सर्व स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संकेतस्थळावर इथे पान क्रमांक २८ वर बघायला मिळेल. हे सर्व लिहायचा उद्देश म्हणजे हिटलरच्या दृष्टीने शत्रू ब्रिटन आणि फ्रान्स नव्हे तर रशिया होते.
फ्रान्सचा पाडाव झाल्यानंतर इंग्लंडच्या लढाईसाठी वेळ जाऊ नये आणि पूर्वेकडे लक्ष द्यायला वेळ मिळावा या उद्देशाने हिटलरने ब्रिटनपुढे परत शांतीप्रस्ताव ठेवला. या प्रस्तावावर ब्रिटिश सरकारचे अधिकृत मत यायच्या आधीच ब्रिटिश वर्तमानपत्रांनी हिटलरचा प्रस्ताव सरकारने फेटाळला आहे असे परस्पर छापले असे वाचल्याचे पक्के आठवते. याचा आंतरजालावर संदर्भ शोधायचा खूप प्रयत्न केला पण तो मला मिळाला नाही.
आता असे वर्तमानपत्रांनी परस्पर कसे छापले?माझा अंदाज असा की या घडीला हिटलरचा प्रस्ताव मान्य केला तर ब्रिटिश जनता आपल्या तोंडात शेण घालेल अशी पक्की खात्री चर्चिल यांना असणार. त्यामुळे चर्चिल असा प्रस्ताव मान्य करणे कदापि शक्य नाही त्यामुळेच वर्तमानपत्रांनी परस्पर तसे छापले. इथे वर्तमानपत्रांची विश्वासार्हता पणाला लागली होती हे लक्षात घ्यायला हवे. ती बातमी खोटी ठरली असती तर त्याचा परिणाम नक्कीच वर्तमानपत्रांच्या खपावर झाला असता. तरीही ती जोखीम त्यांनी पत्करली याचे कारण चर्चिल नक्की काय करणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती. कारण जनमताचा तसा दबाव त्यांच्यावर होता.
आता बंद संदर्भात सांगायचे म्हणजे आपण महागाईविरोधात काहीही पावले उचलली नाहीत तर जनता आपल्या तोंडात शेण घालेल अशी भिती एकदातरी भारतातील राज्यकर्त्यांना वाटली आहे का? आणि ती तशी भिती वाटायला लागणे हेच विरोधी पक्षांचे मोठे यश असते नव्हे ती त्यांची जबाबदारी असते. तरच लोकशाहीचे कामकाज सुरळीतपणे चालू शकते. इतके करूनही सरकार काहीही करत नसेल तर आंदोलनाचा मार्ग अवलंबावा. आणि अशा आंदोलनातही सक्ती आणि सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस समर्थनीय ठरणार नाही. म्हणूनच मी मागे विरोधी पक्षांनी जनतेत जाऊन स्वतःचा मुद्दा रेटावा असे म्हटले आहे. कारण ती पहिली पायरी आहे. पहिली पायरी न चढता दुसऱ्या पायरीवर उडी का?
पण भारतात असा जनमताचा रेटा सरकारवर आणणे आणि त्याकरवी काम करून घेणे हा लोकशाहीत मान्यता असलेला मार्ग अवलंबला जातो का? तसेच विरोधी पक्षांना खरोखरच महागाईविषयी कळवळा असेल तर निदान त्यांच्या राज्यात तरी ते पेट्रोलवरचे कर कमी का करत नाहीत या प्रश्नाचे उत्तर अजूनपर्यंत कोणीही दिलेले नाही. तेव्हा विरोधी पक्षांना महागाईमुळे लोकांना होत असलेल्या त्रासाशी काहीही घेणेदेणे आहे असे मला नक्कीच वाटत नाही.त्यांचे मतलब स्वत:ची पोळी भाजण्यापुरते.आणि या उद्योगात ते सामान्यांना सामील व्हायची सक्ती करतात याचा संताप येतो.
माझे वडिल १९९७ मध्ये ठाण्यातील सिंघानिया रूग्णालयात अतिदक्षता विभागात भरती होते. काही कारणांनी गणेश नाईक प्रणीत कर्मचारी युनियनचे रूग्णालयाच्या व्यवस्थापनाबरोबर वाजले आणि त्या युनियनने अचानक संप सुरू केला. आपल्या संपाचा निदान अतिदक्षता विभागातील रूग्णांवर परिणाम होऊ नये याची किमान माणुसकीच्या दृष्टीने काळजी घ्यायची युनियनवर जबाबदारी नव्हती का? अचानक झालेल्या संपामुळे माझ्या वडिलांना ऑक्सिजन सिलेंडर लावून के.ई.एम हॉस्पिटलमध्ये हलवावे लागले.आणि त्याच दिवशी सायंकाळी त्यांचे तिथे निधन झाले. अतिदक्षता विभागातील रूग्णांना असे हलवणे किती धोकादायक ठरू शकते याची सर्वांना कल्पना असेलच. या सगळ्या प्रकारात युनियनला काय मिळाले याची कल्पना नाही पण त्याचा अतोनात त्रास आम्हाला सगळ्यांना झाला होता. असा कोणालाही त्रास होऊ नये याची काळजी बंदवाले घेतात का?या हलकटांना सत्ता हवी म्हणून महागाईविषयी त्यांना काडीचीही पर्वा नसतानाही स्वत:चा हक्क म्हणून ते सामान्य जनतेला वेठिस धरतात ही संतापजनक गोष्ट आहे. याचे काय स्पष्टीकरण देता येईल?
हा प्रतिसाद श्री क्लिंटन ह्यांस आहे
थोडक्यात काय तर ज्याची जळत आहे त्यांनी बंद पाळा, ज्याची जळत नाही त्याने मात्र ह्या कडे दुर्लक्ष करावे.
ज्याची दोन वेळची रोजी रोटी भागत नाही त्यांनी बंद मध्ये सामील व्हा, आणि ज्याच्याकडे बक्कल पैसा आहे त्यांनी मात्र बंदला चुकीचे ठरवा.
वा रे भारतीया जनता,
वा रे भारतीय लोकशाही,
वा रे महाग(न?) भारत देशा
कुठे गेली आहे संवेदनशीलता ?
(sorry sorry विकून खाल्ली आहे नाही काय ?)
हा प्रतिसाद श्री मनोज काटवे यांना आहे.
मी बंदला चुकीचे ठरवत आहे म्हणजे आपल्या म्हणण्याप्रमाणे माझ्याकडे बक्कळ पैसा आहे असा होतो का? ही माहिती आपल्याला कुणी दिली?
अहो असे संवेदनाशील लोकच बंदचे समर्थन करून अनेकदा हातावर पोट असलेल्यांसाठी अडचणी निर्माण करतात. आज एक दिवस बाजार बंद असला म्हणून मी काही उपाशी राहणार नाही.पण रस्त्यावर वडापावच्या गाड्या असलेले लोक किंवा तत्सम उद्योग असलेल्या लोकांसाठी बंदची सक्ती म्हणजे मोठी अडचण असते हे आपण नाकारू शकता का? मग उद्या ’हीच का तुमची संवेदनाशीलता’ असा उलटा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर?
माझा बंदला विरोध असायचे कारण म्हणजे संवेदनाशीलतेचा अभाव हे नसून हा मार्ग चुकीचा आहे असे मला वाटते हे आहे.
विरोधकांनी एका ठरविलेल्या दिवशी देशातील प्रत्येक तालुका पातळीवर सभा घेऊन सरकारचा निषेध जरूर करावा. मला वाटते अशा हजारो सभा एकाच वेळी देशात एकाच कारणासाठी झाल्या तर त्याची दखल सरकारला घ्यावीच लागेल.
पुढील महागाई (संभाव्य) कमी होण्यासाठी एक दिवस उपाशी राहणे कोणीही पसंत करील हो.
आणि बाकी तुम्ही जे पर्याय सुचविला आहे त्याला सरकार भिक सुद्धा घालत नाही
बंद मुळे निदान कमीत कमी सरकारपुढे विचार करण्यास जबरदस्ती येते.
मला वाटते अशा हजारो सभा एकाच वेळी देशात एकाच कारणासाठी झाल्या तर त्याची दखल सरकारला घ्यावीच लागेल.
फक्त हास्यास्पद
अतिरेकी हमले, रोज नक्षलि लोक करणाऱ्या हत्या, संसदेवरील हमला याची सरकार फक्त दखल घेते.
इतिहास साक्षीला आहे फक्त दखल घेऊन काहीही निष्पत्ती होत नाही. गरज आहे. ठोस कारवाईची
तेथे हे सरकार नापास झालेले आहे.
मी आपल्याला उद्देशून काही म्हणालो नाही.
जर माझ्यामुळे आपल्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मला माफ करा.
भाजपचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पेट्रोलियमच्या किमतीवरील वरील सरकारी नियंत्रणे उठवावीत , त्यांच्या किमती मार्केट नुसार असाव्यात या मागणी ची सुरवात भाजप ने केली. सत्तेत असताना हाच भाजप पेट्रोलियम पदार्थांवरील दरवाढीचे समर्थन करत असतो. काँग्रेस च्या कालावधीत पेट्रोलियम पदार्थांच्या किम्मत नियन्त्रणामुळे सरकारला किती त्रास सहन करावा लागला याची आकडेवारी देखील सादर केली जाते. महागाईचे मूळ कारण असणार्या कमोडीटी मार्केटची भलावण भाजप करते.
खासदार आमदारांच्या पगारवाढीमुळे सरकार वर पडणार्या बोजाचे कोणीच प्रतिपादन करत नाही
(ही पोस्ट नितीन थत्त्यांच्या पोस्ट बद्दल आहे. क्लिंटन यांच्या नाही)
बंद पुकारणे यात गैर काहीही नाही, तसेच तो स्वेच्छेने पाळणे यातही. तो ऑप्शन असायलाच हवा. याच्याशी सहमत आहे (त्याबद्दलची आपली मते ही व इतर पोस्ट वाचून माहीत आहेत तेव्हा त्याबद्दल वाद नाही). पण मला वाटते लोक जेव्हा बंदचा निषेध करतात तेव्हा त्यादिवशी लोकांना जबरदस्तीने घरी बसावे लागते त्याचा निषेध असतो.
आणि मुख्यतः असहमत आहे ते शिक्षित मध्यमवर्गीयांबद्दलच्या वाक्याला - कारण असा एक एकसंध वर्ग असावा असे वाटत नाही. यात कदाचित सरकारी नोकरांपासून ते सर्वसाधारणपणे ज्यांना "आयटीवाले" म्हणतात ते येत असावेत. महागाईचा परिणाम सर्वांनाच जाणवतो. पण एकतर आपण त्याबद्दल काय करू शकतो याची अजिबात कल्पना नसणे व टीव्ही/पेपर मधे मिळणार्या माहितीतून या किमती वाढण्याची कारणे किती अपरिहार्य आहेत ते नीट न समजणे ही कारणे असतील.
बाकी बंद पुकारणे यालाच न्यायालयाने कधी विरोध केला होता (माहीत नाही म्हणून विचारतो)?
क्लिंटन यांनी हा मुद्दा सुरू केला त्या प्रतिसादात दंडाच्या बातमीचा दुवा आहे.
त्या बातमीत स्पष्ट दिसते की नुकसान कोणी केले याचा विचार न करता दंड करणे अयोग्य आहे हे सेना भाजपचे म्हणणे न्यायालयाने फेटाळले होते. म्हणजेच बंद पुकारला एवढ्याच कारणाने दंड झाला होता.
नितिन थत्ते
माझ्या प्रतिसादाला उपप्रतिसाद आल्याने जास्तीचे लेखन या प्रतिसादात.
उघडपणे बंदची हाक देणे यात सवोच्च न्यायालयाचा अपमान असेल तरीही तो जरूर केला जावा असे माझे मत आहे.
त्यासाठी त्यांना पुन्हा दंड केला गेला आणि दंडाच्या रकमेसाठी त्यांनी वर्गणी काढली तर मी घसघशीत वर्गणी देईन इतका हा हक्क मला महत्त्वाचा वाटतो.
नितिन थत्ते
थत्तेसाहेब ++
आपल्या हक्कांसाठी लढा देण्याची सवय जी स्वातंत्र्यापूर्वी टिळक आणी गांधीजींनी लावली होती त्यापासून सुशिक्षितांनी फारकत घेतली आहे.
१३००० कोटीचे नुकसान हा स्पेकुलेटेड आकडा आहे.
महागाई वाढू नये यासाठी सरकार काहीही करत नाही. असं करण हा न्यायालयीन गुन्हा नाही. म्हणून तो करणे समर्थनीय आणि बंदची हाक देणे असमर्थनीय आहे. असा सापत्न भाव का बरं ? बाकी तोडफोड, जाळपोळ वाईट हे खरं पण मग निषेध व्यक्त कसा करायचा असतो? हे खरंतर कधीच व्हायला हवं होतं? अनेक वर्षांनंतर आज किंचित प्रमाणात असं वाटतय की विरोधी पक्ष अस्तित्वात आहेत.
ही बंदची प्रवृत्ती कायमची बंद होऊन work culture भारतात रुजेल तो दिवस सोन्याचा असेल.
महागाई कमी होईल तो दिवस हिर्यामाणकांचा असेल.
निषेध व्यक्त करायला काळे झेंडे लाऊन काम करता येऊ शकतं पण त्याला कितपत प्रतिसाद मिळेल आणि किती यशस्वी होईल हि एक मोठीच शंका आहे.
जाळपोळ आणि काम बंद करून आपण आपलेच नुकसान करतोय हे काही कुणाच्याच लक्षात यायला तयार नाही.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
आपण जी राजकिय व्यवस्था स्विकारली आहे त्या व्यवस्थेत एकदा निवडून दिलेले सरकार ५ वर्षांपर्यंत (किंवा लोकसभेत बहुमत गमावत नाही तोपर्यंत) सत्तेत राहते.महागाईविरोधात सरकार काही करत नसेल तर ती व्यवस्था स्विकारायची ती आपल्याला मोजावी लागणारी किंमत आहे.
जर आपण महागाई कमी केली नाही तर पुढील निवडणुकीत (किंवा मधेमधे होणाऱ्या राज्य विधानसभांच्या निवडणुकींमध्ये) आपल्या पक्षाचा सपाटून पराभव होईल अशी भिती सरकारला बसत नाही तोपर्यंत सरकार काही काम करेल असे वाटत नाही. तशी भिती सरकारला बसावी यासाठी विरोधी पक्षांचे नेते जनतेत गेले आहेत का? किती ठिकाणी जाहिर सभा/ घरोघरी जाऊन जनतेला वस्तुस्थिती सांगितली गेली आहे? सगळे पक्ष निवडणुकीच्या वेळेलाच उगवतात नाहीतर मधूनमधून स्वत:चे अस्तित्व दाखवून द्यायला गुंडगिरी करतात. विरोधी पक्ष असे जनतेत जाऊन प्रचार करायला लागले तर वस्तुस्थिती ध्यानात येऊन सरकारला काहीतरी पावले नक्कीच उचलावी लागतील. निदान कॉंग्रेससारख्या सत्तेला चटावलेल्या पक्षाला तरी जनतेच्या हालअपेष्टा कमी व्हाव्या म्हणून नाही तरी निदान आपली सत्ता जाऊ नये यासाठी नक्कीच काम करावे लागेल.पण असा रचनात्मक विरोध आजपर्यंत कोणत्याही विरोधी पक्षाने केलेला नाही. लोकशाही व्यवस्थेत सरकारला काम करायला लावायचा हा एकच मार्ग आहे. विरोधी पक्षांनी किती वेळेला सरकारचे जनतेत जाऊन असे धाबे दणाणवले आहेत? गुंडगिरी आणि तोडफोड करून काहीही साधणार नाही.
यावर उपाय काय?
टारझन लवकर निघ अणि काम संपव...
सरकारवर नेमका कशासाठी दबाव टाकायचा आहे, हे तुमच्याबरोबर 'उद्या दुकाने बंद करायला' जाणार्या किती जणांना नक्की माहिती आहे हो?
==>
मला सांगा टैक्स भारनाराया सगळ्याना माहिती असता का, की त्या पैसाचा काय होता ते?
»
पण सामान्य मण्स एकच प्रश्न विचारतोय...."ह्याने महागाइ कमी होइल का?"
उत्तर एकच "नाही" व आजच नुकसान भरुन काढायला परत भाववाढ नाही झाली म्हणजे मिळवल.
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
मग महागाई कशाने कमी होईल ह्याचा उत्तर कोण देईल का ?
बंद नाही मग काय मोर्चे काढावे काय, सभा भरावयाच्या काय ?
कि कडक निषेध खलिते पाठवायची? तीव्र, अति तीव्र निषेध करायचा का मग महागाईचा ?
का ते पिटीशन वगेरे sign करत बसायचं ? (मनमोहन ते बघत तरी असेल काय ?)
कोणाकडे आहे का ठोस उत्तर महागाई कशी कमी करायची ते.
जर कोणाकडेच उत्तर नसेल तर ते जे करतायेत निदान त्यात तरी सामील होऊयात
ह्याने महागाई कमी होणार नाही हे माहित आहे, हा सामन्यांचा (विरोधी पक्षांचा) आक्रोश आहे.
सरकारचे कान इतके बधीर झाले आहेत कि त्यांना हे असला बंद, मोर्चे, ह्यांनी काहीही फरक पडत नाही.
एक सामान्य माणूस विचारतो आहे ह्याने महागाई कमी होईल का ते म्हणून ?
त्याच्याकडे उत्तर नाही. (तसे कोणाकडेच नाही म्हणा)
ह्यालाच लोकशाही म्हणतात का ?
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6125570.cms
अच्छा म्हणजे ह्याने काय होइल ते मीहीती नाही तरी खटाटोप करायचा??
सामिल व्हायच नसल तरी व्हावच लागत ती गोष्ट वेगळी.
निदान पानपट्टी व चहाची दुकान उघडी असावीत असा प्रस्ताव का नाही मांडला जात??
_________________________________________________
![]()
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे
इकडे कर्नाटकात भाजपचे सरकार आहे.म्हणून मुख्यमंत्र्यापासुन सगळेच गोंधळले होते. पण उद्या इकडे पण बंद आहे.सकाळी जरा वाचन्,दुपारी पुरणपोळ्या आणि मग रेडियो मिरची ऐकत झोपणे असा 'प्रोग्रॅम' आहे. बंद संपला की मग मस्त चहा.
P = NP
मी ऑफिसात पोचलो आहे. सकाळी ज्ञानेश्वर पादुका चौक, गोखले रस्ता (फर्गसन कॉलेज रस्ता) पुणे येथे २ बस फोडलेल्या पाहील्या. सरकारने व्यापारी पेठांनी (उस्मानाबादेतल्या) बंद पाळायचे ठरवल्याअर त्यांना दंड करण्याची तंबी दिल्याचे बातम्यांमधे पाहीले.
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
काय मिळवलं या लोकांनी बशी फोडून? अशा वेळेस कँपसवर रहात असल्याचा आनंद होतो.
आमच्या सरकारी हापिसात मात्र काही दंड वगैरे करणार अशा टाईपचं इमेल नाही. कँपसबाहेर रहाणारे आज येऊ शकले नाहीत, आले नाहीत तर काही खास वेगळं होईल असं आत्ता दिसत तरी नाही आहे.
अदिती
आपला बंदला पाठिंबा....
आज ऑफिसला दांडी.
कवटी
>>
व्हय व्हय, बरंचसं बंगलूरू झोपलंय आज!
सकालधरनं काय बी आवाज न्हाय आम्च्या इथं (यशवंतपुरात)..
हापिसाला कुलूप हाय आम्च्या..
======================
कोकणी फणस
आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/
आमचा बंद १००% यशस्वी बाकि कत्याकुट चालू दया..
आत्ताच एक SMS आला..........
Petrol Price in
Pakistan 26
Bangladesh 22
Cuba 19
Nepal 34
Burma 30
Afghanistan 36
Qatar 30
India 53
Basic cost per liter 16.50, Centre tax 11.80, excise duty 9.75, state tax 8.00, vat ces 4.00 Total 50.05.
Now extra 3 Rs. great job frm govt.
Support Bharat Bandh
Jai Hind Jai Maharashtra
ह्या असल्या बंद ने काहीही होणार नाही,
सरकार हे ठार बधीर झालेले आहे.
खरतर त्यांच्या कानात हे ओरडणे म्हणजे मूर्खपणा आहे.
त्यांच्या कानात तप्त लाल सळी खुपसायला पाहिजे. तरच काहीतरी हालचाल करतील ते.
सरकार म्हणजे नक्की कोण? त्यांना कोणी निवडून दिलं आहे? आणि नक्की कोणी कोणाच्या कानात तप्त लाल सळी खुपसणं तुम्हाला अपेक्षित आहे?
अदिती
भारतातले सरकार म्हणजे :
£लोकांनी मतदान करून निवडून दिलेले पदाधिकारी" हि जुनी व्याख्या झाली आहे
नवीन व्याख्या
अगोदारच्याच पदाधिकार्यांनी आपापल्या पोरांना/पोरींना कमविण्याचे साधन म्हणून, मत विकत घेऊन
वेळ प्रसंगी बोगस मतदान करून , दंगली, जाळपोळ करून, जातीय राजकारण करून, खोटी आश्वासन देऊन
समर्थ विरोधी पक्षच नसल्याने, जनतेनी बळजबरी बटणे दाबून निवडून आलेले नवीन पदाधिकारी म्हणजे सरकार
(व्याख्या अजून खूप मोठी असू शकली असती, पण जाऊ द्या )
बाकी मी अगोदर जे काही लिहिले त्याचा शब्दश अर्थ घेऊ नये हि विनंती.
महागाई विरोधात जे काही बंद वगेरे होत आहे त्यांनी ह्या सरकारला (ज्या कोणाला , ज्या कोणी निवडून दिले आहे ते) काहीही फरक पडणार नाही.
आंदोलन अजून तीव्र करावेच लागणार आहे. एवढेच मला म्हणायचे होते.
आणि आज नाही केले तर उद्या आपल्या पुढच्या पिढीला करावे लागेल.
सरकारला (ज्या कोणाला , ज्या कोणी निवडून दिले आहे ते) निदान ह्या गोष्टीची जाणीव तरी होऊ द्यात कि आपण जे काही निर्णय घेतो त्याचा कुठेतरी काहीतरी परिणाम होत आहे.
नाहीतर हे सरकार भविष्यात वाट्टेल ते करील .
हा माझ्या मनातील राग आहे, मोकळा करीत आहे, कृपया राग नसावा . क्षमस्व
मनोजशी सहमत आहे. आमच्या मताला काडीचीही किंमत नाही हेच खरे. भोळ्या आशेने आम्ही मात्र मतदान करत असतो.
(कर्तव्यदक्ष)
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
त्यांच्या कानात तप्त लाल सळी खुपसायला पाहिजे. तरच काहीतरी हालचाल करतील ते.
तुम्ही व्हा पुढे. आम्ही येतोच पाठीमागून. तुम्हाला पाठिंबा आहे.
अहो जोगळेकरकाका, सशस्त्र क्रांती हे एकट्या दुकट्याच काम नव्ह.
आमचं ऑफीस बंद!! सुट्टी!!!
ये धत्तड तत्तड!!!!धत्तड तत्तड!!!! धत्तड तत्तड!!!! धत्तड तत्तड!!!!
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
The spirit of resistance to government is so valuable on certain occasions, that I wish it always to be kept alive.
--थॉमस जेफरसन.
माझ्या मते हे वाक्य पुरेसं बोलकं आहे.
--अवलिया
लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार ||
सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||
The spirit of resistance to government is so valuable on certain occasions, that I wish it always to be kept alive.
--थॉमस जेफरसन.
हा "अभारतीय" संदर्भ फारच छान. ;)
मात्र जेफरसन आणि एकंदरीतच अमेरिकेत खाजगी क्षेत्रे आणि व्यक्ती यांचे स्वावलंबन असण्याची अमेरिकेच्या जन्मापासूनची डीमांड होती आणि कायम राहिली आहे. तत्वतः तो मान्य असला तरी त्याचा अनेकदा अतिरेकही होतो, पण एकंदरीतच तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
>>>हा "अभारतीय" संदर्भ फारच छान.
हा हा हा
एखादा मुद्दा योग्य असल्यास मी भारतीय वा अभारतीय असा भेद करत नाही. :)
>>>अनेकदा अतिरेकही होतो, पण एकंदरीतच तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे.
+१
--अवलिया
लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार ||
"ते" सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||
ह्या बंदमधून काय साधणार?
महागाई तर तसूभरही कमी होणार नाही असे आधीच प्रणव मुखर्जींनी जाहीर केले आहे. बसा हात चोळत!
बरं, तरीही ''निषेध'' म्हणून जो बंद झाला त्यात :
१. चाकरमान्यांना फुकाची एक रजा टाकावी लागली. काहींना विदाऊट पे! म्हणजे नुकसान!
२. कंपन्या, कारखाने, दुकानदारांचे नुकसान
३. हातगाडीवाले, हातावर पोट असणार्यांचे नुकसान.
४. सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड. त्याचे नुकसान सरकार पक्षाच्या खासगी तिजोरीतून नव्हे, तर सर्वसामान्याच्या खिशातूनच जाणार!
५. राडेशाहीला, मनगटशाहीला पुन्हा एकदा उधाण. जुने स्कोअर सेटल करायला विविध गुंडांना, राजकीय संघटनांना नामी संधी!
६. पेशंट्स, ज्येष्ठ नागरिक, प्रवासी, होस्टेलमध्ये/परगावी राहणारे, परावलंबी व्यक्तींनाही ''बंद''चा त्रास.
७. पोलिसांनी संरक्षणाची महत्त्वाची कामे करण्याऐवजी बंदच्या नियोजनात त्यांना गुंतवणे.
मग फायदा कोणाचा झाला?
१. विविध राजकीय संघटनांचा, ज्यांनी त्या निमित्ताने आपली पोळी भाजून घेतली. सरकारी व विरोधी पक्षांचा फायदा. एकाने गरीबांविषयी कळवळा दाखवायचा, दुसर्याने सामान्यांची अडचण होऊ देणार नाही अशी गर्जना करायची.... सगळेच नाटक जोरात!
२. सरकारी बाबूंचा.... ज्यांना आपल्या कामात दिरंगाई, निरुत्साह, उदासीनता दाखवायला अजून एक निमित्त मिळाले!
३. प्रसिध्दीमाध्यमांचा! त्या चॅनलवाल्यांनी तर काव आणलाच.... आणि आता पुढचे अनेक दिवस त्यावर रकानेच्या रकाने भरून वाहातील!
मग ज्या सर्वसामान्य जनतेचा एवढा तोटा झाला ती जनता आपणच निवडून दिलेल्या सरकारला थोड्या प्रमाणात तरी हालवू शकली का? तर त्याचे उत्तर ''नाही'' हेच आहे!
बरं, रस्त्यावर हातात लाठ्याकाठ्या घेऊन कोण उतरते? सामान्य माणूस!
तो कोणावर हल्ला चढवतो? सामान्य माणसावर!
त्याचे लक्ष्य काय असते? सार्वजनिक मालमत्तेची नासधूस (जी त्याच्याच खिशातून कररुपातून उभारली जाते!)
ह्या बंदमुळे सरकारी पक्षाचा काही तोटा होतो का? उत्तर ''नाही''.
जबाबदार नेत्यांचा तोटा होतो का?
पुन्हा उत्तर ''नाही''.
मग अशा ''बंद''चा काय उपयोग? फक्त आपण एक लोकशाही राष्ट्र आहोत हे दाखवण्यासाठी? की लोकांना एक दिवसाची सक्तीची सुट्टी देऊन देशाचे आर्थिक नुकसान करण्यासाठी? सामान्य माणसालाच सामान्य माणसाविरुध्द राडा करायला फूस लावण्यासाठी?
आणि त्यात सामील होणार्या ''सामान्य'' माणसाला स्वतःचे दुटप्पीपण जराही लक्षात येऊ नये? निवडणुकांमध्ये कोण किती पैसे/ वस्तू देतंय ह्यावरुन त्या उमेदवाराला मते देताना नाही आठवण होत मग तो पक्ष आपल्याला सरकाररूपात किती नाडतोय ह्याची? आणि ते पैसे घेऊन मत दिलेले उमेदवार जेव्हा नेते बनून असे महागाई वाढीचे निर्णय घेतात तेव्हा त्यांच्याविरुध्द बोंब? अर्रे, ज्या भुसभुशीत मातीवर तो नेता झालाय त्या मातीतून अशीच ''गोमटी'' फळे येणार! मग आता कशाला हे अरण्यरुदन?
आंदोलन करण्याची ''बंद'' हीच एकमेव पध्दत आहे का?
''गो स्लो'' धोरण राबवून किंवा काळ्या फीती लावून निषेध व्यक्त करता येत नाही का?
एरवी ''थाळी बजाव'', ''घंटानाद'' वगैरे वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करणारे पक्ष अगदीच कल्पनादारिद्र्याने का वागतात?
आणि ह्या सर्वाचा उपयोग तरी आहे का? उद्या महागाई कितीने कमी झाली ते सिध्द करुन दाखवा ह्या ''बंद''मुळे!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
असे 'बिनतोड' प्रश्न विचारता येत असतील/विचारावेसे वाटत असतील तर बरेच लोकशिक्षण अजून बाकी आहे.
नितिन थत्ते
+ १
खरं आहे.
+ १
पुष्करिणी
-१
>> प्रत्येकवेळी विरोध हा काही तरी फळ देईल ह्या आशेने करण्यात काही अर्थ नाही. पण सरकारला ही समजायला हवे की जनताचा आपल्या धोरणांना विरोध आहे. त्यामुळे ते पुढच्या वेळी अधिक काळजी घेतील.
पेट्रोल-डिझेल दरवाढ हे तत्कालिक कारण आहे, सर्व प्रकारचे महागाई हे मुख्य कारण आहे, बंद मागचे.
मला अजुनही वाटते की शेतीमालाचे दर कमी आहेत. ज्वारी, गहुचे दर ३५-४० च्या दरम्यान हवेत. साखर ५० च्या आसपास हवी. तरच शेतकर्यांना परवडु शकेल. कारण बाजार समितीमध्ये जवळ पास ५-२० टक्के दलाल घेतात. वजनातील गडबडी वेगळ्याच, वाह्तुक वेगळीच. शेतमालाच्या दरावर शेतकर्याचे नियंत्रण नाही. भाज्यांचे दर ह्या महीन्यात जास्तच असतात.
आणि जे लोक मल्टीप्लेक्स मध्ये विकांत घालवतात, घरात २-३ चांगली कमावती आहेत, त्यांनी शेतीमालाबद्दलच्या महागाईबद्दल बोलणे म्हणजे स्वार्थीपणा वाटतो.
सहमत.
एक मुळातूनच समजून घ्या कि
बंद हि क्रिया नसून प्रतिक्रिया आहे.
जिथे मुळातच एवढी महागाई बोकाळली आहे, लोकांना दोन वेळचे अन्न मुश्कील झाले आहे. त्यांना उपदेशाचे डोस पाज्न्यातच बर्याच जणांना धन्यता वाटते.
ज्याच्या मुलाबाळाला योग्य शिक्षण मिळत नाही, दिवस भर मर मरून दोन वेळचे खायला नाही तो काय हे उपदेशाचे, परदेशातील काही उदाहरणे ऐकून गप्प बसेल काय.
त्याच्या मनावरचा ताबा सुटला कि मग तो जे करतो ते चुकीचे हे ठरवायला शेकडे विचारवंत पुढे सरावतात.
पण त्याच्या मनावरचा ताबा का सुटला, हे सगळं करण्यास तो का धजावला ह्याचा पण विचार व्हायला पाहिजे का नको.
ज्याची दोन वेळची भ्रांत आहे , जो खरोखरीच पोळला गेलेला आहे
त्याला हे दहा-बारा हजार कोटी नुकसान, राजकारण वगेरे सांगणे म्हणजे लाज्ज्स्पद आहे. अक्षरशः चीड येते ह्याची,
कदाचित भाजपचे स्वताचे पोळी भाजून घाण्याचे राजकारण असेलही, पण कोन्ग्रेसने तर त्याही पुढची पातळी गाठली आहे.
सर्वप्रथम सामान्यांना सामान्यपणे जगू द्या मग त्यांच्या कृतींना चागले/वाईट ठरवा.
बंद ला चुकीचे ठरविणार्यांनी दोन ( मुलाबाळा सकट) दिवस उपाशी राहून बघावे, कशी पोटातील आतडी कशी पिळून निघतात ते.
मग दुसर्या कोणाला उपदेश द्यावेत.
(आक्रमक भाषेबद्दल क्षमस्व )
मी भाजपचा समर्थक अजिबात नाही पण हे कोन्ग्रेस ने जा काही चालविलेले आहे ते म्हणजे अगदी भयानक
म्हणे १०० दिवसांत महागाई कमी करू , तिप्पट-चौपट वाढली आहे हीच महागाई.
मग सामान्य माणूस करणार तरी काय
कुठे हंबरडा फोडणार तो ?
त्याच्या जीवाला आणि मनाला काय किंमत आहे कि नाही ?
कि तेच तेच प्रगतीचे आकडे कवटाळून बसायचं आणि तो काय करतोय ते बरोबर कि चुकीचे
दूर कुठेतरी (AC रूम मध्ये ) बसून ठरवायचं
त्याच्या भविष्याची किंमत, बंद मध्ये झालेल्या नुकसानी पेक्षा कैक हजार पटीने जास्त आहे
जिथे त्याची पुढची पिढीच पणाला लागली आहे त्याच्या समोर हे काय लुटू-पुटु १०/१२ हजार कोटी.
असल्या लोकांच्या तोंडापर थू , जे त्यांच्या भावनाची किंमत पैशात करतात
(आक्रमक भाषेबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व )
हा विषय विनाकारण ताणायचा नाही तरीही काही मुद्दे लिहिणे भाग आहे.
सर्वत्र महागाई वाढलेली दिसतच आहे आणि त्याचा त्रास सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर होत आहे यात शंकाच नाही. आणि बंद ही क्रिया नसून प्रतिक्रिया आहे हे १००% मान्य. तरी प्रतिक्रिया या स्वरूपात देणे योग्य आहे का याविषयी पुढील प्रश्नांची उत्तरे दिलीत तर बरे होईल.
१. विरोधी पक्ष स्वत:च्या स्वार्थाची पोळी भाजून घेत आहेत हे तुम्ही स्वत: मान्य करता. आणि ते सामान्यांचा त्यांच्या या नीच खेळामध्ये प्याद्यासारखा वापर करतात. तेव्हा या त्यांच्या स्वार्थी खेळात तुम्हाला इतका कळवळा आहे त्याच सामान्य जनतेने का सामील व्हायचे?
२. मी मागे विचारलेला प्रश्न परत तिसऱ्यांदा विचारत आहे. जर विरोधी पक्षांना महागाईमुळे सामान्य जनतेला होत असलेल्या त्रासाविषयी इतके वाटत असेल तर ते त्यांच्या राज्यातील पेट्रोलवरील कर कमी का करत नाहीत? सांगा आहे का उत्तर? याचे कारण स्पष्ट आहे त्यांना महागाई कमी व्हावी असे मुळातच वाटत नाही. कारण महागाई निवडणुकांपर्यंत तशीच राहिली तर त्याविरूध्द हाकाटी करून सत्तेचा सोपान चढायला त्यांना सोपे जाणार आहे. सामान्य लोक चुलीत का जाईनात!
३. एकाच वेळी हजारो सभा देशात घेतल्या तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही असे तुम्हाला कशावरून वाटते? बाळासाहेब ठाकऱ्यांनी १९९५ च्या विधानसभा निवडणुकींच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात १००-१५० सभा घेतल्या. प्रत्येक सभेच्या शेवटी ते एकच प्रश्न विचारत असत-- कॉंग्रेसच्या राज्यात सुखी झालेल्यांनी हात वर करावेत. अर्थातच कोणी हात वर करत नसे. पुढचा प्रश्न असे-- कॉंग्रेसच्या राज्यात दु:खी झालेल्यांनी हात वर करावेत. आणि जवळपास सगळे लोक हात वर करत असत. आणि याच वर केलेल्या हातांनी शरद पवारांचे सरकार खाली खेचले हा इतिहास जुना नाही. १९७७ च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच दिल्लीत रामलीला मैदानावर विरोधी पक्षांची आणीबाणीविरोधी लाखांची सभा झाली. त्याचे महत्व कमी आहे का? समजा देशातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एकाच वेळी अशा सभा झाल्या आणि त्यात असे कोट्यावधी लोक सामील झाले तर सरकारला लोकांचे भले व्हावे म्हणून नाही तरी आपली सत्ता जाऊ नये म्हणून काहीतरी करणे भाग पडेल असे वाटत नाही का?कॉंग्रेसवाले स्वत:ची सत्ता कशी राहिल हे बघण्यात तर अगदी एक्सपर्ट आहेत. जनमताचा असा रेटा आला आणि आपली सत्ता जाईल अशी भिती कॉंग्रेसला वाटली तर त्या भितीपोटी काहीतरी चांगला बदल व्हायची शक्यता आहे. बंद करून, तोडफोड आणि जाळपोळ करून आणि लोकांवर सक्ती केली तर काही कारण नसताना आपले टाळके फुटायला नको या भितीपोटी लोक घरी बसतीलही पण कॉंग्रेसवाले ’असे लोकांचे घरी बसणे हे सक्तीमुळे झालेले आहे आणि जनमताचे निर्देशक नाही’ असे म्हणायला परत मोकळे राहतीलच. प्रश्न असा की असा जनमताचा रेटा लोकशाहीत संमत असलेल्या मार्गांनी (तोडफोड आणि सक्ती न करता) विरोधक आणणार का?
यात दोन गोष्टी आहेत-- एक तर वर म्हटल्याप्रमाणे विरोधी पक्षांनाही अशी जागृती करण्यात काडीमात्र स्वारस्य नाही. त्यांचे हितसंबंध महागाई राहण्यातच गुंतलेले आहेत. आणि दुसरे म्हणजे अशी जागृत लोकशाही दुर्दैवाने भारतात रूजावी यासाठी कोणत्याही राजकिय पक्षाने प्रयत्न केल्याचे दिसत नाही.
डॉ.आंबेडकरांनीही २५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटनासमितीपुढे केलेल्या भाषणात इशारे दिले . आजही या इशाऱ्यांचे महत्व तितकेच आहे इतके कालातीत इशारे हे आहेत. "Abandon the bloody methods of revolution”. In the circumstances of colonial rule, there were grounds for taking to the streets to protest, and even perhaps to use violence. But with the coming of a free, sovereign and democratic republic, wrote Ambedkar, “there can be no justification for these unconstitutional methods. These methods are nothing but the Grammar of Anarchy and the sooner they are abandoned, the better for us”.
नुसता आंबेडकरांचा उदोउदो करायचा पण त्यांचे हे विचार त्या काळी तरी अशा लोकांना समजले होते का आणि आता तरी समजले आहेत की नाही हा प्रश्न मात्र जरूर पडतो.
४. याच चर्चेत कानात लोखंडी सळया खुपसायचा उल्लेख झाल्यावर ’सशस्त्र क्रांती एकट्याने होत नाही’ असे विधान आपण केल्याचे दिसते. हे विधान जबाबदार विधान आहे असे आपल्याला वाटते का? आणि ते तसे आपल्याला वाटत असेल तर आपल्यासारख्या महात्म्याशी चर्चा करावी इतक्या पात्रतेचा माणूस मी नाही. त्याबद्दल क्षमस्व.
हा विषय मलादेखील विनाकारण ताणायचा नाही
१) दुर्दैवाने समान्य जनतेला सामील होण्यासाठी काही शिल्लकच राहिलेले नाही म्हणून तर जे मिळेल तिथे हि सामील होत आहे.
२) बंद फक्त पेट्रोलच्या किमतीसाठी झाला नसून सर्व अनाठायी महागाई साठी झाला आहे. आणि त्यामध्ये केंद्र सरकारचे धोरण हे प्रमुख भूमिका बजावते.
जर महागाई कमी करणे राज्य सरकारच्या हातात असली असती, तर त्या परिस्थितीत सुद्धा केंद्र सरकारने त्यावर दबाव टाकावयास हवा होता.
३) आपला हा मुद्धा अजिबात पटला नाही.
सरकार इतके बधीर झाले आहे कि
अतिरेकी हमले होतात, नक्षली हमले होतात,
आजवर शेकडो आत्महत्या झाल्या तरी ह्या सरकारला काडीचा देखील फरक पडला नाही,
ह्या असल्या बुळचट सभा घेऊन त्यांच्यात काहीच फरक पडणार नाही. हि वस्तुस्थिती आहे.
मला सुद्धा हेच म्हणायचे आहे कि हे बंद वगेरे नक्कीच ठीक नाही,
पण जनता प्रतिकार करते आहे
मी म्हणेन कि ज्यांना महागाई मुळे काही फरक पडत नाही त्यांनी अश्या चर्चासत्र झाडणे हे फोल आहे.
ज्यांना फरक पडत असेल त्यांनी जमेल तशी कृती करावयास सुरुवात करावी.
४) आपण माझ्या विधानाबद्दल जबाबदारी विचारू पाहत आहात.
जोपर्यंत नेभळट पद्धतीने विरोध चालू राहील तो पर्यंत काहीही होणार नाही.
करून बघा हव्या तितक्या सभा.
जिथे सरकारचा डोलारा अतिरेकी, नक्षली हमले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या असल्या वादळांनी तसू भर देखील हालत नाही,
(मी आतापर्यंत मनमोहन सिंग यांची बरीच भाषणे बघितली आहेत,
अगदी एखादी पत्रकार परिषद असो वा अतिरकी हमल्या नंतरचा कडक, अति कडक , तीव्र कडक निषेध असो,
एकच निराकार भाव चेहऱ्यावर, एक सुरकुती सुद्धा हलत नाही त्यांच्या चेहर्यावरची)
तिथे ह्या असल्या बुळचट सभा म्हणजे वार्याची एक झुळूक,
(रोग जसा , इलाज तसाच करावा लागतो
कर्करोग झाला तर काय disprin घेणार ? )
तेव्हाच्या जनतेच्या प्रतिनिधींची कातडी कदाचित माणसाची होती,
पण आजच्या प्रतिनिधींची कातडी गेंड्या पेक्षा जाड, निब्बर आणि कडक आहे हे कसे विसरलात
एक मनात आलेला शेवटचा प्रश्न
बंद झाला म्हणून तुम्ही आम्ही निदान चर्चा तरी करत आहोत,
जर बंद नसता झाला तर कोणी एवढे मनावर घेऊन चर्चा तरी केली असती का ?
पेट्रोल च्या किमती वाढून ८ दिवस तर झालेच आहेत.
आणि बंद चे आवाहन देखील तेव्हाच केलेले होते.
बंद यशस्वी व्हावा म्हणून मी / आम्ही निदान थोडे फार प्रयत्न तरी केले आहेत,
आपण किती सभा घेतल्या अथवा घेणार आहात ?
नक्की कळवा, मी हजर राहीन आपल्या सभेला .
बाकी खोचकपणे मला महात्याचा दर्जा दिल्याबद्दल धन्यवाद.
हि पदवी मला झेपणार नाही. माझी तेवढी पात्रता नाही.
एकच मनुष्य होता ज्याची पात्रता होती हि पदवी धारण करण्याची.
--------------------------------------------------------------------
कोणीतरी सभी घेईल आणि महागाई कमी होईल ह्या आशेवर बसलेला एक आम आदमी. (हीच पदवी मला पुरेशी आहे. )
बरोबर आहे बसवर दगडफेक करणे किंवा बळजबरीने दुकाने बंद पाडायला लावणे या गोष्टी मला अजिबात झेपणार नाहीत. त्याचप्रमाणे जाहिर सभा घेणे हा लोकशाही पध्दतीत एक मार्ग आहे. जाहिर सभा घेण्याचा उद्देश एवढाच असतो की एखाद्या विषयाचा अभ्यास करावा आणि आपले विचार एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचवावेत. ती गोष्ट करायला लागणारा लोकसंग्रह माझ्याकडे नाही त्यामुळे मी ती गोष्ट या क्षणी करू शकत नाही. मग यासाठी मी काय करणार/करत आहे?
वेळ मिळेल त्याप्रमाणे मी मिपावर आणि माझ्या परिचयातील लोकांपुढे मी माझा मुद्दा मांडत असतो. तुम्ही बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेत म्हणजे बसच्या काचा फोडल्या नाहीत/ जाळपोळ केली नसावेत अशी अपेक्षा आहे. पण या गोष्टी करणे चुकीचे आहे आणि लोकशाहीत जनमताची ताकद दाखवायचे इतर अधिक योग्य आणि वैध मार्ग उपलब्ध आहेत त्याचा वापर करावा आणि त्यात सगळ्यांचेच हित आहे हा माझा मुद्दा मी मांडायचे अजिबात सोडणार नाही. हा मुद्दा वाचून त्यातून पुढच्या बंदच्या वेळी एकतरी दगड कमी मारला गेला किंवा सार्वजनिक मालमत्तेचे एक रुपयाने का होईना नुकसान कमी झाले तर ते माझे पूर्ण यश असेल असेच मी मानेन. मिपा या व्यासपीठावर मांडलेले मुद्दे किती लोकांपर्यंत पोहोचतात किंवा त्याची उपयुक्तता किती याची कल्पना नाही.सध्या मी भारतातील एका नामवंत शिक्षणसंस्थेत शिक्षण घेत आहे आणि अर्थशास्त्रातील आणि इतर गोष्टींमधील बारकावे अजून खोलात जाऊन कळावेत याचा प्रयत्न करत आहे. भविष्यकाळात माझ्या प्रयत्नांना यश आले तर मी नक्कीच अजून मोठ्या व्यासपीठावरून माझे मुद्दे मांडू शकेन. पेट्रोलियम पदार्थांचे दर बाजारात ठरवले जायला सरकारने मान्यता दिली याविषयी हा प्रतिसाद मी मिपावर लिहिला आहे. त्यावर आपली प्रतिक्रिया काय हे जाणून घ्यायला आवडेल.
बाकी मनमोहन सिंहांच्या चेहऱ्यावरची सुरकुती हालत नाही ही गोष्ट खरी आहे. ती गेल्या ६ वर्षांमध्ये कधीच हालली नव्हती हे पण तितकेच सत्य आहे. पण तरीही लोकांनी गेल्या वर्षी त्यांनाच निवडून दिले ना? लोकशाही पध्दतीत आपले म्हणणे जनतेपर्यंत पोहोचवायचा सगळ्यांना अधिकार आहे. लोकांनी परत कॉंग्रेसलाच निवडून दिले याचा अर्थ एक तर विरोधी पक्ष आपली विश्वासार्हता गमावून बसले आहेत किंवा त्यांना आपला मुद्दा जनतेपर्यंत नीट पोहोचविण्यात अपयश आले आहे. तुम्हाला मनमोहन सिंह आवडत नसतील पण त्यांना जनतेचा जनादेश प्राप्त झाला आहे हे कसे नाकारता येईल? आणि पुढच्या वेळी जनादेश आपल्या बाजूने लागावा म्हणून राजकिय पक्षांनी प्रयत्न करावेत हाच लोकशाही संकेत आहे. म्हणजे मला लोकांनी निवडून दिलेले सरकार आवडत नाही म्हणून मी करणार दगडफेक-जाळपोळ या गोष्टीला लोकशाहीत अजिबात स्थान नाही. याच गोष्टीचा पुढचा भाग म्हणजे ’तुला माझे पटत नाही काय? मग घालतो गोळी’ असा कशावरून होणार नाही? आणि तसे झाले तर भारताचा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. याच कारणामुळे मला तुमची सशस्त्र क्रांतीवरील टिपण्णी अत्यंत बेजबाबदार वाटते.
लोकशाहीत जनमताचा दबाव सरकारवर आणून निवडणुकीत बदल घडवता येतात याची किती उदाहरणे सांगू?
१. १९७१ मध्ये बांगलादेश युध्दानंतर इंदिरा गांधींचा पराभव होईल असे कोणाला स्वप्नातही वाटले नसेल. तरी त्यांचा पराभव १९७७ मध्ये झालाच ना?
२. तीच गोष्ट राजीव गांधींची. १९८४ मध्ये ४००+ जागा जिंकणाऱ्या राजीव गांधींच्या पक्षाचाही १९८९ मध्ये पराभव झालाच ना?
३. चंद्रबाबू नायडूंच्या सरकारविरूध्द राजशेखर रेड्डींनी आंध्र प्रदेशात पदयात्रा काढली होती. अनेक हजार किलोमीटर ते पायी फिरले होते, लोकांमध्ये जाऊन त्यांनी लोकांना स्वत:ची बाजू समजावून सांगितली. २००४ आणि २००९ मध्ये काय झाले हे परत सांगायलाच हवे का?
४. तीच गोष्ट बाळासाहेब ठाकऱ्यांची. त्यांनी आणि गोपीनाथ मुड्यांनी असेच शरद पवार सरकारविरोधी रान उठविले आणि बदल घडवून आणला.
तेव्हा असा मतपेटीच्या मार्गाने होणारा बदल आपल्याला अनुकूल लागला नाही तर मी चाललो दगडफेक करायला असे म्हटले तर सगळीकडे कोणीनाकोणी दगड मारणारे निघेलच.
हा असा बदल घडवून आणायला निवडणुकांची वाट बघायला लागते असेही नाही. १९६२ च्या युध्दानंतर संरक्षणमंत्री कृष्णमेनन जनतेत लोकप्रिय नाहीत याची कल्पना आल्यानंतर नेहरूंना त्यांना हकलावेच लागले ना? १९९१ मध्ये आर्थिक संकटाच्या वेळी तत्कालीन राष्ट्रपती वेंकटरामन परदेश दौऱ्यावर निघाले होते. अशा वेळी त्यांनी दौऱ्यावर जाऊन करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करू नये म्हणून लोकसत्ताचे संपादक माधव गडकरींनी राष्ट्रपती भवनावर तारांचा पाऊस पाडावा असे आवाहन वाचकांना केले आणि असा खरोखरच तारांचा पाऊस राष्ट्रपती भवनावर पडला होता आणि त्यातून राष्ट्रपतींना त्यांचा दौरा रद्द करणे भाग पडले होते.त्यावेळी कोणत्या निवडणुका तोंडावर आल्या होत्या?
सनदशीर मार्गांचे हे सामर्थ्य आहे. तरीही तसे करायला न जाता विरोधक बंद का पुकारतात? त्याचे कारण मागे लिहिलेच आहे की त्यांना महागाईविषयी काडीचीही काळजी नाही.त्यांना स्वत:ची पोळी भाजून घ्यायला महागाई जास्त असलेली कधीही चांगली. आणि नाहीतर दुसरे कारण म्हणजे एवढे कष्ट कोण घेणार?
पेट्रोलियम पदार्थांमुळे महागाई वाढते पण १००% वाटा त्याचा नसतो ही गोष्ट मान्य.पण म्हणून विरोधकांनी त्यांना शक्य तेवढे करून त्यांच्या परिने महागाई कमी करायचा प्रयत्न का करू नये? उलट या गोष्टीचा केंद्रावर दबाव वाढेल. शेती या महत्वाच्या विषयापेक्षा क्रिकेटला प्राधान्य देणारे शरद पवार हे कृषीमंत्री आहेत त्यांच्या कारभाराचे वाभाडे संसदेत आणि बाहेर पाहिजे तितक्या प्रमाणावर निघत नाहीत.कृष्णमेननचे जे झाले तेच पवारांचे करण्यासाठी विरोधक का प्रयत्न करत नाहीत?
तेव्हा बंदच्या दरम्यान दगडफेक करणे, दुकाने जबरदस्तीने बंद पाडणे आणि रूग्णांचे शिव्याशाप घेऊन पापाचे धनी होण्यापेक्षा महागाईच्या प्रश्नाचा नीट अभ्यास करा. नक्की कारण काय आणि त्याला जबाबदार केंद्र सरकार कसे हे ओळखीच्या प्रत्येकाला सांगा आणि त्यांना इतरांना सांगायला उद्युक्त करा यातूनच कोणावरही दगड न मारता चांगला बदल घडून येईल.
श्री. क्लिंटन,
पी, आर, ई, पी पद्धतीने, विविध उदाहरणे देऊन (ज्याचा आत्ताच्या बंदशी काही संबंध नाही - उदा. दुसरे महायुद्ध) तुम्ही बंदचा विरोध करत आहात. पण त्यात बंदपेक्षा विरोधी पक्षांचा विरोध आणि 'कॉर्पोरेट' पद्धतीच्या विचारसरणीचे समर्थन वाटत आहे. का कुणास ठाऊक ह्या वादात जेन्युईन विचारापेक्षा मुद्याची लढाई जास्त दिसते आहे.
आय.आय.एम मध्ये आल्यापासून पूर्वीपेक्षा काम करायची क्षमता अनेक पटींनी वाढली आहे त्यामुळे मी work culture च्या मुद्द्याविषयी जास्त आपुलकीनी बोलू शकतो.असा फुकट घालवलेला एक दिवस म्हणजे कामाचा गेलेला एक दिवस नव्हे तर २४ पैकी १७ तास असेच आम्ही समजतो.
-- याचा या चर्चेशी संबंध समजला नाही. आय. आय. एम. च्या संपूर्ण अल्युमनी ची संख्या एका पेठेइतकी पण नसेल. work culture आणि वेळेचं महत्त्व मान्य. पण त्याबरोबर सामान्य लोकांचं काय?
हाच वाद वाढत्या महागाईविरोधात का आला नाही?
तेव्हा बंदच्या दरम्यान दगडफेक करणे, दुकाने जबरदस्तीने बंद पाडणे आणि रूग्णांचे शिव्याशाप घेऊन पापाचे धनी होण्यापेक्षा महागाईच्या प्रश्नाचा नीट अभ्यास करा. नक्की कारण काय आणि त्याला जबाबदार केंद्र सरकार कसे हे ओळखीच्या प्रत्येकाला सांगा आणि त्यांना इतरांना सांगायला उद्युक्त करा यातूनच कोणावरही दगड न मारता चांगला बदल घडून येईल.
- दगड न मारता बंद, तोडफोड, रुग्णांची, प्रवाशांची गैरसोय, त्रास इ. गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि बंद शांततेत आणि तुम्ही म्हणता तसा उत्स्फुर्त पणे झाला तर अति उत्तम. पण म्हणून सनदशीर मार्गाने सामान्य जनतेचा आवाज कसा पोहोचणार तेही तुम्हीच सांगा.
आपले म्हणणे मान्य करायचे तर त्यातही एक खोच आहे. अनेकदा अशी सक्ती केल्यामुळे समाजाचे झालेले नुकसान किती याची मोजदाद करता येणे अशक्य असते. उदाहरणार्थ अशा बंदच्या सक्तीमुळे ट्रक बंद राहिल्यामुळे अनेक टन भाज्या मुंबईत वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे खराब झाल्या तर ते झालेले नुकसान किती किंवा लोक कामावर जाऊ न शकल्यामुळे अनेक व्यवहार लांबणीवर पडल्यामुळे झालेले नुकसान किती याची मोजदाद कशी करणार? --
वाढीव दरांमुळे जो चुकीचा संदेश जातो आहे आणि जनतेच्या खिशातून पैसा जातो आहे त्याला तर माप (measurement)च नाही.
८० रुपये डाळ, ५० ते १०० साखर, ३० रुपये तांदूळ या परिस्थितीमध्ये इंधन दरवाढीने परिस्थिती बिघडेल का सुधारेल?
एक दिवसाचा माल आपल्या आकारमान (volumes) मुळे मोठा वाटतो हे खरे. पण मग एकूण consumption वर च्या delta चा विचार केला तर तो किती जाईल या एका दिवसापेक्षा?
यात इंधन दरापेक्षा प्रचंड inflation मध्ये त्यात भर घालणारे दर याचा मुद्दा जास्त आहे. तोडफोडीचं, लोकांना धमकवण्याचं लोकशाहीत समर्थन नाहीच. पण १९% टक्क्यावर दरवाढीचं तेल ओतण्याचं अजिबात शक्य नाही.
राज्य सरकारांनी टॅक्स कमी करावेत - म्हणजे केंद्राने सबसिडी कमी करावी, मग राज्यांनी आपले उत्पन्न कमी करून त्याची भरपाई करावी. मग त्या राज्यात पैसा कमी पडला की केंद्राने देऊ नये आणि मग निवडणुकात इथे विकास नाही म्हणून बोंब मारायला मोकळे स्थानिक विरोधी आणि केंद्रात सत्ताधारी.
मी भाजप समर्थक होतो आता नाही. मनमोहन सरकार अगदीच वाईट नाही. कारण त्यांना समर्थ पर्यायच नाही. आत्ताचा मुद्दा काँग्रेस भाजप नाहीच. उलट जरा बरे असलेले सरकार गेल्या ८- १० महिन्यात अशक्य झाले आहे. दिवाळीच्या वेळी वाढलेले भाव अजून आवाक्यात आले नाहीत. पवारांवर विरोधी पक्ष का शरसंधान करत नाहीत या प्रश्नात विरोधी पक्षाच्या / बंदच्या विरोधापेक्षा सरकारच्या धोरणांचे आणि वाढत्या महागाईचे समर्थन दिसते आहे.
अर्थशास्त्र याचे उत्तर तुम्हाला देऊ शकत असेल. आणि ते कदाचित बरोबरही असेल (आकडेमोड / प्रमेय). म्हणून ते योग्य / उचित ठरत नाही.
सहमत आहे.
क्लिंटन यांनी बंद पाळण्याऐवजी गावोगाव सभा घ्याव्यात असे सूचित केले आहे.
त्या संदर्भातलीही सध्याची न्यायालयाची आणि जागरूक सज्जन नागरिकांची विचारसरणी विरोधाचीच आहे हे पूर्वी दिसून आलेले आहे.
नितिन थत्ते
माझ्या प्रतिसादांमध्ये मी महागाईचे समर्थन केले आहे हे कशातून सुचित होते? दुसऱ्या महायुध्दाचे उदाहरण द्यायचा उद्देश हाच की ब्रिटिश राज्यकर्त्यांना ’जनता आपल्या तोंडात शेण घालेल’ अशी भिती होती. तशी भिती आपल्या राज्यकर्त्यांना वाटायला लागली तर आपल्याला अपेक्षित बदल नक्कीच घडून येईल. जर सरकार काहीही करत नाही असे आपल्याला वाटत असेल तर लोकशाही पध्दतीत सरकारला तशी ’जरब’ बसवून आपले म्हणणे मांडायचे इतर चांगले मार्ग आहेत त्यांचा अवलंब न करता एकदम रस्त्यावर उतरणे, दगडफेक, जाळपोळ करणे, वृध्द,प्रवासी,स्त्रिया आणि रूग्णांना अडचण निर्माण करणे हे समर्थनीय नाही हाच माझा मुद्दा आहे. आणि हे सगळे ’लोकशाहीतील आपल्या हक्कंसाठी’ ! लोकशाहीतला कुठल्या हक्कान्वये इतरांवर दगड मारायचा अधिकार दिला आहे?
बाकी मला याविषयी जे म्हणायचे होते ते आधीच म्हटलेले आहे तेव्हा त्याची पुनरावृत्ती टाळतो.
क्लिंटन
पानं पानं भरून लिहू लागले लोकं...चालू द्या..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/