Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा/मिळतो/ते?

३
३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/20/2010 - 14:24
🗣 231 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
59951 वाचन

💬 प्रतिसाद (231)
व
वेताळ Fri, 08/20/2010 - 14:33 नवीन
पहिला तुम्हाला वानर बनता येते का तपासुन पहा.मग बाबा बना व इतराना तुमची वानरे बनवा.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 08/20/2010 - 14:33 नवीन
हा पहिला अनुयायी कसा मिळवायचा?
त्याला को-अवतार करून घ्यायचा... शिंपल. एवढंबी कळत नाही तुम्हा झंटलमन लोकान्ला.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Fri, 08/20/2010 - 14:43 नवीन
तु माझी अनुयायी हो मी तुझा होतो.. संपला विषय.. बाकी ती चर्चा वाचुन अजुन हसतोय.. थोड्यावेळानं खूप गंभीर होइन कदाचित. :(
  • Log in or register to post comments
अ
असुर Fri, 08/20/2010 - 14:50 नवीन
स्वतःचे वडील, आणि शिवाजी महाराज सोडून बाकी सगळ्या बुवा, बापू, बाबा, महाराजांना आम्ही जाहीररित्या फाट्यावर मारतो! लेख मस्तच! हा प्रश्न मलासुद्धा खूप वेळा पडलाय. कसे काय लोक स्वतःची बुद्धी गहाण ठेवून या 'बाबा' लोकांच्या भजनी लागतात? (वाचून असेही वाटले की परवाचा 'बापू'पुराणाचा बाण वर्मी लागला की काय? :-) )
  • Log in or register to post comments
अ
अर्धवट Fri, 08/20/2010 - 14:54 नवीन
अगदी असेच म्हणतो.. फक्त आमची यादी अजुन लहान आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
म
मृत्युन्जय Fri, 08/20/2010 - 14:50 नवीन
तो म्हणाला आज पिझा खाऊया, की कॅण्टीनमधे जेवणारे सगळे पिझा खायला तयार होतात. पिझ्झ्याचे पैसे तो देत असेल हो. शिंपल. कोणि स्वखर्चाने पिझ्झा खायला घालणार असेल तर आम्ही पन तेवढ्यापुरते अनुयायी व्हायला तयार आहोत
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/20/2010 - 14:50 नवीन
बिपिन आणि अर्धवटः पण या फ्रॉडमधे लोकं सामील होतातच कसे? म्हणजे मला असा प्रश्न आहे की उदा: ... रावण मरणार निश्चित॥ हे वाक्य घेऊ या. रावण एकतर मेलेला आहेच. त्यातून जन्माला आलेली प्रत्येक गोष्ट, व्यक्ती मरणारच! रावण आणि कौरवच कशाला, राम, कृष्ण, द्रौपदी सगळेच मेले. तर मग हे वेगळं सांगतो आहोत असा आभास कसा काय निर्माण करतात हे भोंदू लोकं?
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 08/20/2010 - 14:54 नवीन
रावण हे रूपक असू शकतं. तसंही रावण ही वृत्ती आहे, माणूस नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/20/2010 - 14:58 नवीन
रूपक आहे हे मान्य केलं तर मग जी या वाक्यातली पहिली ओळ आहे, युद्ध माझा राम करणार, ती लोकांना परावलंबी करत नाही का? असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी याप्रमाणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्रियाली Fri, 08/20/2010 - 17:18 नवीन
म्हणजे "तुम लडो हम कपडा संभालता है|" की "शिवाजी दुसर्‍यांच्या घरी जन्माला घालायचा" असे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
आ
आमोद शिंदे Sat, 08/21/2010 - 00:38 नवीन
होहो असेच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
म
मृगनयनी Sat, 08/21/2010 - 08:43 नवीन
की "शिवाजी दुसर्‍यांच्या घरी जन्माला घालायचा" असे? श्शी!!!! .. दुसर्‍या घरचा वंश (मग भले तो शिवाजी का असेना! )... पण कुणी स्वतःच्या पोटात का सांभाळतंय? :|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्रियाली Sat, 08/21/2010 - 13:37 नवीन
श्शी!!!! .. दुसर्‍या घरचा वंश (मग भले तो शिवाजी का असेना! )... पण कुणी स्वतःच्या पोटात का सांभाळतंय?
हेच वाटतंय वरच्या श्लोकातून. तुम्ही श्शी! म्हणाल्याबद्दल धन्यवाद. स्वतः राम व्हा. वानर नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मृगनयनी Sat, 08/21/2010 - 14:39 नवीन
हेच वाटतंय वरच्या श्लोकातून. तुम्ही श्शी! म्हणाल्याबद्दल धन्यवाद. प्रियाली ताई, कशाचेही काय धन्यवाद देतेस ? तू जे लिहिलंस... त्याच्या भावना पोचल्या गं आमच्यापर्यंत.. पण त्याचा शब्दशः अर्थ "घाण" होता.. म्हणून मला अशी प्रतिक्रिया द्यावी लागली! :) स्वतः राम व्हा. वानर नको. अगं ... इथेच तर चुकतं ना! ..... आमचा आमच्या अनिरुद्धावर पूर्ण विश्वास आहे... तो आम्हाला दगा देणार नाही, याचीही आम्हाला पूर्ण खात्री आहे.. आणि "राम" हा एकच असतो ना!... आणि "वानरे" खूप सारे असतात!... रामनामाचा अखंद जप करणार्‍या वानरांच्या मदतीशिवाय राम समुद्रोल्लंघन करून लंकेला पोचू शकत नाही.... पण "रावणा"चा वध फक्त रामच करू शकतो ना!... "सीताहरण" हे तर केवळ एक कारण होते... पण मूळ उद्देश "रावणाचा विनाश"हाच होता... अगदी रोजच्या जीवनात सुद्धा.. अनेक "रावण"रुपी सन्कटे येतात... पण माझ्या अनिरुद्धाचे स्मरण केल्यावर त्या सन्कटांचा सामना करण्याचे बळ मला मिळते.... आणि त्या सन्कटाचे निवारण होते... कदाचित कुणाच्या आयुष्यात अनिरुद्धा'ऐवजी दुसर्‍या कुठल्या गुरुचेही नाव असू शकते... कारण गुरुमुळे तुमच्या जीवनाला दिशा मिळते.... अर्थात... अनेक भोन्दु बुवा-देखील आहेत.. समाजात... मला इथे त्यांची नावं घ्यायची नाहीयेत... त्यान्च्याबद्दल टी.व्ही.चॅनेल वरती... बर्‍याचे गोष्टी पहयला आणि ऐकायला मिळतात... त्यामुळे कुणी कुठला "गुरु" करावा.. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.... || जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशिल निश्चित..... नाही तक्रार राघवा|| या उक्तीप्रमाणे जे मजसाठी योग्य आहे, ते मला माझा "गुरु" देणारच आहे.. असा विश्वास मनात बाळगणे गरजेचे आहे... अर्थात याचा अर्थ "असेल माझा हरि, तर देइल खाटल्यावरी".. असा होत नाही.... पण स्वामी समर्थ, साईबाबा, कलावतीआई, गजानन महाराज..., अनिरुद्ध बापू... या आणि इतर -खरोखर गुरु म्हणण्यायोग्य अशा व्यक्तींचे एकच सांगणे असते... की , "तुम्ही जे काही कर्म करताय.. ते मला अर्पण करा..आणि माझ्यावर दृढ श्रद्धा ठेवा... तुमच्या दिवसभराच्या कामाची सुरुवात करताना... माझे स्मरण करा.. आणि म्हणा... " स्वामी/ बापू/ आई ........ आज मी हे जे काही करते आहे.. तुम्ही माझ्याकडून ते व्यवस्थित पार पाडुन घ्या..." अर्थात.. एकदा गुरुला शरण गेल्यावर आणि जीवनातले प्रत्येक काम गुरुला अर्पण केल्यावर. (मानसपूजा).. तुमचे काम नक्की यशस्वी होते..... प्रत्येक पायरीवरती... तुमचा गुरु तुम्हाला सांभाळुन घेतो... हा माझा स्वतःचा अनुभव आहे.... कारण कुणी काहीही म्हटले, तर "कर्ता" हा नेहमी "गुरुच" असतो.... त्यामुळेच जर माझ्या गुरुने मला अभयवचन दिलेले आहे, की "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" .. तर मग मला इतर कुणाला भिण्याचे कारण काय ? गुरुच्या अभयवचनावरती गाढ विश्वास असणारी माणसे आयुष्यात कधीच वाया जात नाहीत.. आणि नेक काम करताना.. कितीही अडथळे आले... तरी कुणालाही घाबरत नाहीत... आणि त्यांच्या हातून अयोग्य असे काहीही... घडू शकत नाही! टीप : आयुष्यात माणसे अनेक सवयींचे गुलाम असतात... अनेक लोकांसमोर लाचार असतात.... नाईलाजाने का होईना.. पण स्वतःच्या स्वार्थासाठी ते अनेक गोष्टींना, व्यक्तींना शरण जातात.... उदा. बॉस. आणि ही शरणागती पत्करताना ते अभिमानाने सांगतात... आमच्या संसारासाठी, नोकरीसाठी मी असं केलं... मी माझ्या बॉसच्या "फेवर" मध्ये आहे... त्यामुळे कसलीच भीति नाही.... इ इ. अनेक गोष्टी..... तिथे त्यांचा 'कर्ता' त्यांचा बॉस असतो... पण देवाला शरण जाणे, किन्वा गुरुप्रति पूर्ण विश्वास मनी बाळगणे.. खूप जणांना कमीपणाचे वाटते... देवासमोर माथा टेकणे.. म्हणजे स्वकर्तृत्वावर अविश्वास दाखवणे... असे बर्‍याच जणांना वाटते... पण देवासमोर काय किन्वा गुरुसमोर काय ... शरणागती पत्करणे म्हणजे... कधीही दगा न देणार्‍या शक्तीला आपले म्हणणे- हेच होय! देव /गुरु हा सम्पूर्ण आयुष्याचा कर्ता आहे, हीच गोष्ट नेमकी बरेच जण दुर्लक्षित करतात.. आणि स्वतःच्या खोट्या अहंकाराला कवटाळत बसून आपापल्या कर्तृत्वाचे गोडवे गातात... त्यामुळे "युद्ध माझा रामच करणार आहे!..- कारण तो कर्ता आहे. . विश्वाचा स्वामी गुरुदेव- दत्त हाच माझा मूलाधार आहे.- शक्तीचा मूलस्त्रोत! ... मी यःकश्चित वानर आहे.... हे माझे अहोभाग्य आहे.. की "रावणाच्या" विनाशासाठी रामप्रभूंची मदत करण्यासाठी माझा हातभार लागणार आहे.... आणि पर्यायाने रामाची माझ्यावर कृपादृष्टी असल्यामुळे माझ्या आयुष्यातल्या "रावणांचा"- सन्कटांचा चुटकीसरशी विनाश होणार आहे..... _________________________ आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, एखाद्याच्या श्रद्धेचा कधीही अपमान करू नये... अगदी एखाद्याच्या वैयक्तिक आकसापोटी किमान कुणाच्या "गुरुजनां" वर चिखलफेक होणार नाही. आणि कुणाच्या श्रद्धेचा अपमान होणार नाही.. याची प्रत्येकाने काळजी घ्यावी! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
आ
आमोद शिंदे Sun, 08/22/2010 - 00:07 नवीन
"तुम्ही जे काही कर्म करताय.. ते मला अर्पण करा..आणि माझ्यावर दृढ श्रद्धा ठेवा... तुमच्या दिवसभराच्या कामाची सुरुवात करताना... माझे स्मरण करा.. आणि म्हणा... " स्वामी/ बापू/ आई ........ आज मी हे जे काही करते आहे.. तुम्ही माझ्याकडून ते व्यवस्थित पार पाडुन घ्या..." हाण्ण! वानर असा विचार कधीही करु शकणार नाही. त्यासाठी माणूसच हवा. ताई तुम्ही वानर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
P
Pain Sun, 08/22/2010 - 08:26 नवीन
गुरुच्या अभयवचनावरती गाढ विश्वास असणारी माणसे आयुष्यात कधीच वाया जात नाहीत.. आणि नेक काम करताना.. कितीही अडथळे आले... तरी कुणालाही घाबरत नाहीत... आणि त्यांच्या हातून अयोग्य असे काहीही... घडू शकत नाही! not necessarily. असे न झाल्याची माझ्याकडे उदाहरणे आहेत. तुमची श्रद्धा आहे आणि तुमची संकटे दूर होतात / बळ मिळते. यात स्पष्ट परस्परसंबंध नाही. फक्त नशीब/रॅंडम इव्हेंट/ प्रोबॅबिलिटीचा भाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
अ
अर्धवटराव Sun, 08/22/2010 - 20:47 नवीन
मृगनयनीजी, तहान लागली असता पाणि पिण्याने तृप्ती येते, हा अनुभव ज्याने घेतला त्यालाच पाण्याचे महत्व कळेल. हे कळून देखील पाण्याचे महत्व नाकारणे हि अंधश्रद्धा, आणि अनुभवाविण उगाच उदोउदो करणे हि देखील अंधश्रद्धा. शेवटी ज्याचि त्याची वेळ असते... (अर्धजागृत) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
प
प्रियाली Sun, 08/22/2010 - 23:09 नवीन
एकदा गुरुला शरण गेल्यावर आणि जीवनातले प्रत्येक काम गुरुला अर्पण केल्यावर. (मानसपूजा).. तुमचे काम नक्की यशस्वी होते..... प्रत्येक पायरीवरती... तुमचा गुरु तुम्हाला सांभाळुन घेतो...
हे धादांत चुकीचे आहे. कामे यशस्वी आणि अयशस्वी होण्यात कोणत्याही देवा-गुरुचा हात नाही.
आणि महत्वाची गोष्ट म्हणजे, एखाद्याच्या श्रद्धेचा कधीही अपमान करू नये... अगदी एखाद्याच्या वैयक्तिक आकसापोटी किमान कुणाच्या "गुरुजनां" वर चिखलफेक होणार नाही. आणि कुणाच्या श्रद्धेचा अपमान होणार नाही.. याची प्रत्येकाने काळजी घ्यावी!
दुसर्‍या शब्दात तुमचा जो गुरु आहे तो इतर कोणाचा "भोंदूबाबा"ही असू शकेल. तसे असल्यास तुम्ही त्याचा उदो-उदो केल्याने त्याच्या भावना दुखावण्याचा संभव आहे. याची काळजी तुम्ही कधी केलीत का? जर केली नसेल तर त्याने तुमची काळजी करावी आणि तुमच्या श्रद्धेला दुखवू नये असे तुम्हाला वाटू नये. बाकी आपले विचार मला पटत नाहीत हे वेगळ्याने सांगायला नकोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 08/23/2010 - 14:52 नवीन
>>> कामे यशस्वी आणि अयशस्वी होण्यात कोणत्याही देवा-गुरुचा हात नाही. असं कसं ? प्रयत्न जेव्हा संपतात तेव्हा देवावर हवाला सोडला जातो तेव्हा यश मिळाले तर देवाचा [गुरुची काही आयड्या नाही] हात नक्की असावा असे वाटते. गीतेत भगवंत श्रीकृष्णाने म्हटले आहे की, ''अधिष्ठानं,तथा कर्ता करणं च पृथग्विधम् विविधाश्च पृथग्चेष्टा, देवं चैवान्न पंचमम्'' [जालावरील दुवाअजून काही दुवे ] स्थळ, प्रत्यक्ष कर्ता, नानाप्रकारची साधने, कर्त्याच्या क्रिया, या चार कारणाशिवाय जोडीला दैव हे एक पाचवे कारण आहे असे म्हटले आहे. त्यामुळे आपला या दैवावर विश्वास आहे. उपप्रतिसादापूरता हा विषय आमच्यासाठी संपला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/23/2010 - 14:58 नवीन
असं कसं ? प्रयत्न जेव्हा संपतात तेव्हा देवावर हवाला सोडला जातो तेव्हा यश मिळाले तर देवाचा [गुरुची काही आयड्या नाही] हात नक्की असावा असे वाटते.
आणि प्रयत्न संपलेच नाहीत तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रियाली Mon, 08/23/2010 - 15:00 नवीन
प्रयत्न जेव्हा संपतात तेव्हा देवावर हवाला सोडला जातो तेव्हा यश मिळाले तर देवाचा [गुरुची काही आयड्या नाही] हात नक्की असावा असे वाटते.
हा केवळ मनाची समजूत घालण्याचा प्रकार आहे.
स्थळ, प्रत्यक्ष कर्ता, नानाप्रकारची साधने, कर्त्याच्या क्रिया, या चार कारणाशिवाय जोडीला दैव हे एक पाचवे कारण आहे असे म्हटले आहे. त्यामुळे आपला या दैवावर विश्वास आहे.
जग दैवावर विश्वास ठेवून चालत नाही. :) तसे असते तर पहिली चार कारणे बाजूला ठेवून पाचव्यावरच अवलंबून राहीला असता मनुष्य. जेव्हा सर्व उपाय थकतात तेव्हाच माणूस दैवावर हवाला सोडतो. त्यावरून दैवावरचा विश्वास ध्यानात यावा.
उपप्रतिसादापूरता हा विषय आमच्यासाठी संपला.
अरेच्चा! सुरुवातही आपणच करायची आणि शेवटही आपणच करायचा. नो प्रॉब्लेम! चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अनाम Mon, 08/23/2010 - 18:02 नवीन
प्रयत्न जेव्हा संपतात तेव्हा देवावर हवाला सोडला जातो तेव्हा यश मिळाले तर देवाचा [गुरुची काही आयड्या नाही] हात नक्की असावा असे वाटते.
अहो प्रा.डॉ. जेव्हा आपले प्रयत्न संपलेलेल असतात तेव्हा कदाचीत दुसर्‍या एखद्या मित्राचे/नातेवाईकाचे प्रयत्न चालुच नसतील कशावरुन. तुमचा मुद्दा पटला नाही. पण आपण स्वतःच विषय संपवलायत तर बोलणेच खुंटले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
व
विकास Mon, 08/23/2010 - 18:56 नवीन
गीतेत भगवंत श्रीकृष्णाने म्हटले आहे की, ''अधिष्ठानं,तथा कर्ता करणं च पृथग्विधम् विविधाश्च पृथग्चेष्टा, देवं चैवान्न पंचमम्''
हे खरे आहे, पण या संदर्भात देखील कृष्णाचे एकच वाक्य घेऊन त्याचा संदर्भ देणे हे थोडेसे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट होते असे वाटते. जरी संपूर्ण गीतेच्या संदर्भात नाही तरी त्याच्या पुढच्याच श्लोकाशी याचा प्रत्यक्ष संदर्भ लावताना त्याचा अर्थ वेगळा होतो. खालील ओळी मराठीतील आहेत:
अधिष्ठान अहंकार तशी विविध साधने । वेगळाल्या क्रिया नाना दैव ते येथ पांचवे ॥ १८- १४ ॥ काया-वाचा-मने जे जे मनुष्य करितो जगी । धर्माचे वा अधर्माचे त्याची ही पांच कारणे ॥१८- १५ ॥
आता कृष्ण धर्माप्रमाणेच ही कारणे अधर्माची पण आहेत असे म्हणतो. मग जो स्वतःसंदर्भात "स्थापावया पुन्हा धर्म, जन्मतो मी युगे युगे" असे म्हणतो तो या पाचव्या हिश्श्यात स्वतःचा हात आहे असे कसे म्हणेल? माझ्या मते त्याचे अर्जुनाला इतकेच समजावणे होते की गोल सेटींग, अँबिशन, डिजायर, साधने (मटेरीयल्स अँडा मेथड्स) असे सगळे ठरवून मग मनापासून प्रयत्न करूनही कधी कधी जेंव्हा हवे ते मिळत नाही तेंव्हा त्याचे जे स्पष्टीकरण देता येत नाही त्याला दैव म्हण आणि सोडून दे आणि तिथेच चिकटून (रडत) न बसता पुढचे प्रयत्न कर. हे दैव म्हणजे घासकडवी महाराजांया गोडेल गुरूजींनी सांगितलेल्या "अपुर्णतेच्या सिद्धांतासारखे" आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
N
Nile Fri, 08/20/2010 - 17:56 नवीन
रावण हे रूपक असू शकतं. तसंही रावण ही वृत्ती आहे, माणूस नाही.
बिकांचे इथले (फक्त काही) प्रतिसाद वाचुन आम्ही त्यांचे अनुयायी झालेलो आहोत. इतरांचे (विरोधी)तर्क आम्ही वाचलेले नाहीत, त्याची आम्हाला गरजही वाटत नाही. जय बिकाबाबा! जय बिकाबाबा!! जय बिकाबाबा!!! (आम्ही जर त्यांचे पहिले अनुयायी (मग बिकांच्या रिटायरमेंटनंतर मीच की त्यांच्या खुर्चीचा दावेदार? संपादकाची खुर्ची नाही हो "बाबा"खुर्ची म्हणतोय मी) असु तर आम्ही धाग्यातील मुख्य प्रश्नाचे उत्तर देउ)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
परिकथेतील राजकुमार Fri, 08/20/2010 - 14:50 नवीन
अश्रद्धांनी श्रद्धावंताची व त्यांच्या श्रद्धेची खिल्ली उडवण्यासाठे उघडलेला धागा !! I was an atheist till i realised i was GOD !
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/20/2010 - 14:54 नवीन
बरं, मग तुमची कोणावर श्रद्धा असते ती कशामुळे? समोरचा माणूस आपल्यापेक्षा काहीही वेगळा दिसत नाही, करत नाही, तरीही त्याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवता का? त्यापेक्षा दगडाला देव मानणं जास्त संयुक्तीक वाटतं. दगड किमान आपल्यापेक्षा वेगळातरी असतो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मृगनयनी Fri, 08/20/2010 - 15:03 नवीन
अश्रद्धांनी श्रद्धावंताची व त्यांच्या श्रद्धेची खिल्ली उडवण्यासाठे उघडलेला धागा !! :) १०८ % सहमत!!! स्कोर सेटल करण्यासाठी पातळी सोडून दिलेले प्रतिसाद संपादित करण्यात येतील हे ध्यानात घ्यावे. - संपादक मंडळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
न
नितिन थत्ते Fri, 08/20/2010 - 16:58 नवीन
>>स्कोर सेटल करण्यासाठी पातळी सोडून दिलेले प्रतिसाद संपादित करण्यात येतील हे ध्यानात घ्यावे. - संपादक मंडळ धिस इज नॉट फेअर. :( सदर आयडीच्या खास अ‍ॅबिलिटीज लक्षात घेऊन [हे आव्हान]. दिले होते. संपादकमंडळाने अशी पार्शालिटी केल्यावर मग वॉक ओव्हर दिल्यासारखेच झाले की. :) संपादक मंडळास निवेदन : सदर निषेध या विशिष्ट इश्यूपुरताच आहे याची नोंद घ्यावी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मिसळभोक्ता Fri, 08/20/2010 - 23:25 नवीन
>>स्कोर सेटल करण्यासाठी पातळी सोडून दिलेले प्रतिसाद संपादित करण्यात येतील हे ध्यानात घ्यावे. - संपादक मंडळ बिसलेरीच्या पाण्याच्या पाणीपुर्‍या खाण्यात मजा येत नाही, हे संपादक मंडळाला कधी कळेल ? निवेदनः सदर "अरेरे" हे बिसलेरीपर्यंतच मर्यादित आहे याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
आ
आमोद शिंदे Sat, 08/21/2010 - 00:46 नवीन
सहमत आहे. त्यातून हे तर मिसळपाव. तर्रीऐवजी बिसलेरीचे पाणी मिसळल्यासारखे नको
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
व
विकास Sat, 08/21/2010 - 05:47 नवीन
बिसलेरीच्या पाण्याच्या पाणीपुर्‍या खाण्यात मजा येत नाही, हे संपादक मंडळाला कधी कळेल ? संपादक मंडळाचे योग्य ठिकाणी विरझण घालायचे धोरण आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता
आ
आमोद शिंदे Sat, 08/21/2010 - 14:31 नवीन
विरझण शब्द काळजाला भिडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Mon, 08/23/2010 - 13:20 नवीन
विरझण शब्द काळजाला भिडला. त्याचं काय आहे, योग्य वेळेस विरझण घातले नाही तर दुध देखील नासून वाया जाते. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे
म
मृत्युन्जय Fri, 08/20/2010 - 19:48 नवीन
स्कोर सेटल करण्यासाठी पातळी सोडून दिलेले प्रतिसाद संपादित करण्यात येतील हे ध्यानात घ्यावे. - संपादक मंडळ. फक्त संपादितच केले जाणार असतील तर काही हरकत नाही. आम्हीही आमचा उजेड पाडुन घेउ म्हणतो मग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
आ
आमोद शिंदे Sat, 08/21/2010 - 00:37 नवीन
>>युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||>> तसेच हा मजकूरही संपादित केला जावा. विनोद तर सांगायाचा पण हसायचं मात्रनाही ही बळजबरी नको हो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मृगनयनी Sat, 08/21/2010 - 08:03 नवीन
स्कोर सेटल करण्यासाठी पातळी सोडून दिलेले प्रतिसाद संपादित करण्यात येतील हे ध्यानात घ्यावे. - संपादक मंडळ. :( :( अरे बापरे!!! .. मी दिलेले "रोशनी"चे उदाहरण कुणीतरी इतके "वैयक्तिक" घेईल... याची कल्पनाच नव्हती मला! :| ___________ पण "उपक्रम" या दुसर्‍या संकेतस्थळावरील लिन्क मिसळपाव'वरती देऊन अनिरुद्ध बापूंबद्दल भाष्य करणे, माझ्या (मृगनयनी'च्या) स्वाक्षरी मध्ये असलेल्या "अनिरुद्ध महावाक्यम्" वरती जाणीवपूर्वक वैयक्तिक पातळीवर येऊन असभ्य भाष्य करणे... त्याची मस्करी करणे... इ गोष्टी करणार्‍या मिपासदस्यांबद्दल "सम्पादक मन्डळ" काय बरे करू शकेल? इन फॅक्ट, ते काही करू शकेल का? ! ? ! ? (अर्थात "अशा" सदस्यांना आणि त्यांच्या चेष्टांना मी महत्व देत नाही... ही गोष्ट वेगळी!.... पण "पातळी सोडून न वागण्या"संदर्भात माननीय सम्पादक मन्डळाने "इतरां"कडे ही लक्ष द्यावे, ही नम्र विनन्ती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
N
Nile Sat, 08/21/2010 - 08:10 नवीन
ह्या अन्यावाचा तोडगा बापुंनाच विचारावा काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
र
राधिका Sat, 08/21/2010 - 10:05 नवीन
अगं मृगा, तू इतकी का पझेसीव्ह होतीयेस? पॉझीटीव्हली घेना थोडं, अदितीने जी उपक्रमावरची लिन्क दिलेली आहे, ती वाचली. तिथे कुणीतरी तुला अप्सरा म्हणाले ना! :) तुझे फोटो मी पाहिलेत, तुझे डोळे आणि तू खरंच खूप सुन्दर आहे! अप्सरेपेक्षाही सुन्दर! "मृगनयनी बाईंनाही बोलवा इकडे, आम्ही त्यांचे स्वागतच करु -अप्सरा आली- असे म्हणुन" असंच काहीसं कुणीतरी म्हटलं ना! , मग 'तू अप्सरेसारखी सुन्दर आहेस, हे उपक्रम-वाल्यांनाही माहित आहे, आणि तू तिथे गेलीस, तर तुझे स्वागतच होइल' - हे मिपकरांनाही कळावे म्हणूनच अदितीने हा धागा काढला नसेल कशावरून ? अनिरुद्धबापूंबद्दल तुझ्या मनात श्रद्धा असेल, आणि त्यांच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल, तर तुझ्या श्रद्धेला फरक पडणार आहे का? नाही ना., झालं तर मग! तू इतरांकडे लक्ष देऊ नकोस! प्लीज गं, तू असा त्रागा नको करून घेउस, आमच्यासारख्या तुझ्या बर्‍याच 'हितचिन्तकाना' आणि 'चाहत्यांना' नाही आवडणार हं ते! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मृगनयनी Sat, 08/21/2010 - 10:22 नवीन
तिथे कुणीतरी तुला अप्सरा म्हणाले ना! तुझे फोटो मी पाहिलेत, तुझे डोळे आणि तू खरंच खूप सुन्दर आहे! अप्सरेपेक्षाही सुन्दर! "मृगनयनी बाईंनाही बोलवा इकडे, आम्ही त्यांचे स्वागतच करु -अप्सरा आली- असे म्हणुन" असंच काहीसं कुणीतरी म्हटलं ना! , अगं राधिका ताई, किती कौतुक करशील ? :) मग 'तू अप्सरेसारखी सुन्दर आहेस, हे उपक्रम-वाल्यांनाही माहित आहे, आणि तू तिथे गेलीस, तर तुझे स्वागतच होइल' - हे मिपकरांनाही कळावे म्हणूनच अदितीने हा धागा काढला नसेल कशावरून ? =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) असेल असेल... कदाचित म्हणूनच काढला असेल धागा! या "इतरां" ' चे सुप्त हेतू *भ्य जनांच्या ध्यानीच येत नाही गं!!!!! ;) प्लीज गं, तू असा त्रागा नको करून घेउस, आमच्यासारख्या तुझ्या बर्‍याच 'हितचिन्तकाना' आणि 'चाहत्यांना' नाही आवडणार हं ते! अं ! हो! ... माझ्या हितचिन्तकांसाठी आणि चाहत्यांसाठी मला त्रागा करून नाही चालणार! :) ______________________ धन्यवद राधिका ताई! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राधिका
आ
आमोद शिंदे Sat, 08/21/2010 - 17:22 नवीन
स्कोर सेटल करण्यासाठी पातळी सोडून दिलेले प्रतिसाद संपादित करण्यात येतील हे ध्यानात घ्यावे. - संपादक मंडळ. माझ्या मते पातळी सोडून दिलेले सगळेच प्रतिसाद संपादित करावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मितभाषी Mon, 08/23/2010 - 11:34 नवीन
आमीबी एकशाट परशेंट शहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
अ
असुर Fri, 08/20/2010 - 15:08 नवीन
>>>अश्रद्धांनी श्रद्धावंताची व त्यांच्या श्रद्धेची खिल्ली उडवण्यासाठे उघडलेला धागा !!<<< श्रद्धावान आणि अंधश्रद्धाळू यात अंमळ गल्लत होते आहे की काय? माझ्या मते हा धागा लोकांतील अंधश्रद्धेला उद्देशून आहे. बाबा लोकांच्या भजनी लागलेले हे 'अंधश्रद्धाळू' क्याटेगरीत येतात. --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Fri, 08/20/2010 - 15:29 नवीन
श्रद्धावान आणि अंधश्रद्धाळू यात अंमळ गल्लत होते आहे की काय? माझ्या मते हा धागा लोकांतील अंधश्रद्धेला उद्देशून आहे. बाबा लोकांच्या भजनी लागलेले हे 'अंधश्रद्धाळू' क्याटेगरीत येतात.
मला असे वाटत नाही बॉस. मी मागे पण हे उदाहरण दिले होते, माझ्या आजीला वयोमानाने गुडघेदुखीचा अथवा इतर काही त्रास खुपदा जाणवायचे. बरेचदा तिला डोकेदुखी अथवा इतर काही त्रास चालू झाला की ती गजानन महाराजांची पोथी काढुन वाचायला बसायची, आणि गंमत म्हणजे तिचा त्रास कमी व्हायचा अथवा जाणवणेच बंद व्हायचा. १) दुसर्‍या एखाद्या कामात मन गुंतल्याने कदाचीत तिला दुखण्याचा विसर पडत असावा अथवा २) आता आपले दुखणे कमी होणारच हा आत्मविश्वास मनात जोर धरत असल्याने देखील असे होत असणार ह्या दोन्ही शक्यता जरी गृहित धरल्या तरी तिला पोथी वाचनातुन वा नामःस्मरणामुळे त्रासातुन मुक्ती मिळत असेल तर मी तिला अंधश्रद्धाळु का म्हणावे ? अशा वेळी मग तीच्या भक्तीवर अथवा श्रद्धेवर शंका कशी उपस्थीत करावी ? एखाद्या बुवा अथवा बाबांच्या सल्ल्याने / धाकाने एखादी व्यक्ती दारुच्या व्यसनातुन मुक्त झाली तर ती व्यक्ती व तिचे कुटुंबीय अशावेळी त्या माणसाला देवच मानु लागतात. त्यांना चुक कसे म्हणावे ? अशावेळी त्यांची अंधश्रद्धा बघत बसावे का झालेला फायदा ? मानसीक रुग्णाला अथवा अस्वस्थ माणसाला मानसोपचार तज्ञाशी बोलल्याने आपला प्रोब्लॅम डिस्कस केल्याने जसे बर्‍याचदा मोकळे वाटते अथवा अडचणीतुन मार्ग काढण्याची उभारी मिळते अगदी तसेच एखाद्या माणसाला ह्या बुवा / बाबांच्या सहवासात होत असेल तर आपण त्याच्या श्रद्धेवर (तुमच्या भाषेत अंधश्रद्धेवर) बोट का ठेवावे ? (सात वाजत आल्याने सध्या येवढेच ;) बाकीचे उद्या उतरल्यावर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/20/2010 - 15:37 नवीन
पुन्हा माझा प्रश्न होता तिथेच राहिला: परा, तुझ्या आजीने कोणाकडून तरी गजानन महाराजांचं नाव ऐकलं? त्या कोणीतरी आणखी कोणाकडून? असं करत, तो पहिला भक्त कसा मिळाला/मिळवला?? गजानन महाराजांची गोष्ट, त्यांचा काळ तर तसा फार जुना नाही. मग त्यांच्या पहिल्या भक्ताबद्दल काय माहिती उपलब्ध आहे? कोणी कोणावर विश्वास ठेवावा का नाही याबद्दल मला काहीही बोलायचं नाहीये. माझाही माझ्या बॉसवर विश्वास आहे. तो जेव्हा मला सांगतो, "पुन्हा एकदा अमुक एक प्रोसिजर करून पहा." मी मुकाटपणे करुन पहाते. हा त्याच्या अनुभवावर विश्वास असतो. आणि अजून वीस वर्षांनी माझाही अनुभव असेल (बहुदा!) तेव्हा मीसुद्धा असं सांगू शकेन. पण हा अनुभव कुठून आला हे सगळं शोधता येतं. बाबा-बुवांचं काय? ज्यांना अशा गोष्टी माहित असतील त्यांनी लिहाव्यात अशी विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Fri, 08/20/2010 - 15:39 नवीन
पुन्हा माझा प्रश्न होता तिथेच राहिला: परा, तुझ्या आजीने कोणाकडून तरी गजानन महाराजांचं नाव ऐकलं? त्या कोणीतरी आणखी कोणाकडून? असं करत, तो पहिला भक्त कसा मिळाला/मिळवला??
अग ते माझे उत्तर तुला न्हवते ग. त्या वरच्या प्रतिसादातील प्रश्नाला उत्तर होते. बाकी प्रत्येकाचा पहिला भक्त तो स्वतःच असतो ;) निट विचार केल्यास हे नक्की पटेल तुला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/20/2010 - 15:43 नवीन
स्वतःबद्दल ही गोष्ट खपू देणारा माणूस स्वतःचा 'भक्त' असेल असं वाटत नाही. स्वतःलाही प्रश्न विचारण्यास न घाबरणारा माणूस अगदीच काही गुलबकावलीच्या फुलाएवढा दुर्मिळ नसतो. असे बरेच लोकं मी पाहिल्यामुळे मलातरी हे पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Fri, 08/20/2010 - 15:47 नवीन
बोलणार्‍याचे तोंड कोण धरणार ? आता रामराज्यात असा एकच धोबी होता, आता असे अनेक झालेत.. कलियुग हो कलियुग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/20/2010 - 16:01 नवीन
बोलणार्‍याचं तोंड धरता येत नाहीच. पण जाहीर निवेदन कधीही दिसत नाही, "मी अमुकतमुक चमत्कार केलेले नाहीत" असं. गाडगेबाबांचे चमत्कार का बुवा कधी कानावर आले नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Fri, 08/20/2010 - 16:07 नवीन
पण जाहीर निवेदन कधीही दिसत नाही, "मी अमुकतमुक चमत्कार केलेले नाहीत" असं.
आता काय बोलायच ! तो धम्या गावभर सांगत फिरतो की पर्‍या वेगळ्या नावाने एका ठिकाणी चावट कथा लिहितो ;) मग काही लोक माझ्याकडे आदराने बघतात. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. आता कुठे उगा निवेदन देत बसायचे सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मृत्युन्जय Fri, 08/20/2010 - 16:12 नवीन
पण गजानन महाराजांचे बरेच चमत्कार कानावर पडतात. रामदास स्वामींचे पडतात. त्यांना पण तुम्ही बाकीच्या बुवा बाबांच्या रांगेत उभे करणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा