Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग एक

य
यशवंतकुलकर्णी
Mon, 10/04/2010 - 01:27
💬 18 प्रतिसाद
  • यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग २
  • यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग तीन
  • यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग चार
  • मैसूर भजी
  • यु. जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग सहा
  • यु.जी. कृष्णमूर्ती: भाग सात (अंतिम)

Book traversal links for यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग एक

  • यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग २ ›

प्रतिक्रिया द्या
10993 वाचन

💬 प्रतिसाद (18)
श
शुचि Mon, 10/04/2010 - 01:48 नवीन
>> कुणालातरी काहीतरी खुणावतं, त्या खुणावणार्‍या गोष्टीकडे अधिकाधिक जवळ जायला होतं, त्याबद्दल माहिती होते आणि तीच माहिती तुम्ही जगासमोर मांडत राहाता. >> बीडकर महाराज त्यांच्या गुरूंना अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना म्हणाले "मी परमार्थाचं ज्ञान सर्वांना वाटेन" त्यावर स्वामी समर्थ म्हणाले - "राम्या भुकेल्याला खाऊ घाल नाहीतर अन्नाचा चिवडा होईल" सूज्ञांस अधिक सांगणे नलगे. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Mon, 10/04/2010 - 14:24 नवीन
थोडक्यात, रमण महर्षीनी अन्नाचा चिवडा केला नाही. सगळ्या परम्परा झुगारून देणारे ओशो, जे. आणि यु.जी. 'मीच शहाणा आणि माझेच खरे' ही मूळ भ्रान्ति काही सोडून देउ शकले नाहीत. या तिघान्चे परस्पर धुलाई केन्द्र तसेही चालू होतेच. आता या तिघान्चे शिष्य आपले बुवा सोडून बाकी दोघे, आणि तथाकथित 'जुन्या वळणाचे' अध्यात्म यान्चे धुलाई केन्द्र चालवतील. चालायचेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
य
यशवंतकुलकर्णी Mon, 10/04/2010 - 14:34 नवीन
सगळं चालूच आहे मूकवाचक. तुम्ही वेगळं काय सांगताय? चालायचेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
म
मूकवाचक Mon, 10/04/2010 - 16:00 नवीन
की रमण महर्षीनी अन्नाचा चिवडा केला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी
य
यशवंतकुलकर्णी Mon, 10/04/2010 - 16:16 नवीन
जाऊ द्या हो - तेलकट, मळकट कागदात बांधलेला चिवडा असो की केळीच्या पानाभोवती रांगोळ्या काढून, नंदादीपांच्या प्रकाशात, श्लोक म्हणत, जानव्याने पाठ घासत खाल्लेली पंचपक्वान्ने असोत - ते पाहुन भूक भागणे किंवा लागणे महत्वाचे...कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक
म
मूकवाचक Mon, 10/04/2010 - 16:35 नवीन
भूक काय आणखी काही काय 'लागणे' आणि 'भागणे' हे ठार वेडा माणूस, बैलाला, डुकराला पण समजते. सात्विक आहार, आचार, विचार असल्याने मन कसे शान्त, स्थिर आणि प्रसन्न राहते हे समजणे, उमजणे आणि तसा अनुभव येणे थोडे वेगळेच. ज्याचे त्याचे प्रारब्ध. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी
स
सहज Mon, 10/04/2010 - 02:48 नवीन
गालफुगी म्हणजे नेमके काय व ती बाह्य उपचाराशिवाय बरी होते की नाही? ह्याचे उत्तर कोणी वैद्यकशास्त्री देउ शकेल काय?
  • Log in or register to post comments
य
यशवंतकुलकर्णी Mon, 10/04/2010 - 03:43 नवीन
सहज-साध्य गोष्टीला डाक्टर कशाला पायजे हो? Image removed.From हे घ्या: http://en.wikipedia.org/wiki/Mumps हा आजार किमान महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या (शहरातल्या पण) लहान लेकरांना होतो आणि तो अगदी सर्वसामान्य समजला जातो. चार-आठ दिवसांत गाल उतरतो (गालफुगीने फुगला असेल तर! इतर धंदे करून फुगवून घेतला असेल तर ते येगळे..) युजींची गालफुगी व्याख्यानं देऊन-देऊन झाली होती. त्यांचा रोख आहे तो "शरीर आपोआप स्वत:ला दुरूस्त करून घेत असतं, पण थोडी कळ काढावी लागते..." त्यांनी जादू करून वेदना नाहीशा केल्या किंवा गाल उतरवले असा दावा नाही. "ऑल डॉक्टर्स शुड बी शॉट डेड, थर्टी टू स्क्राऊंड्रल्स हू केम टू ट्रीट मी आर नाऊ रेड्यूस्ड टू अ‍ॅशेस..." - युजी एवढं म्हणूनही युजी म्हणतात फक्त मी म्हणतोय म्हणून लगेच ट्रीटमेंट थांबवू नका - मी माझा अनुभव सांगतोय. तुम्ही तुमच्या अनुभवाला चिकटून राहा आणि अ‍ॅपेंडिक्स ठणकत असेल तर जरूर कापून घ्या. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सहज Mon, 10/04/2010 - 04:13 नवीन
अनेक लोकांना डास चावतो. एखाद्या युजीला डास चावल्याने मरण आले नाही पण दरवर्षी लाखो माणसे त्यात अनेक निरोगी लोक देखील आली डेंगी, मलेरियाने मरण पावतात. त्यामुळे डॉक्टरांना नावे ठेवण्यात व अंगावर आजार काढण्यात प्रत्येक केस मधे एक तत्व अंगीकारता येणार नाही. असो ह्या आणी अश्या मुद्यावरुन युजी काय सांगत आहेत व काय नेमके सांगायचे आहे ते हरवायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी
च
चतुरंग Mon, 10/04/2010 - 02:52 नवीन
वाचतोय. वाचत राहीन. प्रश्न सगळ्यात शेवटच्या भागात असतील. रंगा
  • Log in or register to post comments
भ
भाऊ पाटील Mon, 10/04/2010 - 11:29 नवीन
असेच म्हणतो. अवांतरः ओशोंवर लेख टाकाच्...इकडे धुलाई करायची मजा वेगळीच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
वात्रट Mon, 10/04/2010 - 03:07 नवीन
ओशो वर एक पूर्ण लेख टाका कि साहेब
  • Log in or register to post comments
य
यशवंतकुलकर्णी Mon, 10/04/2010 - 03:23 नवीन
आमचे ओशो धुलाई केंद्र इथे आहे ;-) http://www.yekulkarni.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वात्रट
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/04/2010 - 14:40 नवीन
अरे त्या वाचनखुणा चालू करा रे!!!!
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 10/04/2010 - 14:57 नवीन
छान लेख. प्रवास छान रेखाटला आहे. शेवट काय झाला याची वाट पाहतो आहे. अवांतरः ते ओशो अंबळ आमच्या विजुभाऊंसारखे दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 10/04/2010 - 15:05 नवीन
३.१४ काळजी करु नका. तुम्ही चालु ठेवा हो तुमचे लिखाण. पुपेंशी सहमत. आजकाल विजुभौ पण पुण्यात आहेत असे कळाले.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 10/04/2010 - 16:40 नवीन
आमच्यासारख्या अनेक सामान्य वाचकाना युजी फारसे ओळखीचे नाहीत. मी तत्त्वज्ञान काय वाचलंय? शून्य! पण रजनीश एक लेखक म्हणून मला निश्चित आवडतात. त्यांच्या "सॉफिस्टिकेटेड बाबागिरीशी" आपला काही संबंध नाही. आम्ही त्याना भगवान म्हणत नाही. पण जसे पुल, गंगाधर गाडगीळ मला आवडतात, तसेश ओशो पण लेखक म्हणून आवडतात. त्यांची भाषा अगदी साधी, सोपी आहे. लिखाणात नर्मविनोद सगळीकडे भरलेला असतो. कबीर, झेन, मीराबाई इ वर त्यानी सुंदर पुस्तकं त्यानी लिहिली आहेत. ते त्यांचं श्रेय त्याना द्यायलाच हवं नाही का? बाकी त्यांच्याच काय कोणच्याही बाबागिरीची धुलाई वाचायला मला आवडेल! युजींच्या शिकवण्याची ओळख करून द्यायचं मोठं काम तू स्वीकारलं आहेस. पहिला भाग तर रंगतदार झालाय. आणखी येऊ दे. शंका येतील तशा विचारत जाईनच! त्यांच्या गुरूच्या शोधाबद्दल वाचताना वाटलं, अरे, ही तर "काहीतरी" शोधणार्‍या प्रत्येकाची कहाणी आहे! आणखी असं, की तुमच्या आंतरिक प्रवासात गुरू हे वाटेवरच्या मैलाच्या दगडासारखे असतात. तुम्हाला अजून किती अंतर जायचय याची माहिती देतात. पण त्या दगडाला मिठी मारून बसलं तर तुम्ही कुठेच पोचणार नाही. तेव्हा त्या त्या वेळी त्या गुरूकडून जे मिळेल ते घ्यावं आणि पुढे चालू लागावं. जसं दगडाला मिठी मारून बसू नये, तसंच एखाद्या नावडत्या दगडाला हातोडे पण मारत बसू नये. नाहीतर तुमचा प्रवास तिथेच संपेल!
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Tue, 10/05/2010 - 06:44 नवीन
हे असले बाबा किंवा त्यासम याविषयी मला काही माहिती नाही...हे युजी नावसुद्धा पहिल्यांदाच ऐकतेय... बाकी हे बाबा लोक : एक म्हणतंय मीच देव तर दुसरं म्हणतंय देव नाहीच..वगैरे...बाकी वाचायला म्हणून लेख छानच. पुढचे भाग येऊ द्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा