Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?

स
सुधीर काळे
Sun, 08/01/2010 - 13:56
💬 474 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
214441 वाचन

💬 प्रतिसाद (474)
स
सुधीर काळे गुरुवार, 01/31/2013 - 09:03 नवीन
अनुराधा मॅडम, http://www.chathamhouse.org/sites/default/files/public/Research/Asia/0510pp_kashmir.pdf हा दुवा उघडून "चॅदम हाऊस" या संस्थेचा अहवाल आपण जरूर वाचावा. या अहवालानुसार काश्मीरमध्ये सरहद्दीच्या दोन्ही बाजूच्या लोकांना पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचेच नाहींय्. म्हणूनच हल्ली पाकिस्तानही काश्मीरच्या "आजादी"बद्दलच बोलतो. पण फाळणीच्यावेळी कुठल्याही संस्थानाला आजादी देण्याचा विकल्पच नव्हता. प्रत्येक संस्थानापुढे दोनच विकल्प होते: एक तर भारतात सामील व्हा किंवा पाकिस्तानात सामील व्हा. चॅदम हाऊस अहवालानुसार सरहद्दीच्या दोन्ही बाजूकडील काश्मिरींना जर पाकिस्तानात सामील व्हायचे नसेल तर मग प्रश्नच काय उरला?
  • Log in or register to post comments
म
मन१ गुरुवार, 01/31/2013 - 09:26 नवीन
प्रत्येक संस्थानापुढे दोनच विकल्प होते तिसरा स्वतंत्र राहण्याचाही चॉइस इंग्रज सोडून गेले होते असे वाचल्याचे स्मरते. त्याच क्लॉजचा वापर करुन जुनागड, काश्मीर, हैद्राबाद हे दिमाग खाउ लागले भारताचे. तिकडे कालात संस्थान(आजच्या सिंध नि बलुचिस्थान मधला काही भाग) हाच खेळ पाक सोबत खेळत होते. . भारताने नि पाकने पाहिले पाहिले नि सरळ सरळ सात्मीकरण केले त्या ठिकाणांचे स्वतःच्या देशात. . सगळा वाद झाला तो केवळ ह्याच क्लॉजमुळे :- "स्वतंत्र रहायचे की सामीएल व्हायचे हे ज्या त्या stateने ठरवावे." . आता "स्टेट " म्हणजे कोण? राज्यकर्ता(निवडून न आलेला संस्थानिक) की जनता? सत्ता सार्वभौम की जनता? त्यावरून सगळी हाणामारी सुरु झाली. बाकीचे पुढचे तपशील ह्याच धाग्यात वरती खूप छन दिलेत तुम्ही लोकांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे गुरुवार, 01/31/2013 - 11:51 नवीन
हा रेफरन्स वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१
अ
अनुराधा१९८० Fri, 02/01/2013 - 07:45 नवीन
फाळणीच्यावेळी कुठल्याही संस्थानाला आजादी देण्याचा विकल्पच नव्हता.>>> आझाद राहण्याचा पूर्ण विकल्प होता. म्हणुन तर हैद्राबाद १५/०८/४७ नंतर बरेच दिवस स्वतंत्र होते. बर्‍याच संस्थानिकांना पण स्वतंत्र रहायचे होते पण जनमताच्या रेट्या पाई आणि सैनिक शक्ती शुन्य असल्यामुळे भारतात सामिल व्ह्यावे लागले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Fri, 02/01/2013 - 10:06 नवीन
अनुराधामॅडम आणि मन१साहेब, या बाबत जर एकादा लेख आपल्या वाचनात आलेला असेल तर मला वाचायला हवा आहे. माझ्या माहितीनुसार असा विकल्प नव्हता. पण माझा चुकीचा समज असेल तर तो दुरुस्त करायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुराधा१९८०
स
सुनील Mon, 02/04/2013 - 18:36 नवीन
ब्रिटिशांनी विभागणी केली ती त्यांच्या थेट अधिपत्याखालील भूभागाची. जो भूभाग त्यांच्या थेट अधिपत्याखाली नव्हता (संस्थाने) त्याचा निर्णय त्यांनी त्या-त्या संस्थानिकांर सोपवला होता. त्यांना भारत, पाकिस्तान वा स्वतंत्र असे पर्याय होते. ह्याच पर्यायाचा वापर करून काश्मिर नरेशांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. ह्याचे चर्वितचर्वण धाग्यावर झालेले आहेच! ते आता टाळतो ;) पुढे जेव्हा UN च्या सार्वमताचा प्रश्न आला तेव्हा मात्र दोनच पर्याय - भारत आणि पाकिस्तान त्यांना उपलब्ध झाले. स्वतंत्र राहण्याचा पर्याय गेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
स
सुधीर काळे Tue, 02/05/2013 - 07:45 नवीन
धन्यवाद! म्हणजे आधी तीन्ही पर्याय होते पण आता दोनच पर्याय उरले आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Tue, 02/05/2013 - 15:13 नवीन
सध्या व्यवहार्य असा एकच पर्याय शिल्लक आहे आणि तो म्हणजे LOC ला रीतसर सीमारेषा म्हणून मानणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
श
श्रावण मोडक Tue, 02/05/2013 - 16:19 नवीन
काही नाही. ४२० कोण आहे (म्हणजे, या क्रमांकाचा प्रतिसाद कोणाचा आहे) ते पहायला आलो होतो. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Tue, 02/05/2013 - 17:12 नवीन
काही नाही. ४२० कोण आहे (म्हणजे, या क्रमांकाचा प्रतिसाद कोणाचा आहे) ते पहायला आलो होतो.
कैच्या कै कारणं सांगू नका! ३१ मार्चच्या आत ५०० करायच्या नानाच्या कटात तुम्ही सामील आहात, ते कळ्तय आम्हाला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
स
सुधीर काळे Wed, 02/06/2013 - 08:52 नवीन
सुनील-जी, "सध्या व्यवहार्य असा एकच पर्याय शिल्लक आहे आणि तो म्हणजे LOC ला रीतसर सीमारेषा म्हणून मानणे." १०० टक्के सहमत! माझ्या वाचनात असेही आले होते कीं "सिमला करारा"च्यावेळी थोरले भुत्तो या अटीला तयारही झाले होते पण लेखी दिले तर त्यांना राज्यावरून हाकलून दिले जाईल ही भीती वाटत होती. म्हणून त्यांनी असे वचन दिले कीं हे understanding त्यांना मान्य आहे व ते हळू-हळू जनमत त्याबाजूने तयार करतील. पण पाकिस्तानात परतल्यावर त्यांनी पलटी खाल्ली आणि "जितं मया"चे शड्डू ठोकत ते सगळीकडे भाषणे देत सुटले..... मोडकसाहेब, मला फार काळजी लागली होती कीं या धाग्यावरचे प्रतिसाद नेमके "४२०" वर थांबतील! पण तो आकडा पार झालेले पाहिल्यावर "हुश्श" झाले... बिपिन-जी, मला 'सर्कॅझम' वगैरेबद्दल उमज जरा कमीच आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
न
नितिन थत्ते Tue, 02/12/2013 - 10:25 नवीन
त्याच पर्यायांतर्गत सिक्किम हे संस्थान स्वतंत्र झाले. ते १९७५-७६ पर्यंत भारताचे प्रोटेक्टरेट म्हणून राहिले. त्या सुमारास ते पूर्ण राज्य म्हणून भारतात विलीन झाले. [मधला काही काळ ते असोसिएट स्टेट म्हणूनही होते]. http://en.wikipedia.org/wiki/Sikkim#After_Indian_independence
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
I
II श्रीमंत पेशवे II Fri, 02/01/2013 - 11:30 नवीन
आपल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका. काहीतरी करायला च हवे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 02/01/2013 - 15:11 नवीन
अहो प्रत्येकाचे लाड करीत राहिलो तर झालेच . आमच्या गवाणपाड्याचे आगरी लोक सुद्धा स्वतंत्र व्हायचे आहे म्हणतील.आमचा पंत प्रधान आणि आमचेच मंत्री!!! सती बंदी कायदा केला तेंव्हा तुम्ही जर जनतेचा कौल घेतला तर तो कायद्याच्या बाजूने गेला असता काय? काही लोकहितार्थ निर्णय हे राबवावे लागतात. शेवटी बळी तो कान पिळी आहेच. तुम्ही काश्मिरी लोकांचे किती लाड करायचे ते एकदाच ठरवून टाका. काश्मीर मध्ये किती पैसा ओतला गेला आणि त्यातील किती चा सुविनियोग झाला हा हिशेब केला तर एक लक्षात येईल कि पंडित नेहरू हे स्वतः काश्मिरी असल्याने ३७० कलम प्रथम मान्य केले नंतर ते कलम सर्रास रद्द करून लोकसंख्या बदली केली असती तर आज काश्मिरात बहुसंख्य मुसलमान राहिले नसते आणि हा प्रश्न आपोआप सुटला असता. मला असे वाटते कि जर सरदार वल्लभ भाई पटेल अजून जगले असते किंवा पंतप्रधान झाले असते तर हि खरुज झालीच नसती.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 02/01/2013 - 15:18 नवीन
३७० कलम रद्द करण्यासाठी एवढ्या संधी येऊनही आपल्या मायबाप सरकारांनी काही केला नाही. तुम्ही ३७० कलम रद्द करून टाकले आणि कितीही कोणी कावकाव केली तरी भिक घातली नसती तर हि सगळी लफडी कधीच मिटली असती. चीन ने अमेरिकेला स्पष्ट सांगितले आमच्याशी धंदा करायचा असेल तर करा मानवाधिकार वगिरे आमचा अंतर्गत प्रश्न आहे आणि तुम्हाला त्याच्याशी काय करायचे आहे? अमेरिकेने काय केले? शेवटी बळी तो कान पिळी कबुतरे उडवण्याची चटक लागलेल्या सरकार कडून काय अपेक्षा आहे. चार दोन सैनिक मेले तर काय बिघडले? (man power is expendable) हे आपल्या संरक्षण सचिवांचे मत मी चर्चेच्या वेळी आपल्या स्वतः च्या कानांनी ऐकले आहे. दुर्दैवाने ते माझे द्वारकेवरून परत येताना सहप्रवासी होते.त्यामुळे दहा वीस सैनिक मेले तर एवढा आरडा ओरडा कशासाठी?
  • Log in or register to post comments
अ
अनुराधा१९८० Fri, 02/01/2013 - 17:12 नवीन
ज्या देशाला सैनिकांची किंमत नाही, त्या देशाला चांगले भविश्य नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मदनबाण Fri, 02/01/2013 - 16:01 नवीन
@ वेताळ परवा टीव्हीवर बातम्यात सांगितले होते कि पाकिस्तान काश्मिरात आण्विक हल्ला करणार आहे. त्यामुळे आण्विक हल्ला झालेनतंर लोकानी काय काय करावे ह्याबद्दल काश्मिर पोलीसांनी जनतेला स्थानिक वृत्तपत्रात जाहीरात देवुन मार्गदर्शन केले आहे. बंकर खोदायला देखिल लोकाना सांगितले आहे. ह्याबाबत इतर कोणत्याही पेपरात छापुन आले नाही. ह्यात काही तथ्य आहे काय? ही ती बातमी :- http://news.yahoo.com/india-warns-kashmiris-possible-nuclear-attack-131522521.html अगदी ताजी बातमी :- पाकची अण्वस्त्रे असुरक्षित हाती? जाता जाता :- २६/११ च्या हल्ल्या नंतर पाकिस्तानी शास्त्रज्ञांनी तिथल्या लष्ककराकडे मागणी केली होती की हिंदुस्थानवर अणवस्त्र हल्ला केला जावा. संदर्भ :- http://alturl.com/bnke3
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Fri, 02/01/2013 - 16:42 नवीन
दुसर्‍याच दिवशी पाक सोबत क्रिकेट खळणं थांबवु, अनं हव तर कडक शब्दात समज देणारे निषेध खलितेही धाडू. तसही असा प्रॉक्सि अण्वस्त्रहल्ला झाल्यानंतर दोशींवर पाक न्यायालयात खटले दाखल होऊन शिक्षासुध्दा सुनावली जाऊ शकते हे काय मी सांगायला पाहिजे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
श
श्रीरंग_जोशी Fri, 02/01/2013 - 16:54 नवीन
हि बातमी प्रसिद्ध झाल्यावर तेथील मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना खडसावल्याचीही बातमी आली होती. अवांतर - या धाग्यावरचा हा ४००वा प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
न
नाना चेंगट Fri, 02/01/2013 - 19:09 नवीन
३१ मार्चच्या आत ५०० आणि ३१ डिसेंबरच्या आत १००० प्रतिसाद व्हायला हवेत. लोकहो ! कामाला लागा !! :)
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 02/01/2013 - 19:47 नवीन
खारीचा वाटा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट
व
वेताळ Sat, 02/02/2013 - 14:52 नवीन
चांगला ११ किलोमीटर एलओसी च्या आत आला होता. व एक दिवस मुक्काम केला होता. त्याच वेळी आपल्या जागृत(?)सैनिकानी त्याला यमसदनी धाडला असता तर कारगिल झाले नसते.
  • Log in or register to post comments
स
सागरलहरी Sat, 02/02/2013 - 15:12 नवीन
अहो ऐका हो ऐका... राहुलजी आले आहेत आता कार्भार बघावयांस..आणि शुशीलराव आहेत हो दिमतींस..अता जे होणार ते नीट्च..
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 02/02/2013 - 18:17 नवीन
काय म्हणता ? मला तर लोक सांगतात की मोदी येत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरलहरी
स
सुधीर काळे Sun, 02/03/2013 - 06:32 नवीन
नितिन, मोदी येणे शक्य नाहीं कारण आजच्या 'भाजपा पक्षा'त पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबद्दल एकमत होणे शक्य नाहीं आणि NDA ला बहुमत मिळाले आणि मोदींबद्दल एकमत झाले नाहीं तर पंतप्रधानपदाची जयमाला गळ्यात घालून घ्यायला "विंगे"त आडवानीजी 'तय्यार' उभेच आहेत मान झुकवून! पण 'लाल'कृष्णजींच्या हस्ते एकदा तरी 'लाल' किल्ल्यावर तिरंगा फडकवला जावा असे मात्र मलाही वाटते....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 02/05/2013 - 16:26 नवीन
चेष्टा, सर्कॅझम वगैरे कळत नाही का हो काका तुम्हाला? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर काळे
श
श्रीरंग_जोशी Tue, 02/05/2013 - 17:23 नवीन
ती नितिनभाऊंच्या विनोदाची पुढची पायरी असावी असे वाटते ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बॅटमॅन Sat, 02/02/2013 - 22:01 नवीन
ए ऽ ऽ धत्तड तत्तड ४०० झाले रे प्रतिसाद!!!! ५०० आणि १००० करून या धाग्याला एकहजारी मनसबदारी बहाल केल्या जाऊन मिपाच्या हॉल ऑफ फेम मध्ये हा शानसे लागावा अशी अरजी मिपास्वामींचे चरणी दाखल करत आहोत. - सेवेचे ठायी तत्पर. वेनकुलोद्भव ब्रूसाजी बिन थॉमसाजी निरंतर.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 02/04/2013 - 04:49 नवीन
जम्मु काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची गेल्या आठवड्यातील मुलाखत - http://articles.timesofindia.indiatimes.com/2013-01-28/interviews/36577461_1_generation-capacity-omar-abdullah-public-service-guarantee-act
  • Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ Mon, 02/11/2013 - 17:57 नवीन
आजच टाईम्स नाऊ वर बघितले की हुरियत कॉन्फरन्सचा नेता यासीन मलिक पाकिस्तानात जाऊन २६/११ चा मास्टरमाईंड हाफिझ सईदला जाऊन भेटला.या कृत्याला देशद्रोही कृत्य का म्हणू नये आणि त्याच्यावर कारवाई का करू नये? याविषयी आपले मत काय?
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 02/11/2013 - 18:20 नवीन
यासिन मलिक जम्मु काश्मीर लिबरेशन फ्रंटचा संस्थापक नेता आहे. त्याने (अंदाजे) दोन दशकांपूर्वी शस्त्रे ठेवली असली तरी त्यानंतरही अनेकदा त्याने तुरूंगाची हवा खाल्लेली आहे. काही वर्षांपूर्वीच त्याने पाकिस्तानी स्त्रीबरोबर विवाह केला असल्याने पाकिस्तानी व्हिसावर तो तिकडल्या वार्‍या करत असतो. त्याने नेहमीच स्वतःत्र काश्मीरचा पुरस्कार केलेला आहे. या कृत्याबद्दल त्याच्यावर भारत सरकारने कायदेशीर कारवाई केल्यास नेमके हाती काय लागेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
प
पुण्याचे वटवाघूळ Tue, 02/12/2013 - 02:48 नवीन
त्याने नेहमीच स्वतःत्र काश्मीरचा पुरस्कार केलेला आहे. या कृत्याबद्दल त्याच्यावर भारत सरकारने कायदेशीर कारवाई केल्यास नेमके हाती काय लागेल?
स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार करत असेल तर (एक वेळ) समजण्यासारखे आहे पण २६/११ च्या सूत्रधाराबरोबर स्टेज शेअर करणे कसे समर्थनीय आहे? पण त्याच्या स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार करायच्या अधिकाराबरोबरच हाफिज सईदच्या २६/११ करायचा अधिकारही मान्य केला नाही तर स्वतःला मानवतावादी म्हणवत नसावे अरूंधती रॉय आणि त्या पठडीतल्या इतरांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Tue, 02/12/2013 - 03:07 नवीन
कारवाई केल्याने यासीन मलिक बदलणार की त्याच्या समर्थकांना जरब बसणार? काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांनी यापूर्वीही पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानचे दौरे केले आहेत व त्यामध्ये भारतावर केल्या जाणाऱ्या सूत्रधारांना भेटले नाहीत असा दावा कुणीच करू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
प
पुण्याचे वटवाघूळ Tue, 02/12/2013 - 03:44 नवीन
यासीन मलिक नक्कीच बदलणार नाही. पण एक देश म्हणून या बाबतीत आपला काही स्टॅन्ड आहे की नाही? भारतावर उघड-उघड हल्ला करणार्‍याला, दोनशे भारतीयांना ठार मारणार्‍या माणसाला भेटून यासीन मलिकने त्याला भारताविषयी काही वाटत नाही हे अगदी सिध्द केले आहे.मग अशाला भारतात का म्हणून ठेऊन घ्यायचे? १९४७ मध्ये एक फाळणी झाली ती चूक परत करता कामा नये.इतर कोणाला भारतात राहायचे नसेल तर अशांनी पाकिस्तानात खुशाल चालते व्हावे पण या देशाची टाचणीच्या टोकावर मावेल इतकीही जमीन तुम्हाला मिळणार नाही असे आपण ठणकावून सांगणार की नाही? की दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडलेले लोक कधीच न दिसणार्‍या पण कोर्टाने रितसर दोषी ठरविलेल्यांना फाशी दिले की मग नक्राश्रू ढाळणार्‍या ढोंगी मानवाधिकार वाल्यांचे पित्ते भारत सरकार आहे असे मानायचे का? आणि कारवाई करून नक्की काय होणार हा प्रश्न २६/११ मध्ये बळी पडलेल्या कोणाच्या बायकामुलांपुढे जाऊन विचारायचे धैर्य आहे का तुमच्यामध्ये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Tue, 02/12/2013 - 04:02 नवीन
अशा बाबतीत अतिउत्साह अडचणीत आणत असतो. आपल्याला जे साध्य करायचे आहे ते असे रुसवे फुगवे दाखवून होणार नाही. हे काही नळावरचे भांडण नाहीये. या इथे मराठी आंतरजालावर अनेक जालकंटक मोठ्या मोठ्या डौलाने मिरवत असतात. त्यांना इशारे दिल्याने, कारवाई केल्याने त्यांचे कारनामे थांबले आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
ब
बॅटमॅन Tue, 02/12/2013 - 09:26 नवीन
नळावरची भांडणे अन भारत-पाक इश्श्यूची तुलना केल्याने डोळे पाणावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Tue, 02/12/2013 - 17:42 नवीन
भारत सरकारची कृती विचारपूर्वक व परिणामकारकच असावी. भारत सरकारकडून काही आगळीक व्हावी यासाठीच मलिक व हुरियतवाल्यांचे सतत प्रयत्न सुरू असतात की जेणेकरून तेथील नव्या पिढीला भारताविरुद्ध भडकवता यावे. सौ सुनारकी एक लोहारकी हे धोरणच योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पुण्याचे वटवाघूळ Wed, 02/13/2013 - 03:46 नवीन
काश्मीर खोरे हा (बहुदा) एकमेव प्रांत आहे जिथे हिंदू-मुस्लिम दंगली कधीच झाल्या नव्हत्या.काश्मीरी लोकांना जर वेळीच नोकर्‍या,शिक्षणव्यवस्था,रस्ते,पाणी,वीज इत्यादी दिले गेले असते तर काश्मीरी युवक कधीच चुकीच्या वाटेला गेला नसता. पण अब्दुल्ला कुटुंबियांनी (आणि इतरही राज्यकर्त्यांनी) अत्यंत ढिसाळ प्रशासनाचा नमुना दिला आणि त्यातून काश्मीरी युवक एलिनेट झाला. अजूनही काश्मीरात या मूलभूत गोष्टी दिल्या तर यासीन मलिकवर कितीही कारवाई केली तरी काश्मीरी लोक त्यामुळे काडीमात्र भडकावले जाणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Wed, 02/13/2013 - 04:08 नवीन
इतर ठिकाणांसारख्या दंगली झाल्या नसतील पण ८९-९० मध्ये मशीदीमधून निर्वाणीचे इशारे देऊन व अनेक हिंदूचे प्राण घेऊन त्यांना काश्मीरमधून हुसकावण्यात आले होते. त्यातले अनेक आजही जम्मूतील किंवा दिल्लीमधील निर्वासितांच्या छावण्यांमध्ये राहत आहेत. फार पूर्वीचे माहीत नाही पण गेल्या काही वर्षांत तेथील पायाभूत सुविधांमध्ये कमालीची सुधारणा झालेली आहे. काही महिन्यांपूर्वीच मी काश्मीरमध्ये जाऊन आलोय. लहानसहान खेड्यांमध्ये सुद्धा शाळेत जाणारे विद्यार्थी बहुसंख्येने दिसत होते. या सर्व सकारात्मक बाबी आहेतच त्यामुळे भारत सरकारने थोडा अधिक संयम दाखवून पुढची पायरी गाठावी हि अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
स
सन्दीप Tue, 02/12/2013 - 09:11 नवीन
पण एक देश म्हणून या बाबतीत आपला काही स्टॅन्ड आहे की नाही? भारतावर उघड-उघड हल्ला करणार्‍याला, दोनशे भारतीयांना ठार मारणार्‍या माणसाला भेटून यासीन मलिकने त्याला भारताविषयी काही वाटत नाही हे अगदी सिध्द केले आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Tue, 02/12/2013 - 12:16 नवीन
मुशर्रफ साहेब राहुन गेले काश्मीरात LOC ओलांडुन आणि ती सुद्धा हेलिकॉप्टर ने. मस्त एक दिवस राहिले आणि परत गेले. मग अतिरेक्यांना पाठवले कार्गील ची शिखरे ताब्यात घ्यायला. अपनी मर्जी आये, अपनी मर्जी चले गये. आणि इथे आपण इंच इंच माघारी बद्दल बोलत आहोत.
  • Log in or register to post comments
स
सुपरमॅन Tue, 02/12/2013 - 15:36 नवीन
या सगळ्या मागे आपल ढिसाळ सरकार आहे..एक अनुबॉम्ब टाकला तर गायब होतील पाकडे.. सीमेवर तर वाद आहेतच शिवाय भारतात राहून हिन्दू ना १५ मिनीटात सम्पवन्याच्या गोष्टी होतात हा कीती मोठा अपमान :(
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Tue, 02/12/2013 - 19:23 नवीन
असा एक भाग असतो. एक बाँब टाकला तर! तो काय दिवाळीचा अ‍ॅटम बाँब वाटला का तुम्हाला? कराचीवर बाँब टाकला, तर मुंबई अन त्या आधी अहमदाबाद अन सुरत मधे रेडिओ अ‍ॅक्टिव्ह धूळ येऊन क्षक्ष लागेल याची कल्पना आहे का तुम्हाला? अभ्यास तरी करा हो किमान ७वीच्या भौतिक अन रसायन शास्त्राचा. गेला बाजार गूगल आहे बोटाखाली? राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, इ.इ. काही असते हे ठाऊक करून घ्यायची गरज आपल्याला नसतेच. "उठला" झोपेतून की चाल्ला बाँब टाकायला पाकिस्तानावर. चौथी ड च्या वर्गात 'मला पंतप्रधान केला तर' असा निभंद लिव्ताय काय हो तुम्ही??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुपरमॅन
म
मालोजीराव Wed, 02/13/2013 - 08:39 नवीन
जाऊ द्या हो ...उत्साहाच्या भरात म्हणाले असतील ते ! तो अकबर्या ओवेसी जर उत्साहाच्या भरात १०० कोटी हिंदूंना मारायची भाषा करत असेल ते पण लाखभर लोकांसमोर तर हे मिपाकर मिपा च्या व्यासपीठावरून अणु बॉम्ब फोडायची भाषा करू देत कि, आपण त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा प्रोत्साहन द्यायला हवे...कि अणुबॉम्ब कशाला आपण हायड्रोजन बॉम्ब पण वापरूया वगैरे वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
श
श्री गावसेना प्रमुख Wed, 02/13/2013 - 04:24 नवीन
गाडगे बाबा तरीच सांगत होते गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. कराचीवर अणुबाँब टाकला तर त्याचे इफेक्ट हे अहमदाबाद मुंबै पर्यंत यायचे तर.त्याच न्यायाने हिरोशीमा नागासाकी वर अमेरीकेने टाकलेल्या अणुबॉम्ब ने तर दोघ कोरीया ने तर अकार्यक्षम व्हायला हवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुपरमॅन
न
नाना चेंगट Wed, 02/13/2013 - 12:11 नवीन
४४४
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 02/13/2013 - 12:46 नवीन
445!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट
श
श्री गावसेना प्रमुख Wed, 02/13/2013 - 13:11 नवीन
भर टाकताय का?मी देउ का ट्रॅक्टर भर मुरुम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
र
राही Wed, 02/13/2013 - 15:13 नवीन
इंच इंच हा आणि तो राष्ट्रपिता हे दोन्ही धागे वज्रचुडेमंडित अखंड सौभाग्यवती कॅटेगरीतले आहेत. यांचे सौभाग्य अक्षय्य आहे/असो.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sat, 02/16/2013 - 04:11 नवीन
राहीसाहेब/राहीमॅडम, अगदी खरे आहे आपले म्हणणे! हा विषयच इतका काळजाला हात घालणारा आहे कीं त्याला 'मिपा'करांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिले यात नवल ते काय? हा धागा मी सुरू केला त्यावेळी माझ्या स्वप्नातही नव्हते कीं हा धागा प्रथम क्रमांकावर येईल. या धग्यावर खूप लोकांनी मौल्यवान भर भर घातली त्यात सुनील-जींचा वाटा मोठा आहे! त्याबद्दल त्यांचे खास आभार! या विक्रमी घाग्याच्या बाबतीत मी केवळ निमित्तमात्र आहे. त्याला विक्रमी बनविण्यात इतरांनीच खूप योगदान केलेले आहे! माझा वाटा अगदी खारीचाच आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा