यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग तीन
Book traversal links for यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग तीन
💬 प्रतिसाद
(35)
व
विलासराव
Tue, 10/05/2010 - 17:03
नवीन
पुढील भाग वाचण्यास उत्सुक.
- Log in or register to post comments
अ
अडगळ
Tue, 10/05/2010 - 17:36
नवीन
पण एकूणच तत्वविचाराची नवी मांडणी वगैरे या माणसाने कशी केली हे काही समजले नाही.(कदाचित ते पुढे येईल)
जर वैयक्तिक अनुभव हाच या नव्या विचारांचा पाया असेल तर मात्र अडचण आहे.
परत जे शारीरिक बदल नोंदवले आहेत , ते जसे चमत्कार तसेच विकार/भ्रम पण असू शकतात असे शंकेखोर मनाला वाटते.
बाकी लेखन , मांडणी छान.
वाचत आहे.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
गुरुवार, 10/07/2010 - 05:55
नवीन
+ सहमत....
~ नेमक्या याच शब्दात [यु.जी.के. समजून घेताना] मला जाणिवलेली अडचण मांडण्याच्या बेतात असतानाच श्री.अडगळ यांचा हा प्रतिसाद नजरेसमोर आला आणि समाधान वाटले की असे वाटणारा मी एकटाच नाही.
श्री.यशवंतराव यांच्या लेखनशैलीवर सरस्वती प्रसन्न आहे असे तिन्ही लेखावरून दिसून येतेच, त्यामुळे आमच्यासारख्यांच्या मनात भिरभिरणार्या शंकेच्या पाकोळ्या ते आपल्या लेखणीने दूर करतील...येणार्या पुढील भागातून....असा विश्वास आहेच.
इन्द्रा
(जाताजाता > अजूनही दोन्ही कृष्णमूर्तींच्या शिकवणीमध्ये ठळक असे फरक जाणवत नाही; जे ओशोमध्ये आढळतात....अर्थात माझे हे किरकोळ असे निरिक्षण आहे...अभ्यास नव्हे)
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
गुरुवार, 10/07/2010 - 06:26
नवीन
दोन्ही कृष्णमूर्तींच्या शिकवणीमध्ये>>>>
कृष्णजींबद्दल (जे.के) बोलताना 'शिकवण' हा शब्द योग्य वाटत नाही,
त्यानी कुणालाही काहीही 'शिकवले' नाही, त्यांनी फक्त निरिक्षणे माडली,
त्या अनुषंगानी समोर 'प्रश्न' घेउन बसलेल्या लोकांना, अजून खोल खोल जण्यास उद्युक्त करणारे प्रश्न विचारले,
त्यांनी कधीही ' मी शिकवतो' असे विधान केले नाही.
ओशोनी देखिल माझ्या माहितीप्रमाणे फक्त 'मेडिटशन शिकवले',
त्यांच्या प्रवचनातून केवळ विचार व निरिक्षणे मांडली.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
गुरुवार, 10/07/2010 - 07:27
नवीन
"...कृष्णजींबद्दल (जे.के) बोलताना 'शिकवण' हा शब्द योग्य वाटत नाही,>
~~ वेल, आय अॅक्सेप्ट ! मी प्रतिसादात कबुली दिलेलीच होती की, या विषयात माझे फक्त वाचन वा निरिक्षण आहे, अभ्यास नाही. श्री.महेश भट्ट हे युजींचे कट्टर भक्त. त्यांच्या पुस्तकात कुठेतरी युजींबद्दल लिहिताना 'टीचिंग' शब्दाचे प्रयोजन आल्याचे स्मरत होते.....ते 'शिकवण' या अर्थाने मी घेतले...इतकेच.
श्री.यशवंत कुलकर्णी अधिक प्रकाश पाडतील यावर.
इन्द्रा
- Log in or register to post comments
ग
गणपा
Tue, 10/05/2010 - 17:38
नवीन
हे ही वाचतोय. :)
- Log in or register to post comments
भ
भाऊ पाटील
Wed, 10/06/2010 - 11:40
नवीन
यु जीं बद्दल काहीच माहीत नव्हते. फक्त नाव तेवढे ऐकून होतो.
येउ द्यात पटापट.
साक्षात्काराची अनुभूती इतरांपेक्षा* खूप वेगळी मांडली आहे.
पुढील भाग वाचण्यास उत्सुक
बाकी लेखन , मांडणी खरोखरच छान आहे.
* इतरांपेक्षा वेगळी आहे हे माझे व्यक्तिगत मत आहे.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
गुरुवार, 10/07/2010 - 05:42
नवीन
कुत्र्याचा आवाज त्यांच्या आतून येत असल्यासारखे जाणवले. सर्व आवाज माझ्या आतूनच येत आहेत, बाहेरून नाही असे जाणवले. अजूनही ते तसेच आहेत.>>>>>>>>>>>
अशाच प्रकारचे अनुभव कृष्णजी ( जे.कृष्णमूर्ती) या>नी लिहिले आहेत.
"... ...... ते हलणारे गवताचे पाते मीच आहे, ..आगगाडीची चाकेसुद्धा मीच आहे........" अशा प्रकारची खरोखरच 'विस्तृत' म्हणता येइल अशी जाणीव , त्यानी अतिशय सुंदर रितीनी लिहिली आहे.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 10/07/2010 - 13:32
नवीन
हम्म. मी जे.केंचे वाचलेले नाही पण . ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत असे लिहील्याचे स्मरते आहे. नक्की ओवी आठवली, सापडली तर देईन. त्या ओवीत मुंगीचे मनोगत असे काहीतरी आहे.
- Log in or register to post comments
य
यशवंतकुलकर्णी
गुरुवार, 10/07/2010 - 10:55
नवीन
अडगळ, इंद्रराजसाहेब आणि लीमाऊजेट,
कालच भाऊ पाटलांना मी खरड टाकलीय त्याप्रमाणे या लेखमालेतून युजींची फक्त आणि फक्त ओळख करून द्यायचेच मनात आहे; वाचकांच्या मनात येणार्या प्रामाणिक, लहानसहान शंका त्यांनी स्वत: दूर करुन घ्याव्यात असे वाटते कारण
"Tell them that there is nothing to understand."
If you listen to me year after year, you are only clarifying your thoughts. It's useless.
Anything I do to help you would be adding to your misery--that's all. You add one more misery to those you already have by listening to me.
All experiences, however extraordinary they may be, are in the area of sensuality.
The talk of intuition and insight is another illusion. Every insight you have is born out of your thinking.
Whatever we experience is thought-induced. What you don't know you can't experience. To experience a thing you have to know.
Society is built on a foundation of conflict, and you are society. Therefore you must always be in conflict with society.
If, when this body is buried, the memories people have of me are also buried along with it , that will be the end of me.
I don't give a hoot for a sixth-century B.C. Buddha, let alone all the other claimants we have in our midst. They are a bunch of exploiters, thriving on the gullibility of the people
ही युजींची विधाने आहेत. मी सुंदर पध्दतीने युजींबद्दल लिहीत आहे असे वाटू शकते - पण वर युजी म्हणतात त्याप्रमाणे ते "यूसलेस" आहे याची मला जाण आहे; मग सगळंच यूसलेस असेल तर काहीही करण्यात अर्थ नाही आणि काहीही न करण्यातही काही अर्थ नाही - तरीही सतत आपण काहीतरी करीत असतो; करावंच लागतं - असल्या विचित्र मनोवस्थेतून मी हे लिहीत आहे. त्यामुळे आता यूसलेसपणे तुमच्या शंकाबद्दलही मला काय वाटते ते सांगतो.
अडगळ,
होय. युजींचा वैयक्तिक "शारीरिक" अनुभव हाच पाया आहे; पण युजींनी स्वत: होऊन कुठलेही विचार मांडलेले नाहीत - इव्हन आजूबाजूला लोक गोळा होतात म्हणून ते तीन महिन्यांपेक्षा जास्त कुठेही थांबत राहात नसत - फक्त लोकांना टाळण्यासाठी; खरंच विचार हा पाया असता तर त्यांच्याभोवती एखादी तरी "संस्था" उभी राहिली असती. आजपर्यंत ती राहिलेली नाही. युजींबद्दल जे काही वाचायला मिळतं ते प्रश्न विचारणार्यांच्या प्रश्नाच्या चिंध्या करून झाल्यानंतर, "गेट अप, अॅण्ड गो," "आय हॅव नॉट इन्व्हायटेड यू हेअर", "गेट लॉस्ट अॅण्ड स्टे लॉस्ट" अशी त्यांची वाक्ये पचवून ऐकावं लागतं.
ओके. इटस हेल्दी.
लीमाऊजेट,
.
हीच तर अडचण आहे ना - पार भगवान बुध्दांपासून युजींपर्यंत सगळे लोक "मी काहीही शिकवत नाही" असं एकीकडे म्हणतात आणि दुसर्या बाजूला पसारा मात्र तयार होत राहातो. युजींच्या क्लिप्समध्ये उत्तर देतानाची त्यांची चीड, राग, शिव्या पाहाता युजींकडे शिकवायला काही नव्हतं, पण काहीतरी सांगितल्याशिवाय पर्याय नाही म्हणून, फक्त एक "रिस्पॉन्स" म्हणून ते सांगितलं जात होतं असं दिसतं.
ओशो आणि जेके या दोघांच्याही "त्या" अनुभवोत्तोर आयुष्यात त्यांनी लोकांना, मेडीटेशनचा का होईना पण मार्ग ऑफर केलेला आहे; यापैकी ओशोंनी तर "ध्यान आणि संबंधित प्रॉडक्टस (११२ ध्यानपध्दतींसह आश्रमात चालणार्या "सेक्स ऑर्गीस" धरून ) " चा तर खुलेआम बाजारच सुरू केला होता.
पुढच्या भागानंतरच्या भागात अजून तपशीलात लिहीण्याचा प्रयत्न करतो.
जाणीवेबद्दल इंटरप्रिटेशन्स, तिचे ट्रान्सलेशन करणे (आयुष्यभर, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बसून, पुस्तकांतून तेच करीत राहाणे) वेगळे - आणि युजींसारखा भाजून टाकणारा "पूर्णत:" शारीरिक अनुभव येणे, शरीराच्या प्रत्येक भागावर त्याची लक्षणे दिसणे, मूळापासून शेंड्यापर्यंत पूर्ण लाईफ स्टाईलच बदलणे वेगळे आहे असे वाटत.
शेवटी मी पण कुठल्याच गोष्टीवर जोर देत नाहीय, कुठल्याच गोष्टीला चिकटून बसत नाहीय. पण हे सगळं असं आहे.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
गुरुवार, 10/07/2010 - 11:51
नवीन
पसारा करणे हा मानवी स्वभावच आहे!
तो कुणीच अनुभवी लोक ( युजीके, जेके, ओशो, वगरै....) मुद्दाम करत नाही.
जेके सुद्धा , 'माझी विधाने स्वतः तपासून पहा, आंधळेपणाने विश्वास ठेउ नका' असेच सांगायचे,
पण लोकाना स्वतः विचार करायचा नसतो, त्यासाठी अंतर्मुख व्हायची बिल्कुल हिम्मत नसते,
फक्त, कुणाच्यातरी मागे लागून, फुकट मोकळीक हवी असते.
( मोक्ष वगरे नाही, फक्त स्वतःच निर्माण केलेल्या चित्रविचित्र प्रश्नांपासून मोकळीक.
युजीके त्यामूळेच चिडत असावेत!))
त्यातच सगळा घोटाळा होतो.....मूळ तत्वांवर काजळी चढते....
शिवाय स्वतः अनुभव घेण्यापेक्षा नुसत्याच शब्दबंबाळ चर्चा करण्यात लोक समाधान मानतात.
(आपल्यासारखे! )
..आणी मग सगळेच ज्ञान हरवते.
युजींसारखा भाजून टाकणारा "पूर्णत:" शारीरिक अनुभव येणे
..असे अनुभव अनेक जणाना आले आहेत.
त्याबद्दल वेग्वेगळ्या पद्धतीनी लिहिले गेले आहे.....
त्यामूळे प्रत्येकाचा अनुभव वेगळा भासतो.
( त्याची चर्चा इथे नको...... अंनिसवाले गळा धरतील!)
कृष्णजी (जेके) आणी डेविड बोह्म यांची एक अत्यंत किचकट चर्चा आहे, त्यात या प्रकारच्या पेशींतील बदलाबद्दलच कृ्ष्णजी 'म्युटेशन' हा शब्द वापरतायत....
- Log in or register to post comments
य
यशवंतकुलकर्णी
गुरुवार, 10/07/2010 - 12:04
नवीन
माझ्यापुरतं बोलायचं तर या चर्चा बिलकुल शब्दबंबाळ नाहीत... आणि मी सध्या "त्याच" अनुभवातून जातोय...कुणी समदु:खी/समसुखी मिळतात का पाहात होतो..
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
गुरुवार, 10/07/2010 - 20:52
नवीन
मी सध्या "त्याच" अनुभवातून जातोय...>>>>>
म्हणजे सध्या तुमची त्वचा मलमली वस्त्रासारखी मऊ झालीये आणी तुम्हाला चवी देखिल कळत नाहीत!??
हलके घ्या.
- Log in or register to post comments
य
यशवंतकुलकर्णी
गुरुवार, 10/07/2010 - 21:35
नवीन
तुम्ही शब्दबंबाळ चर्चा हा शब्द वापरल्यानं मी माझी बाजू गरजेपुरती स्पष्ट केली होती; पुढे काही सांगणं अनावश्यक आहे.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 10/07/2010 - 14:58
नवीन
आम्हाला भावातीत ध्यान (समाधी) शिकवणार्यानी "कोणाला काही अतींद्रिय अनुभव आले तर त्याची वाच्यता किंवा चर्चा करू नका" असं सांगितलं होतं. ते बहुतेक असला "पसारा" टाळण्यासाठीच असावं.
- Log in or register to post comments
य
यशवंतकुलकर्णी
गुरुवार, 10/07/2010 - 15:12
नवीन
युजी या अनुभवातून बाहेर पडले तेव्हा "आय वील डिस्कस अबाऊट इट ओपन्ली (हे "इट" म्हणजे युजींबद्दल लिहीणारे लोक त्यांची "एन्लायटन्मेंट" मानतात, युजी एन्लायटन्मेंट नाहीच असं हज्जारदा सांगतात ) ..."
हाच तर मुद्दा आहे ना. असल्या ध्यान पध्दती शिकवण्यासाठी अवास्तव स्तोम माजवायचं, लोकांकडून पैसे वसूल करायचे, कधीकधी तर त्यांना "हॅंण्डल"ही करायचं...पुन्हा काखा वर करायला मोकळे..ते तिकडं, आपण इकडं..
हे म्हणजे गाडी चालवता न येणार्या माणसाला गाडीवर बसवून उताराला लाऊन द्यायचं आणि पडून मेंदू वगैरे फुटला किंवा टाळके सरकले तर "त्याची वाच्यता करू नका किंवा चर्चा करू नका" असं म्हणण्यासारखं आहे..
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 10/07/2010 - 15:21
नवीन
आमच्या सारखे सामान्य लोक यावर फारसं वाचन किंवा विचार करत नाहीत, त्यामुळे असले अॅक्सिडंट होत नाहीत. अति विचार करणार्यांसाठी मात्र ते धोकादायक आहे.
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
गुरुवार, 10/07/2010 - 18:20
नवीन
हा 'कोल्ह्याला द्राक्षे आम्बट' चा प्रकार आहे का यावर पण अवश्य विचार करा.
बाजारात खरी खोटी नाणी असणारच. म्हणून कुणी चलन की कल्पना मोडीत काढत नाही की अर्थशास्त्राच्या, अर्थशास्त्रज्ञान्च्या नावाने सरसकट शिवीगाळ करत नाही. माझे बोलणे कुत्र्याचे भुन्कणे आहे असे म्हणल्याने सरसकट शिवीगाळ करण्याचा अधिकार तर मुळीच येत नाही. असो.
ओशो, जे. आणि यु.जी. इतकेच 'अध्यात्म' आहे असे समजाल तर कायम गोन्धळात रहाल आणि जग 'युसलेस' आहे, सगळेच मूर्ख आहेत असले निष्कर्ष निघतील.
तुमची लिहीण्याची शैली छान आहे. तुम्हाला 'खरीखुरी गोड द्राक्षे' मिळावीत (जशी गुळवणी महाराजाना लोकनाथतीर्थ स्वामी महाराजानी दिली, स्वामी स्वरूपानन्दाना गणेशनाथ वैद्य महाराजानी दिली) यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा. बाकी चू.भू.दे. घे. काही वावगे बोललो असल्यास क्षमस्व.
- Log in or register to post comments
य
यशवंतकुलकर्णी
गुरुवार, 10/07/2010 - 18:21
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments
य
यशवंतकुलकर्णी
गुरुवार, 10/07/2010 - 15:31
नवीन
मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की "अतिंद्रिय अनुभव आले तर वाच्यता किंवा चर्चा करू नका...."
हे असले अतिंद्रिय अनुभव विचार करून (किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणं अति विचार करून) येत नसतात - काहीकाळ सगळी शारीरिक यंत्रणा त्यात इन्व्हॉल्व्ह झाली तरच तशी शक्यता असते...
वन्स यू माऊंट, देअर इज एव्हरी पॉसीबिलीटी ऑफ अॅक्सीडेंट...
राजहंस प्रकाशनने नुकत्याच प्रकाशित केलेल्या "अज्ञात विवेकानंद" या विवेकानंदांवरील पुस्तकात तर अशी नोंद आहे की ध्यान करीत असताना "मेंदुतील शीर तुटून" विवेकानंदांचा मृत्यू झाला...काय म्हणायचं आता?
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 10/07/2010 - 18:24
नवीन
कारण वसंत पोतदारांचे 'योद्धा संन्यासी' माझ्याकडे आहे त्यात विवेकानंदांनी देह ठेवला त्याचे वर्णन आहे. त्यात कुठेही असे वर्णन नाही की त्यांनी ध्यान करत असताना मेंदूतील शीर वगैरे तुटली...(अचूक वर्णन मी पुस्तकातून देऊ शकेन.)
त्यामुळे तुझा हा संदर्भ विचारात पाडणारा वाटतोय.
-रंगा
- Log in or register to post comments
य
यशवंतकुलकर्णी
गुरुवार, 10/07/2010 - 18:33
नवीन
चतुरंग,
विवेकानंदांवरील हे पुस्तक अगदी अलिकडलं आहे आणि ते कुणीतरी "म" यांनी मूळ बंगालीत लिहीलं आहे. यात विवेकानंदांबद्दल आतापर्यंत अज्ञात असलेली बरीच माहीती दिलीय हे नावावरूनच कळतं.
यापूर्वी ओशोंनी त्यांच्या व्याख्यानात विवेकानंदांवर दिलेल्या उत्तरात नेमका हाच मुद्दा मांडला होता; पण तो "ओशों"चा असल्याने बेसलेस म्हणून मी दुर्लक्ष केले होते. ही जुनी गोष्ट. पण हे पुस्तक तर आताचं आहे. एक-दोन दिवसात पुस्तक मिळाले तर ती नोंद असलेले ते पान नक्की स्कॅन करून टाकतो.
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
गुरुवार, 10/07/2010 - 18:49
नवीन
एकदा अधिकारी सद्गुरू मिळाल्यावर त्या तार्किक, बुद्धिमान युवकाने 'स्वात्मदान' दिले, गुरुपदिष्ट राहून निष्ठेने सत्कार्याला वाहून घेतले. नुकतेच अचाट, अफाट, भन्नाट अनुभव आणि उलटसुलट लोकविलक्षण विचारान्च्या मागे लागले नाहीत हे महत्वाचे. एकदा असे सद्गुरू, सत्शिष्य एकत्र आले, की आपोआप शिष्याची जीवननिष्ठा दृढ होते आणि सद्गुरूप्रणित जीवितकार्यही पूर्ण होते. असो.
ध्यान करत असताना मेन्दूची शीर तुटून मृत्यु आला (हे बरोबर आहे असे गृहीत धरू) याचा अर्थ ध्यान केल्याने मेन्दूची शीर तुटून मृत्यु आला असा सोयिस्करपणे का घ्यावा? आमच्या अल्प माहितीनुसार त्याना मधुमेह आणि रक्तदाबाचा विकारही होता. (स्वामीजी 'सक्रिय ध्यान', 'एन्काउन्टर ग्रुप' वगैरे ध्यान 'प्रयोग' करत नव्हते. त्याना रामकृष्णानी शक्तिपाताने व्यवस्थित दीक्षा दिलेली होती आणि ध्यान ही त्यान्ची जीवनशैली होती. )
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 10/07/2010 - 19:22
नवीन
स्वामी विवेकानंदांना मधुमेह, रक्तदाब तर होताच शिवाय सायटिकाचा सुद्धा विकार होता. अत्यंत तिखट मांसाहाराची त्यांना आवड होती आणि ते शीघ्रकोपीही होते! पण ह्या कोणत्याही गोष्टीचा त्यांच्या ध्यानाशी संबंध नाही.
अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात डोंगराएवढे कार्य करणार्या ह्या नरसिंहाला 'योद्धा संन्यासी' हेच नाव समर्पक आहे!
-रंगा
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Sun, 10/10/2010 - 07:50
नवीन
"....अत्यंत तिखट मांसाहाराची त्यांना आवड होती...."
~ इतकेच नव्हे तर त्यांना शाकाहाराचे महत्व कुणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्याला (पत्राद्वारे...) मांसाहार आणि शाकाहार या संबंधी लिहिले :
"..... जीवहत्या करणे हे पाप होय यात संशय नाही; तथापि, जोपर्यंत शाकाहारी अन्न हे रासायनिक प्रक्रियांद्वारा मानवी शरीराला यथोचित असे खाद्य बनत नाही तोपर्यंत मांसाहाराखेरीत गत्यंतर नाही. जोवर माणसाला आजच्यासारख्या अवस्थांत राहून रजोगुणाची कामे करावी लागतील तोवर मांसाहाराखेरीज उपाय नाही. यावर असेही म्हणता येईल की; अंगमेहनतीची कामे करून ते पोटाला मिळवीत नसतात अशा उच्च वर्गाच्या लोकांनी मांसाहार करू नये, परंतु ज्यांना रात्रंदिवस काबाडकष्ट करून खाणे-लेणे कमवावे लागत असते अशांना जबरदस्तीने शाकाहारी बनविणे हे आमच्या देशाचे स्वातंत्र्य गमाविण्याचे एक कारण होय. उत्तम पुष्टिकारक अन्नाने काय होऊ शकते ह्याचे जपान हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.....अस्तु....विवेकानंद..."
नियम आणि शिस्त याच्या अतिरेकावरपण स्वामींनी खूप प्रभावी असे भाष्य केले आहे; पण इथल्या धाग्याचा तो विषय नाही; त्यामुळे त्यावर लिहिणे अवांतर होईल.
इन्द्रा
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
गुरुवार, 10/07/2010 - 15:42
नवीन
कोणि अतिशहाण्यानी हा शोध लावला?
मेंदूतील शीर वगरै?
विवेकानंद मरेपर्यन्त पूर्ण जागे होते, त्यांची शेवटच्या क्षणापर्यंतची वाक्य लिहून ठेवली गेली आहेत.
शिवाय शीर-बीर तुटायला त्यांना 'हाय बीपी' कधीही नव्हते!
- Log in or register to post comments
य
यशवंतकुलकर्णी
गुरुवार, 10/07/2010 - 15:53
नवीन
आता तो अतिशहाणा होता की नाही ते माहीत नाही पण ही एका डॉक्टरची नोंद आहे एवढं नक्की.
सध्या पुस्तक नाहीय माझ्याकडं नाहीतर पान स्कॅन करून टाकलं असतं.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/07/2010 - 20:15
नवीन
हो पण ब्रेन हॅमरेज होण्यात एवढं काय अप्रूप?
- Log in or register to post comments
य
यशवंतकुलकर्णी
गुरुवार, 10/07/2010 - 22:13
नवीन
अप्रुप काही नाही.
अशी कथा आहे की स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदांना शक्तीपात दिक्षेद्वारे समाधीत प्रवेश करण्याची गुरूकिल्ली दिली.
विवेकानंद ध्यानाला बसत त्यावेळी त्या अवस्थेतून ते इतरांच्या मनावर नियंत्रण ठेऊ शकत - बोलू शकत.
रामकृष्ण परमहंसाच्या सान्निध्यात कुणीतरी एक व्यक्ती राहात असे आणि त्या माणसाची खोली देव-देवतांच्या मूर्ती, तसबिरी यांनी भरून गेलेली होती. त्याचा दिवसच त्या देवदेवतांची पूजा करण्यात खर्च होत असे. थोडक्यात तो भलताच भक्त माणूस होता. विवेकानंदांना त्याच्या त्या पूजा-अर्चा आणि भजन-पूजन आवडत नसे.
विवेकानंदांना समाधीचा अनुभव येऊ लागला तेव्हा विवेकानंदांनी पहिले काम केले ते म्हणजे समाधीत असताना त्या माणसाला सगळ्या मूर्ती आणि सगळ्या तसबीरी गंगेत टाकून यायला सांगितले; त्या माणसाला फार दु:ख झाले पण झालेल्या प्रकारावर विश्वास ठेऊन तो सगळ्या मूर्ती, तसबीरी घेऊन त्या गंगेत टाकण्यासाठी निघाला.
तो गंगेकडे जात असताना रामकृष्ण परमहंस गंगेत स्नान करून परत येत होते. रामकृष्णांनी त्या माणसाला मूर्ती आणि तसबीरी घेऊन परत जायला सांगितले आणि विवेकानंद जिथे बसले होते तिथे आले आणि त्यांनी -
"तु गैरवापर करू लागलायस, तुला दिलेली गुरूकिल्ली मी परत घेतोय - मरण्यापूर्वी एक दिवस तुला ती परत मिळेल " असे विवेकानंदांना सांगितले.
विवेकानंद फार तळमळले, रामकृष्णांची खूप वेळा करूणा भाकली. पण तो अनुभव त्यांना पुन्हा आला नाही. शेवटच्या दिवसांतही विवेकानंदांना तो अनुभव येईना; तेव्हा ध्यानात ते स्वत:च्या शारीरिक बळाचा वापर करू लागले. विवेकानंद जीवनभर अस्वस्थ, तणावात (भले मातृभूमीच्या कल्याणासाठी असोत, पण अस्वस्थता, तणाव सुटला नव्हता ) होते हे त्यांची पत्रे आणि जीवन चरित्र वाचून कळू शकते.
या पार्श्वभूमीवर, ध्यानात असताना ब्रेन हॅमरेज होऊन मृत्यू घडण्याच्या घटनेतून बरेच काही ध्वनित होते.
पण त्यात अप्रुप असं काही नाही.
वर सांगितलेली कथा रामकृष्ण मिशनच्या पुस्तकांत आढळणार नाही.
ओशोंनी ती सांगितलेली आहे.
त्यांना कुठून कळाली, माहीत नाही.
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Sat, 10/09/2010 - 22:46
नवीन
काय ध्वनित होते? थोडे इस्कटून सान्गाल काय? समजले नाही.
(आमच्या शेजारचे नाना आयुष्यभर ध्यान इ. फन्दात पडले नाहीत. रोज एक क्वार्टर, चिकन, कट्ट्यावर बसून चकाट्या पिटणे, पत्ते खेळणे वगैरे करत मस्त मजेत जगले. पण मेन्दूची शीर अचानक तुटूनच गेले हो!)
- Log in or register to post comments
य
यशवंतकुलकर्णी
Sun, 10/10/2010 - 14:47
नवीन
माझा विचार, तुमचा विचार होऊ शकत नाही. सांगून फायदा नाही.
युवर नेबर नाना मे रेस्ट इन पीस.
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Sun, 10/10/2010 - 22:07
नवीन
आभारी आहे. (नाना पण आभारी असावेत)
- Log in or register to post comments
ई
ईश आपटे
Mon, 07/18/2011 - 17:24
नवीन
तेव्हा ध्यानात ते स्वत:च्या शारीरिक बळाचा वापर करू लागले.
शारिरीक बळाचा वापर आणि ध्यानात ??? ;)
कुलकर्णी साहेब , मी एक लेख इथेच लिहीला होता.. ह्या सगळ्या गुरुपध्दतीवर. कदाचित आपल्या नजरेतुन सुटला असेल.
ही त्याची लिंक http://misalpav.com/node/18228
आणि ओशोनी सांगितलेल्या सर्वच कथा विश्वासार्ह मानणे धोक्याचे ठरेल. कारण त्यामागे त्यांचा बर्याचदा वैयक्तिक पूर्वग्रह ही असायचा.............
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/10/2010 - 09:02
नवीन
हम्म, वाचतोय........!
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Mon, 07/18/2011 - 17:01
नवीन
.
- Log in or register to post comments