पितृपक्ष-२
Book traversal links for पितृपक्ष-२
💬 प्रतिसाद
(141)
श
शिल्पा ब
Sun, 09/26/2010 - 18:31
नवीन
थोडसं गंभीरपणे : एक तर कशावरून मृत्युपक्षात जीवन असते? आणि जरी असेल तरी जिवंत जे आपल्या समोर आहेत त्यांच्याशी माणुसकीने वागण्यापेक्षा मेलेले अन ज्यांचे अस्तित्व आपल्याला ज्ञात नाही त्यांच्यासाठी एवढे पैसे खर्च करणे अन जेवणावळी घालणे यापेक्षा एखाद्या गरजवंताला का नाही मदत करायची?
अन जरी आत्मा वगैरे प्रकार असले तरी ते या पृथ्वीवरच राहतील हे कशावरून? टिळक असो कि आणखी कोणी त्यांनी हि मृत्युपक्षात योनी आहे वगैरे कशावरून ठरवले? काय पुरावा आहे? वाचायला अद्भुत असले म्हणजे ते सत्य असते असे नाही...किंबहुना खुपदा नसतेच.
पूर्वापार चालत आलेल्या रुढींना विचार न करता आंधळेपणाने धरून राहिले कि आपण धर्माभिमानी ठरतो का?
मला व्यक्तीशः हे प्रकार पटत नाही...जिवंत असलेले राहिले बाजूला मेलेल्यांचे काय करत राहायचेय?
- Log in or register to post comments
श
शुचि
Sun, 09/26/2010 - 18:46
नवीन
>> एक तर कशावरून मृत्युपक्षात जीवन असते?>>
कशावरून नसते?
>> आणि जरी असेल तरी जिवंत जे आपल्या समोर आहेत त्यांच्याशी माणुसकीने वागण्यापेक्षा मेलेले अन ज्यांचे अस्तित्व आपल्याला ज्ञात नाही त्यांच्यासाठी एवढे पैसे खर्च करणे अन जेवणावळी घालणे यापेक्षा एखाद्या गरजवंताला का नाही मदत करायची? >>
गरजवंताला मदत करा ना वर्षभर. वर्षातले १५ दिवस पितरांना देता येत नाहीत?
>> आंधळेपणाने धरून राहिले कि आपण धर्माभिमानी ठरतो का? >>
आंधळेपणानी नाही स्वप्न आदिंचा इनेक्स्प्लिकेबल अनुभव!!!
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Sun, 09/26/2010 - 19:02
नवीन
विषय तुम्ही काढलात...तुम्ही एखादा तरी पुरावा द्या कि मृतुपक्षात लोक अजून कुठल्यातरी योनीत फिरतात वगैरे...
स्वप्न म्हणजे आपण विचार करतो , पाहतो, ऐकतो वगैरे याची फलित असते..
आता तुम्ही म्हणता हि १५ दिवस (आहेत याची खात्री नसली तरी) पितरांना द्या....उद्या अजून काही कोणीतरी आहेच म्हणेल त्यांना पण द्या...याला काय अर्थ आहे..आणि ज्याचे अस्तिव आहे कि नाही याचा काहीच पुरावा नाही त्यासाठी एवढी यातायात? त्यापेक्षा जिवंत असतानाच चांगले वागा कि...
- Log in or register to post comments
श
शुचि
Sun, 09/26/2010 - 19:11
नवीन
>> तुम्ही एखादा तरी पुरावा द्या कि मृतुपक्षात लोक अजून कुठल्यातरी योनीत फिरतात वगैरे >>
माझ्याकडे पुरावा नाही.
सूर्याचा गायत्री मंत्र सगळे म्हणतात त्यातही भु:, भुवः, स्वः या तीन लोकांचा उल्लेख आहे. कोणी पाहीलेयत हे तीनही लोक? पण आपण म्हणतोच ना गयत्री मंत्र?
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Sun, 09/26/2010 - 20:02
नवीन
मग जे लोक भूत / पिशाच्च वगैरे मानतात अन त्यांच्यावर "जालीम " उपाय करतात त्यांना का अंधश्रद्ध म्हणून नावे ठेवायची?
- Log in or register to post comments
श
शुचि
Sun, 09/26/2010 - 20:21
नवीन
प्रत्येकाची सीमारेखा अस्ते, मर्यादित अनुभवकक्षा असतात हे खरं. त्यानुसार तो श्रद्धेच्या मर्यादा ठरवतो.
- Log in or register to post comments
च
चित्रा
Sun, 09/26/2010 - 18:58
नवीन
जीवात्मा आपण पाहिलेला नसतो, पाहिलेले लोकही माहिती नसतात.
अशावेळी या विषयावर आपला वेळ दवडण्यापेक्षा चांगल्या ठिकाणी मन लावले तर त्या वेळाचा आपल्याला आणि दुसर्यांनाही फायदा होऊ शकतो.
अश्रद्ध लोकांनी नक्की काय वाचलेलं असतं की त्यांचं एकच परिमाण असतं की जे जे काही आकलन होत नाही ते ते खुळचट म्हणोनी बाजूस सारावे? पूर्वापार चालत आलेल्या रुढींना खुळचट म्हटलं की आपण पुरोगामी ठरतो का?
अश्रद्ध लोक कधी वाचून बोलतात, कधी न वाचता लोकांवर विश्वास ठेवून बोलतात. माणसे म्हटली, की विविध प्रकारची असतात. सर्वांना सरळसोट एकच समजणे गरजेचे नाही.
मुळात पुरोगामी म्हणजे पुढे जाणारा. पुरोगामी असणे चांगले असते. या आधारे, एखादी कृती समाजाला सध्याच्या काळाला योग्य आणि जरूरीचे असे मार्गदर्शन करत असली, पुढे घेऊन जात असली तर पुरोगामी आहे, असे म्हणायला हरकत नाही. पुरोगामी असण्याला विरोध नसतो. तुमचा विरोध पुरोगामी असण्यास नाही, पण पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी धडपडणार्यांना आहे असे दिसते आहे. पण तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. शेवटी पुरोगामित्व हे कृतीने ठरणार आहे. आज इंटरनेटच्या जमान्यात काँप्युटर वापरायला शिकायचाच नाही, असा हट्ट धरून बसणार्याचे आजच्या जगात काय होईल? आणि एखाद्याने असा हट्ट धरला, म्हणून त्याचे सर्वच म्हणणे टाकाऊ, खुळचट आहे असे समजणे विवेकीपणाचे नाही. प्रत्येक व्यक्तीच्या विचारांचा स्वत:साठी स्विकार किंवा अस्विकार करण्यासाठी अशा प्रत्येक विचाराचा वेगळा असा आढावा घेऊन स्विकार/अस्विकार करावा, हे धोरण योग्य ठरेल असे वाटते.
माझ्या मते पितृपंधरवड्यात आपल्याला हवी ती व्रते करणे, जेवण घालणे हे वाईट नाही. पूर्वजांची आठवण करणे हेही वाईट नाही. किंबहुना ती नेहमीच असावी. पण त्याचा संबंध जीवात्म्याशी लावणे हे गरजेचे नाही. कारणपरंपरा मागे नेणे अशा ठिकाणी थांबवावे, जिथपासून पुढे विश्वासार्ह डेटा मिळणे बंद होते. उदा. अलिकडे मी एकाजणांना म्हटले त्याप्रमाणे - मंगल पांडे यांनी १८५७ च्या बंडात/युद्धात चुकीच्या दिवशी पहिला वार केल्याने ब्रिटिशांना काहीतरी कारस्थान चालले आहे याची जाणीव झाली, आणि त्यांनी हे बंड मोडून काढले असे सांगितले जाते. याचा अर्थ मंगल पांडेचे डोके त्याच दिवशी का फिरले? त्या दिवशी त्याच्यावर काही ग्रहतार्यांचा परिणाम झाला होता का? बंडात सामील करून घेण्याआधी त्याची पत्रिका पहायला हवी होती का, अशा प्रश्नांची न मिळणारी उत्तरे शोधण्यापेक्षा मंगल पांडेला भडकवण्यासारखे काय झाले, ते व्हायला नको म्हणून काय करायला/सांगायला हवे होते जे केले/सांगितले गेले नाही, किंवा जे सांगण्याचा बंडाच्या नेतृत्वाकडून विचार झाला नाही, ते पाहिले पाहिजे. हे अवांतर वाटेल, पण तसे नाही. मूळ मुद्दा एवढाच आहे, की पितृपंधरवड्यासाठीची कारणपरंपरा मागे नेताना जीवात्मा येतो म्हणून आम्ही पितृपंधरवडा करतो असे म्हणण्यापेक्षा हा पंधरवडा आम्ही आमच्या पूर्वजांच्या आठवणीसाठी, त्यांच्या नावाने काही चांगले करण्यासाठी ठेवला आहे, असे म्हणणे हे सयुक्तिक ठरेल, आणि पुरोगामीही ठरेल.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Sun, 09/26/2010 - 19:01
नवीन
सहमत आहे.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 09/26/2010 - 20:18
नवीन
सहमत आहे.
माझ्या वडिलाना जाऊन ३० वर्षे झाली. आम्ही कधीही त्यांचं श्राद्ध केलं नाही, पण त्यांची आठवण म्हणून गरजू मुलांना मदत करणे माझ्या आईने चालू ठेवलं आहे. त्यांची आठवण जागी ठेवणं हेच एक प्रकारे श्राद्ध आहे.
त्याचवेळी, माझ्या सासूबाई तेव्हाच गेलेल्या त्यांच्या सासूबाईंचं श्राद्ध अजून करतात, तर त्यालाही आम्ही विरोध करत नाही, फक्त रजा बिजा घेऊन येणं शक्य नाही हेही त्याना सांगितलंय.
शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शिवाय मला असं वाटतं की "अंनिस" चा सुद्धा विरोध अंधश्रद्धेला आहे, कोणी सश्रद्ध असण्याला नाही.
ज्या लोकमान्यांबद्दल तुम्ही लिहिलंय ना त्यांचं स्वतःचं वागणं असल्या गोष्टीत एकदम practical होतं. समाजातले बहुमत बालवयातल्या विवाहाना अनुकूल होतं त्यांचा त्यानी विरोध केला नाही. त्याचवेळी स्वतःच्या मुलींची लग्नं लहान वयात केली नाहीत. समाजाबरोबर राहून, न बोलता आणि बहुमताला विरोध न दर्शवता, स्वतःच्या वागण्यातून समाजाला धडे कसे द्यावेत, हे शिकावं लोकमान्यांकडूनच. म्हणूनच, समाजाला आपल्याबरोबर नेण्यात ते आगरकरांपेक्षा यशस्वी ठरले.
- Log in or register to post comments
श
शुचि
Sun, 09/26/2010 - 19:06
नवीन
>> हा पंधरवडा आम्ही आमच्या पूर्वजांच्या आठवणीसाठी, त्यांच्या नावाने काही चांगले करण्यासाठी ठेवला आहे, असे म्हणणे हे सयुक्तिक ठरेल, आणि पुरोगामीही ठरेल. >>
मान्य!!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 09/27/2010 - 17:04
नवीन
क्या बात है. नंबर एक प्रतिसाद.....!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Sun, 09/26/2010 - 19:02
नवीन
प्रेतयोनी , जीवात्मा वगैरे गोष्टी वाचून रंजन झाले. यापुढचा लेख काय गंडे दोरे ताईत भूतप्रेतादि गोष्टी यांवर येणार काय ? मग जारणमारण इत्त्यादि गोष्टी फार मागे नाहीतच.
या सर्व गोष्टींबद्दल लेख लिहिणे ही एक बाब झाली. परंतु या सर्व गोष्टींची भलावण करणे म्हणजे फारच झाले.
अश्रद्ध लोकांनी नक्की काय वाचलेलं असतं की त्यांचं एकच परिमाण असतं की जे जे काही आकलन होत नाही ते ते खुळचट म्हणोनी बाजूस सारावे?
या वाक्यातले कर्ता कर्म क्रियापद या सर्व गोष्टी , जत्रेत मुले माणसे हरवतात तशी हरवलेली दिसतात :-) (कर्टसी - पु ल देशपांडे)
- Log in or register to post comments
N
Nile
Mon, 09/27/2010 - 18:09
नवीन
सहमत आहे.
अश्या गोष्टींबद्दल लिहायला सगळ्यांना स्वातंत्र्यच काय मुभा दिल्यासारखे वातावरण आहे त्याउलट एखादा प्रतिसाद त्याविरोधात लिहला की सामंजस्य दाखवा म्हणुन सुचना येतात हा विरोधाभास नमुद करावासा वाटतो.
- Log in or register to post comments
क
काव्यवेडी
Sun, 09/26/2010 - 19:08
नवीन
विषय नक्कीच गहन आहे. पण जिवन्त असताना माणसाशी नीट वागायचे नाही.
आणि मेल्यावर श्राध्द घालून मोकळे व्हायचे हे अजिबात योग्य नाही.
त्यापेक्शा माणसान्शी माणुसकीने वागून समाधान मिळ्वावे.असे
मला वाटते.
- Log in or register to post comments
अ
अडगळ
Sun, 09/26/2010 - 19:20
नवीन
घुबडाचे डोळे जाळून त्याचे अंजन डोळ्यात घातले असता गुप्तधन दिसते.
कृपया आसपास घुबड दिसल्यास व्यनिने कळवावे.
डायरेक्ट डोळे काढून पाठवल्यास तर उत्तमच.
( स्वतःचे डोळे काढून जाळा वगैरे पीजे मारू नयेत.)
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Sun, 09/26/2010 - 20:02
नवीन
पितरांचे श्राध्द घालणारे सगळे त्यांच्याशी जिवंतपणी वाइट वागून आता मात्र प्रेम दाखवतायत,
हा गैरसमज कुठून आला.
ज्याना श्रध्देनी, त्या निमित्तानी दान करायचे असेल, त्याना खुशाल करु द्यावे.
पित्रुऋण मानण्यात चुकीचे काय आहे???
ज्याची त्याची पध्दत वेगळी असू शकते,
एखादा वडलांच्या , आजोबांच्या, नावानी एखाद्या संस्थेला काहीतरी देतो, एखादा, ( कदाचित सेफ साईड म्हणून) पित्रुपक्षात जेवणावळी घालतो.
पूर्वी ब्राम्हण गरीब होते, त्यामूळे त्याना जेवायला घालायचे... शिवाय पित्रुपक्षात फक्त ब्राम्हणाना जेउ घालायची पध्दत नाही. नातेवाइक, मित्रमंडळी व अंत्यज म्हणजे ( तळागाळातले लोक), यानाही जेवायला बोलवण्याची व दान देण्याची पध्दत आहे??
आपल्याला 'मोठ्या' लोकांची स्मारके चालतात, मग घरच्याच बिचार्या आजोबा पणजोबांची १ दिवसाची जेवणावळ अंगावर का येते?
( कुंपणावरुन आत उडी टाकलेली) माउ
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Sun, 09/26/2010 - 20:20
नवीन
जेवणावळच घालायची तर रोज घाला पण पितर बितर म्हणून घालतोय असे सांगायची काय गरज? हवं तर तुम्हीपण परसात एखादं स्मारक बांधा नाही कोण म्हणतंय?
आपल्या पूर्वजांचे ऋण ठेवायचे तर ठेवा अथवा नका ठेवू पण उगाचच अंधश्रद्धा कशाला पसरवायची? काय तर म्हणे पूर्वजांना जेवायला घालायचे !!! आनंद आहे.
- Log in or register to post comments
व
वेताळ
Mon, 09/27/2010 - 08:01
नवीन
तेव्हढीच कावळ्याची व इतर पक्षाची चांगली सोय होते.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Mon, 09/27/2010 - 08:17
नवीन
इथे लोकांचे रुढी परंपरांचे फंडे फारच कच्चे आहेत! :-S
त्यामुळे काहीच पटेनासे होते......
नक्की 'कोण' जेवते, कावळा काय दर्शवतो, हे एकदा नीट महिती करुन घ्या!
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाची 'सेन्सिटिविटी लेवल' वेगळी असते.
कुठल्यातरी महत्वाच्या श्राध्द्तिथीच्या सुमाराला/ पित्रुपक्षात साप-नागाची स्वप्न पडल्याचे मी अनेक लोकांकडून ऐकले आहे.
जर प्रत्येक वेळेस शुचीताइना हे स्वप्न पदत असेल, तर ती अंधश्रध्दा कशी?
आणी हा अनुभव शेअर करणे म्हणजे अंधश्रध्दा पसरवणे नाही.
आणी त्यानी शेअर केला नाही तरी लोकाना स्वप्न पडायची थांबणार नाहीत! ;)
माझा एक मित्र असाच प्रश्नकंटक नास्तिक होता.
त्यालादेखील अशीच स्वप्न पडली मध्ये.....
घरे सांगितल्यावर कळले, की त्याच दिवशी त्यच्या आजीची श्राध्द्तिथी येत होती.
घरी अनेक वर्षे कुणचही श्राध्द वगरै कही केले जात नव्हते.
याच्या नास्तिकपणाला घरातले एवढे टरकून असायचे, की त्याच्यासमोर, देवपूजेबद्दल सुध्दा कुणी बोलायचे नाहीत. त्यामूळे त्यानी घरात काही श्राध्दाबद्दल ऐकले असेही नाही.
त्यानी प्रत्यक्ष साप-नाग अनेक वर्षात पहिला नाही.
तो ढकल्पत्र वाचतच नाही. डिलिट मारतो, त्यामूळे असे उगीच कुठे चित्र पहायचा संबंध नाही.
शिवाय त्याला कुठल्याही प्राण्याची, सापानागासकट, भिती वगरै बिल्कुल नाही.
..पण हा योगायोग दिसला! :-O
ह फक्त एक किस्सा...
असे अनेक ऐकले आहेत.
....मला स्वतःला असा अनुभव नसला तरी इतरांच्या अनुभवावर, विश्वास ठेउन त्याचा आदर राखण्याइतका समजूतदारपणा नक्कीच आहे.मी लोकांची खिल्ली उडवत नाही, त्यामूळी मला अनेकजण सांगतात.
- Log in or register to post comments
श
शुचि
Mon, 09/27/2010 - 16:16
नवीन
माऊ धन्यवाद ग!!! मी खूप सेन्सिटीव्ह आहे या (स्वप्नांच्या) बाबतीत. तुला व्य नि करून एक गोष्ट सांगते.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Mon, 09/27/2010 - 17:49
नवीन
आम्ही पण असल्या बाबतीत फार सेन्सिटिव्ह आहोत...उगाच बुरसटलेले अन रुढींच्या नावाखाली असलेले विचार आम्हाला आवडत नाहीत..
आणि एवढेच आहे तर मंत्र तंत्र, जारण मारण, बळी देणे हे प्रकार जे लोक करतात त्यांचे पण काही फंडे असतात...काहीतरी प्रतीके असतात...त्यांना तुम्ही अंधश्रद्ध का म्हणता ? का त्यांना प्रश्नकंटक होऊन असे कशाला करायचे विचारता?
आणि तुम्हीच तर म्हणालात न कि पूर्वज जेवतात .... आमच्याकडचे पूर्वज मेलेले आहेत म्हणून मी आपले विचारले? मेलेल्यांना जेवायला घालायचे नाही हा आमचा फंडा आहे...तुमच्याकडचे पूर्वज असतील अजून जिवंत तर घाला खायला ...आमच्याकडे आणा आम्ही पण आदरातिथ्य करूच.
- Log in or register to post comments
N
Nile
Mon, 09/27/2010 - 18:12
नवीन
होना, फक्त अंधश्रद्धच लोक कसे बुवा अश्या बाबतीत सेंन्सिटीव्ह असतात काही कळत नाही, अन विरोध केला की लगेच यांचे गळे काढणे सुरु.
- Log in or register to post comments
श
शेखर
Mon, 09/27/2010 - 19:42
नवीन
>> आम्ही पण असल्या बाबतीत फार सेन्सिटिव्ह आहोत...
मुखपृष्टावर लावलेल्या कावळ्याबद्दल आपले काय मत आहे? तो काढुन टाकावा अशी सुचना करायची असा विचार तुमच्या मनात आला का?
- Log in or register to post comments
म
मितान
Sun, 09/26/2010 - 20:10
नवीन
जगातल्या प्रत्येक गोष्टीवर आपला विश्वास किंवा अविश्वास असलाच पाहिजे का ?
ज्या गोष्टीतले मला काहीच कळत नाहीत त्यावर मी विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे याला काही अर्थ नसतो. म्हणजेच ती गोष्ट चांगली किंवा वाईट म्हणण्यालाही अर्थ नाही.
पण इतर कुणी त्यावर विश्वास ठेवत असेल तर त्यांच्या श्रद्धेला धक्का देण्याचे काही कारण नाही.
तुमची या गोष्टींवर श्रद्धा असेल तर ती इतरांनी काही म्हटल्यामुळे दुखावली जाण्याइतकी तकलादू नक्कीच नसावी.
पूर्वजांचे स्मरण करावे, त्यासाठी काहीतरी चांगले कार्य करावे आणि कृतज्ञता व्यक्त करावी ही चांगली परंपरा आहे. चांगले कार्य याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते.
- Log in or register to post comments
श
शुचि
Sun, 09/26/2010 - 20:19
नवीन
>> पूर्वजांचे स्मरण करावे, त्यासाठी काहीतरी चांगले कार्य करावे आणि कृतज्ञता व्यक्त करावी ही चांगली परंपरा आहे. चांगले कार्य याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. >>
मान्य
>> तुमची या गोष्टींवर श्रद्धा असेल तर ती इतरांनी काही म्हटल्यामुळे दुखावली जाण्याइतकी तकलादू नक्कीच नसावी. >>
दुखावली नाही ग जस्ट क्युरीऑसिटी की कोणी माझ्याइतकं श्रद्धाळू आहे का? मी खूप पॅशनेट आहे श्रद्धेच्या बाबतीत.... अनुभव आहेत तसे.
- Log in or register to post comments
आ
आंसमा शख्स
Mon, 09/27/2010 - 04:16
नवीन
पटले.
- Log in or register to post comments
आ
आंसमा शख्स
Mon, 09/27/2010 - 04:16
नवीन
पटले.
- Log in or register to post comments
अ
अडगळ
Sun, 09/26/2010 - 20:11
नवीन
>>पूर्वी ब्राम्हण गरीब होते, त्यामूळे त्याना जेवायला घालायचे>>
( उडी मारून पळालेला अंत्य़ज) अडगळ
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Sun, 09/26/2010 - 20:16
नवीन
फार पूर्वी ब्राम्हण केवळ भिक्षुकी करायचे...
त्याच दक्षिणेवर घर चालायचे......
तुम्ही गोष्टी वाचल्या नाहीत वाटते,... एका गावात एक गरीब ब्राम्हण रहात होता........ वगरै
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Sun, 09/26/2010 - 20:27
नवीन
त्या गावाचे नाव आटपाट नगर असायचे.
हे आटपाट नगर काय आहे हे अजुनही मला कळले नाही.
आटपाट ह्याच अर्थ काय?
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 09/27/2010 - 13:51
नवीन
आटपाट ह्याच अर्थ काय?
ज्या नगरात पाण्याचे पाट आठही दिशानी वहात असतात्...अर्थात पाण्याची रेलचेल असते. तेथे जीवन समृद्ध असते असे गाव म्हणजे आटपाट नगर.
आटपाट नगर हे नगर ( शहर) असते गाव नसते. तेथे उद्योग धन्दे पैसा मुबलक असतो.
- Log in or register to post comments
अ
अडगळ
Sun, 09/26/2010 - 20:28
नवीन
(दणद्णीत पुरव्याला घाबरून कुंपण तोडून लांब पळालेला) अडगळ
- Log in or register to post comments
ग
गोरिला
Sun, 09/26/2010 - 20:40
नवीन
पण अजून हि ब्राह्मण लागतो ना सर्व कार्यांना
भिक्षुकाचे स्थान अजून कोणी नाही (पण काही अपवाद सोद्लेतर )घेवू शकत कारण ब्राह्मण हाच सर्व खरा धर्माचे पालन करणारा आहे .
- Log in or register to post comments
अ
अडगळ
Sun, 09/26/2010 - 20:44
नवीन
या धाग्यातील गुप्तधन सापडले.
(अक्कल चोरिला गेलेला ) अडगळ
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Sun, 09/26/2010 - 21:04
नवीन
अतिशय जातीय विधान...ते कोण संभाजीब्रिगेडच्या बाजूने लिहितात त्यांच्यासारखेच..
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 09/27/2010 - 14:03
नवीन
भिक्षुकाचे स्थान अजून कोणी नाही (पण काही अपवाद सोद्लेतर )घेवू शकत कारण ब्राह्मण हाच सर्व खरा धर्माचे पालन करणारा आहे .
साहेब आपले ३.१४ कुठे आहेत . एकदा दर्शन घ्यावे म्हणतो.
"जरी ब्राम्हण भ्रष्ट तिन्ही लोकी तो श्रेश्ठ"
या उक्तीवर फारच श्रद्धा दिसतेय .
अभ्यंकरानी चप्पलांचा कारखाना काढला , लागू बंधूनी सोनारकाम केले , चितळ्यानी गाईम्हशी पाळल्या , किर्लोस्करानी लोहारकाम केले ,
अंबेडकरानी भारताची घटना बनवली , भाऊराव पाटलानी शिक्षणसंस्था काढल्या , आण्णा भाउ साठ्यानी पुस्तके लिहीली ,
टाटानी हजारो लोकाना रोजगार दिला , ज्योतिबा फुल्यानी मुलींसाठी शिक्षणाची चलवळ राबवली
हे सारे जन्माने नव्हे पण कर्माने ज्ञानदान कार्य करीत होते
- Log in or register to post comments
ग
गोरिला
Sun, 09/26/2010 - 20:31
नवीन
सर्व मिपा कराना एक विनिन्ति आहे कि ह्या धाग्या काही प्रतिक्रिया देण्या पूर्वी जरा साम वेद आणि अथर्व वेद जरूर वाचावा जर तीव्धी कुवत असेल तर नीट अभ्यास करून प्रतिक्रिया द्यावी हि विनंती .
जे दिसते ते नसते
आणि जे आहे ते आपण मान्य नाही करत
काय करणार आपण सगळेच स्वताला शहाणे समजतो ना?
एक वेद अभ्यासक म्हणून सांगतो
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Sun, 09/26/2010 - 20:41
नवीन
आमची कुवत नाही...तुम्हीच समजवा ना.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 09/27/2010 - 14:33
नवीन
प्रतिक्रिया देण्या पूर्वी जरा साम वेद आणि अथर्व वेद जरूर वाचावा जर तीव्धी कुवत असेल तर नीट अभ्यास करून प्रतिक्रिया द्यावी
नाय बॉ आम्ही अज्ञानी आहोत. पण सामवेद आणि अथर्ववेदाचे पुस्तक कुठे उपलब्ध आहे ते सांगाल का.
आळंदीत एका ठिकाणी वेदमहाराज असे वेदांच्या पुस्तकांचे मंदीर होते. लोक त्याला हळदकुम्कू वहात होते . नमस्कार करत होते.
कोणत्याही पुस्तकाचा अभ्यास असा करतात हे प्रथमच पाहिले.
असो.
विवेकानन्द म्हणतात की युरोप जेंव्हा औद्यगीक प्रगती करीत होता तेंव्हा भारतातील पुरोहीत आचमन करताना पळी डाव्या हातात की उजव्या हातात याची चर्चा करण्यात मग्न होते. जानवे उजव्या कानावर चांगले की डाव्या कानावर याचे चर्वण करत होते.
असो. पुराणकाळातील त्या काळातील गरजेनुसार ऋषीमुनीनी काही संशोधन केले ते कुठेतरी लिहून ठेवले.
आपण मात्र ममः आत्मनः म्हणत आचमने करीत बसलो त्यानी केलेल्या संशोधनाला पूर्णविराम दिला. खरा जिज्ञासू विद्याभ्यास बाजूलाच राहीला. फालतू सोवळ्याओवळ्याचे शुचितेचे नुसते स्तोम माजवत बसलो.
असो.
बर्याच लोकांकडून ऐकले आहे की वेदांत बरेच ज्ञान आहे.
तुम्ही एवढा वेदाभ्यास केलेलाच आहे . मला काही सोप्या शंका आहेत त्या सोडवाल का? सोप्या मराठीत सांगा.
१)खगोलशास्त्रात सांगितलेला उर्टचा ढग पत्रीकेत कोणत्या स्थानात असतो. पत्रीकेचे थोडावेळ बाजूला ठेवा उर्टचा ढग आकाशात ( सूर्यमालेत)कोणत्या ग्रहानन्तर येतो.
२) वेदातील ज्ञानात गेल्या चारशे वर्षात कोणती नवी भर पडली आहे?
३) एका वैज्ञानीक प्रयोगानन्तर ओपेनहायमर ला भग्वतगीता आठवली होती . त्याचे वर्णन कोणत्या वेदात आहे?
४) तुम्ही सांगितलेल्या वेदांत नक्की कोणत्या प्रकारची महिती दिलेली आहे?
५) वेदांतील ज्ञान कधीच कालबाह्य कसे नाही ?
जे दिसते ते नसते
असू शकते.
आणि जे आहे ते आपण मान्य नाही करत
नक्की काय आहे तेच कोणी सांगत नाही. तुम्ही सांगा ना.
काय करणार आपण सगळेच स्वताला शहाणे समजतो ना?
नाही हो. खरेच अज्ञानी आहे. पण आमचे अज्ञान दूर करायचे बाजूलाच उलट आम्हाला तुम्हाला काय यातले कळणार असे म्हणून बाजूला केले जाते आणि आम्ही अज्ञानीच रहातो
एक वेद अभ्यासक म्हणून सांगतो
खर्या अभ्यासकाबद्दल नेहमीच आदर आहे. आम्हाला थोडे समजावून सांगा. आमची कुवत कमी असेल. पण म्हणून आम्हाला न हिणवता ;थोडेतरी सांगा.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Sun, 09/26/2010 - 20:42
नवीन
अय्या,
मला माहितीच नव्हते, इथे कोर्ट भरलंय पुरावे घ्यायला!
मी काही आट्पाट नगरातल्या गोष्टी गंभीरपणे घ्यायला ७-८ वर्षाची मुलगी नाही.
पण गोष्टी सांगताना/लिहिताना एकंदर परिस्थिती भवतालच्याच समाजाचे चित्रण करणारी असते.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Sun, 09/26/2010 - 20:54
नवीन
कोर्ट कशाला लागतंय..तुम्ही जर एखादी दिसत नसलेली अस्तित्व न जाणवणारी वस्तू आहेत असे म्हणताहात तर ते कशावरून हाच याचा अर्थ...पण अय्या तुम्हाला नाही समजलं? कमाल आहे!!
- Log in or register to post comments
श
शुचि
Sun, 09/26/2010 - 21:34
नवीन
ज्या सर्वांनी या चर्चेत सहभाग घेतला त्यांची मी आभारी आहे.
गोरीला यांचे विशेष आभार कारण मला माहीत नसलेली माहीती कळली की साम आणि अथर्व वेदात उल्लेख आहे. मी जालावर शोध घेतला सापडलं नाही. भारतात कधी काळी जायला मिळेल वेदांचा अभ्यास होईल अशी आशा करते.
ज्यांना कोणाला श्राद्ध संकल्पाबद्दल माहीती हवी असेल त्यांनी पुढील साईट पहावी -
http://home.comcast.net/~p.kulkarni/SSfiles/ssindex.htm
ही माझ्या अतिशय आवडीच्या साईटींपैकी एक साईट.
- Log in or register to post comments
र
राघव
Mon, 09/27/2010 - 00:19
नवीन
पहिल्या धाग्यावर जो प्रतिसाद दिलाय तोच येथे परत देण्याचा मोह आवरला नाही -
सगळे शेवटी मानण्या - न मानण्यावर आहे.
मृत्यूनंतर काय होत असेल ह्यावर चर्चा करण्यार प्वॉईंटच काय ते मला कळत नाही. कारण त्यासाठी तो अनुभव घेऊन सांगणारा हवा. अन् त्यावर इतरांनी विश्वास ठेवायला हवा. त्यात पुन्हा विश्वास ठेवणारे (अंध)श्रद्धाळू अन् विश्वास न ठेवणारे विज्ञानवादी!
जे काय असेल ते.. माझे कुणी पूर्वज खरेच माझ्यासमोर येऊन उभे राहिलेत तर मी त्यांना नक्की नमस्कार करेन अन् मनापासून जेवायला वाढेन. ते नाही आलेत तरी गाईला जेऊ घातल्यानं त्यांना समाधान लाभलं असतंच या भावनेनं गाईलाही जेऊ घालेन. दररोज शक्य होत नाही म्हणून. नाहीतर तेही केलं असतं. शेवटी ज्याचे त्याचे लॉजिक. बाकी चालू देत.
- Log in or register to post comments
य
योगप्रभू
Mon, 09/27/2010 - 05:49
नवीन
मला लई जड विचार झ्येपत न्हाईत आजकाल. म्हनून म्या आपली येक वाचलेली गोष्ट सांगतु...
गुरु नानक एकदा काशीला गेले असताना तेथे घाटावर अनेक लोक पंड्यांकडून श्राद्ध, तर्पण करुन घेताना दिसले. असाच एक पोटार्थी पंड्या नानकांच्या मागे लागला. नानकांनी क्षणभर थांबून विचारले, 'तुम्ही दर्भाने पाणी सर्व दिशांना शिंपडता ते कशासाठी?' त्यावर पंड्या म्हणाला, 'त्यामुळे पितृलोकातील आपले पितर संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात.' मग नानकांनी विचारले, 'हा पितृलोक किती दूर आहे?' त्यावर पंड्या म्हणाला, ' आपल्या पृथ्वीच्या वर आकाशात सप्तलोक आहेत. त्यात तो आहे.' नानक काही बोलले नाहीत. ते पाण्यात उतरले आणि ओंजळीने पाणी सगळीकडे फेकू लागले. त्यावर पंड्या म्हणाला, 'अरे हे काय करतो आहेस?' त्यावर नानक म्हणाले, 'तिकडे पंजाबात माझे शेत आहे. यंदा पाऊस पडला नसल्याने ते वाळून गेले आहे. मी येथून माझ्या शेताला पाणी देतो आहे.' त्यावर पंड्या उपहासाने म्हणाला, 'अरे वेड्या माणसा! इथून ओंजळभर पाणी फेकण्याने का तुझे शेत भिजणार आहे?' त्यावर नानक म्हणाले, ' का नाही बरे? जर तुमच्या चार थेंब प्रोक्षणाने पृथ्वीच्या वर असलेल्या लोकातील पितरांना पाणी मिळत असेल तर माझे शेतही नक्कीच भिजेल.'
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Mon, 09/27/2010 - 11:05
नवीन
य गोष्टीमूळे 'पितर' नातातच हे 'प्रूव्ह' होत नाही.
यंत्रवत कर्मकांड केल्यामूळे त्याना काही मुक्ती वगरै मिळणार नाही, एवढेच 'प्रूव्ह' होते.
शिवाय गुरु ग्रंथसाहेब या ग्रंथात 'पुनर्जन्माबद्दल' लिहिले आहे असे हल्लीच मला एका अभ्यासू शिख मित्राकडून कळले.
हवे असल्यास मी विचारुन गुरुबानी मधल्या त्या ओव्या १-२ दिवसात इथे देउ शकते.
- Log in or register to post comments
श
शुचि
Mon, 09/27/2010 - 18:46
नवीन
माऊ शीख लोकांचं सापडलं ग-
आवत हुकमि बिनास हुकमि आगिआ भिंन न कोइ ॥
आवन जाना तिह मिटै नानक जिह मनि सोइ ॥१॥
त्याच्या हुकमानुसार आपण येतो , त्याच्या हुकमानुसार आपण जातो, त्याच्या हुकमाबाहेर कोणी नाही. हे येण-जाणं (जन्म-मरणाचा फेरा) टळतं जेव्हा तुमचं हॄदय, मन पूर्ण त्याच्या स्वाधीन होतं.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 09/27/2010 - 06:21
नवीन
श्राध पक्षात पितराना त्यांच्या नरकातल्या कामातून कॅज्यूअल लीव्ह देतात.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Mon, 09/27/2010 - 12:52
नवीन
आयला इतकी खात्री आहे तुम्हाला तुमच्या पितरांबद्दल? आम्हाला तर आमची पित्रे स्वर्गात आहेत हे माहीत आहे. ;)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 09/27/2010 - 14:35
नवीन
आम्हाला तर आमची पित्रे स्वर्गात आहेत हे माहीत आहे
ती जिथे असतात त्यालाच स्वर्ग म्हंटले की झाले ..
हाय काय अन नाय काय
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Mon, 09/27/2010 - 14:39
नवीन
हलके घ्या.
>>आमची पित्रे स्वर्गात आहेत
तिथले काही फोटू बिटू पाठवायला सांगा ना. तिथे इंटरनेट असतो का ?
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »