Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?

स
सुधीर काळे
Sun, 08/01/2010 - 13:56
💬 474 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
214441 वाचन

💬 प्रतिसाद (474)
अ
अवलिया Fri, 01/07/2011 - 14:13 नवीन
कोणत्या दिशेने?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Fri, 01/07/2011 - 14:15 नवीन
ते जाणकार सांगतीलच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
प
परिकथेतील राजकुमार Fri, 01/07/2011 - 14:15 नवीन
खवय्यांच्या स्वर्गाच्या दिशेने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सुधीर काळे Fri, 01/07/2011 - 17:12 नवीन
नानासाहेब, आपला प्रश्न चांगला आहे. "काश्मीर आपले आहे" असा माझा आतापर्यंत समज होता पण अलीकडेच तिथे आपला झेडा फडकावण्याचीसुद्धा-तोसुद्धा आपल्या प्रजासत्तक दिनाला-चोरी झाल्याचे सरकारी सूत्रांकडूनच सांगण्यात आल्याचे माझ्या वाचनात आले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. जाणकार मंडळी उत्तर देतीलच! वाट पाहू या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ग
गांधीवादी Sat, 01/08/2011 - 02:07 नवीन
तिरंगा फडकाविल्याने काही राष्ट्र मजबूत होत नाही. कुठेही असो. 'काश्मीर' मध्ये असो कि 'लाल किल्ल्यावर' कि आमच्या गल्लीत............. त्यामुळे कोणीही कुठेही तिरंगा फडकावू नये, इतकंच बिचारे बापडे सांगतायेत.(आणि सद्य सरकार ऐकून घेतंय) श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून भाजप काय मिळवणार आहे? आणि लाल किल्ल्यावर फडकावून देखील काय साध्य होते ? आमच्या मते, लाल चौकात तिरंगा फडकावून काहीही साध्य होत नाही, तसेच अनुक्रमे लाल किल्ल्यावर आणि देशातील प्रत्येक शहरात, शहरातील प्रत्येक गल्लीत तिरंगा फडकावून देखील काहीच साध्य होत नाही. त्यामुळे तिरंगा कुठेच फडकवला जाऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
च
चिंतामणी Sat, 01/08/2011 - 05:19 नवीन
तुमचा प्रतीसाद आणि जोडणी दिलेली बातमी दोन्ही वाचले. बातमीने फारच करमणुक झाली. विषेशतः पुढील वाक्याने लाल चौकात तिरंगा फडकवून भाजपला काय दर्शवायचे आहे. टूजी स्पेक्ट्रमच्या चौकशीसाठी जेपीसीची मागणी पुढे रेटत संसदेचे कामकाज रोखणाऱ्या या पक्षाला तसा नैतिक अधिकार नाही. त्यांनी आतापर्यंत देश तोडण्याचेच काम केले आहे अशी टीका करत लाल चौकात येऊन तिरंगा फडकवण्याने राष्ट मजबूत होणार आहे का, असा परखड सवालही त्यांनी केला. सैन्यदले रोजच खोऱ्यात तिरंगा फडकवतात असेही त्यांनी भाजपला सुनावले. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी भाजपने ही थेरं चालवली असल्याचेही ते म्हणाले. बाकी तुम्ही लश्कराने तिरंगा फडवण्यावर काही प्रतिक्रीया व्यक्त नाही केलीत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी
स
सुधीर काळे Sat, 01/08/2011 - 04:30 नवीन
ज्या राष्ट्राला कश्शाचाही राग येत नाहीं त्याला, प्रत्येक चुगलीनंतर "मला लागलंच नाहीं" असं म्हणणार्‍या लहान मुलांसारखे "आम्हाला कांहीं वाटलंच नाहीं" असं म्हणणार्‍या राष्ट्राला जिवंत समजायचं कीं नाहीं हेंच कळेनासं होतं कधी-कधी! '२६/११'नंतरही आपण हातावर हात ठेवून गप्प बसलो, अतिरेक्यांसाठी पाकिस्तानने उभारलेल्या प्रशिक्षण शिबिरांच्या जागा माहीत असूनही कांहींही न करण्याचा 'विवेकी' निर्णय घेतला त्या राष्ट्राला काय म्हणावे? अशा राष्ट्राने कुठेही झेंडा फडकवायच्या आधी (दोन्ही) गिलानी (एक 'आपले' आणि एक 'शेजारचे', पाकिस्तानचे प्रधानमंत्री), माओवादी, वेन ज्याबाव, ओबामा, हिलरी क्लिंटन वगैरेंची परवानगी घेऊन मगच स्वातंत्र्यदिनाचा किंवा प्रजासत्ताकदिनाचा कार्यक्रम आखावा! खरं सांगू? असं लिहायची खरंच लाज वाटते पण सत्य परिस्थिती तर हीच आहे! पण माझ्या मतें कधी-कधी अशी वेळ येते कीं विवेक किंवा (अति)विचारीपणा बाजूला ठेवून आणि "good-boy-image" त्यजून नालायक लोकांच्या मुस्काटात सणसणीत थप्पड द्यायची गरज असते! आपला देश असा कधी भडकेल कोण जाणे!
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sat, 01/08/2011 - 05:33 नवीन
आपलेच नाणे खोटे? प्रेषक सुधीर काळे दि. गुरू, 23/12/2010 - 13:31. आपला हा प्रतीसाद मी उशीराने बघीतला. तुमच्या भावनांमधील तिव्रता पोहोचली. पण अभीनंदन यासाठी नाही केले. वरीलपैकी एकच फोटो मी "तिरंगा फडकावाल तर....." धाग्यावर टाकला तर तो काढुन टाकण्याची मागणी झाली. तुम्ही ४-५ फोटो टाकल्यामुळे फोटोबरोबरच तुम्हाला काढुन टाकण्याची मागणी होउ शकली असती. पण तसे न झाल्याबद्दल अभीनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
अ
अवलिया Sat, 01/08/2011 - 07:14 नवीन
३०० अभिनंदन
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sat, 01/08/2011 - 11:44 नवीन
यात सिंहाचा वाटा आपलाच आहे, नानासाहेब! अर्थात् "बिल्ली-ए-कश्मीर"ही अभिनंदनास पात्र आहे! (ओमारसाहेबांसाठी 'शेर' ऐवजी 'बिल्ली' हा शब्द जास्त योग्य वाटला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
वेताळ Sat, 01/08/2011 - 09:43 नवीन
पण थंडीमुळे काश्मीर गारठलेले आहे. त्यात नाना देखिल थंडी वाजु लागली त्यामुळे चर्चा देखिल थंडावली आहे.
  • Log in or register to post comments
व
विनायक बेलापुरे Sat, 01/08/2011 - 10:53 नवीन
फुटा फुटाने लागतीय आपली तिथे
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 02/12/2011 - 13:44 नवीन
काय म्हणतेय सध्या काश्मिरची हवा?
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sun, 02/13/2011 - 04:55 नवीन
चिनी सैनिकांनी लडाखमध्ये घूसखोरी केल्याच्या वृत्तावर १० जानेवारी रोजी डॉ. फरूक अब्दुल्ला यांनी जोरदार गर्जना केली होती कीं "सध्या लेह येथे फारच थंडी असल्याने भारत आपली ताकत उन्हाळ्यात दाखवेल. उन्हाळा येऊ दे, मग आम्ही चीनवर सूड उगवू." चिनी पंतप्रधान वेन ज्याबाव यांनी त्यांच्या भारतभेटीत मैत्रीचे वचन दिले होते. त्या पार्श्वभूमीवर चिन्यांचे हे कृत्य मैत्रीच्या संकल्पनेचा द्रोह करणारे आहे असेही ते म्हणाले होते. ते जम्मू येथील एका समारंभात त्यांना चिन्यांच्या घुसखोरीबद्दल आणि देमचोक येथील काम थांबविल्याच्या एका प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. संपूर्ण वृत्त इथे वाचता येईल: http://economictimes.indiatimes.com/news/politics/nation/india-will-take-revenge-for-china-incursion-in-ladakh-in-summer-farooq-abdullah/articleshow/7255281.cms हे वक्तव्य वाचून मला जर कशाची आठवण झाली असेल तर ती महाभारतातील ’उत्तर’ नावाच्या विराट राजाच्या पुत्राची. तोही अंतःपुरात आपल्या शौर्याबद्दल बराच बडबडला होता, पण रणांगणावर कौरवांचे सैन्य पाहिल्याबरोबर त्याचा सर्व आवेश गळून पडला आणि तो पळू लागला. या प्रसंगाचे वर्णन गतकालातील सुप्रसिद्ध आर्या पद्धतीची कविता रचणारे मराठी कवी मोरोपंत यांनी सुंदर केले आहे: कुरुकटकासि पहाता तो उत्तरबाळ फार गडबडला स्वपर बळाबळ नेणुनि बालिश बहु बायकात बडबडला. उन्हाळ्यात जे होईल त्याबद्दल..... चिनिकटकासि पहाता तो फारुकबाळ फार गडबडला स्वपर बळाबळ नेणुनि बालिश बहु काश्मिरात बडबडला असे म्हणता येईल. या आर्येतील पहिली ओळ मला आठवत नव्हती व ती मी शोधत होतो. ती नुकतीच माझ्या एका मित्राने पाठविली म्हणून हे इथे लिहायला अंमळ उशीर झाला. ----------------------------------------------------------------------------------------- तसेच काश्मीरमधील सोपोर येथे दहशतवादी (कीं सनातनी) लोकांनी दोन १८-१९ वर्षाच्या मुलींना घराबाहेर काढून त्यांना गोळ्या घालून ठार केले. असले निर्घृण कृत्य करण्याच्या मागचे नेमके माहीत नाहीं! त्यावर ओमारसाहेबांनी ट्विट्टरवरून निषेध केल्याचेही वाचले. आपल्या सेनेविरुद्ध भरपूर बोलणार्‍या ओमरसाहेबांनी या दहशतवाद्यांच्या कृत्त्याबद्दल आणखी कांहीं बोलल्याचे/केल्याचे वाचनात आलेले नाहीं. काश्मीरमध्ये अलीकडील उठावात १०० हून जास्त निदर्शक आपल्या सेनेच्या हातून ठार झाले. पाकिस्तानी सैन्याने पूर्वी वजीरिस्तान व स्वात खोर्‍यात केलेल्या सैनिकी मोहिमेत शेकडो लोक ठार झाले व हजारो-लाखों निर्वासितही झाले. पाकिस्तानी निदर्शकांना त्यांचे सरकार दहशतवादी म्हणते, पण काश्मिरातील निदर्शकांना मात्र "स्वातंत्र्यसैनिक"! आपण केलेली हत्त्या नक्कीच निंदनीय आहे पण त्यांनी केलेली हत्त्या तर आपल्या अनेकपटीने निंद्य आहे. पण आपल्या हातून झालेल्या हत्त्येवरून (आपणच) गदारोळ उठवतो पण त्याच्या कित्येकपट जास्त हत्त्या पाकिस्तानी सैन्य करते त्याबद्दल 'हूं का चूं' होत नाहीं. 'द्रोणाचार्यां'मुळे (drone attacks) किती हत्त्या होतात तो हिशेब वेगळाच! या घटनेवरून वो कत्ल करते हैं तो चर्चाभी नहीं होती हम आहभी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम! या शेराची आठवण झाली! असो! धागा कुणी दुसर्‍यानेच वर आणला हे बरे झाले. नहीं तो हम आह भरके बदनाम हो जाते!
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Fri, 02/18/2011 - 10:31 नवीन
कांहीं न समजलेल्या कारणामुळे माझा प्रतिसाद दोनदा पोस्ट झाल्यामुळे इथून काढून टाकला आहे.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Fri, 02/18/2011 - 10:27 नवीन
आतापर्यंत गिलानींसारखे लोकसभेत किंवा विधानसभेत निवडून न आलेले 'गद्दार' नको ते बोलायचे पण आता लोकप्रतिनिधीही बोलू लागले आहेत असे दिसते! या किंवा या धाग्यांवर हे तपशीलवारपणे वाचता येईल. Image removed. पीडीपी पक्षाच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी "Vision on KashmIra" या विषयावर एक 'पॉवर-पॉइंट'द्वारा केलेल्या सादरीकरणात अक्साईचीन आणि काराकोरम विभाग चीनला बहाल करून टाकला आहे. याही पुढे जाऊन त्या म्हणाल्या कीं श्रीनगर ते यार्कांद (हे एका नदीचे नांव आहे पण मला ती जम्मू-काश्मीर-काराकोरम भागाच्या नकाशात मात्र सापडली नाहीं) आणि नंतर पाकिस्तानने १९६३ सालीच बहाल केलेल्या ४००० चौ. कि.मि. प्रदेशात चीनने बांधलेल्या काराकोरम द्रुतगतीमार्गापर्यंत नवा द्रुतगतीमार्ग बांधावा. Image removed. चीन त्या भागात बुंजी धरणाच्या पाण्यावर आधारित वीज प्रकल्प आणि एक लोहमार्ग बनवत आहे. या आधी Northern Areas म्हणून ओळखणार्‍या विभागाला थेट आपल्या केंद्रशासित अधिकारातून बाजूला करून त्याला गिलगिट-बाल्टिस्तान असे नवे नाव देऊन तिथे विधानसभाही आणली. नव्या मुख्यमंत्र्याने आपल्या पहिल्याच भाषणात "गिलगिट कशीच जम्मू-काश्मीरचा भाग नव्हता" असे विधानही केले. पाकिस्तान याबद्दल नेहमीच सांगत आले आहे कीं हा भाग हरीसिंग यांनी १९३५ सालच्या करारानुसार ६० वर्षांसाठी लीजवर दिला होता. पण माउंटबॅटननी तो कजुलै१९४७सालच्या जुलैमध्ये रद्द केला होता आणि गिलगिट पुन्हा हरीसिंगना दिला होता हे ते सोयिस्करपणे विसरतात! इतकेच नव्हे तर हा भाग चीनला देण्याबद्दलच्या करारात "हा करार काश्मीर प्रश्न सुटल्यावर पुन्हा चर्चिला जाईल" असे कलमही आहे. इथेच बाई थांबल्या नाहींत. त्यांनी इजिप्तमधील चळवळीत इजिप्तच्या लष्कराच्या अलिप्ततेची स्तुती केली आणि काश्मिरी लोकांना चिथावणी दिली कीं त्यांनीही ओमार यांचे सरकार बदलण्यासाठी असेच करावे. ओमारसाहेबांनी सांगितले कीं बाई लष्कराच्या पक्षात आहेत. ते पुढे म्हणाले कीं त्या इअत्क्या निराशाग्रस्त झाल्या आहेत कीं कसेही करून त्यांचे सरकार पाडण्यासाठी त्या काश्मिरींना लष्कराच्या हवाली करायला मागे पुढे पहाणार नाहींत! मस्त जुगलबंदी चाललीय्. भारत सरकार काय करत आहे? चिदंबरम यांनी 'दु:ख व्यक्त केले आणि बाईंच्यावर कारवाई करण्याची घोषणा केली. भारत सरकार कांहींच करत नाहीं हे कळल्यामुळे असे बोलणार्‍यांची संख्या नक्कीच वाढत जाणार. अर्थात् कुणी कांहींही बोलल्याने काय होतंय्? पण देशद्रोही सोकावत चालले आहेत. जाणकारांनी यात जरूर भर घालावी ही विनंती!
  • Log in or register to post comments
व
वाहीदा Sat, 02/19/2011 - 10:28 नवीन
काका, आपण गबोल वर ज्या बध्द्ल बोललो त्याचं तुम्ही फार सुंदर भाषांतर केले त्याबद्धल अभिनंदन ! पण मी जेवढे पण कश्मीरी लोकं जवळून बघितली आहेत ती मला खूप gullible जाणविली मग तो माझा मित्र / मैत्रीणी तरुण रैना / माही शर्मा असो किंवा अब्दूल सिद्दीकी / शाहीन सिद्दीकी असो , anybody can take their advantage very easily ती लोकं खूप पिचली गेली आहेत काका ..त्यांच्या मनावर भितीचं सावट सतत असतं :-( ती लोकं अगदी मुंबई / पुण्यात राहीली तरी घाबरतात त्यामानाने आपण महाराष्ट्रीयन खूप बिंदास्त आहोत . आपलं काहीही म्हंटलं तरी पेल्यातलं वादळ अन त्यांच्याकडे तर सतत वादळी युद्ध :-( देशाच्या फाळणीत पिचल्या गेलेल्या चांगल्या घरंदाज सुंदर कश्मिरी मुलींना नाचगाण्याच्या कोठीपर्यंतही प्रवास करायला मजबूर केलं गेलंय अन मग नाचगाणी ते तवायफ अन मग वेश्यावृतीही इतका जेवघेणा प्रवास यांच्या ही वाटेला आला आहे कश्मिरींच्या अतोनात हानी ला कोण जबाबदार ??? :-( काही जण जेव्हा हा प्रश्न विचारतात तेव्हा काळिज पिळवटून निघतं Tell me whom to turn and whom to speak to Wahida, there is Nobody for us no Government Listens. Government ला हे कळत नाही का की कश्मिरींची इज्जत / आब्रु देशाची ईज्जत / आब्रू ही आहे !! मधुनच मग हे नविन महबूबा मुफ्ती चं नव एक तुणतुण बाहेर येतं अंधेरीत रहाणारे माही शर्माचं कुटुंब बहुतेक वेळा माझ्याशी हिंदीतच बोलतात हमारी जमीन खुबसुरत हैं , यह हमारा गुनाह है क्या ? सौंदर्य शापित असते हे कश्मिर अन कश्मिरींच्या बाबतित खूप खरं आहे :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Sat, 02/19/2011 - 12:23 नवीन
वाहीदा, अगदी हृदयस्पर्शी आणि बरोबर प्रतिसाद लिहिला आहेस! तू तो दुवा मला दिला नसतास तर ती बातमी मी कदाचित् वाचलीच नसती! पण असे जरूर दिसते कीं त्रास हिंदू आणि मुस्लिम अशा दोघांनाही होतोय्. पण मला मात्र अद्याप तरी कुणी काश्मिरी मुस्लिम लोक भेटलेले नाहींत! पण परवाच सोपोरला दोन मुस्लिम मुलींनाही गोळ्या घालून ठार केले अशा बातम्या वाचण्यात येतातच. याला जबाबदार कोण याचा मीही विचार करतो आणि गोंधळून जातो. मी सुराबायाला असताना आमच्या संगीताला वाहिलेल्या 'धमाल' ग्रूपमध्ये एक हिंदू काश्मिरी कुटुंब होते. त्यातला पुरुष कधीही बोलत नसे पण सौ. कधी-कधी डोळयाला पदर लावत बोलायच्या. ते कुटुंब सुरबाया सोडून आता पुण्याला रहात आहे. जकार्तालासुद्धा दोन काश्मिरी हिंदू कुटुंबे आहेत, पण त्यातलेही पुरुष कधी फारसे बोलत नाहींत. बहुतेक त्यांचे बरेचसे आयुष्य काश्मीरबाहेरच गेलेले आहे. कर्नल चितळेंच्या लिखाणातही कांही नवी माहीती वाचायला मिळत आहे. सध्या मी य. दि. फडके यांनी लिहिलेले "काश्मीर-स्वायत्तता कीं स्वातंत्र्य?" हे पुस्तक वाचत आहे पण त्यात सगळ्यांनी इतका घोळ घातलेला आहे कीं ते वाचवतच नाहीं. अद्याप मला काश्मिरी मुस्लिम कुटुंब कुणी भेटलेले नाही. पण तुझ्या लिहिण्यावरून त्यांची परिस्थितीही फारशी चांगली दिसत नाहीं. कधी-कधी वाटते कीं १९४८ सालीच सार्वमत घेऊन हा प्रश्न निकालात काढायला हवा होता. जितका विलंब होत आहे तितका तो किचकट होत चालला आहे. पूर्वी जुल्फिकार भुत्तो आणि इंदिरा गांधी यांच्यात 'प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलाच आंतरराष्ट्रीय सीमा मानायचे व दोन्ही देशांनी चांगले शेजारी म्हणून रहायचे' असा अलिखित करार झाल्याची कुणकुण होती पण आज भुत्तो, बेनझीर (जी वडिलांबरोबर सिमल्याला आलेली होती) आणि इंदिरा गांधी यांच्यापैकी खरे-खोटे सांगायला कुणीच हयात नाहीं. त्यामुळे प्रश्नच प्रश्न पण उत्तरे नाहींत अशी परिस्थिती आहे खरी! काका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा
प
पुण्याचे वटवाघूळ Sun, 07/10/2011 - 14:53 नवीन
या वर्षीची अमरनाथ यात्रा शांततेत चालू आहे असे वाचले. तसेच काश्मीरी विद्यार्थी पण रस्त्यावर उतरत नाहीत. एकूण शांततेत चालले आहे हे वाचून आनंद वाटला.
  • Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ Wed, 08/31/2011 - 16:09 नवीन
आजच ओमर अब्दुलाने म्हतले की जर तमिलनादू विधानसभा राजीव हत्यारांची फाशी माफ व्हावी असा ठराव करू शकते तर तसाच थराव काश्मीर विधानसभेने महंमद अफझलबाबत केला तर? अब्दुल्लाच्या वाक्याचा निशेध आणि तामिलनाडू विधानसभेत ठराव झाला त्याचाही निशेध्.ओमरचे वाक्य म्हनजे निशेध करण्याजोगा प्रकार नाही का? महान आनि अभ्यासू मिपाकरांनी त्यांचे याबाबतचे म्हनने सांगावे ही विन्ती. पुण्याचे वटवाघूळ
  • Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ Wed, 08/31/2011 - 16:09 नवीन
आजच ओमर अब्दुलाने म्हतले की जर तमिलनादू विधानसभा राजीव हत्यारांची फाशी माफ व्हावी असा ठराव करू शकते तर तसाच थराव काश्मीर विधानसभेने महंमद अफझलबाबत केला तर? अब्दुल्लाच्या वाक्याचा निशेध आणि तामिलनाडू विधानसभेत ठराव झाला त्याचाही निशेध्.ओमरचे वाक्य म्हनजे निशेध करण्याजोगा प्रकार नाही का? महान आनि अभ्यासू मिपाकरांनी त्यांचे याबाबतचे म्हनने सांगावे ही विन्ती. पुण्याचे वटवाघूळ
  • Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ Wed, 08/31/2011 - 16:09 नवीन
आजच ओमर अब्दुलाने म्हतले की जर तमिलनादू विधानसभा राजीव हत्यारांची फाशी माफ व्हावी असा ठराव करू शकते तर तसाच थराव काश्मीर विधानसभेने महंमद अफझलबाबत केला तर? अब्दुल्लाच्या वाक्याचा निशेध आणि तामिलनाडू विधानसभेत ठराव झाला त्याचाही निशेध्.ओमरचे वाक्य म्हनजे निशेध करण्याजोगा प्रकार नाही का? महान आनि अभ्यासू मिपाकरांनी त्यांचे याबाबतचे म्हनने सांगावे ही विन्ती. पुण्याचे वटवाघूळ
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Wed, 08/31/2011 - 18:23 नवीन
माझ्या मतें ओमार अब्दुल्ला चुकीचे बोलले नाहींत. चूक केली आहे सवंग लोकप्रियतेसाठी तामिळनाडूच्या विधानसभेने (ठराव पास करून) व तिथल्या हायकोर्टने (शिक्षा लांबणीवर टाकायचा निर्णय देऊन). केवळ मरगळ आलेल्या भारतीयांना 'झटका' देण्यासाठी ओमार अब्दुल्लांनी एक टोकाचे उदाहरण दिले. राजीव गांधींच्या आरोपींवर खालील सर्व कोर्टात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून उच्च व सर्वोच्च न्यायालयानेही संमती दिल्यावर फक्त दयेचा अर्ज हा एकच पर्याय उरतो. त्यानंतर कुणीही यावर भाष्य करणे ही कोर्टाची बेअदबी आहे. याबद्दल तामिळनाडूच्या स्पीकरवर Contempt of court या मुद्द्यावर खटला घालून त्याला शिक्षा करायला हवी. पण प्रत्येक वेळी केवळ वोटबँकवर डोळा ठेवून जर लोकप्रतिनिधी वागू लागले तर या देशाला कसलेही भविष्यच उरणार नाहीं. यामुळे ओमार अब्दुल्लांचे मी उलट कौतुक करतो कीं त्यांनी सवंग लोकप्रियतेच्या मागे लागणार्‍या आमदारांच्या इतकी परिणामकारक "कानाखाली" काढली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
प
पुण्याचे वटवाघूळ Sat, 10/29/2011 - 12:18 नवीन
मध्यंतरी कश्मिर विधान्सभेने अफजलला सोडायचा ठराव पास केला.त्या नालयाकाचा गुन्हा इतका मोटा आहे तरीही त्याच्यामागे नंबर जास्त म्हनून त्याला सोडणार का?म्हनजे भारतात काहीही करा ते चालते पण आपल्यामागे मोथा नंबर आहे अशी भिती घालता आली पाहिजे आनी ते अत्यांत घातक आहे. उद्या नरेंद्र मोदी दोषी सिध्द झाला आनि गुजरात विधान्सबेनेही असाच मोदीला सोडा म्हनून थराव पास केला तर्?मग त्यालाही सोडनार का?ते काही नाही.कायदा हा सगलांना एकसारखाच लागू व्हायला हवा आनि केलेल्या गुन्हाला कायद्याप्रमाने शिक्षाही हवी मग गुन्हेगारामागे कितीही नंबर असेना. पुण्याचे वटवाघूळ
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 10/30/2011 - 06:26 नवीन
आमेन!!!
  • Log in or register to post comments
म
मन१ Mon, 12/05/2011 - 11:56 नवीन
चित्र अगदिच निराशाजनक नाही. २००२च्या तुलनेत आता ५% सुद्धा हिंसाचार नाही असं मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणताहेत. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=197778:2011-12-04-18-39-51&catid=73:mahatwachya-
  • Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ गुरुवार, 07/12/2012 - 12:21 नवीन
सेक्सी धाग्यामुल माझा हा आवडता धागा लोकप्रियतेत खाली गेला याचे वाईट वाटत आहे म्हणून हा धागा मुद्दामून वर आनत आहे. १५ दिवसांपूर्वी काश्मीरातील फुटिरतावादी नेत्यांच्या तोंडाला काळे फासले असे वाचले. वाचून खूप बर वाटल. अशा पुढाकार घेतलेल्या लोकांमुलेच काश्मीरातून आपण इंचाइंचाने माघार घेत आहोत का या प्रश्नाला 'नाही' असे उत्तर मिळेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
स
सागर गुरुवार, 07/12/2012 - 14:30 नवीन
सेक्सी धाग्यामुल माझा हा आवडता धागा लोकप्रियतेत खाली गेला याचे वाईट वाटत आहे म्हणून हा धागा मुद्दामून वर आनत आहे. याबद्दल धन्यवाद रे वटवाघळा (ते पण पुण्याचे ;) ) १५ दिवसांपूर्वी काश्मीरातील फुटिरतावादी नेत्यांच्या तोंडाला काळे फासले असे वाचले. वाचून खूप बर वाटल. अशा पुढाकार घेतलेल्या लोकांमुलेच काश्मीरातून आपण इंचाइंचाने माघार घेत आहोत का या प्रश्नाला 'नाही' असे उत्तर मिळेल असे वाटते. याबद्दल सविस्तर मत मांडायला आवडेल. पण ही सर्व चर्चा बरीच मोठी आहे. ती आधी वाचू देत. शिवाय विकांताला गडबडीत आहे हे ही एक कारण आहेच. थोडक्यात एकच सांगतो: भारत इंचाइंचाने माघार घेतो आहे का हा मुळात प्रश्नच नाहिये. फुटीरतावादी (विशेषतः पाकीस्तानने चिथावणी दिलेल्या संघटना) या इंचा इंचाने काश्मीरवासीयांच्या मनात शिरत आहेत का नाही हा खरा प्रश्न आहे. कोणताही भूभाग हा शस्त्राच्या बळावर केवळ जिंकता येतो. पण तेथील रहिवाश्यांची मने मात्र जिंकता येत नाही. सैन्याकडून कोणावर नकळत वा अपवादात्मक हेतुतः अन्याय वा अत्याचार झाले की या स्वतंत्र काश्मीरवादी संघटना त्याचे भांडवल करुन प्रचंड प्रसिद्धी करतात. अशा गोष्टींमुळे स्थानिकांच्या मनात भारत सरकार विरोधात अढी निर्माण झाली तर अशा भडकलेल्या व्यक्ती या संघटनांना जिहादसाठी( म्हणजेच त्यांच्या दृष्टीकोनातून स्वातंत्र्ययुद्धासाठी ) स्वतःहून मदत करतात. अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत राहिली तर भारताच्या लश्कराला आतंकवाद्यांना शोधणे दिवसेंदिवस अवघड का होऊ लागले आहे याचे उत्तर मिळू शकेल. हजारो घरांत प्रत्यक्ष जाऊन सेना तर तपास करु शकत नाही ना? भारत सरकार काश्मीरातील स्थानिकांचा विश्वास आजपर्यंत जिंकू शकलेले नाहिये हे फाळणीनंतर आजपर्यंतचे सत्य आहे. असो.. शिवाय चीन फॅक्टर या मुद्द्यावर महत्त्वाचा असूनही त्यावर भारतीय थिंकटँकने किती काम केलेले आहे हाही वादाचा मुद्दा आहेच. बाकी पुढे लिहिण्यासारखे असेल तर जरुर लिहिन पण पुढच्या आठवड्यात. तोपर्यत ही सर्व चर्चा वाचून काढतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
प
पुण्याचे वटवाघूळ Fri, 07/13/2012 - 09:58 नवीन
याबद्दल सविस्तर मत मांडायला आवडेल.
आमालाही वाचायला आवडेल :)
पण ही सर्व चर्चा बरीच मोठी आहे. ती आधी वाचू देत.
हार्दिक शुभेच्छा. :) :)
कोणताही भूभाग हा शस्त्राच्या बळावर केवळ जिंकता येतो. पण तेथील रहिवाश्यांची मने मात्र जिंकता येत नाही.
याबद्दल +१००.
भारत सरकार काश्मीरातील स्थानिकांचा विश्वास आजपर्यंत जिंकू शकलेले नाहिये हे फाळणीनंतर आजपर्यंतचे सत्य आहे.
परत +१००. पण काश्मीर म्हटले की पाठवा सैन्य पाकिस्तानात, नेस्तनाबूत करा पाकड्यांना अशा पध्दतीची टाळ्याखाऊ वाक्येच दिली जातात पण या महत्वाच्या गोष्टीकडे फारसे कोणी लक्ष देत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर
न
नाना चेंगट गुरुवार, 07/12/2012 - 12:23 नवीन
एक इंचाची भर माझ्याकडून ... पण लेखकांनी हल्ली चिंता सोडलेली दिसतेय..
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 07/13/2012 - 08:32 नवीन
हे पाव इंच माझ्याकडून. लेखकानं चिंता नाही तर मिपा सोडलेलं दिसतं.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट
इ
इरसाल Fri, 07/13/2012 - 08:59 नवीन
काही डुआयडींनी अशक्य असा त्रास दिल्याने त्यांनी इथे रामराम ठोकला. इति. आंजा साभार. अवांतरः तोंडफाडुन डुआयडी कोण हे विचारु नये विदा मिळणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ब
बॅटमॅन Fri, 07/13/2012 - 09:14 नवीन
पाऊण इंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
आ
आंबोळी Fri, 07/13/2012 - 20:12 नवीन
काही डुआयडींनी अशक्य असा त्रास दिल्याने त्यांनी इथे रामराम ठोकला. अरेरे.... असे असेल तर ड्युआयडी त्रास देत असताना संपादक मंडळ काय झोपा काढत होते का? संपादकानी टुकार धाग्यांना, तेढ पसरवणार्या प्रतिसादांना जरूर पंख लावावेत पण कुठल्या लिहित्या सभासदाला पंख लागणार नाहीत याचीही काळजी (कंपूच्या बाहेर जावून) घ्यावी अशी कळकळीची विनंती...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
न
नाना चेंगट Sat, 07/14/2012 - 09:44 नवीन
हॅ हॅ हॅ भलत्याच अपेक्षा तुमच्या !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 07/12/2012 - 13:48 नवीन
अश्या गहन ,जिव्हाळयाच्या व अस्मितेच्या विषयावर आता येथे पूर्वीसारखी चर्चा सत्र घडत नाहीत. सुका ह्यांना परत बोलावण्याची मोहीम सुरु करावी का ? असा प्रश्न किती तरी दिवस मला भेडसावत आहे. इंच इंचाने काश्मीर प्रश्नी पाकिस्तान माघार घेत आहे असा माझा दावा आहे. ह्या संबंधी माझे मौलिक विचार मी नक्कीच पुढील लेखातून व्यक्त करेन, हे विडंबन नसून नाण्याची दुसरी बाजू म्हणून पहावे. संपादित. कृपया सदस्यांनी वय्यक्तिक प्रतिसाद टाळावेत.
  • Log in or register to post comments
स
सागर गुरुवार, 07/12/2012 - 14:35 नवीन
इंच इंचाने काश्मीर प्रश्नी पाकिस्तान माघार घेत आहे असा माझा दावा आहे. ह्या संबंधी माझे मौलिक विचार मी नक्कीच पुढील लेखातून व्यक्त करेन, हे विडंबन नसून नाण्याची दुसरी बाजू म्हणून पहावे. निनाद नक्की लिहाच तुम्ही. मला आवडेल या चर्चेत भाग घ्यायला. माझी मते थोडी वेगळी आहेत पण त्याशिवाय चर्चेला मजा नाही येणार.. हो की नाही? ;) आंतरराष्ट्रीय राजकारण हा माझ्याही आवडीचा विषय आहे. त्यातून आपल्या देशाबद्दल तर जास्तच जिव्हाळा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/12/2012 - 14:40 नवीन
त्यातून आपल्या देशाबद्दल तर जास्तच जिव्हाळा आहे. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ ११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर
अ
अर्धवटराव गुरुवार, 07/12/2012 - 18:36 नवीन
(हे नटसम्राट + जाने भी दो यारो स्टाईलने वाचावे :) ) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
व
वेताळ गुरुवार, 07/12/2012 - 13:58 नवीन
लिखाण चालु आहे.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Fri, 07/13/2012 - 20:02 नवीन
सुधीरजी, पाडगावकर व अन्य लोकांच्या लेखनातून आता तर इंचाच्या ऐवजी फुटात व काही काळाने, मैलात असा प्रवास चालू राहील असे दिसत आहे....
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sat, 09/08/2012 - 12:29 नवीन
माझ्या अनुपस्थितीतही हा धागा अजून जिवंत आहे हे पाहिल्यावर आश्चर्य वाटले! नुकतीच मी नजम सेठी या प्रख्यात पाकिस्तानी पत्रकाराची Geo TV या पाकिस्तानी चित्रवाहिनीवरील मुलाखत पाहिली. त्यात काश्मीर समस्येबद्दलची कांहीं नवी माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर या धाग्यावर एक टिप्पणी करायचा मोह झालाय खरा! तसेच फरूक अब्दुल्ला यांच्या "उन्हाळा येऊ दे, मग देतो चीनला चांगले झणझणीत उत्तर" या राणा भीमदेवी थाटात मारलेल्या सिंहगर्जनेबद्दलही लिहायचे उरलेच आहे. (त्यानंतरचा आता दुसरा उन्हाळा चालू आहे!). पाहू, मूड आला तर लिहीनही. नक्की नाहीं.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 09/08/2012 - 12:33 नवीन
वाचायला उत्सुक आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
च
चिंतामणी Sat, 09/08/2012 - 13:34 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पुण्याचे वटवाघूळ Sun, 09/30/2012 - 11:41 नवीन
राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या काश्मीर भेटीवर http://indiatoday.intoday.in/story/young-kashmir-says-bye-bye-pakistan/1/222852.html हा लेख चांगला आहे. काश्मीरी युवकांमध्ये पाकिस्तानची क्रेझ आता दिसत नाही असे त्यात म्हटले आहे ही चांगलीच गोष्ट आहे. अजूनही आझादीची क्रेझ आहे पण पाकिस्तानची क्रेझ कमी झाली तशी आझादीची क्रेझही कमी होईल आणि आपल्याला काश्मीरातून इंचाइंचाने माघार घ्यावी लागत आहे का अशा प्रश्नांची गरजच राहणार नाही अशी आशा करू या.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Sun, 09/30/2012 - 12:03 नवीन
याच विषयाशी संबंधित नुकताच आलेला कर्नल रणजित चितळ्यांचा हा चिंताजनक धागा मात्र दुर्लक्षित राहिला आहे याची आठवण झाली. नेतेमंडळी 'सबकुछ आलबेल है' म्हणून सांगत असली तरी ground reality वेगळी आहे हे अशा वृत्तांवरून दिसतं. काळे साहेबः तुम्हाला काश्मिरातील सद्य परिस्थितीबद्दल काय वाटतं ते तुम्ही लवकरच लिहाल अशी अपेक्षा आहे. (अवांतरः या धाग्यावरची वाहिदा यांची प्रतिक्रिया पुन्हा वाचली, त्या हल्ली दिसत नाहीत याची खंत वाटली, पण त्या अजूनही मिपावर उपस्थित असल्या तर त्यांच्या काश्मिरी परिचितांना, तिथल्या परिस्थितीत बदल घडवून आणण्याविषयी काय वाटतं हे जाणून घ्यायला आवडेल. त्यांच्या या परिचितांचं म्हणणं [हमारी जमीन खुबसुरत हैं , यह हमारा गुनाह है क्या ?] काळजाला भिडलं :-(
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/30/2012 - 16:27 नवीन
नवं काय चालु आहे, त्याची उत्सुकता आहेच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Wed, 10/03/2012 - 12:53 नवीन
तर का ४ रनांसाठी आउट करा म्हणुन हा उपद्व्याप.त्यामिषाने का होईना न जाणो काका पुन्हा लिहीते होतील काय सांगावे.
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Fri, 10/05/2012 - 21:43 नवीन
राहुलच्या सभेवर बहिष्कार. काश्मीरमध्ये भारतीय एमएनसीज आणण्याच्या विचारावर रतन टाटा खूष!
  • Log in or register to post comments
त
तुर्रमखान गुरुवार, 10/25/2012 - 21:22 नवीन
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा