Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक प्रश्न

श
शिल्पा ब
Mon, 12/06/2010 - 09:18
🗣 108 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
23013 वाचन

💬 प्रतिसाद (108)
अ
अन्या दातार Mon, 12/06/2010 - 09:29 नवीन
प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतेच असे नाही. अनेकदा उत्तर माहीत असुनही त्याचा उहापोह करणे टाळणे उत्तम.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 12/06/2010 - 09:35 नवीन
लोकांना खरंच उत्तरे माहिती नसतात की मुद्दाम तेच प्रश्न विचारतात? उत्तर द्यावे का नाही या संभ्रमात. :(
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Mon, 12/06/2010 - 09:40 नवीन
थत्ते काका उत्तर माहीत असेल तर नक्कि द्या किंवा व्यनि करा ...कारण या प्रश्नाच्या उत्तरासाठी आतुर आहे..
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 12/06/2010 - 09:51 नवीन
गहन आहे विषय..पण करतो प्रयत्न. आपल्यात काही कमी किंवा जास्त आहे अशा भावनेपेक्षा व्यवहारातला फायदा नेहमीच वरचढ ठरतो. आपण असे समजू की एका सिनेमाच्या तिकिटाच्या मैलभर लांब लाईनीस पाहून मी आणि माझी पत्नी हबकलेले आहोत. तेवढ्यात लक्षात येतं की बाजूला एक फक्त "लेडीजसाठी" लाईन आहे आणि ती तुलनेत लहान आहे. तर मी आणि पत्नी झटक्यात निर्णय घेतो की तिने त्या रांगेत उभं रहावं. स्त्री म्हणून वेगळी रांग म्हणजे कमीपणा वगैरे असा विचार त्यावेळी मनात येत नाही. ठराविक जातीला केवळ त्या जातीचा असल्याचा फायदा मिळतोय म्हटल्यावर बाकीच्या जातीही आपला फायदा (वेगळी रांग) मागणार. जातपात नको बुवा असं म्हणून केवळ सांपत्तिक स्थिती (दारिद्र्य / निम्न मध्यम / उच्च मध्यम गट) असं करून आरक्षण सुरु केलं तर मग आपल्याला "आरक्षित" गटात शिरता यावं म्हणून लोक स्वतःला गरीब सिद्ध करतील. आणि अशीच तीस चाळीस वर्षं गेली की श्रीमंतही "श्रीमंत वर्गाला ठराविक कोटा द्या. हवं तर पैसे मोजतो.." म्हणून वेगळी रांग मागतीलच. एकदा समानता नाही म्हटलं की असले घोळ उभे राहणारच.
  • Log in or register to post comments
ब
बबलु Mon, 12/06/2010 - 09:58 नवीन
उत्तम विषयाला तोंड फोडलेत. उत्तर अजून तरी माहित नाही. प्रतिक्रिया वाचायला उत्सुक. (आरक्षण सिस्टिमचा बळी) बबलु
  • Log in or register to post comments
अ
अब् क Mon, 12/06/2010 - 10:00 नवीन
एकदम सहमत!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 12/06/2010 - 10:09 नवीन
मार्टिन ल्युथर किंग आणि क्रिस्तियानो रोणाल्डो (पाचवा) शी सहमत. त्यांचे विचार मला नेहमी पटत आलेले आहेत. - लुतिक लोशन
  • Log in or register to post comments
ग
गांधीवादी Mon, 12/06/2010 - 10:48 नवीन
आज लोकशाहीचा डोलाराच ह्या 'आरक्षण' आणि 'जातपात' ह्यावर आधारलेला आहे, त्यामुळे त्यात सराईत झालेले इतक्या सहजासहजी आपलेच स्थान गमून बसतील असे वाटत नाही. आणि ज्या देशात उच्चतम उच्च व्यक्ती हीच एक रिमोटने चालणारी बाहुली असेल तर तिथे असला काही विचार करणे म्हणजे दिवास्वप्न पाहण्यासारखे आहे. जर बदलायचेच असेल तर मूळ ह्या राजकारणाचा पाया ज्यावर आधारलेला आहे तिथेच घाव घातला पाहिजे, मगच हे प्रश्न सुटण्यास मदत होईल. इथे काही विचार मांडलेले आहेत. देशहिताचे निर्णय घेणे हा जरी सरते शेवटी बहुमतात आलेल्या सरकारचे काम आहे हे माहित असले तरी हे सरकार म्हणजे वेगवेगळ्या विभागातून निवडून आलेले उमेदवारच असतात. आजच्या लोकशाही प्रमाणे त्यांना स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या विभागाची एक खास अशी काळजी घ्यावीच लागते आणि हीच काळजी घेताघेता देशहिताचा लवकरच विसर पडतो टीप : मागे झालेल्या चर्चेत बर्याच मान्यवरांनी सविस्तर प्रतिक्रिया देतो असे जाहीर केले होते, त्यांच्या प्रतिक्रियांची पूर्तता ह्या निमित्ताने होऊ शकते.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Mon, 12/06/2010 - 14:33 नवीन
काही (४/५ असेल) वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या महाचर्चा कार्यक्रमात की कशात तरी ह्याच विषयावर चर्चा चालू होती. तेव्हा आरक्षणाबाबत आंबेडकरांचे म्हणणे त्यांनी बदलून असे सांगितले होते की, "आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे १० वर्षे आरक्षण ठेवून मग ते हळू हळू वाढवत न्या." ह्यावर कोणी आक्षेप घेतला नाही. स्वत:च्या फायद्याकरिता गोष्टी, वाक्ये बदलून आपल्याला पाहिजे तसे वापरणे हेच आज सर्वत्र चालले आहे. (ह्यातूनच आंबेडकरांचे अनुयायी म्हणवत जे लोक दरवर्षी ६ डिसेंबरला मुंबईत येतात त्यात खरेच किती अनुयायी आहेत आणि किती फक्त फुकटात मुंबईला जायला मिळते म्हणून येतात असा प्रश्न पडत असतो.)
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Mon, 12/06/2010 - 15:39 नवीन
ज्या आरक्षणाला कालमर्यादा असावी असं बाबासाहेब बोलले होते ते आरक्षण केवळ राजकीय स्वरूपाचं होतं. म्हणजे की आज जे मतदारसंघ आरक्षीत असतात ते काही काळानंतर आरक्षीत नसल्यास चालतील असं त्यांचं मत होतं. त्यामागे असा आशावाद होता की आरक्षण देऊन आणि शिक्षणाची, प्रगतीची संधी उपलब्ध करून दिल्यास मागसवर्ग अगदी झपाट्याने प्रगती करेल आणि मग त्यावेळी प्रस्थापित झालेली समता लक्षात घेता अश्या राजकीय आरक्षणाची गरज उरणार नाही असा विचार त्यामागे होता. मात्र हे एकतर माहिती नसल्ल्यामुळे किंवा कित्येकदा मुद्दामच मोघमपणे बोलून ही कालमर्यादा सर्वच (विशेषतः शैक्षणीक) आरक्षणाबाबत असल्याचे पसरवले जाते. असे मुळीच नाही. आजही असे लाखो लोक आहेत ज्यांच्या घरातील पहिली पिढी आता शिकायला लागली आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी उपलब्ध करून दिलेल्या सोई किती परिणामकारक राबवल्या गेल्या हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे यापुढील काळात सुध्दा आरक्षण आवश्यक आहेच. मात्र त्याचा अतिशय परिणामकारक उपयोग केल्या गेला पाहिजे. कारण आरक्षणाचा वापर सुध्दा अतिशय असमान झालेला दिसून येतो. मात्र ज्यांनी अश्या आरक्षणाच्या परिणामकारक अंमलबजावणीची मागणी केली पाहिजे ते त्यांचे जवळच्यांचे हितसंबंध आड येतात म्हणूण गप्पं आहेत आणि अन्य जे आरक्षणाबाबत बोलतात त्यांचा मूळी आरक्षणावर रागच आहे त्यामुळे त्यांच्या हेतूवर शंका येणे रास्त आहे. अश्या अडचणीत आज आरक्षण आहे. त्यामुळे किमानपक्षी आज आहे ते पुरेसे आहे अश्या विचारात जनता आहे. बाकी मागासवर्गीय जनतेचे आजच्या काळात खुल्या गटातून प्रवेश किंवा नोकरी पटकावण्याचे वाढते प्रमाण बघता. लवकरच खुल्या जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षीत करा असा लढा उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. - नीलकांत
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही Mon, 12/06/2010 - 16:31 नवीन
यापुढील काळात सुध्दा आरक्षण आवश्यक आहेच. मात्र त्याचा अतिशय परिणामकारक उपयोग केल्या गेला पाहिजे. कारण आरक्षणाचा वापर सुध्दा अतिशय असमान झालेला दिसून येतो. सहमत. बाकी मागासवर्गीय जनतेचे आजच्या काळात खुल्या गटातून प्रवेश किंवा नोकरी पटकावण्याचे वाढते प्रमाण बघता. लवकरच खुल्या जागा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षीत करा असा लढा उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. सहमत. (खुल्या प्रर्वगातला) इंटेश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
द
देवदत्त Mon, 12/06/2010 - 17:22 नवीन
विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद नीलकांत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
श
श्रावण मोडक Mon, 12/06/2010 - 17:47 नवीन
नीलकांत,
­ज्या आरक्षणाला कालमर्यादा असावी असं बाबासाहेब बोलले होते ते आरक्षण केवळ राजकीय स्वरूपाचं होतं. म्हणजे की आज जे मतदारसंघ आरक्षीत असतात ते काही काळानंतर आरक्षीत नसल्यास चालतील असं त्यांचं मत होतं­
याचा काही संदर्­भ देता ये­ईल का? तो ­आव­श्यक ­आहे. कार­ण ­आर­क्षणाच्या कालमर्यादेबाबतचा युक्तिवाद कायम केला जातो. तो ­खोडून का­ढायचा ­झाला तर हा संदर्­भ आव­श्यक ­आहे... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
न
नितिन थत्ते Mon, 12/06/2010 - 18:05 नवीन
खाली १० वर्षांविषयी प्रश्न उपस्थित केल्यावर शोधाशोध केली असता या दुव्यावर खालील मजकूर वाचायला मिळाला. Honourable Sardar Vallabhbhai J. Patel: Sir, I move the proviso to the first item- "Provided that. as a general rule, there shall be reservation of seats for the minorities shown in the schedule in the various legislatures on the basis of their population : Provided further that such reservation shall be for 10 years, the position to be reconsidered at the end of the period." I move this for the acceptance of the House. सरदार पटेल यांनी ही सूचना मांडली असल्याचे दिसते.(ती राजकीय आरक्षणाबाबत असल्याचे 'सीट्स' या शब्दावरून दिसते). सरदार पटेल यांनी ही सूचना "अल्पसंख्यांकांविषयीच्या सल्लागार समितीच्या" अहवालाला अनुसरून केली होती. संबंधित चर्चेत १० वर्षांनंतर सर्व लोक समान पातळीवर येतील असा आशावाद दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Mon, 12/06/2010 - 18:21 नवीन
­उत्तम. ­किती तार­खेचे प्रोसिडिंग ­आहे? मी थोडा ­आळस करतोय हे माहितीये... प­ण... मा­फी ­असावी. :) हा संदर्­भ पक्का मानता, आता ­­एक सं­­भाव्य निष्कर्ष ­असा: आर­क्षणाबाबत दहा वर्­षांच्या मर्यादेची सूचना ­आंबेडकरांनी केलीच नव्हती. ­ती पटेलांनी केली होती. ­आणि तीही राजकीय ­आर­क्षणाबाबत होती. ­­ हे निर्विवाद सिद्­ध हो­ण्यासा­ठी नीलकांतने ­आंबेडकरांबाबत जो ­उल्ले­ख केला ­आहे त्याचा काही पुरावा / संदर्­भ ­­आहे का, हे पहावे लागेल ­आणि तो नसेल तर तो ­उल्ले­ख रद्द मानावा लागेल. मग नितिन ­थत्ते यांनी मांडलेला संदर्­भ टिकून राहतो. त्याच्या विरो­धात, ­आंबेडकरांनी जर ­इतर ­आरक्षणाबाबत दहा वर्­षांची सूचना केल्याचा संदर्­भ कु­णी मांडला तर हे दोन वेग­ळे स्वतंत्र मुद्दे होतात. दोन्हीचे स्­थान वेग­ळे राहील. ­आपल्या या चर्चेतून ही गोष्ट काही प्रमा­णात निर्विवाद सिद्­ध झाली तर हवीच ­आहे!­
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Tue, 12/07/2010 - 02:56 नवीन
२७ ऑगस्ट १९४७.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
र
रन्गराव Mon, 12/06/2010 - 18:19 नवीन
>>कार­ण ­आर­क्षणाच्या कालमर्यादेबाबतचा युक्तिवाद कायम केला जातो. त्याला एक कारण आहे. समजा आज समाजात काही लोक मागासलेले आहेत. त्याचे दोन गट करूयात 'अ' आणि 'ब'. 'अ' गटात शुन्य लोक आहे सुरुवातीला. काहि लोकांना आरक्षणाचा फायदा मिळायला सुरुवात झाली. त्यांना आता अ गटात नेवूयात. पण एका इटिरेशन मध्ये सर्व परिस्थिती सुधाणार नाही. अजून ब गटातल्या इतर लोकांना काहीच उपयोग झालेला नाही. . म्हणून काही पिढ्या हे चालत राहीलं पाहिजे. आणि एकदा एखाद्याला आरक्षणाचा फायदा मिळाला की त्याने त्याच्या पुढच्या पीढीला तो वापरण्याची गरज पडू नये ह्याची काळजी घेतली पाहिजे, म्हणजेच तो मागासलेला नाही. आणि त्याची पुढची पिडी आता अ गटामध्येच रहाणार. त्यामुळे आरक्षणाच्या पूढच्या काही इटीरेशन्स मध्ये 'ब' गटातल्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि ते अ गटात येतील. अस करत करत काही कालाने सगळे अ गटात असतील आणि ब गटात कोणीच नसेल. मग आरक्षणाची गरज राहणार नाही. ही झाली आदर्श पद्धत. पण सत्य परिस्थिती अशी आहे. दोन गट आहेत ब आणि क. ब गटातले लोक आरक्षणाचा फायदा घेतात पण अ गटात जात नाहीत. आणि क गटातले लोक सोपा उपाय म्हणून ब गटात जातात. त्यामुळे ब गट कधी शुन्यावर येतच नाही. आरक्षणाचा फायदा फक्त एकदाच का असायला हवा? उत्तर: समजा दोन मागासलेले कुटूंब आहेत. त्यातेली एकाला आरक्षणाचा फायदा आज मिळाला. दुसर्याला मिळाला नाही. आता पुढच्या पीढीत येवू. आरक्षाणातील जागाही मर्यादीत असल्यामुळे तिथही स्पर्धा आहेच. तेव्हा ह्या दोन कुटंबातील मुलांमधील स्पर्धा फेअर असेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
न
नितिन थत्ते Mon, 12/06/2010 - 16:49 नवीन
आंबेडकरांनी १० वर्षे आरक्षण ठेवा असे सांगितल्याचे अनेक वेळा वाचायला मिळते. त्याच्या संदर्भाचा शोध घ्यायचा प्रयत्न केलेला नाही. पण ते खरेच असे म्हणाले होते (आणि १० वर्षांनी रिव्यू करू असे म्हणाले होते) असे समजून उत्तर देत आहे. सर्वांना समान संधी आणि कोणत्याही प्रकारे भेदभाव नसावे हे एक आदर्श तत्त्व म्हणून योग्य आहे. परंतु ते तत्त्व अंमलात आणण्यासाठी स्पर्धा समान व्यक्तींमध्ये आहे हे तपासायला हवे. उदा मुष्टीयुद्धाची स्पर्धा घेताना ७५ किलो वजनाच्या स्पर्धकाची ५० किलो वजनाच्या स्पर्धकाशी मॅच ठेवत नाहीत. त्यांचे वेगवेगळे गट ठेवून वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. त्याच तत्त्वावर आधारून आरक्षणाची कल्पना निर्माण झाली होती. जे शेकडो वर्षे शिक्षणापासूनच नाही तर मानव्यापासूनही वंचित ठेवले गेले आहेत त्यांना मुख्यप्रवाहात येण्याची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना असमान स्पर्धेत थेट उतरायची सक्ती होऊ नये अश्या हेतूने आरक्षण ठेवण्याची योजना सुरू झाली. या मागे सवर्णांच्या मनातील गिल्टचाही भाग असणार. दुसरे म्हणजे आंबेडकर हे घटनेच्या 'मसुदा समिती'चे अध्यक्ष होते. घटनेत काय असावे काय नसावे हे एकतर्फी ठरवण्याचा अधिकार आंबेडकरांना नव्हता. घटना समितीमध्ये होणार्‍या चर्चांमधूनच या तरतुदी ठरत असणार. त्यामुळे आंबेडकर म्हणाले म्हणून आरक्षण दिले गेले असे नसणारच. माझ्या समजुतीप्रमाणे आंबेडकरांचे "१० वर्षांनी रिव्ह्यूचे" वक्तव्य अजिबात आरक्षण नको असे म्हणणारे आणि आरक्षण हवे म्हणणारे यांच्या मधील तडजोड म्हणून आले असावे. १० वर्षांनी आरक्षण रद्द व्हावे असे आंबेडकरांना खरोखर म्हणायचे होते की नाही हे माहिती नाही. खरोखर किती वर्षे समानता निर्माण व्हायला आवश्यक आहेत हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्याचे उत्तर मला माहिती नाही. ६० वर्षांत समानता निर्माण झाली आहे असे मला वाटत नाही. एकीकडे घटनेत आरक्षण देण्याबरोबरच समाजातली जातपात आणि भेदभाव नष्ट व्हावेत आणि उच्चवर्गीयांनी मागासांना मनःपूर्वक आपले मानून व्यवहार करावा अशीही अपेक्षा नव्हती. त्या अपेक्षेच्या पूर्तीच्या जवळपासही आपण अजून पोचलेलो नाही. [प्रत्यक्षानुभवांवरून आढलेला निष्कर्ष आहे]. सामाजिक समानता निर्माण करण्यात हयगय झाली असूनही आरक्षण हटवण्याची मात्र घाई सुटलेली आहे. आरक्षण दिल्यामुळे मागासांपैकी काहींना तरी पुढे येण्याची संधी मिळाली आहे यात संशय नाही. आरक्षण नसताना ती मिळाली नसती. (आरक्षण नसतानाही आंबेडकर पुढे आलेच हा युक्तिवाद योग्य नाही कारण मग पुढे येण्याचा मार्ग आंबेडकरांसारखाच खडतर असता आणि ते अत्यंत थोड्याच व्यक्तींना शक्य झाले असते). सध्या आरक्षण ठेवून क्रीमी लेयर काढण्याची तडजोड झाली आहे ती योग्य आहे असे मला वाटते पण क्रीमी लेयर खुल्यावर्गातही लागू करावा असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
प
पंगा Tue, 12/07/2010 - 01:29 नवीन
बाकी सर्व ठीक आहे, पण...
सध्या आरक्षण ठेवून क्रीमी लेयर काढण्याची तडजोड झाली आहे ती योग्य आहे असे मला वाटते पण क्रीमी लेयर खुल्यावर्गातही लागू करावा असे माझे मत आहे.
हा मुद्दा समजला नाही. माझ्या अर्धवट (आणि कदाचित चुकीच्याही) समजुतीप्रमाणे, क्रीमी लेयर हा (एरवी सामूहिक निकषानुसार आरक्षणास पात्र असलेल्यांपैकी) काहींना आरक्षणातून वगळण्याचा निकष आहे. (समजूत चुकीची असल्यास जरूर दुरुस्त करावी.) अशा परिस्थितीत, क्रीमी लेयर खुल्या प्रवर्गास नेमका कसा लावता यावा? ज्यांना मुळात आरक्षणच उपलब्ध नाही, त्यांना आरक्षणातून वगळायचे म्हणजे नेमके काय करायचे? कृपया खुलासा व्हावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Tue, 12/07/2010 - 02:55 नवीन
वाइल्ड थॉट आहे. माझा मुद्दा शैक्षणिक आरक्षणाला लागू आहे. आजच्या परिस्थितीत एखाद्याला इंजिनिअर व्हायचे असेल तर त्याला ते होता येते (कितीही कमी गुण असले तरी) कारण आज इतकी कॉलेजेस आहेत की कुठेनाकुठे प्रवेश मिळतोच. (म्हणजे आरक्षण आहे म्हणून एखाद्या खुल्या प्रवर्गातल्या मुलाला इंजिनिअर होता येत नाही अशी परिस्थिती नाही). पण त्यासाठी पैसा लागतो. म्हणजे मग प्रश्न राहतो सरकारी कॉलेजात सबसिडाइज्ड शिक्षण मिळण्याचा. दुसरीकडे क्रीमी लेयरच्या कल्पनेत ज्यांना आधी आरक्षणाचा फायदा मिळाला त्यांना तो परत परत मिळू नये आणि त्या ऐवजी दुसर्‍या गरजूस मिळावा असे अपेक्षित आहे. आता प्रश्न फक्त सबसिडाइज्ड शिक्षणाचा आणि आधी फायदा मिळालेल्याला पुन्ह फायदा मिळू नये असा असेल तर ज्याला आधी खुल्यावर्गातून सबसिडाइज्ड शिक्षण मिळाले आहे त्याच्या मुलांना सबसिडाइज्ड शिक्षण न देता दुसर्‍यांना सबसिडाइज्ड शिक्षण द्यायला हवे. उदा. माझे वडील आणि मी (खुल्या प्रवर्गातून) सबसिडाइज्ड शिक्षण घेऊन इंजिनिअर झालो. म्हणून माझ्या मुलीला सबसिडाइज्ड शिक्षण वर्ज्य असायला हवे (भले तिला ९०-९५-१००-१०५ कितीही टक्के मिळालेले असो). त्या ऐवजी आधी सबसिडाइज्ड इंजिनिअरिंग शिक्षण न मिळालेल्यांच्या मुलांना (खुल्या वर्गातील) प्रवेश मिळायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
प
पंगा Tue, 12/07/2010 - 05:19 नवीन
मुद्दा विचार करण्यासारखा आहे, पण दोन मुद्द्यांच्या तपशिलांबद्दल शंका आहे.
दुसरीकडे क्रीमी लेयरच्या कल्पनेत ज्यांना आधी आरक्षणाचा फायदा मिळाला त्यांना तो परत परत मिळू नये आणि त्या ऐवजी दुसर्‍या गरजूस मिळावा असे अपेक्षित आहे.
सध्या याची अंमलबजावणी आरक्षित वर्गांत नेमकी कशी होते? म्हणजे केवळ एखाद्या कुटुंबातील दोन पिढ्या आरक्षणाच्या आधारावर शिकल्या म्हणून त्या कुटुंबास यापुढे आरक्षण वर्ज्य, असे, की यामागे काही आर्थिक निकष आहेत?
उदा. माझे वडील आणि मी (खुल्या प्रवर्गातून) सबसिडाइज्ड शिक्षण घेऊन इंजिनिअर झालो. म्हणून माझ्या मुलीला सबसिडाइज्ड शिक्षण वर्ज्य असायला हवे (भले तिला ९०-९५-१००-१०५ कितीही टक्के मिळालेले असो). त्या ऐवजी आधी सबसिडाइज्ड इंजिनिअरिंग शिक्षण न मिळालेल्यांच्या मुलांना (खुल्या वर्गातील) प्रवेश मिळायला हवा.
आयआयटीसारख्या संस्थांमध्ये काय करावे? (नक्की खात्री नाही, पण आयआयटीमधील शिक्षण सब्सिडाइज़्ड असते, असे वाटते. नसल्यास चूभूद्याघ्या.) येथे केवळ सबसिडीचा प्रश्न नाही, तर दर्जाचाही प्रश्न आहे असे वाटते. (अनेक खाजगी इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश मिळणे शक्य असेल, परंतु आयआयटीसारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेऊ पाहणारे केवळ सब्सिडाइज़्ड शिक्षण मिळते म्हणून आयआयटीचा प्रवेश घेऊ पाहत असतील, असे वाटत नाही.) आयआयटीच कशाला, कित्येक सरकारी इंजिनियरिंग कॉलेजांचे कोणते ना कोणते विभाग दर्जेदार शिक्षणासाठी नावाजलेले आहेत. तेथे विद्यार्थी केवळ सबसिडीसाठी प्रवेश घ्यायला धावत असतील, असे वाटत नाही. उदा. कोणत्यातरी फलाण्याठिकाण्या खाजगी कॉलेजापेक्षा यूडीसीटीमधून केमिकल इंजिनियरिंग करणे हे निदान वीसपंचवीस वर्षांपूर्वी तरी होतकरू विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून (म्हणजे निदान पर्सेप्शनमधून तरी - प्रत्यक्षात माहीत नाही) श्रेयस्कर ठरले असते, आणि यात सबसिडीचा विचारदेखील त्या होतकरू विद्यार्थ्याच्या मनास शिवला असता, असे वाटत नाही. अगदी प्रस्तुत होतकरू विद्यार्थी गर्भश्रीमंत असला, खाजगी कॉलेजांची फी मागचापुढचा विचार न करता सहज परवडण्यासारखी असली, तरीही. (आणि गेल्या वीसपंचवीस वर्षांत एक तर खाजगी कॉलेजांची परिस्थिती फारच सुधारली असल्याशिवाय किंवा यूडीसीटीसारख्या संस्थांची पातळी फारच खालावली असल्याशिवाय यात आजही फार फरक पडला असावा असे वाटत नाही. अर्थात गेल्या किमान वीस वर्षांतील परिस्थितीची मला फारशी कल्पना नाही, तरीही.) येथे प्रश्न पूर्णपणे सबसिडीचा नसून पर्सीव्ड दर्जाचाही आहे, ही अडचण आहे. कदाचित एका मार्गाने याचे निराकरण करता येऊ शकेल. जर सरकारी कॉलेजांची शुल्केसुद्धा बाजारभावाएवढी केली, आणि फक्त काही टक्के जागा सब्सिडाइज़्ड ठेवल्या, तर आपण म्हणता तशी योजना शक्य आहे. पण सरकार मुळात अशी कॉलेजे एक सार्वजनिक सुविधा या तत्त्वावर चालवत असल्यामुळे सरकारी कॉलेजांतून बाजारमूल्याप्रमाणे शुल्कांची अंमलबजावणी सरकार कधी करेल का, याबद्दल निदान मी तरी साशंक आहे. मुळात सरकारने शिक्षणाच्या (किमान उच्चशिक्षणाच्या तरी) धंद्यात असावे का, हा मुद्दा पूर्णपणे वेगळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Tue, 12/07/2010 - 05:51 नवीन
मी मांडलेला मुद्दा एक वाइल्ड थॉट आहे. खुल्या वर्गातल्या होतकरूंना जवळ पैसा नसल्याने थोडे कमी गुण मिळतात आणि प्रवेश मिळत नाही या मुद्द्यावरचा उपाय म्हणून आहे. शिवाय त्याच्या डिटेलबाबत अजून फार विचार केलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 12/07/2010 - 06:23 नवीन
शिवाय त्याच्या डिटेलबाबत अजून फार विचार केलेला नाही.
करूही नका. रोगापेक्षा इलाज भयंकर वाटतो आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
प
पंगा Tue, 12/07/2010 - 06:28 नवीन
बाकी सर्व बाबी (जसे शिक्षणाचा दर्जा वगैरे) समान असता केवळ सबसिडीचा अथवा तिच्या अभावाचा (आणि म्हणूनच केवळ मूल्याचा) फरक असल्यास आपला मुद्दा योग्यच आहे. दुर्दैवाने प्रत्यक्षात तशी परिस्थिती असण्याबाबत साशंक आहे. खाजगी कॉलेज (= अधिक शुल्क) याची परिणती दर्जेदार (किंवा किमानपक्षी तितक्याच दर्जाच्या) शिक्षणात होईलच, असे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत केवळ गेल्या दोन पिढ्यांनी सरकारी कॉलेजांत शिक्षण घेतले म्हणून एखाद्या (अन्यथा पात्र) होतकरू विद्यार्थ्यास एखाद्या नावाजलेल्या परंतु सरकारी (पर्यायाने सब्सिडाइज़्ड) कॉलेजात प्रवेश नाकारणे उचित ठरणार नाही. (सबसिडी नाकारल्यास, म्हणजेच बाजारभावाने फी लावल्यास, समजण्यासारखे आहे, पण प्रवेशच नाकारणे योग्य वाटत नाही. अशा विद्यार्थ्यास खाजगी कॉलेजचा पर्याय तरीही राहील, खाजगी कॉलेजची फी परवडण्यासारखीही असेल कदाचित, पण कोणीही-उठतो-खाजगी-कॉलेज-काढतो-च्या जमान्यात त्या खाजगी पर्यायाचा दर्जा जर खूपच कमी असेल, तर केवळ पाठच्या दोन पिढ्या सरकारी कॉलेजात शिकल्या म्हणून अशा विद्यार्थ्यास दर्जेदार शिक्षण नाकारणे हे काउंटरप्रॉडक्टिव ठरेल. अर्थात सगळीच खाजगी कॉलेजे ही टाकाऊ असतात असे म्हणण्याचा उद्देश नाही, पण तरीही. त्याऐवजी अशा विद्यार्थ्यास सदर नावाजलेल्या सरकारी कॉलेजात प्रवेश दिला, पण बाजारभावाप्रमणे मजबूत फी आकारली, तर त्या विद्यार्थ्यावरही अन्याय होणार नाही, आणि क्रीमी लेयरचाही कार्यभाग साधेल, असे वाटते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
श
शैलेन्द्र Mon, 12/06/2010 - 18:33 नवीन
अत्यंत किचकट व जिवघेणा विषय... मुळात आरक्षण आहे साधारण ४०-४५% जागांवर, आणि ज्यांना आरक्षण आहे त्यांची लोकसंख्या यापेक्षा कितीतरी जास्त आहे. तरी आरक्षणाचा फायदा का होतो? कारण या समाजातुन स्पर्धक कमी असतात. कारण काय? इतका मोठा जनसमुह नालायक आहे असे मानायला मी अजिबात तयार नाही, फक्त आज सक्षमतेच्या ज्या फुटपट्ट्यांनी आपण गुणवत्तेचे मोजमाप करतो त्यात ते कमी पडतात. ही सक्षमता मीळेल अशी परीस्थीती त्यांना लाभली नाही. शैक्षनीक यशासाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा एक वातावरण हवे असते. तसे वातावरण येवढ्या मोठ्या समुदायाच्या वाट्याला का आले नाही? नोकरी अंतर्गत आरक्षण अजिबात नसावे पण शैक्षणीक व रोजगार यंत्रणेत प्रवेश मिळवण्यासाठी त्याची आजही गरज आहे. मागे आमच्या मित्रांत हाच वाद एकदा झाला होता, "लेले" आडनावाच्या एका अस्सल चितपावनाने मांडलेला मुद्दा परत मांडतो, तो म्हणाला होता, जोवर जन्माच्या एकमेव आधारावर, ब्राम्हन समाज, "पौरोहीत्य" या व्यवसायाचे आरक्षण उपभोगतो तोवर, इतर कोणत्याही आरक्षणावर बोलायचा आपल्याला हक्क नाही.
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Tue, 12/07/2010 - 09:01 नवीन
"पौरोहित्य" ह्या शाखेला असलेलं तथाकथित आरक्षण हे कायद्याने मिळालेलं नाही. त्यामुळे सरकारी नोकरीत आरक्षणाने जागा राखीव ठेवणे आणि ब्राम्हणेतरांना पौरोहित्य करू न देणे ह्यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टींची तुलना अतिशय अयोग्य आहे. हे लेल्यांनाही सांगा. आजकाल अनेक ब्राम्हणेतर लोकंही पौरोहित्य करू लागली आहेत. आणि जुन्या काळी पौरोहित्य केवळ इतर समाजातील लोकांसाठीच नव्हे तर मुंज न झालेले ब्राम्हण आणि ब्राम्हण स्त्रिया ह्यांच्यासाठीही वर्ज्य होतं. मंत्रोच्चारात सगळ्यात जास्त महत्व शब्दोच्चारांना असतं. तसे योग्य शब्दोच्चार करू शकणारी कोणतीही व्यक्ती पौरोहित्य करण्यास समर्थ आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. अशुद्ध उच्चार असलेले गुरुजी कोण खपवून घेईल? ब्राम्हणेतर व्यक्ती तरी असे गुरूजी बोलावतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
प
परिकथेतील राजकुमार Tue, 12/07/2010 - 09:39 नवीन
अदिभौशी सहमत आहे. मुळात अनेक समाजात पौरोहित्य (ह्यात मी लग्न लावण्यापासुन ते अंत्यविधी पर्यंत सर्व विधी पकडले आहेत) हे ब्राम्हणाकडून न होता त्या त्या समाजातील पुरोहिताकडुन केले जाते. आमचे आरक्षण उपभोगणारे एक मित्रवर्य कायम म्हणायचे, "बामणांनी मांस-मटण महाग करुन ठेवलय आन आम्ही शिक्षण."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
श
शैलेन्द्र Tue, 12/07/2010 - 10:57 नवीन
""पौरोहित्य" ह्या शाखेला असलेलं तथाकथित आरक्षण हे कायद्याने मिळालेलं नाही. त्यामुळे सरकारी नोकरीत आरक्षणाने जागा राखीव ठेवणे आणि ब्राम्हणेतरांना पौरोहित्य करू न देणे ह्यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टींची तुलना अतिशय अयोग्य आहे." लेल्यांचे मत मला पुर्ण पटले असे नव्हे, पण,कायद्यापेक्षाही प्रभावी अस सामाजीक दडपण असताना कायदा करायची गरजच काय? "आजकाल अनेक ब्राम्हणेतर लोकंही पौरोहित्य करू लागली आहेत. आणि जुन्या काळी पौरोहित्य केवळ इतर समाजातील लोकांसाठीच नव्हे तर मुंज न झालेले ब्राम्हण आणि ब्राम्हण स्त्रिया ह्यांच्यासाठीही वर्ज्य होतं." असे किती जण आहेत? शेकडा ०.१% ? अपवादाने नियमच सिध्द होतात. दुसरे, करु शकणे आणी करण्याची संधी उपलब्ध करुन देणॅ यात फरक आहे. ज्यांनी पौरोहीत्य करण्याची संधी इतरांकडुन हिसकावुन घेतली त्यांनीच पुढाकार घेवुन ह्या वर्गाला यात सामावुन घ्यायला हवे. "चातुर्मासात लग्न केली तर चालतील, बदलत्या काळानुसार ते धर्मसंमत आहे", असे ठराव करायला एकत्र येणार्‍या धर्म मार्तंडांनी या बाबत काय पुढाकार घेतला? "मंत्रोच्चारात सगळ्यात जास्त महत्व शब्दोच्चारांना असतं. तसे योग्य शब्दोच्चार करू शकणारी कोणतीही व्यक्ती पौरोहित्य करण्यास समर्थ आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. अशुद्ध उच्चार असलेले गुरुजी कोण खपवून घेईल? ब्राम्हणेतर व्यक्ती तरी असे गुरूजी बोलावतील का?" तोतर्‍या भटजींची किती ऊदाहरणे देवु? गर्दीच्या वेळी चालवुन घ्याव लागत. माझ्या स्वता:च्या घरी गणपतीला येणारे गुरुजी प्रकांडपंडीत किंवा विद्या-वाचस्पती नाहीत, पण त्या वेळी इतर कुणी मिळत नाही. खरंतर हल्ली या पेशात यायची कुणाचीच इच्छा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
आ
आदिजोशी Tue, 12/07/2010 - 11:16 नवीन
पण, कायद्यापेक्षाही प्रभावी अस सामाजीक दडपण असताना कायदा करायची गरजच काय? कायद्याबद्दल बोलताना कायद्यात बसणार्‍या गोष्टींबद्दल चर्चा करावी. माझ्या मते सामाजीक दडपण ही "पत्रिका जुळत नाही" सारखी सोयिस्कर पळवाट आहे. दुसरे, करु शकणे आणी करण्याची संधी उपलब्ध करुन देणॅ यात फरक आहे. संधी उपलब्ध होणे हे ब्राम्हणांच्या हातात राहिले आहे काय? ३% लोक ह्याबाबत समाजात दबाव निर्माण करू शकतात का? जे पुरोहितांना घरी बोलावतात तो समाज नक्कीच जास्त मोठा आहे. संख्याबळाच्या दृष्टीने ब्राम्हण नगण्य आहेत. इतरांनी जर आपल्यातलेच गुरुजी बोलवायचे असं ठरवलं तर ब्राम्हणेतरांना संधी का मिळणार नाहीत? आणि ते जर असं करत नसतील तर तो दोष ब्राम्हणांचा आहे का? खरंतर हल्ली या पेशात यायची कुणाचीच इच्छा नाही खरं बोललात. पण मग असे असताना ह्या संदर्भातले लेल्यांचे उदाहरण, जे तुम्हाला स्वतःलाही पूर्णपणे पटलेले नाही, ते इथे देऊन नेमका काय मुद्दा मांडायचा प्रयत्न होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
श
शैलेन्द्र Tue, 12/07/2010 - 11:44 नवीन
"खरं बोललात. पण मग असे असताना ह्या संदर्भातले लेल्यांचे उदाहरण, जे तुम्हाला स्वतःलाही पूर्णपणे पटलेले नाही, ते इथे देऊन नेमका काय मुद्दा मांडायचा प्रयत्न होता." मुद्दा हाच की आपण सगळे स्वार्थी आहोत, जे हातात आहे ते कोणीही सोडणार नाही, ब्राम्हण असो कि दलित कि इतर कुणी. जे आरक्षण आज ज्यांच्या हातात आहे ते कोणत्याही नैतीक अनैतीक कारणासाठी ते सोडणार नाही. समाज म्हणुन आपण सगळे दांभिक आहोत. सो, ज्याची जितकी ताकद, तो तितका ओरबाडुन घेणार, वांझोट्या चर्चा करण्यात अर्थ नाही. "कायद्याबद्दल बोलताना कायद्यात बसणार्‍या गोष्टींबद्दल चर्चा करावी. माझ्या मते सामाजीक दडपण ही "पत्रिका जुळत नाही" सारखी सोयिस्कर पळवाट आहे." कित्येक गोष्टी कायदा नसतानाही पाळल्या जातात किंवा कायदा असुनही पाळल्या जात नाही. सामाजिक दडपणाला इतक कमी नका लेखु..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
आ
आदिजोशी Tue, 12/07/2010 - 16:51 नवीन
परत घोळ घालताय. जर मी ठरवलं की आरक्षीत जागेवर नोकरी मिळवायची तर ते मला कदापी शक्य नाही, कितीही गुणवत्ता असली तरी. पण जर एखाद्याने ठरवलं की पौरोहित्य शिकून तो व्यवसाय म्हणून स्विकारायचा तर त्याला ते शक्य आहे. हाच फरक मी दाखवून देऊ इच्छितो. आता त्या पुरोहिताला समाज स्विकारतो की नाही हा पुढचा प्रश्न आहे. पण सुरुवात तर करू शकतो. पण आरक्षणामुळे लायक व्यक्तींना लायकी नसलेल्या व्यक्तीच्या हाताखाली काम करावे लागणार असेल तर त्याचा गुणवत्तेवर परिणाम होणार नाही का? आणि ह्याच कारणामुळे प्रायव्हेट सेक्टर वाल्यांनी नोकर्‍यांमधे आरक्षण देण्याच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
श
शैलेन्द्र Tue, 12/07/2010 - 17:56 नवीन
"परत घोळ घालताय. जर मी ठरवलं की आरक्षीत जागेवर नोकरी मिळवायची तर ते मला कदापी शक्य नाही, कितीही गुणवत्ता असली तरी. पण जर एखाद्याने ठरवलं की पौरोहित्य शिकून तो व्यवसाय म्हणून स्विकारायचा तर त्याला ते शक्य आहे." चुक कोणत्याही जागा १००% आरक्षीत नसतात, उदा. शिक्षकाच्या १० जागा असतील तर त्यात ४ आरक्षीत असतात, म्हणुन जर तुम्हांला शिक्षक व्हायचे असेल तर गुणवत्तेच्या जोरावर तुम्ही नक्किच होवु शकता. "आता त्या पुरोहिताला समाज स्विकारतो की नाही हा पुढचा प्रश्न आहे. पण सुरुवात तर करू शकतो." इथेच तर खरी गम्मत आहे, ५०-६० वर्षापुर्वी नोकरी धंद्याच्या निमीत्ताने मुख्य प्रवाहात येवु पाहणार्‍या उपेक्षीतांच्या पहिल्या पिढीने हा भेदभाव पुरता भोगलाय (आज अनेक ठीकानी गंगा उलट वाहतीय तो भाग अल्हीदा), बढतीमधील आरक्षण याच प्रकाराने सुरु झाले. "पण आरक्षणामुळे लायक व्यक्तींना लायकी नसलेल्या व्यक्तीच्या हाताखाली काम करावे लागणार असेल तर त्याचा गुणवत्तेवर परिणाम होणार नाही का?" हॅ हॅ, तुमचा आवेश असा आहे जणु आरक्षण घेणारे सगळे नालायल असतात वा बढतीवर परीणाम करणारा आरक्षण हा एकच घटक आहे. सरकारी नोकरीतील बरीच प्रमोशन "टाइम बाउंड" असतात, आरक्षण ही एक शीडी नक्किच आहे पण विना आरक्षण हेड क्लार्क किंवा डेप्युटी अकाउंटंट झालेली व्यक्ती ३-४ वर्ष जुन्या रंगरुटाहुन फार श्रेष्ट असते असे नाही. परफॉरमन्स हा निकष सरकारी नोकरीत फार कमी वेळा असतो. खाजगी नोकर्‍यात तर आरक्षण नाही, मग सगळेच बॉस आपल्यापेक्षा जास्त कर्तब्गार असतात का? "आणि ह्याच कारणामुळे प्रायव्हेट सेक्टर वाल्यांनी नोकर्‍यांमधे आरक्षण देण्याच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला" आरक्षण ही "आयडीयल" सिस्टीम नक्किच नाही, पण समाजातील सर्व घटकांना विकासाची संधी देण्याच्या दृष्टीने उपलब्ध व राबवता येणार्‍या पर्यांयांपैकी तो "कदाचीत" सर्वोत्तम पर्याय आहे. खाजगी क्षेत्राने त्याला विरोध करणे स्वाभावीक आहे, कारण सामाजीक बांधीलकीसाठी, आपल्या नफ्यावर परीणाम करुन घेणे त्यांना परवडणारे नाही. तशी अपेक्षाही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
ल
लॉरी टांगटूंगकर Mon, 12/06/2010 - 18:37 नवीन
सध्या आरक्षण ठेवून क्रीमी लेयर काढण्याची तडजोड झाली आहे ती योग्य आहे असे मला वाटते पण क्रीमी लेयर खुल्यावर्गातही लागू करावा असे माझे मत आहे. मान्य आहे .पण क्रीमी लेयर मर्यादा बरीच वर आहे असे वाटते (दारिद्र्या रेषेशी तुलना करता)आणि मा.भुजबळ वगैरे अजून वर नेण्याच्या गोष्टी करतात .आणखी म्हणजे या वर्गातील एका गट आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे .आणि दुसरा त्याच (दुर्दैवी) परिस्थितीत आहे . क्रीमी लेयर खुल्यावर्गातही लागू करावा असे माझे मत आहे.---हे पूर्ण मान्य
  • Log in or register to post comments
ड
डावखुरा Mon, 12/06/2010 - 18:43 नवीन
>>>सर्वांना समान संधी आणि कोणत्याही प्रकारे भेदभाव नसावे हे एक आदर्श तत्त्व म्हणून योग्य आहे. परंतु ते तत्त्व अंमलात आणण्यासाठी स्पर्धा समान व्यक्तींमध्ये आहे हे तपासायला हवे. उदा मुष्टीयुद्धाची स्पर्धा घेताना ७५ किलो वजनाच्या स्पर्धकाची ५० किलो वजनाच्या स्पर्धकाशी मॅच ठेवत नाहीत. त्यांचे वेगवेगळे गट ठेवून वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. >> थत्ते काका हे पटतंय हो.. १]पण आता हे आरक्षण जातीवरुन होते की आर्थिक परिस्थितिवरुन.. २]हे आरक्षण फक्त बौद्ध समाजापुरता मर्यादित होते की सगळ्या समाजातील भरडलेल्यांसाठी? >>>>>"१० वर्षांनी रिव्ह्यूचे" वक्तव्य अजिबात आरक्षण नको असे म्हणणारे आणि आरक्षण हवे म्हणणारे यांच्या मधील तडजोड म्हणून आले असावे.>>>>> हं हे एकवेळ असु शकते.. कारण हा निर्णय समितीद्वारे चर्चा घडुनच झालेला असला पाहीजे.. खरोखर किती वर्षे समानता निर्माण व्हायला आवश्यक आहेत? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरंच.. थत्ते काका आता मतांकरिता राज्कारण होते आणि त्या घटनेतील तरतुदीचा गैरवापर होताना दिसुन येतो..पण एक विचार करुन पहा डॉक्टर आंबेडकर हे संघर्षतुन वर आले ते भारताच्या घटनेचे शिल्पकार बनले.. पण त्यांना ती प्रतिकुल परिस्थिती होती म्हणुन त्या परिस्थीती शी झगडण्याची प्रेअरणा मिळुन ते अनेक संघर्ष करत वर आले.. त्यामुळे मला तुमचा हा आरक्षण नसताना ह्या लोकाना पुढे यायची संधी मिळाली नसती हे जरा पटत नाही पण हे माझे मत आहे.. आणि आरक्षण देउन्ही किती फरक पडला आहे हे तर आपल्या डोळ्यासमोर आहेच...तथाकथित १० वर्ष मुदतीचे आरक्षण आता साठ वर्ष होउनही आपले उद्दिष्ट्य साध्य करु शकले नाही आणि अजुन क्लिष्टच होत आहे.. आरक्षित लोकाना फक्त चैत्यभुमीवर जाण्यात धन्यता वाटते असे दिसुन येते.... तिथे जाताना होणारे प्रकार मांडुन मी ह्या प्रतिसादाला स्फोटक रुप देउ ईच्छित नाही.. आणि क्रिमिलेयर हा काय प्रकार आहे..? (कृपया जरा विस्तृत माहीती कुठे उपलब्ध असेल तर दुवा ) आणि जातीचा दाखला असुन ही त्याला दरवर्शी वॅलिडिटी ची गरज का की दरवर्षी जात बदलणार आहे... पण साला ही जातच का.. गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश द्या .. मग तो आरक्षित जातीतील असो किंवा अनारक्षित... >>>>>>>>>एकीकडे घटनेत आरक्षण देण्याबरोबरच समाजातली जातपात आणि भेदभाव नष्ट व्हावेत आणि उच्चवर्गीयांनी मागासांना मनःपूर्वक आपले मानून व्यवहार करावा अशीही अपेक्षा नव्हती.>>>> अशी अपेक्षा नवह्ती ?????? मग कशी होती?? माझ्यामते हे भेदभेदाची दरी मिटुन सलोखा, समानता स्थापन व्हावा ह्या दॄष्टीकोणातुन हे आरक्षण जन्माला आले असेल... आणि माझ्या वाचनात असे आले आहे की दर १० वर्षानंतर ह्या आरक्षणाचा काय परिणाम समाजावर झाला आहे याचा आढावा घेउन त्या निष्कर्षाच्या आधारे ही आरक्षण पद्धती पुढे परत क्चालु ठेवायची की नाही ही तर्तुद आहे .. पण तसे काही झालेले दिसुन येत नाही.. उलट एकगठ्ठा मतांसाठी....त्यांचा विकास त्यांना गोंजारुन व सुविधांच्या नावाखाली त्यांचा विकास खूंटवुन त्यांना निवड्णुका जवळ आल्या की गोंजारण्याचे धोरण आपल्या राजकीय शिलेदारांनी अंगिकृत केल्याने दिसुन येते.. यावर आपले मत काय? लालसा
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 12/06/2010 - 18:53 नवीन
"१]पण आता हे आरक्षण जातीवरुन होते की आर्थिक परिस्थितिवरुन.. २]हे आरक्षण फक्त बौद्ध समाजापुरता मर्यादित होते की सगळ्या समाजातील भरडलेल्यांसाठी?" नक्किच जातीवरुन, मला वाटत, तुंम्ही स्वता:च जरा वाचन करुन माहिती काढा. "पण साला ही जातच का.. गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश द्या .. मग तो आरक्षित जातीतील असो किंवा अनारक्षित..." गुणवत्ता कशी मोजायची? रघुनाथ माशेलकर वा नरेंद्र जाधवांबरोबरच डॉक्टरेट केलेले अनेक आहेत, ते तितकी उंची का गाठु शकले नाही? एखाद्याची किंमत तो माणुस कुठे पोचला यावर ठरत नसुन तो कुठुन आला यावर ठरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा
आ
आजानुकर्ण Tue, 12/07/2010 - 17:55 नवीन
उलट एकगठ्ठा मतांसाठी....त्यांचा विकास त्यांना गोंजारुन व सुविधांच्या नावाखाली त्यांचा विकास खूंटवुन त्यांना निवड्णुका जवळ आल्या की गोंजारण्याचे धोरण आपल्या राजकीय शिलेदारांनी अंगिकृत केल्याने दिसुन येते..
आरक्षित समाजाची अशी एकगठ्ठा मते आहेत असे वाटत नाही. किंबहुना इथल्या अनेकांचा रोख नवबौद्धांवर आहे, त्यांचे डेडिकेटेड असे किमान १४ नेते व तितकेच पक्ष आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा
स
सुहास.. Mon, 12/06/2010 - 19:04 नवीन
घाई करतो आहेस असे वाटले, ( दरवर्षीप्रमाणे ) अजुन प्रतिसादांची वाट बघत आहे . सोशल इजिंनयिरिंग कोळुन प्यालेला वाश्या
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 12/06/2010 - 19:10 नवीन
"घाई करतो आहेस असे वाटले," झोप आलिय हो... " एकवेळ वडापावची गाडी लावेन, पण सर्कारी नौकरी करणार नाही." मस्त, आपण पण हेच केलं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
आ
आदिजोशी Tue, 12/07/2010 - 06:13 नवीन
१. आरक्षण आर्थिक परिस्थिती वर आधारित असावे. २. जातीवर आधारीत आरक्षण असेल तर ते एका व्यक्तीला आयुष्यात एकदाच मिळावे. शिक्षण घेताना आरक्षण, नोकरी मिळताना आरक्षण आणि ह्यावर कडी म्हणजे प्रत्येक पदोन्नतीच्या वेळीही आरक्षण असा विनोदी प्रकार आहे. शिक्षण घेताना आरक्षण समजू शकतो. नोकरी मिळताना आरक्षण दिले तरी एकवेळ चालवून घेता येईल. पण पदोन्नतीने येणार्‍या जबाबदार्‍या आणि निर्णय क्षमता केवळ जातीमुळे एखाद्या माणसात लवकर कशी येते हे आकलना पलिकडे आहे. चतूर्थश्रेणी कामगार म्हणून सुरुवात करून हेड-क्लार्कच्या पदावर आरक्षणाच्या जोरावर १५ वर्षात पोचलेल्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली २०-२२ वर्ष अनुभव असलेल्या व्यक्ती काम करत असल्याचे भयानक चित्र स्वतः बघितले आहे.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 12/07/2010 - 11:32 नवीन
जातीवर आधारीत आरक्षण असेल तर ते एका व्यक्तीला आयुष्यात एकदाच मिळावे. त्रिवार सहमत. चतूर्थश्रेणी कामगार म्हणून सुरुवात करून हेड-क्लार्कच्या पदावर आरक्षणाच्या जोरावर १५ वर्षात पोचलेल्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली २०-२२ वर्ष अनुभव असलेल्या व्यक्ती काम करत असल्याचे भयानक चित्र स्वतः बघितले आहे. गुड. आणि आशा करतो की हेदेखील बघितले असेल की हेड क्लार्क ला डोंबलाचं काहीच येत नसते आणि त्याला काही येणे हे तसे अपेक्षितही नसते. सगळे काम हाताखालचा माणूस करत असतो (जर तो आरक्षणाने तिथे पोचलेला नसेल तर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
अ
अब् क Tue, 12/07/2010 - 07:21 नवीन
चतूर्थश्रेणी कामगार म्हणून सुरुवात करून हेड-क्लार्कच्या पदावर आरक्षणाच्या जोरावर १५ वर्षात पोचलेल्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली २०-२२ वर्ष अनुभव असलेल्या व्यक्ती काम करत असल्याचे भयानक चित्र स्वतः बघितले आहे. अगदि हेच!!!!!!!!
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 12/07/2010 - 07:43 नवीन
असहमत. त्यात भयानक काय आहे हे कळले नाही. १५ वर्षात केवळ आरक्षणामुळेच ती व्यक्ती हेडक्लारक झाली काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अब् क
छ
छोटा डॉन Tue, 12/07/2010 - 07:53 नवीन
>>१५ वर्षात केवळ आरक्षणामुळेच ती व्यक्ती हेडक्लारक झाली काय? थत्तेचाचा, ही 'आरक्षणामुळे' नावाची शक्यता चुक आहे काय ? असे घडु शकत नाही काय ? तुम्ही अशी उदाहरणे पाहिली नाहीत काय ? बाकी शिक्षणसंस्थात आणि अ-कुशल कामात 'आरक्षण असावेच' ह्या मागणीचा मी समर्थक आहे, मात्र त्या कुबड्या प्रमोशन आणि इतर फायद्यांसाठी वापरण्यासंबंधी आरक्षण आणणे हे मला पटत नाही. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Tue, 12/07/2010 - 08:01 नवीन
>>मात्र त्या कुबड्या प्रमोशन आणि इतर फायद्यांसाठी वापरण्यासंबंधी आरक्षण आणणे हे मला पटत नाही मलाही पटत नाही. मी प्रश्न विचारण्याचे कारण १५ वर्षे हा फार लहान कालावधी नाही. कोणत्याही कंपनीत देखील १५ वर्षे अनुभव असलेले लोक २०-२० वर्षे अनुभव असलेल्यांचे बॉस असल्याचे आपण पाहतो. तेव्हा तो हेडक्लारक झाला तो केवळ आरक्षणामुळेच झाला की कसे हे तपासून पहायला हवे असे वाटते. कंपॅरिझन ४-५ वर्षे आणि २०-२२ वर्षे अशी असती तर आरक्षणामुळेच हे मान्य केले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Tue, 12/07/2010 - 08:17 नवीन
बहुतेक तपशीलात गोंधळ होतो आहे. मुळ प्रतिसादात त्यांना 'सरकारी क्षेत्र ( की जेथे 'आरक्षण' असते )' अपेक्षित असावे असे वाटते, कारण सध्याही खासगी क्षेत्रात आरक्षण नाही त्यामुळे त्याचा फायदा घेऊन बढती मिळवण्याचा प्रश्नच नाही. असो, सरकारी क्षेत्रात ( इथे सरकारी, निम-सरकारी, सरकारी अखत्यारीत येणार्‍या इत्यादी इत्यादी सेवा ) ही बाब सहज शक्य आहे असे वाटते. खासगी क्षेत्रात मात्र असे घडेल किंवा नाही ह्यावर नक्की असे सांगता येणार नाही, तुम्ही म्हणता ते 'कोणत्याही कंपनीत देखील १५ वर्षे अनुभव असलेले लोक २०-२० वर्षे अनुभव असलेल्यांचे बॉस असल्याचे आपण पाहतो' हे उदाहरण योग्य आहे पण तितकेच 'चतुर्थश्रेणी कामगाराचे हेडक्लार्कच्या पोस्टपर्यंतचे ( किंवा हापिस बॉयचे प्रोजेक्ट मॅनेजर / डिलिव्हरी मॅनेजर ) प्रमोशन हे तितके सहज नजरेस पडणारे नाही असे मला वाटते, अर्थात अपवाद असु शकतो व सध्यातरी तो माझ्या पाहण्यात नाही. ट्रेनी म्हणुन जॉइन झालेला माणुस व्हाईस प्रेसिडेंट झालेला मी पाहिला आहे पण म्हणुन मशिनिस्ट किंवा हेल्पर बॉयला हे शक्य असेल असे वाटत नाही. त्यामुळे मुळ प्रतिसादात त्यांना 'सरकारी क्षेत्र'च अपेक्षित असावे असे वाटते आणि तिथे असणार्‍या आक्षरण तसेच बढतीच्या इतर नियमांमुळे उपरोक्त बाब सहज शक्य आहे असे मी मानतो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Tue, 12/07/2010 - 08:21 नवीन
सरकारी क्षेत्रात आरक्षणामुळे शक्य आहे हे मान्यच आहे. फक्त ते तसेच आहे याची खात्री करून घेतली का? एवढाच मूळ प्रतिसादकाला प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
आ
आदिजोशी Tue, 12/07/2010 - 08:36 नवीन
फक्त ते तसेच आहे याची खात्री करून घेतली का? हा प्रकार सरकारी नोकरीतच घडलेला आहे. प्रमोशन मिळालेली व्यक्ती आणि हाताखाली काम करणारी व्यक्ती ह्या दोघांशीही माझी ओळख आहे. तसंच प्रमोशन मिळालेल्या व्यक्तीला केवळ जातीमुळेच ते मिळालं आहे ह्याचीही खात्री करून घेतली आहे. तसेच दोघांचेही शिक्षण समान असल्याचीही करून घेतली आहे. अजून काही शंका? अवांतरः प्रमोशन मिळालेल्या व्यक्तीने खासगीत बोलताना ह्या प्रकाराचा उल्लेख "काय **गिरी आहे ही. ज्यांच्याकडून अकाउंटच्या एंट्री शिकलो आज त्यांनी बनवलेल्या फाईल्स तपासतोय." असा केला आहे. पण ही **गिरी असूनही ती नाकारली मात्र नाही. आहे की नाही आरक्षणाची गंमत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नितिन थत्ते Tue, 12/07/2010 - 08:38 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद. शंका मिटली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
आ
आदिजोशी Tue, 12/07/2010 - 08:43 नवीन
शंकानिरसन होण्याआधी मताची पिंक का टाकली जावी ही शंका आता मला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अवलिया Tue, 12/07/2010 - 09:05 नवीन
सवय ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा