Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?

स
सुधीर काळे
Sun, 08/01/2010 - 13:56
💬 474 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
214441 वाचन

💬 प्रतिसाद (474)
स
सुधीर काळे Mon, 12/13/2010 - 06:58 नवीन
छान लिहिले आहेस, निनाद! लिहीत रहा.... तुझ्या हॉटेल व्यवासायाच्या नोकरीमुळे तुझ्या पाकिस्तान्यांबरोबर बर्‍याच गप्पा-टप्पा होतात असे दिसते. या गप्पा-टप्पांवर आधारित एक 'रंगारंग' धागा तू काढावास असे मनापासून वाटते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
व
वेताळ Mon, 12/13/2010 - 07:15 नवीन
नाहीतर गप्पाटप्पा तुन निनाद चे नावेद व्हायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
न
निनाद मुक्काम … Tue, 12/14/2010 - 17:48 नवीन
शब्दिक चकमकींना मी गप्पा ची झालर चढवावी लागते .जेवढे आपण वाचले व यु ट्यूब वर पहिले ते कितपत सत्य आहे हे सामान्य पाकिस्तानी अफगाणी इराकी इराणी कुर्दिश लोकांपासून समजून घेण्यास आव्स्ते कारण प्रसर मध्यमे स्वताच अजेंडा राबवत असतात .सत्य हे नेहमीच दुर्लक्षिले जाते .पकिस्तानी लोक सध्या कट्टर पंथीय बनत चालले असून सरकार व काही प्रमाणात लष्करावरील त्याचं विश्वास डळमळीत झाला आहे .भारताचे वर्चस्व व विकास जे परदेशात आहेत व पाकिस्तांत शहरात आहेत त्यांना नाईलाजाने मान्य करावे लागते .सध्या ह्या देशात एवढी अंतर्गत बंडाळी आहे कि फोडा नि राज्य करा हे तत्व जरी आपल्या हेरखात्याने सरकारी आशीर्वादाने वापरले तरी उचित परिणाम साधला जाईल .(माझे कडवे मत असे आहे .आपल्या वरील काश्मीर व इतर भागांत हिरवा दहशतवाद कमी करायचा असेल तर ह्या देशाचा विकास साक्षरता ह्यांचा बोन्साय केले पाहिजे .जग प्रगत होत असतांना ह्यांना मध्ययुगीन प्रवास ह्यांना जगात एकटा पाडणार आहे .नक्की ह्या लोकांचे अंत रंग व खरे रूप मी नेहमीच गोर्यांसमोर उघडे पडतो (माझ्या सासर्यचा ग्रुप मध्ये ह्यांना शिव्या देनारा मी त्यांना हिरो वाटते कारण नाझी शिक्का अजून पुर्नपने पुसल्या न गेल्याने त्यांच्या देशात हि लोक स्वताच्या बापाचे राज्य असल्यासारखे राहतात .कर बुडवतात . त्यामुळे मनात प्रचंड खदखद आहे .)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Wed, 12/15/2010 - 04:33 नवीन
'न्यूक्लियर डिसेप्शन'मध्ये झियांची कट्टर मुस्लिमांबद्दलची ओढ हा विषय चर्चिलेला आहे. इतकेच काय "पाकिस्तानी अणूबाँब सार्‍या 'उम्मा'चा" असेही त्यांनी जाहीर केले होते. (उम्मा Ummah म्हणजे मॉरिटानिया ते भारत यामधील सर्व मुस्लिम जनता.) झिया स्वतः देवबंदी या मुस्लिमांमध्येसुद्धा कट्टर समजल्या जाणार्‍या पंथाचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
नितिन थत्ते Fri, 12/10/2010 - 15:16 नवीन
टॉप ३ मध्ये आला बर्का हा धागा.....
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sat, 12/11/2010 - 06:11 नवीन
मी विक्रमासाठी लिहिले नाहीं, देशाच्या हितासाठी लिहिले. धागा इतका लांब आपल्यासारख्या देशभक्तांनी केला. पहिली पोस्ट लिहिली तेंव्हां धागा इतका लांब होईल असे मला वाटलेसुद्धा नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ट
टारझन Mon, 12/13/2010 - 06:19 नवीन
मी विक्रमासाठी लिहिले नाहीं, देशाच्या हितासाठी लिहिले.
अक्षरश: धसाढसा रडतोय ऑफिसात !! सगळी क्युबिकल्स मधली मुंडकी उठुन उठुन पहात आहेत. आम्हीच च्यामायला आलतु फालतु लिव्हतो !! देशसेवा आमच्यात नाहीच !! :( आज स्वतःचीच शरम वाटली .. चला किमान एक प्रतिसाद देऊन ह्या देशहितासाठी प्रसवलेल्या धाग्यात माझा खारीचा क्रिमरोल टाकतो. -(स्वदेश भक्त ) टारझन शिंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
व
वेताळ Fri, 12/10/2010 - 15:35 नवीन
ह्या करिता ह्या धाग्याचा उप्योग केला जावा. आज परत फुटभर हा धागा परत वर आला.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 12/10/2010 - 15:56 नवीन
हा धागा पाकिस्तानी सैनिक, काश्मीरातले अतिरेकी गट आणि चिनी सैनिक यांना डिट्टेलमध्ये वाचायला लावला तर ते नक्कीच काश्मीरचा नाद सोडतील असा मला विश्वास वाटायला लागला आहे.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Mon, 12/13/2010 - 06:17 नवीन
१० डिसेंबरच्या *जकार्ता पोस्ट*मध्ये माझे काश्मीर तंट्याविषयीचे पत्र प्रसिद्ध झाले आहे (http://www.thejakartapost.com/news/2010/12/10/letter-kashmir-dispute.html). जकार्ता पोस्टमधे काश्मीरच नव्हे पण कुठल्याही विषयावर भारताविरुद्ध कुणी लिहिले तर मी नेहमीच भारताच्या बचावात लिहितो. माझ्या वरील पत्राला त्या पत्राच्या खालीच एका Edo E. नावाच्या वाचकाने 'फासी झाका' नावाच्या एका पाकिस्तानी पत्रकाराने 'एक्सप्रेस ट्रिब्यून' या वृत्तपत्रात लिहिलेला "Pakistan’s human cockroaches" हा लेख "कॉपी-पोस्ट" केला आहे. तो जरूर वाचा. याला ५८०+ विक्रमी प्रतिसाद-बहुतेक सर्व पाकिस्तान्यांचे-आलेले आहेत. या लेखातील शेवटचे दोन परिच्छेद असे आहेत: There is such a sense of sickening moral superiority in Pakistanis, it needs to be addressed. All we care about is foreign policy, eager to point out the hypocrisies of the world, silent on our domestic, or even local life. Why should the world take what you say seriously, why should you be a regional power, or a leader in the comity of Islamic nations? Truth is, there is only one way to get change, and it’s not hanging the people who killed these boys. It is raising your voice to contradict people who advocate death for others, no matter who they are speaking of. To internalize that murder of any kind, for anyone is wrong. Sounds easy? Well just try it." या नंतर सदर 'जकार्ता पोस्ट'चा वाचक त्या लेखाचा दुवा देऊन लिहितो: http://tribune.com.pk/story/42158/pakistan’s-human-cockroaches/ I wonder if the Kashmiris want to become cockroaches... आधी मला वाटलं कीं मी Being Indian ची पाकिस्तानी आवृत्ती वाचतो आहे कीं काय! मग असेही वाटले कीं 'काश्मिरी लोकांच्या मनात काय आहे' याबद्दल आपल्या मनात जी शंकेची पाल चुकचुकत असते त्याचे मूळ आपल्या मनातील अपराधित्वाच्या भावनेत (guilty conscience-correct or ill-placed) आहे कीं ती शंका रास्त आहे?
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 12/13/2010 - 06:24 नवीन
काश्मीर प्रश्न चर्चेने सोडवावा का? चर्चा करावी ती नेमकी कुणाशी करावी?का तो सोडवण्यास इतर कोणता मार्ग आहे? हे सर्व पहिले प्रश्न अपुर्णच आहेत्.धागा कर्त्याना नम्र विनंती आहे कि ह्या गोष्टीवर अजुनही उहापोह व्हायला हवा आहे.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Mon, 12/13/2010 - 06:48 नवीन
मी इथल्या एका काश्मिरी मित्राला हेच विचारले (एंबसीवाला नव्हे) तर तो म्हणाला कीं भारत सरकारला हीच अडचण आहे कीं काश्मीरमधील आणि पाकिस्तानमधीलही कुणाशी त्यांनी चर्चा करावी! क्यूबेकच्या धर्तीवर एकतर्फी (unilateral) सार्वमत घेणे हा एक पर्याय (हतो वा प्राप्यसी स्वर्गम्, जितो वा भोक्षसे महिम्'च्या थाटातला) मला चांगला वाटतो. त्यात धोके आहेतच. काश्मीर जाईल या धोक्यापेक्षा कदाचित् इतर ठिकाणी असेच मोहोळ उठेल कीं काय याची शक्यताही वाटते. पण "मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरे" या प्रणालीनुसार मला असे वाटते कीं आज भारतीय नागरिकांना आपल्या देशाचा इतका अभिमान आहे कीं एरवी अकलेचे कसेही तारे तोडणारे भारतीय मतपेटीसमोर गेल्यावर 'ऐक्या'च्या बाजूनेच (in favour of 'Union') मते देतील अशी खात्री वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
न
नितिन थत्ते Mon, 12/13/2010 - 06:57 नवीन
आँ? सार्वमत घ्यायचे असेल तर ते काश्मीरींचे घ्यायला लागेल. आपली कल्पना सार्वमत म्हणजे काश्मीर भारतात ठेवावे की नाही हे भारतीयांना विचारण्याची दिसते. असले सार्वमत कोणीही घ्यायला तयार असेल. :) ब्रिटनने पण भारताच्या स्वातंत्र्यासाठी, सद्दामने कुवेतच्या स्वातंत्र्यासाठी, श्रीलंकेने जाफनाच्या स्वातंत्र्यासाठी सहज घेतले असते. तशा सार्वमताला काही अर्थ नाही. कारण त्या सार्वमतात मी सुद्धा (तुम्ही म्हणता तसेच) काश्मीर भारतात ठेवावे असेच मत देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Mon, 12/13/2010 - 07:09 नवीन
नाहीं. गैरसमज झालेला दिसतो. काश्मीरबद्दल सार्वमत भारतातील काश्मिरींचेच घ्यायचे. हरलो तर उदक सोडून बाहेर पडायचे. जिंकलो तर मान ताठ करून राज्य करायचे. पाकव्याप्त काश्मीरवर आज आपली सत्ता नाहीं. पण आपल्या काश्मीरमधील हे सार्वमत जर आपण जिंकलो तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रचंड उलथापालथ होईलच. पण त्यातून इतर राज्यांमधूनही जर अशाच मागणीचे मोहोळ उठले तर? त्यावरही सर्वमत घ्यायची वेळ आली तर? याचे आज भारतीय नागरिकांना आपल्या देशाचा इतका अभिमान आहे कीं एरवी अकलेचे कसेही तारे तोडणारे भारतीय मतपेटीसमोर गेल्यावर 'ऐक्या'च्या बाजूनेच (in favour of 'Union') मते देतील अशी खात्री वाटते हे उत्तर होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Mon, 12/13/2010 - 07:21 नवीन
ओके. आपले म्हणणे खरे आहे. बहुतेक स्वतंत्र व्हायची मागणी इतरत्र होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
अ
अवलिया Mon, 12/13/2010 - 07:34 नवीन
किंचित सुधारणा. बहुतेक स्वतंत्र व्हायची मागणी आज इतरत्र होणार नाही. उद्याचे काय? कदाचित वेगळा विचार डोके वर काढु शकतो. त्यामुळे "बहुतेक स्वतंत्र व्हायची मागणी इतरत्र होणार नाही" असे विधान ठामपणे सार्वकालिक तथ्य म्हणुन मांडता येत नाही असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
सुधीर काळे Mon, 12/13/2010 - 07:42 नवीन
१०० टक्के सहमत. राजकीय बाबतीत कुठलेही 'सत्य' त्रिकालाबाधित नसतेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
न
नितिन थत्ते Mon, 12/13/2010 - 07:51 नवीन
बरोबर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
त
तिमा Sun, 10/30/2011 - 06:17 नवीन
महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांचा मिळून एक वेगळा देश करता येईल का ? अशी मागणीही येऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
पैसा Sun, 10/30/2011 - 09:31 नवीन
गुजरात आणि कर्नाटक कशाला? आम्हाला कोकणीस्तान पाहिजे (मुंबईसकट)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
व
वेताळ Tue, 12/14/2010 - 13:49 नवीन
चीनने तिब्बेट वर आक्रमण करुन तिथे आजकाल चीनी वंशाच्या लोकाना पध्दतशीर वसवणे सुरु केले आहे.त्यामुळे मुळ तिब्बेटी व चीनी लोकसंख्या समान राहिल असा त्याचा प्रयत्न आहे.त्याच धर्तीवर जर भारतसरकारने काशीर मध्ये निर्वासित तिब्बेटी व उत्तरप्रदेश-बिहार मधील गरीब लोकाना व निवृत्त सैन्य अधिकार्‍याना विशेष सोयीसवलती देवुन राहण्यास प्रवृत्त केले तर अनायसे तिथे भारत प्रेमी लोकाची संख्या वाढुन दहशतवादी कारवायाना आळा घालता येईल. ह्याला काश्मीरचे ३५६वे कलम मोडता घालु शकते पण त्यावर ही काही उपाय असण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Tue, 12/14/2010 - 14:01 नवीन
>>त्यावर ही काही उपाय असण्याची शक्यता आहे. शेकडो उपाय असण्याची शक्यता आहे, पण राज्यकर्त्यांकडे इच्छाशक्ती आहे का ? खरोखरच इच्छाशक्ती असती तर कदाचित गुपचूप रोज शेकडो/हजारो भारतीयांना तिकडेच राहायला पाठविले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
स
सुधीर काळे Wed, 12/15/2010 - 04:25 नवीन
गांधीवादी-जी, तिबेटमध्ये चीन जे करीत आहे तेच इस्रायलने 'किबुत्स' निर्मून पॅलेस्टाईनमध्ये केले. याला इच्छाशक्ती म्हण किंवा विजिगीषु वृत्ती म्हणा! तीच तर हवी आणि तीच दिसत नाहीं. ज्याला इंग्रजीत one-track-mind म्हणतात ते चीनकडेही आहे व दुर्दैवाने दहशतवाद्यांकडेही, जिहादींकडेही आहे आणि ISI याचा नक्कीच फायदा घेत आहे. [अवांतरः सध्या हे जिहादी (TTP याने कि "Tehrik-e-taliban Pakistan") भस्मासुरासारखे जन्मदात्यावरच उलटले आहेत ही त्यातल्या त्यात एक समाधानाची गोष्ट आहे!] असो. वरच दिलेल्या "एका अन्य संस्थळावरील माझा प्रतिसाद इथे कॉपी-पेस्ट करत आहे" या माझ्या प्रतिसादात मी हेच लिहिले आहे. "भारत सरकारकडे इच्छाशक्तीचा संपूर्ण अभाव आहे असेच माझे मत आहे. याविरुद्ध फुटीरवादी गटातील अनुयायी केवढेही कष्ट करायला, प्राणाहुतीसह पडेल तो त्याग करायला व कुठल्याही हालअपेष्टा सोसायला तयार आहेत. हाच खरा फरक मला तरी दिसतो..........त्यांच्याविरुद्ध लढायला आपल्या बाजूनेही अशीच अभेद्य आणि अथक इच्छाशक्ती हवी. पण आपण तर माघार घेण्यासाठी निमित्त शोधत आहोत असाच माझा ग्रह झाला आहे."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
प
प्रदीप Wed, 12/15/2010 - 07:03 नवीन
तिब्बेटमधे चीन जे काही करीत आहे, त्याचा आपण (म्हणजे भारतीय) निषेध करणार, त्याबद्दल आदळआपट करणार. पण ह्याच धाग्यावर काश्मिरवर आपली सत्ता कशी प्रस्थापित झाली व ती किती वैध आहे अथवा नाही, ह्याबद्दल बरीच माहिती देण्यात आलेली आहे. अलिकडेच मिपावरच झालेल्या दुसर्‍या एका चर्चेतही अजून नवी माहिती देण्यात आली आहे. आणी ती माहिती कुणीही खोडून काढलेली नाही. ह्या सर्व पाश्वभूमीवर अजूनही आपण 'विजीगिषू' वृत्ति धारण करून काश्मिरवर 'जास्त चांगला ताबा मिळवला पाहिजे' अशा अर्थाचे वक्तव्य करायचे! ह्या दोन अगदी परस्परभिन्न इच्छांचा मेळ कसा घालायचा? का ह्याला दुटप्पी वर्तन म्हणायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
न
नितिन थत्ते Wed, 12/15/2010 - 08:07 नवीन
प्रदीप यांच्याशी सहमत आहे. आपण फार न्यायाने वागतो. आणि इतर टगेगिरी करतात या गैरसमजुतीतून असे विचार जन्मतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
स
सुधीर काळे Tue, 12/14/2010 - 15:27 नवीन
पूर्वी सिक्किमला भारतचे एक राज्य बनविताना काय-काय पावले टाली होती याची मला नीटशी कल्पना नाहीं. पण सिक्किमलाही पूर्वी वेगळा दर्जा होता. या विषयावर ज्यांचे चांगले वाचन आहे त्यांनी याबाबत लिहावे ही विनंती. आपल्या लोकसभेत तसा ठराव जर संमत झाला तर ते पुरेसे आहे काय? मला स्वत:ला याबद्दल कल्पना नाहीं. पण एक राष्ट्र या नात्याने आपण कायमच अपराधित्वाच्या टोचणीने पछाडलेले आहोत. राजकारणात बर्‍याचदा ’टगे’पणा कारावा लागतो. तो मनमोहन सिंग यांच्याकडून अपेक्षिणे म्हणजे "अगदीच too much हं!". आपण कायमचा good boy असण्याचा वसा घेतलेला असल्याने "वल्लभभाई पटेल"-स्टाईल ’टगे’पणा करायला विसरलोच आहोत असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
स
सुनील Wed, 12/15/2010 - 12:20 नवीन
"वल्लभभाई पटेल"-स्टाईल ’टगे’पणा करायला विसरलोच आहोत असे मला वाटते उपलब्ध माहितीनुसार, वल्लभभाई पटेल संपूर्ण काश्मिर पाकिस्तानला देण्यास तयार होते. तसे झाले असते तर आज हा प्रश्नच निर्माण झाला नसता म्हणा! असो, धागा पुन्हा चांगला फूटभर वर आलाय!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
न
निनाद मुक्काम … Wed, 12/15/2010 - 18:54 नवीन
राजकारणात नेहरू व पटेल हे गांधीजींच्या कुबड्या घेतल्या शिवाय राजकारण करू शकत नव्हते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
न
निनाद मुक्काम … Wed, 12/15/2010 - 19:05 नवीन
* Amalgamation of Sikkim: Bordered by Tibet, Nepal, Bhutan and West Bengal in the Eastern Himalayas, Sikkim was ruled by a Maharaja. The Indian Government had recognized the title of Chogyal (Dharma Raja) for the Maharaja of Sikkim. In 1972, R&AW was authorized to install a pro-Indian democratic government there. In less than three years, Sikkim became the 22nd State of the Indian Union, on April 26, 1975.[3]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
इ
इन्द्र्राज पवार Wed, 12/15/2010 - 12:27 नवीन
आजच (डिसें.१५, २०१०) श्री.प्रदीप यानी वर व्यक्त केलेल्या मताला दुजोरा देताना हेही इथे सांगू इच्छितो की, निव्वळ सिक्कीमच काय पण अरूणाचल प्रदेश (शिवाय तिबेट) या वर अलिप्तपणे तसेच परखडपणाने लिहिणे सहज शक्य आहे. पण त्या लिखाणावर येणार्‍या प्रतिक्रिया ह्या जर "भावना" नावाच्या क्रीमरोल्स मधून येऊ लागल्या की युक्तीवाद लटका होऊन जातो. "इस्त्रायलने अरबांना कसे वठणीवर आणले ते पाहा.....", "कॅस्ट्रोने किमान डझनभर अमेरिकन प्रेसिडेंट्सना रडविले..." यासारखी प्रतिक्रियेतील उदाहरणे वाचताना कितीही प्रभावी आणि टाळ्याखाऊ वाटली तर ती 'लोकशाही प्रणाली" मानणार्‍या (आणि स्वीकारलेल्या) भारतासारख्या खंडप्राय देशाने जशीच्या तशी स्वीकारणे शक्य आहे का? याचा विचार करणे आंतरराष्ट्रीय स्तरावर फार जरूरीचे असते. दिल्लीतील मनमोहन सिंग यांना म्हणजेच पर्यायाने कॉन्ग्रेस पक्षाला काश्मिरबाबत किंवा तिबेट, सिक्कीम आणि ईशान्येकडील भागावर चीनचा लाल ड्रॅगन दाखवित असलेल्या दादागिरी या प्रश्नावर झोडपणे हा रोजचाच खेळ आहे; ज्यात भाजपराव तावातावाने (जरी मोदी गुजरातेत असले तरी...) पुढे असतात; पण याच भाजपच्या पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यानी २००३ च्या चीन भेटीत 'चीनने सिक्कीम हा भारताचा अविभाज्य भाग आहे यास मान्यता देण्यासाठी 'तिबेट' हा चीनचाच एक भाग हे मान्य आहे सबब (म्हणजे करारावर सह्या झाल्यानंतर) भारतात कोणत्याही तिबेटी नागरिकाला चीनविरोधी राजकीय हालचाली करण्यास परवानगी दिली जाणार नाही..." असे लिखित आश्वासन दिले होतेच ना? अशा राजकिय पटलावर चालणार्‍या चाली हा जागतिक राजकारणाचे न विझणारे अग्निकुंड असते ज्याच्या ज्वाला 'अमुकच सरकार दिल्लीत आहे म्हणून धगधगते"; किंवा "तमुकच सरकार आले तर नदीपल्याड लोकांना त्याचा हिसका कळाला असता..." अशा विधानांनी त्यात काहीही फरक पडत नाही. शिवाय एखादा भाग आपल्या देशात येणार असेल तर हेही मान्य केलेच पाहिजे त्यावेळी जे जे काही करार झाले असतील वा होतील याची वचने झाली असतील तर त्या बाबतची ऐकीव पेक्षा लिखित स्वरूपाची माहिती (तीही सरकारी गॅझेट्सची....कुठल्यातरी टॅब्लॉइड पेपर्सने 'आतल्या गोठातून' काढलेली नव्हे..) मिळवून तीवर आपले मत बनविणे फार गरजेचे असते. .... "गांधीनी चूक केली. नाहीतर १९४७ ला नेहरूऐवजी पटेल पंतप्रधान झाले असते म्हणजे सारे काही आलबेल झाले असते...." अशी जरतरची भाषा चौपाटीवर जमलेल्या गर्दीच्या टाळ्या मिळविण्यासाठी चांगली असते. पण मग त्याच चालीवर "इंग्लंडपेक्षा जर्मनीने आमच्यावर १५० वर्षे राज्य केले असते तर आम्ही आता आशिया खंडावर राज्य केले असते..." असेही म्हटले गेले असते.....[प्रत्यक्षात हिटलरने आम्हाला काय दर्जा दिला असता हा विचार कुण्याच्या डोक्यात येत नाही.] ~~ थोडक्यात अशा प्रश्नांवरची 'भावविवशता" टाळून जर चर्चा झाली तरच या आणि तत्सम धाग्यांतील विचारमंथनाचा उद्देश अर्थपूर्ण राहील. इन्द्रा
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Wed, 12/15/2010 - 19:31 नवीन
प्रदीप-जी, इन्द्रा-जी आणि इतर, मी म्हणतो कीं जर काश्मीर आपले नाहीं तर ते सोडून सैन्य घेऊन परत येऊ या. शंका असेल तर एकतर्फी सार्वमतामार्फत ठरवू दे तिथल्या जनतेला, सार्वमतानंतर "आपले आहे" असे ठरले तर ३७० कलम विसर्जित करून ते इतर राज्यांप्रमाणे सर्वांसाठी खुले करू या आणि ठामपणे सांभाळू या. या प्रश्नाचा सोक्ष-मोक्ष लागायला हवा. त्यासाठी जे कांहीं करायला हवे ते ते केले पाहिजे. पण या पैकी कांहींच न करता हा मुद्दा टांगत ठेऊन उगीचच सैनिकांचे रक्त सांडू नये. आपला ध्वज जाळू देऊ नये. काश्मीरमधील सरकारी कार्यालयांना शुक्रवारी साप्ताहिक सुटी देऊ नये. गिलानी-रॉयना मोकळे सोडू नये असे माझे म्हणणे आहे..... काश्मीर आपले आहे कीं नाहीं हे नक्की ठरले कीं गिलानी वगैरे मंडळी बंडखोर किंवा अतिरेकी आहेत कीं मुशर्रफ म्हणतात तसे "स्वातंत्र्ययोद्धे" आहेत तेही नक्की ठरेल. सरदार पटेल यांनी हैदराबादच्या बाबतीत जे केले ते एक तर काश्मीरमध्ये करायला हवे होते किंवा काश्मीर सोडायचा एक पक्का आणि धीट निर्णय घ्यायचा होता. पण झाले-गेले होऊन गेले. आता तरी हा प्रश्न असा अर्धवट सोडता कामा नये. हा प्रश्न आपणच युनोकडे नेला पण त्यानंतरच्या अनिश्चिततेला (सैन्य बाहेर न काढल्यामुळे) पाकिस्तान जबाबदार आहे. पण सगळ्यात जास्त खोड्या तोच काढत आहे. सुरक्षा समितीच्या ठरावाला कालमर्यादा नसल्यामुळे तो आणखी चिघळला हेही खरेच. एकतर्फी सार्वमत (जसे गोव्याच्या बाबतीत आपण केले) तसे आपण कां करत नाहीं? ते सार्वमतसुद्धा फक्त काश्मीर खोर्‍याचे घ्यावे (जम्मूसह सार्‍या राज्याचे नको). हेच योग्य आहे आणि ते करून मोकळे व्हावे. पण हा प्रश्न चिघळत ठेऊ नये एवढेच मला म्हणायचे आहे. भावनाविवशतेचा हा प्रश्न होतोय कारण आपले सरकार (काँग्रेस तसेच भाजप) त्या प्रश्नाचा सोक्ष-मोक्ष लावत नाहींय. प्रदीप-जी, इन्द्रा-जी, नितिन-जी, सुनिल-जी आणि अवलिया-जी यांनी आपल्या सरकारने काय करावे याबद्दल लिहावे. आतासारखे कांहींच न करणे हे बरोबर नाहीं कारण त्यामुळे हा प्रश्न चिघळत आहे असे मला वाटते. तिबेटमधील चीनची वागणूक किंवा पॅलेस्टाईनमधील इस्रायलची वागणूक ही one-track-mind ची उदाहरणे आहेत. पण आपले जर चुकले असेल व आपल्या मनातील त्या अपराधित्वाच्या भावनेमुळेच आपण निर्णायकपणे (one-track-mind ठेऊन) वागत नसलो तर ते कारणच मुळासकट उपटायला हवे. "धागा किती वर आला" याला महत्व नाहीं. तो इतका लांबेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. पण हा सर्वांच्या सहभागाने वाढला. पण हा धागा आणि काश्मीर प्रश्न संपायला हवा व त्यासाठी काय करायला हवे याबाबत आपण पाच जणांनी भावनाविवश न होता कृपया लेखन करावे असेच मी म्हणेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
न
नितिन थत्ते Wed, 12/15/2010 - 20:06 नवीन
>>मी म्हणतो कीं जर काश्मीर आपले नाहीं तर ते सोडून सैन्य घेऊन परत येऊ या. शंका असेल तर एकतर्फी सार्वमतामार्फत ठरवू दे तिथल्या जनतेला, सार्वमतानंतर "आपले आहे" असे ठरले तर ३७० कलम विसर्जित करून ते इतर राज्यांप्रमाणे सर्वांसाठी खुले करू या आणि ठामपणे सांभाळू या. या प्रश्नाचा सोक्ष-मोक्ष लागायला हवा. त्यासाठी जे कांहीं करायला हवे ते ते केले पाहिजे. पण या पैकी कांहींच न करता हा मुद्दा टांगत ठेऊन उगीचच सैनिकांचे रक्त सांडू नये.
तिथल्या जनतेला सार्वमताने ठरवायची मुभा दिली तर काश्मीर हातचे जाईल असा "अंदाज" सरकारला असावा. "त्यानुसार ठामपणे वागायचे" म्हणजे भारतातल्या जनतेचा रोष ओढवून घ्यायचा. लोकशाहीत लोकांच्या इच्छेनुसार वागणेच भाग आहे. म्हणजे ही (काश्मीर स्वतंत्र करण्याची) ठाम कृती न करता बहुसंख्य भारतीयांच्या बाजूने "बोटचेपेपणा" करून आणि काश्मीरींशी "टगेगिरी" करून काश्मीर भारतात ठेवणे. हेच तर आपले सरकार गेली कित्येक वर्षे करीत आहे. गिलानी टाईपचे लोक बोलत काहीही असले तरी सरकार त्यांचे मुळीच ऐकत नाही. सैनिकी दलांचे विशेषाधिकार काढून घ्यावेत अशी खूप वर्षांची मागणी काश्मीरी आणि पूर्वोत्तर राज्यांतल्या जनतेची सुद्धा आहे. सरकार तसे मुळीच करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
ग
गांधीवादी गुरुवार, 12/16/2010 - 02:06 नवीन
>>तिथल्या जनतेला सार्वमताने ठरवायची मुभा दिली तर काश्मीर हातचे जाईल असा "अंदाज" सरकारला असावा. जर असे असेल तर काश्मीर वर पाणी सोडणे हेच जास्त उपयोगी. >>लोकशाहीत लोकांच्या इच्छेनुसार वागणेच भाग आहे. म्हणजे ही (काश्मीर स्वतंत्र करण्याची) ठाम कृती न करता बहुसंख्य भारतीयांच्या बाजूने "बोटचेपेपणा" करून आणि काश्मीरींशी "टगेगिरी" करून काश्मीर भारतात ठेवणे. हेच तर आपले सरकार गेली कित्येक वर्षे करीत आहे. 'बोटचेपेपणा' करून काश्मीर ताब्यात ठेवणे हि भारतीयांची इच्छा नक्कीच नाही. एकतर साम-दाम-दंड-भेद वगेरे वापरून काश्मीर पूर्ण ताब्यात घ्यावे, नाहीतर सोडून द्यावे. तितकाच सरकारच्या डोक्याचा त्रास तरी वाचेल. पण केवळ भारतातल्या जनतेचा रोष न पत्करण्यासाठी (म्हणजे थोडक्यात काय, खुर्ची न सोडण्यासाठी) वेळ मारून नेणे आणि जवानांचे रक्त सांडणे. हे सुद्धा कितपत ठीक आहे. (आणि यालाच म्हणायचे बुद्धिमत्ता . व्वा) अवांतर : भावना या असायलाच हव्यात. भावना नसून कसे चालेल. कोणतेही कार्य हे (चांगल्या/वाईट) भावनेतूनच घडते. बुद्धीचे भावनेवर केवळ नियंत्रण हवे. आपण सर्व मनुष्य आहोत, यंत्रमानव नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते गुरुवार, 12/16/2010 - 03:17 नवीन
बोटचेपेपणा हा शब्द मी उलट दिशेने वापरला आहे. काश्मीर भारतातच असावे असे भारतीय जनतेला वाटते. तिला ठामपणे ते चुकीचे आहे असे न सांगता सरकार भारतीय जनतेसमोर बोटचेपेपणा करत आहे आणि काश्मीर भारतात ठेवत आहे. उलट काश्मीर स्वतंत्र व्हावे अशी कदाचित काश्मीरी जनतेची इच्छा आहे तिच्याशी सरकार टगेपणाने वागून काश्मीरवर ताबा ठेवत आहे. (काश्मीरी जनतेशी सरकार अजिबात बोटचेपेपणा करीत नाही).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
प
प्रदीप गुरुवार, 12/16/2010 - 04:53 नवीन
मलही म्हणायचे आहे. सुधीरभाऊ, आता हेच पहा, मिपासारख्या संस्थळावर येणारी, चर्चेत भाग घेणारी सर्वच माणसे शिक्षित आहेत. तरीही काश्मिरविषयीचे कटु सत्य त्यांना पचवणे अत्यंत जड जात आहे. तेव्हा समस्त भारतीय जनतेस विश्वासात घेऊन काश्मिरबाबत तुम्ही म्हणता तशी ठाम पाउले उचलणे किती कठीण असावे? हा अत्यंत बिकट तिढा आहे, तो सहजी सुटणे शक्य नाही. तेव्हा अशा परिस्थितीत सरकारने नक्की काय करावे ह्याविषयी मी तरी काही सांगू शकत नाही. आपल्याकडील राजकीय परिपक्वता पाहता लोकमत तयार करण्याचे जिकीरीचे कार्य कुठल्याही पक्षाचे सरकार करू धजावणार नाही, कारणे ती राजकीय हाराकिरीच ठरेल. खरे तर हे कार्य कुठल्याही एका राजकिय पक्षाचे न ठरता सर्वच पक्षांचे मिळून व्हावे. पण इथे तर गोची आहे, भारतातील किती पक्ष राष्ट्राच्या हिताचा दूरदर्शी विचार करतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
क
क्लिंटन गुरुवार, 12/16/2010 - 14:09 नवीन
इतर कोणत्याही गुंतागुंतींचा परामर्श न घेता विचार केला तर आपले म्हणणे रास्त आहे.काश्मीरींना भारतात राहायचे नाही असे वरकरणी वाटत असूनही केवळ लष्करी बळावर आपण त्यांना भारतात राहायला भाग पाडत आहोत असे वाटणे स्वाभाविक आहे.पण इतर गुंतागुंतींचा विचार केल्यास तसे वाटणे योग्य नाही असे मला वाटते. आता या कोणत्या गुंतागुंती? १. आपल्याला आवडो अथवा न आवडो पाकिस्तान हा एक घटक काश्मीर प्रश्नात पाकिस्तान हा एक घटक आहे आणि पाकिस्तानची निर्मितीच मुळात भारतद्वेष (मुख्यत: हिंदूद्वेष) यावर झालेली आहे हे वेगळे सांगायलाच नको.समजा पाकिस्तानला उद्या काश्मीर मिळाले तर आपला दिवटा शेजारी हातावर हात ठेऊन स्वस्थ बसेल या नसत्या भ्रमात आपण अजिबात राहून चालणार नाही.एकदा काश्मीर मिळाले की चेकाळलेला पाकिस्तान काश्मीर हा Launchpad वापरून देशाच्या इतर भागात दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणावर वाढवेल.पाकिस्तानी दहशतवाद्यांनी (किंवा त्यांच्या भारतीय पिलावळीने) भारतात बंगलोर पासून वाराणसीपर्यंत अनेक ठिकाणी दहशतवादी कृत्ये केली आहेत.यातील किती भाग मुस्लिम बहुसंख्य होते?काश्मीरातील दहशतवाद हा मुस्लिमबहुल प्रदेशाला भारत लष्करी बळाच्या जोरावर भारतात ठेवत आहे यापेक्षा भारतद्वेष या पायावर आधारीत आहे.आणि तो द्वेष त्यांच्या नसानसातून वाहत आहे तो काश्मीर मिळाल्यावर कसा जाईल? तेव्हा असल्या हलकट लोकांना काश्मीरात जिंकून देऊन त्यांचे बळ आपण वाढवायचे का? २. मी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांच्या भाषणाला काही वर्षांपूर्वी गेलो होतो.तिथे त्यांनी मांडलेला मुद्दा असा (जो मी पूर्वी अन्यत्र आणि माझ्या ब्लॉगवर लिहिला आहे): "लिंकन अमेरिकेचे अध्यक्ष असताना अमेरिकेतील दक्षिणेकडील राज्ये संघराज्यातून गुलामगिरीच्या प्रश्नावरून फुटून निघायच्या बेतात होती. दक्षिणेकडील राज्यांनी रिचमंड येथे राजधानी असलेले ' Confederate' संघराज्य स्थापन केले होते. तरीही लिंकन यांनी यादवी युध्दाचा धोका पत्करून अमेरिकेची एकात्मता टिकवली. जर जनतेची आकांक्षा हा एकच मुद्दा असता तर त्याच न्यायाने लिंकन यांनी जनतेच्या आकांक्षांची पायमल्ली करून देशाची एकात्मता टिकवली. आजच्या काळात दक्षिणेतील फ्लॉरिडा, जॉर्जिया इतकेच काय तर रिचमंड राजधानी असलेल्या व्हर्जिनिया राज्यातील लोक न्यू यॉर्क आणि वॉशिंग्टन सारख्या उत्तरेतील राज्यातील लोकांप्रमाणेच स्वत:ला 'अमेरिकन' म्हणवतात. ते स्वतःला 'Confederate' म्हणवत नाहीत. त्याचप्रमाणे काश्मीरच्या संदर्भात धर्माच्या नावावर आणि भारताला त्रास द्यायच्या उद्देशाने पाकिस्तान काश्मीरींना भडकविण्याचे काम करत आहे हे उघड आहे.समजा असे आपण धरून चाललो की काश्मीरींना भारतात राहायचे नाही तरीही लिंकनप्रमाणे खंबीर पावले उचलून काश्मीरला भारतातच ठेवावे. भविष्यकाळात पाकिस्तानचा खरा डाव लक्षात येताच काश्मीरी लोक स्वतःला अभिमानाने 'भारतीय' म्हणवतील." यात चूक काय? ३. काश्मीर भारतात यावे यासाठी गुरदासपूर हा पंजाबातील मुस्लिमबहुल जिल्हा भारतात सामील करण्यापासून काश्मीरच्या घटनासमितीवर बहुसंख्य विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज नाकारून अशाच घटनासमितीकडून काश्मीरचे भारतात विलीनीकरण करण्याचा एकमताने ठराव पास करून घेण्यापर्यंत आपण भरपूर टगेगिरी केली आहे आणि आपली बाजू अजिबात धुतल्या तांदळासारखी नाही.पण जागतिक राजकारणात आदर्शवाद अजिबात चालत नाही.प्रत्येक देशाने आपले हितच बघितले पाहिजे आणि तसे न केल्यास त्या देशाचे भवितव्य कठिण असते.आपण टगेगिरी केली हे मान्य पण पाकिस्तान काय टगेगिरी करत नव्हते का?पाकिस्तानने काश्मीरबरोबर standstill agreement केले होते.प्रथम अफ्रिदी टोळीवाल्यांनी आणि नंतर पाकिस्तानी लष्कराने काश्मीरावर आक्रमण केले ते या standstill agreement चे उल्लंघन नव्हते का?आपल्या शेजाऱ्याच्या अशा अनेक कहाण्या सांगता येतील.अशांबरोबर ठकाशी व्हावे महाठक असे बनून वागले तर त्यात चूक काय? क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
स
सुधीर काळे Mon, 12/20/2010 - 11:26 नवीन
क्लिंटन-जी, तुमचा अब्राहम लिंकनचा उल्लेख मला आवडला व माझ्या मनातले व्यक्त करायला तो चपखलपणे वापरता आले. याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. खरे तर काश्मीर देऊन टाका या मताचा मी नाहींच! याउलट अपराधित्वाची भावना त्यजून तो नीट राखा या मताचा मी आहे. पण इथल्या प्रतिसादांवरून मला असे वाटते कीं मी अल्पमतांत असून आपल्याला सातत्याने अपराधित्वाची भावना टोचत आहे. (माझी समजूत बरोबर आहे कां?) इस्रायलने जे पॅलेस्टाईनमध्ये केले व तो जे आजही जेरुसलेममध्ये करत आहे किंवा चीन जे तिबेटमध्ये करत आहे त्यात ते दोन्ही देश one-track-mind ठेवून अपराधित्वाची भावना न बाळगता जे करायला हवे ते करत आहेत हे खरे आहे ना? मी एक भारतीय या नात्याने असे मानतो कीं काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे (आता हे बरोबर कीं चूक याबद्दल माझ्याच मनात संभ्रम निर्माण झाला आहे, तरी शंका निरसन करून घ्यायला हवे! यासाठी मी य.दि. फडके यांचे सौमारे इ.स. २००० साली प्रकाशित झालेले पुस्तक वाचू लागलो आहे. त्याबद्दल मधून मधून उल्लेख येत राहील!). मला एक घटना आठवते आहे कीं माजी रेल्वे मंत्री जाफर शरीफ यांनी एकदा रेल्वेचे अंदाजपत्रक सादर करताना "काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे" असे ठासून सांगितले होते व लोकसभेत टाळ्यांचा कडकडाट झाला होता. हे (काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असणे) राजमान्य (म्हणजे काँग्रेस वा भाजपा प्रणीत सरकारला मान्य) असेल तर असेल सरकारने एक तर अब्राहम लिंकनसारखे वागले पाहिजे (दृढपणे बंडाळीचा बिमोड करून काश्मीर भारतात विलीन करून सर्वांना खुले करणे) किंवा कॅनेडियन सरकारसारखे वागले पाहिजे (क्यूबेक प्रांतात घेतले तसे सार्वमत घेणे). हे दोन्ही केले नाहीं तर, आज ना उद्या, फौजने बंड पुकारणे अटळ वाटते. सेनाप्रमुखांची किंवा आपल्या संरक्षणमत्र्यांची अलीकडची भाषणे वाचली तर फौजेच्या सहनशक्तीचा शेवट होऊ घातला आहे असा माझा तरी समज होतो. *मिपाकरां*पैकी कुणाचा असा समज झाला आहे काय? असो. धागा पुन्हा 'हातभर' वर आला याबद्दल क्षमस्व! इंद्रा-जी आणि नितीन यांच्या प्रतिसादांबद्दल नंतर लिहेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
स
सुधीर काळे गुरुवार, 12/16/2010 - 08:29 नवीन
"नेत्यांचा खेळ होतो आणि सैनिकांचा जीव जातो" असे होता कामा नये असे मला वाटते व म्हणूनच या प्रश्नाचा सोक्ष-मोक्ष लागायला हवा. कांहींच न करता हा मुद्दा टांगत ठेऊन सैनिकांचे रक्त सांडू नये. आपला ध्वज जाळू देऊ नये. एवढे धैर्य दाखविणारा उत्तुंग नेता भारतात आज नाहीं असाच त्याचा अर्थ होतो, नाहीं कां? खूप लोकांची मते या धाग्यावर वाचली. त्यातील बर्‍याच जणांना आपलेच चुकले आहे असे वाटते. ते खरे असेल तर ते मान्य करून मोकळे व्हावे हेच बरोबर. चिदंबरम् यांच्या नेतृत्वाखाली एक सर्वपक्षीय तुकडी अलीकडेच काश्मीरला गेली होती. त्यांना काय आढळून आले? या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काय सुचविले? चॅथॅम हाऊस रिपोर्ट एक तर्‍हेची माहिती देतो. त्यानुसार आजाद काश्मीरची मागणी करणार्‍यांची संख्या ५० टक्क्याहून जास्त असलेले १८ पैकी फक्त चार जिल्हे आहेत असे त्यात वाचले. मग ही संधी वेळेवर घेतली पाहिजे नाहीं तर ही संख्या वाढत जाईल. दुसरा उपाय काय? सैन्याने बंड करेपर्यंत आपण थांबणार आहोत काय? त्यांना बंड करायला आपण प्रोत्साहन देणार आहोत काय? आपले सेनाप्रमुख आणि संरक्षणमंत्री जे बोलले त्यावरून लष्कराला सर्वाधिकार हवे आहेत तर ओमारला ते द्यायचे नाहींत. मग काय विचार आहे आपल्या नेत्यांचा? सुन्न होऊन जातं डोकं!
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार गुरुवार, 12/16/2010 - 13:56 नवीन
श्री.सुधीर जी.... तुम्ही एक गोष्ट तर मान्य करालच की, या प्रश्नाचा सोक्षमोक्ष (तुम्ही जे वर म्हणता तसे...) तुम्ही, मी वा इथे धाग्यात आपआपले विचार मांडणारे सदस्य तरी करू शकत नाही. शेवटी हा सरकारच्या अखत्यारीतील (पक्षीय विचार बाजूला ठेवू या) विषय असून त्याला आंतरराष्ट्रीयच नव्हे तर अंतर्गतही अनेक कंगोरे आहेत. "मतदान घ्या...मतदान घ्या..." असा नारा चारी दिशांनी येत असताना तो दिल्लीकरांच्या कानी जात नसेल का? नक्कीच जातो, पण ती एक अ‍ॅसिड टेस्ट आहे व तिचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. आज काश्मिर झाले, तर उद्या नेफा उपटेल, तर परवा सिक्कीमचा एक असंतुष्ट कोपरा परत नव्या ईर्षेने धगधगू लागेल.....खलिस्तानचे शेपूट तर हमेशा वळवळत असतेच. शिवाय 'मतदान' हे काय एकटी दिल्ली ठरवू शकत नाही....का? तर ते परत घटनेतील काश्मिरचे खास कलम. युनोची परवानगी. त्याच्या अंतर्गत परत घटनादुरूस्ती आली... पटलावर विषय मांडणे आणि परत जी-स्पेक्ट्रमसम तीन आठवड्याचा हजारो कोटींची 'ना कामकाज, ना खाजशमन...' सद्दर्श्य स्थिती...लोकसभेतील तो धिंगाणा पाहण्याचे तुम्हाआम्हा सर्वसामान्य नागरिकाच्या नशिबी. अहो, इथे महाराष्ट्र एकीकरण समिती सरकारच्या कानीकपाळी गेली ४० वर्षे 'बेळगाव-बिदर-भालकी-निपाणी' मध्ये मतदान घ्या असे कोकलत आहे तरी कुठलेही सरकार एका शेंगदाण्याएवढी हालचाल करत नाही, अन् वरचा काश्मिरचा प्रश्न तर युनोपर्यंत पोचलेला. दोन्ही सरकारे (भारत्+पाकिस्तान) Referendum मध्ये १९४६\४७ च्या Plebiscite च्या अनुषंगाने केवळ दोनच विकल्प (हे किंवा ते राष्ट्र) असावे या मताचे आहे आणि तिसरा "स्वतंत्र अस्तित्व" विकल्पाचा विचारही ते येऊ देणार नाहीत....आणि नेमकी पाचर बसत आहे ते या तिसर्‍या विकल्पाची. आझाद काश्मिर आणि यासिन मलिकचा जेकेएलएफ आणि बहुतांशी मुस्लिम नागरिकांचे याबाबतचे विचार थोडा वेळ बाजूला ठेवू या आणि आज ओमार अब्दुल्ला यांच्या सरकारात वाटेकरी असलेल्या खुद्द काँग्रेसच्या एका ज्येष्ठ मंत्र्याचे अन् तेही एका काश्मिरी पंडिताचे मत पाहू या का? हे मत तर अगदी गेल्या आठवड्यातील (दिनांक ७ डिसेंबर २०१० चे). केन्द्रीय गृहमंत्री यांच्या अलिकडच्या भेटीनंतर उधाण आलेल्या चर्चेवर एका मोर्चासमोर बोलताना काश्मिरचे आरोग्य मंत्री श्री.शामलाल शर्मा उदगारले, "“Kashmir should be granted freedom, Jammu should be made a separate state and Ladakh a Union territory. This is the only solution and can lead to progress and development of the state,” ~ आता हा वृत्तांत दिल्लीकरांना माहित नसेल? पण ते गप्पच आहेत ना? श्री.शर्माचे हे एकट्याचे मत असणे शक्यच नाही कारण ते ज्या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात तिथेही या भावनेचीच हवा असेल ना? या गोष्टी चॅथम हाऊस रीपोर्टमध्ये टाळल्या जातात.....(त्या "चॅथम" वर वेगळे भाष्य आवश्यक आहे. ते पुन्हा कधी तरी करू या.) आता खुद्द गृहमंत्र्याच्या तेथील भेटीविषयी खुद्द दिल्लीतच चांगले मत नव्हते. शिवाय पी.चिदंबरम म्हणजे कुणी सरदार पटेल नव्हेतच. अहो जो माणूस "देशातील नागरिकाने बॅन्केतून घरखर्चासाठी आपल्या हक्काचे पैसे काढले तर त्याला २० रुपये चार्ज लावा" असे सुचवितो, तो काश्मिर नावाचा अंगार हाती घेण्यास पात्र असेल का? अशीच भावना वरच्या बेल्टमध्ये आहे. ठरली भेट....गेले काश्मिरला...पाहिला बारामुल्ला (म्हणजे काश्मिर भेट झाली) आणि दिल्लीला आल्यावर पत्रकारांना काय सांगितले? तर, “The Valley seems to be gradually coming back to normal, though it is too early to say that everything is normal.” आता ही Too early to say स्थिती संपविण्याची धमक दिल्लीने दाखवायची म्हटल्यास तिचा मार्ग आखणेही त्यांच्याच हाती आहे..... ......या नाजूक विषयावरील आपल्या भावनांचा आदर करून मी असेच म्हणेन की, आपल्याला तो मार्ग ठरविण्याचे स्वातंत्र्य नाही, सुधीर जी. इन्द्रा
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 12/16/2010 - 17:18 नवीन
>>खूप लोकांची मते या धाग्यावर वाचली. त्यातील बर्‍याच जणांना आपलेच चुकले आहे असे वाटते. नाही. प्रतिसादकांना बहुधा असे सुचवायचे नसावे. प्रतिसादकांनी पुढील मुद्दे प्रामुख्याने मांडले. १. सरकार काहीच न करता बघ्याची भूमिका घेत आहे हे तितकेसे बरोबर नाही. भारताच्या ड्रुष्टीने स्ट्रेटेजिक महत्त्व असल्याने काश्मीर भारतात ठेवण्यासाठी जे काय करायचे ते सरकार करीतच आहे. २. कन्वेन्शनल "दहशतवाद" एवढ्याच चष्म्यातून काश्मीर प्रश्नाकडे पाहता येणार नाही. कारण काश्मीरचे भारतातील अ‍ॅक्सेशन काही करारमदार होऊन झालेले आहे. आणि त्या करारांमधल्या काही मुद्द्यांबाबत आपल्याकडूनही हेळसांड झाली आहे. २अ- काश्मीरींना त्यांची स्वत:ची घटना बनवून त्यांनी फायनल निर्णय घ्यायचे ठरले होते. ते घडले नाही. त्याची कारणे काही असोत- जसे पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरातून माघार न घेणे वगैरे. पण काश्मीरींच्या दृष्टीने त्यांना स्वातंत्र्य मिळाले नाही ही ग्राऊंड रिअ‍ॅलिटी राहतेच. २ब- भारताने मूळ करारात ठरलेल्या मर्यादांचे अनेक प्रमाणात अतिक्रमण केले आहे. ३. जिसकी लाठी उसकी भैस या तत्त्वामुळेच युनो वगैरे सार्वमताच्या मुद्द्यावर तितकेसे आग्रही राहिलेले नाहीत. ४. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावर ध्वज जाळला म्हणजे काश्मीर हातचे चालले हे समीकरण अगदीच चुकीचे आहे. ५. सरकार भारतीय जनतेची काश्मीर ताब्यात ठेवण्याची इच्छा मानूनच ताबा ठेवून आहे. आता (या धाग्यावर इतके प्रतिसाद आल्यावर) काही जण काश्मीर देऊन टाकावे असे म्हणू लागले आहेत. आणि ते करण्याची धमक सरकार दाखवत नाही असे म्हणत आहेत. तशी धमक कोणीच दाखवणार नाही. इस्रायल सरकारही (पॅलेस्टाईनबाबत) दाखवू शकणार नाही. ब्रिटनमध्येही जोपर्यंत साम्राज्यवादाची भावना होती तोपर्यंत ब्रिटिश सरकारलाही वसाहतींना स्वातंत्र्य देणे शक्य नव्हते. ४०-५० च्या दशकात हे साम्राज्यवादी विचार उतरणीला लागल्यावरच वसाहतींना स्वातंत्र्य देण्याची सुरुवात झाली. तोपर्यंत नुसती बोलाचीच कढी म्हणून थातुरमातुर सुधारणा सुचवल्या जात असत. ६. पाकिस्तानशी सामना करणे वाटते तितके सोपे नाही. (अवांतर : "त्यांना नाही ना आपल्याबरोबर रहायचे? मग देऊन टाकूया त्यांना पाकिस्तान" असा विचार करून नाइलाजाने फाळणीला मान्यता देणारे लोक ६०-७० वर्षांनी अजून शिव्यांचे धनी होतायत. तर असे पाऊल उचलण्याचा धोका कोण पत्करणार?) (अतिअवांतरः इंद्रा यांच्या प्रतिसादानंतर तरी या धाग्याचा समारोप होईल का?)
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे गुरुवार, 12/23/2010 - 09:01 नवीन
इन्द्रा-जी, तुमच्या १६ डिसेंबरच्या प्रतिसादात शामलाल शर्मांच्या काश्मीरला स्वातंत्र्य द्यायच्या वक्तव्याचा उल्लेख आहे. पण या वक्तव्याबद्दल मी ऋषिकेश-जींच्या धाग्यावर माझ्या "न समजणारे दोन-तीन प्रश्न आहेत ते इथे लिहिले आहेत!" या मथळ्याखालील प्रतिसादांत १० डिसेंबरलाच लिहिले होते ते बहुतेक तुम्ही वाचले नसावे. "(२) परवा काँग्रेस सरकारचे एक मंत्री श्री. शामलाल शर्मा यांनीही काश्मीरला 'आजादी' द्या, जम्मूचे वेगळे राज्य करा व लडाखला केंद्रशासित प्रदेश करा असे उद्गार काढले व काँग्रेस पक्षाला अडचणीत आणले. त्यावर काँग्रेस पक्षाकडून आलेल्या प्रतिसादात म्हटले होते कीं पक्षाची भूमिका बदलली नसून काश्मीर प्रश्न घटनेच्या चौकटीत ठेवूनच आम्ही सोडवू!" म्हणजे काय करणार आहेत? मला याचा जो अर्थ एवढाच समजतो तो हा कीं आपण पाकव्याप्त काश्मीरची मुक्तता करणार आहोत. घटनेच्या चौकटीत आणखी काय करायचे बाकी आहे? आणि त्यांनी कां बोलू नये? आधी गिलानी असेच देशहिताविरुद्ध बोलले. त्यांनी पाहिले कीं सरकारने बघ्याची भूमिका घेतली आहे. सरकार कांहीं करत नाहीं हे कळल्यावर हे बहाद्दर दिल्लीला आले आणि तिथेही असेच वक्तव्य त्यांनी केले. सरकार कांहीं करत नाहीं हे पाहून अरुंधतीबाई रॉयसुद्धा हेच बोलल्या. मग आले शामलाल शर्मा. ते तर कॉंग्रेसचे आणि वर जम्मू आणि काश्मीर राज्याचे मंत्री! असेल देशहिताविरुद्ध विधान, पण स्वतःच्या मतदारांबरोबर एक मुद्दा तर score केलाच त्यांनी! "वोटके लिये कुछभी करेगा?" मग कालच नुकतेच "स्वगृही" परतलेले स.पा.चे आझम खानही तेच बोलले. (http://timesofindia.indiatimes.com/india/Is-Kashmir-a-part-of-India-asks-SP-leader-Azam-Khan/articleshow/7145687.cms) कां? कारण सर्वांना खात्री आहे कीं आपले सरकार बोटचेपे धोरणच चालू ठेवणार. (आता याला 'बोटचेपे' म्हणणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. आता 'पंजाचेपे किंवा तळहातचेपे धोरण' हा नवा शब्द 'पाडायला' हवा!) म्हणूनच शीर्षक मी निवडले होते "इंचा-इंचाने माघार घेत आहोत काय" असे. माघारीचा प्रत्येक इंच मला तरी दिसतोय्! तुम्ही म्हणता की शेवटी हा सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. पण सरकारला 'लायनी'त आणायचे काम लोकशाहीत आपणच करायचे असते आणि त्यासाठी सत्य परिस्थिती जाणणे आणि त्यावरून सरकारवर दबाव आणणे हे काम आपलेच आहे. 'मिपा'वरील चर्चेद्वारे आपण हेच करायचा प्रयत्न करत आहोत. म्हणून मला तरी ही चर्चा अजीबात वांझोटी वाटत नाही. आपल्या घटनेतील काश्मिरचे खास कलम हा एक self-inflicted disease आहे. चूक कुणाची आहे या प्रश्नाची चर्चा करावी, पण त्यापासून रोगमुक्त होणे हे महत्वाचे आणि जरूरीचे आहे. आणि पक्क्या निर्धाराने आपण रोगमुक्त झाले पाहिजे. मग लाठी वापरून म्हैस राखा किंवा सार्वमताने. पण हे खास कलम काढलेच पाहिजे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उदाहरण वेगळे आहे. तिथे या पक्षाने प्रत्येक निवडणूक जिंकून दाखविली. पण महाजन कमीशनचा अहवाल आपल्याविरुद्ध गेल्यामुळे आणि आज काश्मीरमध्ये भारत सरकार जो 'पंजाचेपे'पणा करत आहे तोच प्रकार महाराष्ट्र सरकारने सुरुवातीला केल्यामुळे हा प्रश्न सुटलेला नाहीं. काश्मिरचा प्रश्न युनोपर्यंत पोचलेला आहे पण असा-नाहीं-तर-तसा तो सोडवलाच पाहिजे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी Referendum मध्ये Plebiscite च्या अनुषंगाने केवळ दोनच विकल्प ठेवायचे मान्य केले होते. पण आता पाकिस्तानला कळून चुकले आहे कीं काश्मिरी लोक कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानबरोबरच्या विलीनीला पाठिंबा देणार नाहींत व म्हणून केवळ कुरापत म्हणून पाकिस्तान "स्वतंत्र अस्तित्वा"चा विकल्पाला पाठिंबा देत आहे. जर काश्मीर स्वतंत्र झाला तर पाकिस्तान पुन्हा एकदा अफ्रीदी टोळ्यांच्या नावाखाली त्याला काबीज करेल असे मला पाकिस्तानच्या जुन्या track record वरून खात्रीपूर्वक 'वाटते'. (पुरावा नाहीं!) पण तो जरा लांबचा प्रश्न आहे. नितिनने जे लिहिले आहे त्याने तर मी थक्क होऊन गेलो! त्यांनी जे लिहिले आहे कीं "सरकार काहीच न करता बघ्याची भूमिका घेत आहे हे तितकेसे बरोबर नाही. भारताच्या ड्रुष्टीने स्ट्रेटेजिक महत्त्व असल्याने काश्मीर भारतात ठेवण्यासाठी जे काय करायचे ते सरकार करीतच आहे." मला तर दिसतंय् कीं सरकार हळू-हळू या प्रश्नावर 'यशस्वी माघार' घेत आहे. अगदी इंचा-इंचाने. Image removed. "सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावर ध्वज जाळला म्हणजे काश्मीर हातचे चालले हे समीकरण अगदीच चुकीचे आहे" हे वाचून तर मी धन्य झालो. कुठे रेघ मारायची देशाच्या मानापमानाची? उद्या जर कुणी गुंड आपल्या घरात शिरून नको ते करून गेला तर "असे केल्याने घर हातचे गेले असा त्याचा अर्थ होत नाहीं" असे म्हणुन गप्प बसायचे? फोटोसह सज्जड पुरावा असताना त्या फोटोतल्या माणसाला कांहींच करायचे नाहीं? हे वाक्य वाचले आणि ठरविले कीं बस्स! मला वाटते कीं भारतीयांना आता रागच येईनासा झाला आहे. असो! आपलेच नाणे खोटे तर इतरांना कशाला दोष द्यायचा? शेवटी एकदा recapitulate करून थांबतो: काश्मीरबाबत आपले चुकले असेल तर ते लागतील तितकी पावले उचलून ती चूक दुरुस्त करावी. जर "पाकिस्तानने आक्रमण काढून घेईपर्यंत आम्ही कांहीं करणार नाही" असे सरकारचे ठाम मत असेल तर ते होत नाहीं तोवर खंबीरपणे काश्मीरचे संरक्षण करावे. पण या "आक्रमण काढून घेण्या"च्या प्रक्रियेसाठी एक एकतर्फी कालमर्यादा जाहीर करावी. या कालमर्यादेत आक्रमण काढले गेले नाहीं तर युनोचा प्रश्न केरात काढून एकतर्फी निर्णय घ्यावा. सध्या तरी इतकेच सुचत आहे. मी नुकतेच य. दि. फडके यांचे "जम्मू-काश्मीर स्वायत्तता कीं स्वातंत्र्य" हे काश्मीरच्या इतिहासावरचे २०००साली प्रकाशित झालेले पुस्तक वाचायला सुरुवात केली आहे. त्यात बरीच रंजक माहिती वाचायला मिळेल असे वाटते. (एका ठिकाणी त्यांनी म्हटले होते कीं युनोकडे हा प्रश्न नेणे म्हणजे "बंदरवाला न्याय". म्हणजे दोन मांजरांतला तंटा सोडवता-सोडवता सारे लोणी फस्त करणार्‍या माकडचे उदाहरण त्यांना सुचले होते.) या पुस्तकाच्या वाचनातून कांहीं लिहिण्यासारखे मिळाले तर लिहीन, या प्रतिसादाला कुणी उत्तर दिले तर त्यावर लिहीन नाहीं तर माझा हा प्रतिसाद शेवटचा.
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी गुरुवार, 12/23/2010 - 11:53 नवीन
माननीय सुधीर काळे, आपला प्रतिसाद वाचून सुन्न झालो. जर आपल्या सारख्या व्यक्तीनेच अशी हार मानली तर अजून शत्रूचे फावणारच आहे. ह्या धाग्यातून जी माहिती मिळाली ती अजून कोठूनही मिळाली नाही. हि माहिती समजण्याअगोदर तर मनात संदिग्धता होती पण हळूहळू सर्वांची मते वाचून तर आता खात्री झाली आहे कि 'काश्मीर आपलेच आहे'. महासत्तेत असलेले देश कोणत्याही परिस्थितीचा केवळ स्वताच्या फायद्यासाठी वापर करतात, त्यामुळे इथे आशिया खंडात शांती नांदू न देणे हे त्याच्या पथ्यावर आहे. 'काश्मीरचा प्रश्न असाच चिघळत ठेवणे' हे त्यातील एक धोरण आहे हे आता गल्लोगल्ली समजते. आणि यावर कोणताही ठोस तोडगा निघणार नाही, असेच जर का आपण मानून बसलो तर खरेच काहीही होणार नाही. आपल्या धाग्याचा आधार घेऊन बरीच मंडळी चर्चा करीत असतात. त्यातून नवीन मुद्दे समोर येतात आणि मार्ग सोपा होतो. इथे मार्ग माहित आहे पण त्यावर चालण्याची हिम्मत मात्र सरकार (मतांच्या लालसेपायी) करू इच्छित नाही. या धाग्यावर चर्चा करायची कि नाही, हा आपला निर्णय केवळ काही जणांचे मत बघून घेऊन घेऊ नये. अवांतर : ज्यांच्या धार्मिक भावना कुरवाळण्यासाठी सरकार काश्मीरचे राजकारण करू इच्छिते त्यांच्या धार्मिक भावना देखील बरोब्बर देश बघूनच भडकतात. 'जे' 'इथे' झाले कि दंगली उसळतात, सरकार पडते, पण 'तेच' जगाच्या 'एके ठिकाणी' घडले कि मात्र सगळीकडे चिडीचूप, कुठे काही पत्ता नाही. त्याविरुद्ध आवाज उठवण्याची सोडा, ब्र काढण्याची सुद्धा त्यांची हिम्मत नाही. तर अश्या ह्या यांच्या दुट्टपी धार्मिक भावनेपायी काश्मीर हातचे चाललेले आहे. बाकी सरकारच्या सक्षमतेविषयी खूप काही लिहिण्यासारखे आहे. पण तूर्तास इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Fri, 12/24/2010 - 03:08 नवीन
गांधीवादींनी माझा 20/12/2010 चा प्रतिसाद वाचलेला दिसत नाहीं! काळे --------------------------------------------------------------------- माझे म्हणणे पटते कीं मी अल्पमतात आहे? प्रेषक सुधीर काळे दि. सोम, 20/12/2010 - 15:56. क्लिंटन-जी, तुमचा अब्राहम लिंकनचा उल्लेख मला आवडला व माझ्या मनातले व्यक्त करायला तो चपखलपणे वापरता आले. याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद. खरे तर काश्मीर देऊन टाका या मताचा मी नाहींच! याउलट अपराधित्वाची भावना त्यजून तो नीट राखा या मताचा मी आहे. पण इथल्या प्रतिसादांवरून मला असे वाटते कीं मी अल्पमतांत असून आपल्याला सातत्याने अपराधित्वाची भावना टोचत आहे. (माझी समजूत बरोबर आहे कां?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
इ
इन्द्र्राज पवार गुरुवार, 12/23/2010 - 12:04 नवीन
"....म्हणून मला तरी ही चर्चा अजीबात वांझोटी वाटत नाही....." श्री.सुधीर जी ~ या व श्री.ऋषिकेशच्या 'त्या' धाग्यात मी जे काही प्रतिसाद दिलेले आहेत त्यावरून निदान तुम्ही तरी असे म्हणणार नाही की मला ही चर्चा वांझोटी वाटत आहे. ज्याना तसे वाटत असेल तो त्यांचा प्रश्न/मत आहे आणि तसे वाटण्याचे त्यांचे स्वातंत्र्य असल्याने त्यांचे मतपरिवर्तनदेखील करणे मग अनावश्यक ठरते. मी तुमच्या वरील प्रतिसादाबद्दल नंतर सविस्तर लिहितो. आताच्या या छोट्याचे प्रयोजन केवळ वरील कोट केलेल्या वाक्यापुरतेच सीमित आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
अ
अवलिया गुरुवार, 12/23/2010 - 09:31 नवीन
माझा हा प्रतिसाद शेवटचा.
शक्यता नाकारता येत नाहि.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 12/23/2010 - 09:33 नवीन
शक्यता नाकारता येत नाहि. - कळिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
वेताळ Fri, 12/24/2010 - 16:46 नवीन
टाकला अशी मला शंका आली म्हणुन हा धागा परत वर घेवुन येत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Sat, 12/25/2010 - 02:07 नवीन
माजी पंतप्रधान अटलबिहारी यांचे काश्मीर बद्दलचे विचार : तसेच त्यांना आज ८७ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! ! !
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 01/07/2011 - 14:08 नवीन
काही नाही, काश्मिर सध्या कुणाकडे हे विचारायचे होते.
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 01/07/2011 - 14:11 नवीन
काश्मिरात थंडी खूप आहे. बचाव करायचा असेल तर, मैला-मैलाने दूर पळा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा