Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक प्रश्न

श
शिल्पा ब
Mon, 12/06/2010 - 09:18
🗣 108 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
23013 वाचन

💬 प्रतिसाद (108)
न
नितिन थत्ते Tue, 12/07/2010 - 09:57 नवीन
मताची पिंक टाकली नव्हती. शंका विचारली होती. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी अवांतर कारणे सांगण्याची माणसांची प्रवृत्ती असते. खाजगी क्षेत्रात "साहेबाच्या पुढे पुढे करणे" हे कारण सांगितले जाते तसे सरकारी क्षेत्रात आरक्षण हे पटण्यासारखे कारण म्हणून वापरले जाऊ शकते म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
आ
आदिजोशी Tue, 12/07/2010 - 10:04 नवीन
असहमत. हे मत नाही काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
आ
आदिजोशी Tue, 12/07/2010 - 07:30 नवीन
आमच्या शाळेला सरकारची ग्रँट मिळाली म्हणून शिक्षकांची काही रिक्त पदे आरक्षणातून भरली गेली. नववी सारख्या महत्वाच्या वर्षात आम्हाला मराठी शिकवायला आलेले सर मराठीचा येता जाता मर्डर करत असत. प्रमाणित मराठी योग्य की अयोग्य ह्या वादात पडायचे नाही. पण मार्क्स मिळवण्यासाठी पुस्तकातील मराठीच पेपरात लिहावी लागते. पेपरात आनी, पानी लिहिलं की शुद्धलेखनाचे मार्क कापले जातात. महत्वाचे म्हणजे हेच सर आम्हाला पि.टी.ला सुद्धा होते. आहे की नाही आरक्षणाची गंमत :)
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 12/07/2010 - 07:44 नवीन
शाळेच्या व्यवस्थापनाने मिस्चिफ केली असणे शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 12/07/2010 - 08:32 नवीन
मान्य आहे. आमच्या शाळेनेही हीच मिस्चिफ केली होती. खात्री करून घेऊ शकता. ;) अजून बर्‍याच शाळा ही मिस्चिफ करतात असेही ऐकून आहे. आजकाल तर ब्वॉ शाळाच मुलांपेक्षा खोडकर झाल्यात!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
आ
आदिजोशी Tue, 12/07/2010 - 08:40 नवीन
हो ना बिका भाऊ. अनेक शाळा असा खोडकरपणा करतात. आणि मुलं पण पेपरात अशुद्ध लिहायचे सोडून शिक्षकांविरूद्ध तक्रार करतात. सगळाच खोडकरपणा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
आ
आदिजोशी Tue, 12/07/2010 - 08:41 नवीन
शाळेच्या व्यवस्थापनाने मिस्चिफ केली असणे शक्य आहे भयानक विनोदी आणि विरोधासाठी विरोध म्हणून अविचारपूर्वक देण्यात आलेला एक भन्नाट प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
अ
अवलिया Tue, 12/07/2010 - 09:05 नवीन
भयानक विनोदी आणि विरोधासाठी विरोध म्हणून अविचारपूर्वक देण्यात आलेला अजुन एक भन्नाट प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 12/07/2010 - 09:07 नवीन
चुकून अतिविचारपूर्वक असे वाचले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
आ
आजानुकर्ण Tue, 12/07/2010 - 18:06 नवीन
मला वाटते, त्या शिक्षकांची कोअर कॉम्पिटन्सी मराठी असूनही शाळेच्या गरजेपोटी (पुरेशा शिक्षकांची अनुपलब्धता वगैरे) त्यांनी पीटी शिकवण्याचीही जबाबदारी स्वीकारली. याला टेकिंग इनिशिएटिव किंवा "कॉन्ट्रिब्युटिंग बियाँड स्कोप ऑफ वर्क" असे म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
आ
आदिजोशी Wed, 12/08/2010 - 05:56 नवीन
त्या शिक्षकांची कोअर कॉम्पिटन्सी मराठीच होती पण ती मार्क मिळवून देणारी नव्हती. त्यांनी पिटी शिकवून शाळेवर उपकारच केले पण फक्त पिटी शिकवली असती तर विद्यार्थ्यांवरही उपकार झाले असते. भोकनीच्या, आगं बोंबल की जोरानं काय मुळू मुळू बोलतियास, हानंन एक थोबाडात, इत्यादि गोड मराठी शब्द त्यांच्या तोंडून ऐकत ऐकत आमचं मराठी ज्ञानविश्व समॄद्ध झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
म
मृत्युन्जय Wed, 12/08/2010 - 06:11 नवीन
भोकनीच्या, आगं बोंबल की जोरानं काय मुळू मुळू बोलतियास, हानंन एक थोबाडात, इत्यादि गोड मराठी शब्द त्यांच्या तोंडून ऐकत ऐकत आमचं मराठी ज्ञानविश्व समॄद्ध झालं. ही सुद्धा मराठी भाषाच आहे. माझ्यामते अश्या भाषेतले एक दोन धडे प्रत्येक वर्षी मराठी भाषेत असतात देखील. तुम्ही पुण्या मुंबैकडचे झंटलमन लोकं उगाच गावाकडच्या भाषेला नावं ठेवता. खरे म्हणजे तिच खरी भाषा. ती भाषा जास्त लोक बोलतात. राहता राहिला परीक्षेत मार्क मिळवण्याचा प्रश्न तर तुम्ही शिकता ते मार्क मिळवण्यासाठी की ज्ञान मिळवण्यासाठी. खरे ज्ञान मिळत असेल तर मार्क कमी मिळाले तर बिघडले कुठे. आपण एवढे एक्झाम ओरिएंटेड का झालो आहोत? शिवाय असे बघा कित्येक ओपन वाल्यांची मराठी पण अशुद्ध असते. उगाचा रिझर्वेशनला नावे का ठेवावीत. शिवाय त्यांचा ऊद्धार करण्यासाठी काही लोकांना नौकरी मिळाली आणि त्यामुळे काही ओपन वाल्या लोकांच्या मुलांची भाषा बिघडली (बिघडली म्हणजे काय हाही एक प्रश्न आहेच) तर बिघडले कुठे. त्यांच्या पंखात बळ मिळावे म्हणुन तुम्हाला ४-२ काटे टोचले तर एवढे का विव्हळताय? आठवा तुमाच्या समाजाने त्यांच्यावर शतकोनुशतके केलेला अन्याय. आता त्यांची पाळी आहे. आता तुम्ही सहन करा. वावगे काय त्याच्यात? शिवाय असे बघा वरती कोणितरी छान उपाय सांगितला आहेच. देश सोडुन जा. पल्याडला जास्त संधी आहेत. तुम्ही जर गुणवान असाल तर तिकडे संधी मिळतील. नसाल तर उगा कशाल बोंबा मारताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
प
परिकथेतील राजकुमार Wed, 12/08/2010 - 11:42 नवीन
भोकनीच्या, आगं बोंबल की जोरानं काय मुळू मुळू बोलतियास, हानंन एक थोबाडात, इत्यादि गोड मराठी शब्द त्यांच्या तोंडून ऐकत ऐकत आमचं मराठी ज्ञानविश्व समॄद्ध झालं.
आमचे इतिहासाचे शिक्षक 'द ग्रेट मराठा' ह्या शिवाजी महाराजांच्या इंग्रजी धड्यातील दख्खनचा उच्चार कायम डेक्कन असा करायचे. आणि आम्ही देखील तो तसाच करावा असा त्यांना आग्रह असायचा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
क
कानडाऊ योगेशु Wed, 12/08/2010 - 11:55 नवीन
ह्याबाबतच एक किस्सा .... शिक्षक पाणी ला पानी म्हणाले आणि मुले हसली. मुलांना का हसलात असे शिक्षकांनी विचारल्यावर मुले म्हणाली गुरुजी तुम्ही पानी म्हणालात पाणी नाही. गुरुजी पुढे म्हणाले बाळांनो मी पानी म्हणालो नाही मी पाSSनी म्हणालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
आ
आदिजोशी Wed, 12/08/2010 - 12:29 नवीन
हान् तिज्यायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
अ
अन्जन Tue, 12/07/2010 - 09:13 नवीन
प्रशन अर्धवट वाटतो, तो असा असावा, आंबेडकरांनी फक्त दहा वर्ष आरक्षण सांगितले होते पण नंतरच्या नेत्यांनी मत मिळवण्याच्या आशेने आत्तापर्यंत तेच चालू ठेवले आहे तो का? त्यात आताच्या इतर समाजातिल नविन पिडिचा काय दोष आहे काय?
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 12/07/2010 - 16:05 नवीन
आधी कुणीतरी मला 'भीम' आणि 'भिम' या दोन व्यक्ति होत्या का एकाच व्यक्तिची दोन नांवे आहेत हे सांगावे, त्यानंतर आरक्षणाबद्दल बोलता येईल.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 12/07/2010 - 17:52 नवीन
आरक्षण व्यवस्थेतून (बापाच्या जातीचा फायदा घेऊन) शिकून आलेले मागासवर्गीय लोक गुणवत्ताधारक नसतात आणि खुल्या प्रवर्गातील (बापाने भरलेल्या भरपूर पैशाने मिळालेल्या पेमेंट सीटवरून) शिकून आलेले लोक गुणवान असतात असा अनेकांचा सोयीस्कर गैरसमज दिसत आहे. कोणीही पेमेंट सीट स्वरूपातील आर्थिक आरक्षणाचा उल्लेखही केलेला नाही यावरून हा निष्कर्ष मी काढला आहे. असो. मागासवर्गीय लोक गुणवान नसतात याबाबत कोणतेही पुरावे किंवा आकडेवारी उपलब्ध नाही. खुल्या प्रवर्गातील मुलांना जी परीक्षा द्यावी लागते तीच मागासवर्गीयांना द्यावी लागते. दोघांचे पेपर तपासणारे शिक्षक एकच असतात. त्यामुळे गुणवत्तेचा मुद्दा अग्राह्य धरावा.
चतूर्थश्रेणी कामगार म्हणून सुरुवात करून हेड-क्लार्कच्या पदावर आरक्षणाच्या जोरावर १५ वर्षात पोचलेल्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली २०-२२ वर्ष अनुभव असलेल्या व्यक्ती काम करत असल्याचे भयानक चित्र स्वतः बघितले आहे.
यात भयानक काय आहे? चतूर्थ हा अशुद्ध शब्दच जास्त भयानक वाटला.
नववी सारख्या महत्वाच्या वर्षात आम्हाला मराठी शिकवायला आलेले सर मराठीचा येता जाता मर्डर करत असत.
आम्हाला देशपांडे आडनावाचे एक सर होते त्यांनी मर्ढेकरांची 'प्रेमाचे लव्हाळे' ही कविता शिकवताना लव्हाळे या शब्दाचा अर्थ 'लव्ह + आळे' असा सांगितला होता. या उदाहरणावरून सर्व देशपांडे गुणवान नसतात असा निष्कर्ष मी काढला नाही. थोडक्यात anecdotal पुरावे हवे तेवढे देता येतील. महाराष्ट्र - (कोल्हापूर वगैरे) व दक्षिण भारतात (म्हैसूर राज्य) इंग्रजांच्या काळापासूनच शिक्षणासाठी आरक्षण आहे. त्यामुळे सामाजिक प्रगती व एकंदर विकासास हातभार लागला आहे. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Tue, 12/07/2010 - 18:01 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ह
हुप्प्या Tue, 12/07/2010 - 20:13 नवीन
कुणी स्वतःच्या कमाईचे पैसे खर्चून पेमेंट सीट मिळवली तर त्याला जातीवर आधारित आरक्षणाच्या पंक्तीत बसवणे अत्यंत तर्कदुष्ट आहे. शिक्षणाला खर्च येतो. शिक्षकांचे पगार, वर्गातील सोयी, प्रयोगशाळेतील उपकरणे, पुस्तके, फळे, खडू सगळे काही पैशानेच विकत मिळते. पेमेंटवाल्या सीटमुळे एक मोठी रक्कम शिक्षण संस्थेला मिळते आणि ती चालवण्याकरता सरकारकडे तोंड वेंगाडावे लागत नाही. मला वाटते आपल्या देशाला जे समाजवादी बाळकडू मिळाले आहे त्यामुळे कुणी पैसेवाला असेल तर त्याला नाक मुरडणे हा एक स्थायीभाव बनला आहे. सगळेच काही पैसेवाले दुसर्‍यांचे गळे वा खिसे कापून गब्बर होत नाहीत ( ह्या वाक्याला शिंपी लोकांनी माफ करावे). अपार कष्ट, बुद्धी, प्रतिभा अशा गोष्टी वापरुनही लोक श्रीमंत होतात. आणि आपल्या मुलाच्या शिक्षणाकरता स्वतःचाच पैसा जास्त प्रमाणात खर्च करणे कमीपणाचे का समजले जावे? जातीवर आधारित आरक्षणामुळे असे काही होत नाही. शिक्षणाचा खर्च काही अचानक कमी होत नाही. प्रवेश मिळाल्यावर (बहुधा) सगळ्यांना सारख्याच परीक्षा द्याव्या लागतात. त्यामुळे त्यानंतर जे काही बरेवाईट होणार ते त्या विद्यार्थ्याच्या हातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
प
पंगा Wed, 12/08/2010 - 01:20 नवीन
बाकीचे मुद्दे पटण्यासारखे आहेत, पण...
कोणीही पेमेंट सीट स्वरूपातील आर्थिक आरक्षणाचा उल्लेखही केलेला नाही यावरून हा निष्कर्ष मी काढला आहे.
पेमेंट सीटची (आर्थिक) आरक्षणाशी तुलना तितकीशी सयुक्तिक वाटली नाही. शिक्षण ही बाजारातील एक कमॉडिटी आहे अशा दृष्टीने विचार करू. म्हणजे मागणीपुरवठा तत्त्वानुसार मूल्यनिश्चिती, ज्याला परवडेल त्याने घ्यावे, ज्याला परवडणार नाही त्याने घेऊ नये, वगैरे वगैरे. (गुणवत्ता, बारावीचे मार्क वगैरेंचा विचार केलेला नाही. एक म्हणजे बारावीचे मार्क आणि गुणवत्ता / पात्रता यांचा अर्थाअर्थी काही थेट संबंध असतोच, याबद्दल साशंक आहे, आणि दुसरे म्हणजे समजा असलाच, किंवा अन्य प्रकारे गुणवत्ता असली, तर त्याचा उपयोग फारफार तर पुढील शिक्षणाशी अधिक सुलभतेने cope up करण्यासाठी त्या विद्यार्थ्यास होऊही शकेल, पण तो त्या विद्यार्थ्याचा खाजगी मामला आहे. कमॉडिटीविश्वात आपल्याला त्याचा विचार करण्याची गरज नाही, आणि प्रवेशासाठी निकष म्हणून तर त्याच्याशी काहीच घेणेदेणे नाही. कोणीही यावे आणि खुल्या बाजारातून शिक्षण विकत घ्यावे, परवडत असेल तर उत्तम, नाही तर टफ लक - पण मूल्य हे मागणीपुरवठा तत्त्वावरच राहील. वगैरे वगैरे.) या दृष्टिकोनातून पाहिल्यास पेमेंट सीट हा वास्तविक खुला प्रवर्ग (कदाचित एकमेव खुला प्रवर्ग) ठरावा, आणि उलट (थत्त्यांनी वर म्हटल्याप्रमाणे) नॉन-पेमेंट सीट (सरकारी किंवा खाजगी, तथाकथित 'आरक्षित' किंवा तथाकथित 'खुला प्रवर्ग') या सर्वच 'आरक्षण क्याटेगरी'त मोडाव्यात. (खाजगी कॉलेजांतील 'पेमेंट सीट'च्या बाबतीत खाजगी कॉलेजची जबरदस्त फी - जी खाजगी कॉलेजांत प्रवेश घेऊ पाहणार्‍या सर्वांनाच द्यावी लागते - ही तर असतेच, शिवाय कॉलेजला देणगी हाही प्रकार असतो, अशी माझी समजूत आहे - चूभूद्याघ्या. म्हणजे खाजगी कॉलेजांत नॉन-पेमेंट सीटसाठीसुद्धा सबसिडीचा प्रश्न येणार नाही असा याला आक्षेप घेता येईल. हरकत नाही. पेमेंट सीट ही बाजाराच्या तत्त्वानुसार 'टू द हायेस्ट बिडर' विक्री आहे हे लक्षात घेता, हा खुल्या बाजाराचा, आणि म्हणूनच 'खुल्या प्रवर्गा'चा प्रकार मानता यावा, असे वाटते. उलटपक्षी तथाकथित 'आरक्षित' जागांबरोबरच तथाकथित 'खुल्या प्रवर्गा'तील जागा - खाजगी अथवा सब्सिडाइज़्ड - या तथाकथित 'गुणवत्ते'साठी - म्हणजे बारावीच्या मार्कांसाठी वगैरे - जरा कमी पैसे देऊ शकणार्‍यांसाठी आरक्षित जागा म्हणता येतील.) मुळात शिक्षण - त्यातसुद्धा खास करून उच्चशिक्षण - ही एक कमॉडिटी न मानता (१) एक मूलभूत मानवी हक्क, किंवा (२) गुणवंतांची मक्तेदारी/हक्क यांपैकी काहीही (किंवा दोन्ही) मानण्यातून हा सगळा गोंधळ आहे. मुळात शिक्षण हा कोणाचाही हक्क का असावा? त्यातसुद्धा एखादा गुणवंत आहे म्हणून त्यास काहीही करून संधी उपलब्ध करून दिलीच पाहिजे, याला काय आधार आहे? जमत असेल, परवडत असेल तर त्याने शिक्षण घ्यावे, नाही तर स्वतःच्या उन्नतीचा अन्य काही मार्ग शोधावा! कोणीही कोणालाही चरितार्थ देणे लागत नाही, सरकार तर नाहीच नाही. आणि सरकारने (स्वस्त दरात) सार्वजनिक शिक्षणाच्या धंद्यात का असावे? नाही, यातून सरकारी सब्सिडाइज़्ड शिक्षणास विरोध करण्याचा उद्देश नाही, वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजनांनाही विरोध करायचा नाही आणि आरक्षणाला तर मुळीच विरोध करायचा नाही. शिक्षण हे जितक्या जास्त जणांपर्यंत जितके अधिक पोहोचेल तितके ते समाजाच्या फायद्याचेच आहे, आणि म्हणून त्या उद्देशाने जे जे काही करता येईल किंवा केले जाईल ते ते स्वागतार्हच आहे. मात्र हे सर्व करायचे ते त्यातून समाजाचा अंततः फायदा होतो म्हणून स्वागतार्ह आहे; कोणाचा 'मूलभूत हक्क' आहे, किंवा कोणाची 'पात्रता' (आणि म्हणूनच अप्रत्यक्ष मक्तेदारी) आहे, म्हणून नव्हे, एवढेच मांडायचे आहे.
आम्हाला देशपांडे आडनावाचे एक सर होते त्यांनी मर्ढेकरांची 'प्रेमाचे लव्हाळे' ही कविता शिकवताना लव्हाळे या शब्दाचा अर्थ 'लव्ह + आळे' असा सांगितला होता. या उदाहरणावरून सर्व देशपांडे गुणवान नसतात असा निष्कर्ष मी काढला नाही.
सहमत. शुद्धलेखन, व्याकरण किंवा तर्क ही कोण्या एकाच वर्गाची मक्तेदारी नाही. उलटपक्षी, शुद्धलेखनाचा मुडदा, व्याकरणावर बलात्कार किंवा तर्काशी फारकत हीदेखील कोण्या एकाच वर्गाची मक्तेदारी नाही. पण लक्षात कोण घेतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/08/2010 - 15:18 नवीन
पंगा, तुमच्या बहुतेक सर्वच मुद्द्यांशी सहमत आहे.
कमॉडिटीविश्वात आपल्याला त्याचा विचार करण्याची गरज नाही, आणि प्रवेशासाठी निकष म्हणून तर त्याच्याशी काहीच घेणेदेणे नाही. कोणीही यावे आणि खुल्या बाजारातून शिक्षण विकत घ्यावे, परवडत असेल तर उत्तम, नाही तर टफ लक - पण मूल्य हे मागणीपुरवठा तत्त्वावरच राहील. वगैरे वगैरे.
इथे कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो. अजूनही आपल्या देशात अभियांत्रिकी क्षेत्र फार जास्त पुढारलेलं आहे असं म्हणवत नाही. (माझं म्हणणं खोटं असेल तर आनंदच आहे.) अशा वेळी देशात चांगले इंजिनियर (फक्त इंजिनियरच का, डॉक्टर, सर्वच क्षेत्रातले संशोधक, इ.इ.) तयार झाले पाहिजेत आणि ते भारतातच राहिले पाहिजेत आणि त्यांना चांगल्या संधी मिळाल्या पाहिजेत .... अभियांत्रिकी शिक्षणाला फक्त कमॉडीटी म्हणावं अशी आपल्या देशाची आज स्थिती आहे काय? पण हा प्रश्न सदर धाग्यात कदाचित अवांतर ठरावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
आ
आदिजोशी Wed, 12/08/2010 - 06:05 नवीन
मागासवर्गीय लोक गुणवान नसतात याबाबत कोणतेही पुरावे किंवा आकडेवारी उपलब्ध नाही. असं मी कुठेही म्हटलेलं नाही. मी त्या उदाहरणा संबंधात बोलत होतो. उगाच वादासाठी जनरलायझेशन नको. खुल्या प्रवर्गातील मुलांना जी परीक्षा द्यावी लागते तीच मागासवर्गीयांना द्यावी लागते. दोघांचे पेपर तपासणारे शिक्षक एकच असतात. त्यामुळे गुणवत्तेचा मुद्दा अग्राह्य धरावा. खरंय. पण खरी मजा गुण मिळाल्यावर येते. एकाला ८५% मिळूनही प्रवेश नाही आणि दुसर्‍याला ५०% मिळाले तरी आनंदाने प्रवेश. इथे प्रॉब्लेम आहे. जो आरक्षण घेतो तो खरंच मागासलेला असेल तर काहीच हरकत नाही. पण आर्थिक दृष्ट्या सबल वर्गातली मंडळी जेव्हा केवळ जात वेगळी म्हणून वेगळा सवलती मिळवतात तेव्हा त्रास होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
श
शुचि Wed, 12/08/2010 - 00:05 नवीन
कालच मी दोन चिमणे पाहीले. एक चिमणा जिथे टिपत होता तिथेच दुसर्‍याला टिपायचं होतं. बाकी ठीकाणी रान मोकळं होतं पण हे दोघं एकमेकांचं अन्नच टिपायच्या मागे लागले होते. मला हे कळत नाही आता जगभर मुबलक संधी उपलब्ध झाल्या असताना आपल्या देशातल्या आरक्षणांसाठीच भांडण्यात काय अर्थ आहे? मूव्ह ऑन!!!! __ काही चुकतय का माझं?
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 12/08/2010 - 06:45 नवीन
दोन चिमणे 'एकमेकांचं' अन्न टिपायच्या मागे लागले होते, असे निश्चित म्हणता येणार नाही. मुळात जे अन्न आहे ते 'फक्त' माझ्यासाठीच असा दोहोंपैकी कोणत्याही चिमण्याचा समज झाल्यास तो चुकीचाच आहे. ते सर्व चिमण्यांसाठी आहे. दुसरे म्हणजे समजा दुसर्‍या चिमण्याला हवे असणारे अन्न अशा रानात आहे जेथे जाण्यासाठी त्याला ठराविक बँक बॅलन्स, व्हिजादी सोपस्कार, स्थलांतरादी कर्मे इ. आवश्यक (मॅन्डेटरी या अर्थाने) ठरणार आहे नि यांपैकी एक किंवा अनेक काही कारणांनी शक्य होणारे नाही; मग त्यावेळी सध्याच्याच रानात असलेले अन्न टिपायचे प्रयत्न त्याने केले तर त्याचे काय चुकले? पण दुसर्‍या रानात जाऊन दाणे टिपणे 'सहज' शक्य असलेला पहिला चिमणा जर या रानात दाणे टिपत असेल, तर या दुसर्‍या चिमण्याचा तळतळाट अस्थानीही मानता येणार नाहीसे वाटते. मला वाटते देशातील आरक्षणाबद्दल अशीच काहीशी परिस्थिती असावी. (पक्षीप्रेमी)बेसनलाडू भारतातील ठराविक संधीसाठी स्पर्धा करणारे - एक खुल्या प्रवर्गातील नि दुसरा आरक्षित वर्गातील - भारताबाहेर कोणत्याही स्वरूपाच्या आरक्षणासाठी पात्र ठरत नसले (विशेषतः जातीवर आधारीत) तरीही नागरिकत्त्व आणि त्यायोगे मिळणार्‍या सवलतींचा लाभही ते घेऊ शकत नाही. ज्या संधी केवळ त्या त्या देशांतील नागरिकांसाठी किंवा कायमस्वरूपी राहणार्‍यांसाठी 'राखीव' आहेत, तेथे हे दोघेही स्पर्धा करू शकत नाहीत. त्यामुळे मूलतःच देशातील उपलब्ध संधी आणि इतरत्र (पक्षी देशाबाहेरच्या) उपलब्ध असलेल्या (जागतिकीकरण किंवा अन्य कारणांनी) संधी यांचा विचार समान पातळीवर करण्यात अर्थ नाही. (जागतिक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
उ
उपास Wed, 12/08/2010 - 00:39 नवीन
माफी करा पण हे ब्रेड नाही तर केक खा सांगण्यासारखे नाही का? अहो त्यातला एक चिमणा अशक्त आहे त्याच मनोबल खच्ची झालय इतक्या दशकांत.. त्याला उडण्यासाठी पंखात बळ नको का द्यायला.. त्याची शैक्षणिक, सामाजिक प्रगती नको का बघायला एकूण चिमण्यांची प्रगती व्हायला हवी असेल तर? - (चिमणा) उपास
  • Log in or register to post comments
प
पंगा Wed, 12/08/2010 - 01:44 नवीन
मला वाटते त्यांना नेमके उलट म्हणायचे असावे. म्हणजे ज्यांना केक मिळू शकतो त्यांनी केकच्या मागे (हिरव्या कुरणांकडे?) "मूव्ह ऑन" व्हावे, (आधीच तुटपुंज्या असलेल्या) ब्रेडसाठी रडत बसू नये. ब्रेडचे वाटेकरीही कमी होतील, आणि केकमागल्यांनाही समाधान मिळेल. पुढेमागे ब्रेडमागल्यांच्या पंखात बळ आले की तेही केकमागे धावतील, वगैरे वगैरे. पण सगळ्यांनी त्याच तुटपुंज्या ब्रेडसाठी भांडण्यात काय हशील आहे? (अवांतरः 'आरक्षणामुळे आमची जागा गेली' हे रडणे तितकेसे पटत नाही. एक म्हणजे कमी जागांसाठी स्पर्धा इतकी प्रचंड आहे, की जर जागा मिळाली नसेल, तर ती आरक्षण नसते तर नक्की मिळाली असती, या म्हणण्याला काहीही आधार नाही. बहुधा तरीही मिळाली नसतीच. दुसरे म्हणजे इतर संधी उपलब्ध नाहीत असेही नाही. मात्र त्यांचा उपयोग करण्याची (मानसिक) लवचिकता पाहिजे. जगातील - किंवा गेला बाजार भारतातील - सर्वांनी इंजिनियर, डॉक्टर किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर झालेच पाहिजे, आणि न झाल्यास जग बुडाले, असे काहीही नाही. डोळे उघडे ठेवल्यास संधी सहसा कोठे ना कोठे सापडते, ब्रेड मिळतो, कधीकधी केकही मिळू शकतो. जी मिळेल ती संधी घेण्याची आणि तिचा उपयोग करून घेण्याची मानसिकता मात्र पाहिजे.) थोडक्यात, 'आरक्षणाविरुद्ध बोंब मारत बसणे हे डिफीटिस्ट मनोवृत्तीचे लक्षण आणि काउंटरप्रॉडक्टिव आहे' असे त्यांना म्हणायचे असावे, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास
उ
उपास Wed, 12/08/2010 - 01:51 नवीन
छान.. असेच असावे.. पटलेच. :) काय लोभस चित्र आहे! सशक्त चिमणे केक पाठी (पक्षी: अमेरिका) उडताहेत तर विकसनशील चिमणे तेथेच (भारतात) ब्रेड खात बागडतायत... जो जे वांच्छील तो ते लाहो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
श
शुचि Wed, 12/08/2010 - 01:58 नवीन
नाही मला काय वाटतं - लेट मी ट्राय. एक तर विचार शब्दांत मांडता येत नाहीत मला. ___ बरोबर - पण हेच :) ....... जेव्हा मोठ्ठा दगड समोर येतो तेव्हा २ च पर्याय असतात त्या दगडावर डोकं फोडणे अथवा वळसा घालून मूव्ह ऑन!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास
उ
उपास Wed, 12/08/2010 - 02:10 नवीन
शुचि, २ पेक्षा अधिक पर्याय खचितच असू शकतात की.. म्हणजे दगडातून मूर्ती बनविणे.. किंवा दगड रस्त्यात असेल तर तो (एकट्याने जमत नसेल तर चार जणांनी मिळून) बाजूला करणे किंवा तेही शक्य नसेल तर वळसा घालून पुढे गेल्यावर, तो दगड तिथे आहे त्याच काही तरी करायला हवं अशी संवेदनशीलता ठेवून, जबाबदारीचे भान ठेवून त्याप्रमाणे विचार आणि कृती करायला हवी.. त्यामुळेच विश्वास आणि आनंदाचे वातावरण निर्माण होऊन समाज प्रगतिमान होईल.. मुव्ह ऑन पण डोंट रन अवे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
प
पंगा Wed, 12/08/2010 - 02:32 नवीन
एक म्हणजे आजकाल अमेरिकेत केक तितकासा उरलेला नाही. (दुरून डोंगर साजरे म्हणतात, पण) त्या मानाने आजकाल भारतात (निदान काही क्षेत्रांत तरी) केक मिळण्याची शक्यता त्या मानाने बरी असावी, असे वाटते. पण ते जाऊ द्या. केक म्हणजे अमेरिकाच असायला पाहिजे, असे काही नाही. केक कोठेही असू शकतो - भारतातसुद्धा. आणि केक ज्याला दिसू शकतो, जेथे कोठे दिसू शकतो, आणि मिळवता येतो, त्याने अशा केकमागे जाण्यात काहीही गैर नाही. (मात्र केक दिसावा लागतो.) दुसरे म्हणजे, केकमागेच धावले पाहिजे, असेही नाही. दुसरा ब्रेड दिसत असेल तर त्यामागेही धावण्यास हरकत नसावी. एकाच तुटपुंज्या ब्रेडसाठी सगळ्यांनी झगडण्यात, आणि मग 'त्याने माझा ब्रेड हिसकावला' म्हणून रडण्यात काय हशील आहे? जरा इतरत्रही बघावे - डोळे उघडे असले तर ब्रेड कोठे ना कोठे सापडावाच. 'तो ब्रेड आहे' हे ओळखण्याची नजर मात्र पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास
न
नरेशकुमार Wed, 12/08/2010 - 03:11 नवीन
जौद्या, उगा झगडु नका, ब्रेड आनि केक हलका घ्या. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
उ
उपास Wed, 12/08/2010 - 15:18 नवीन
पंगा, तुमच्या आणि शुचिच्या मताशी सहमत आहेच.. केक खाण्यात आणि आपला मार्ग आपण शोधण्यात गैर नाहीच उलट चांगलेच, पण माझे म्हणणे इतकेच की केक खाताना जे ब्रेड खातायत त्यांच्या बद्दल संवेदनशीलता बाळगून त्यांच्या पंखात बळ कसे येईल हे पहायलाच हवे इतकच. दुसरीकडे उडून जाऊन आपल्या सामाजिक जबाबदारीकडे दुर्लक्ष होता कामा नये असे वाटते, अमेरिकेचे एक सर्वमान्य उदाहरण (गेल्या १० वर्षांचा [१० महिन्यांचा नाही] पक्षांचा प्रवाह बघता)म्हणून दिले बाकी ब्रेड/ केक शोधक नजर पाहिजे हे तर खरेच.. आरक्षणाच्या संदर्भात, जोपर्यंत मनापासून दोन स्तर एक मेकांजवळ येत नाहीत तोपर्यंत आरक्षण हा पर्याय अपरिहार्य वाटतो, त्याला नेमकी अमुकेक (उदा. दहा)वर्षे असं ठेवता येण म्हणूनच कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
प
पंगा गुरुवार, 12/09/2010 - 12:34 नवीन
आरक्षणाच्या संदर्भात, जोपर्यंत मनापासून दोन स्तर एक मेकांजवळ येत नाहीत तोपर्यंत आरक्षण हा पर्याय अपरिहार्य वाटतो,
आरक्षणाचा हेतू, स्कोप इ. दोन स्तरांना मनापासून एकमेकांजवळ आणणे हा नसून, विकासाच्या पातळीवर एकमेकांजवळ आणणे हा आहे, असे वाटते. मानसिक दरी, इतिहासात काय घडले वगैरे बाबींचा आरक्षणाशी, आरक्षणाच्या हेतूशी काहीही संबंध नाही. विकासाची पातळी असमान आहे याच्याशी निश्चित आहे. (मानसिक दरी, इतिहासात काय घडले वगैरे पूर्णपणे वेगळे मुद्दे आहेत. त्याचा आरक्षणाशी काहीही संबंध नाही.)
त्याला नेमकी अमुकेक (उदा. दहा)वर्षे असं ठेवता येण म्हणूनच कठीण आहे.
विकासाची पातळी समान व्हायला जो काही वेळ लागेल तो लागेल. त्याला कालमर्यादा लावता येणार नाहीच. आणि त्यासाठी जेवढा वेळ आरक्षणासारख्या योजनांची गरज भासेल, तोवर त्या राबवणे इष्टच आहे. त्यात काहीही गैर नाही. मात्र त्यात इतर मुद्द्यांची सरमिसळ करणे काउंटरप्रॉडक्टिव ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास
न
नितिन थत्ते Wed, 12/08/2010 - 06:01 नवीन
>>(अवांतरः 'आरक्षणामुळे आमची जागा गेली' हे रडणे तितकेसे पटत नाही. एक म्हणजे कमी जागांसाठी स्पर्धा इतकी प्रचंड आहे, की जर जागा मिळाली नसेल, तर ती आरक्षण नसते तर नक्की मिळाली असती, या म्हणण्याला काहीही आधार नाही. बहुधा तरीही मिळाली नसतीच. स्वानुभवावरून सहमत आहे. माझा गेट स्कोअर ७६ माझ्या मित्राचा ५५ मला एमटेकसाठी प्रवेश मिळाला नाही. त्याला मिळाली. प्रथमदर्शनी मत- आरक्षणामुळे मला प्रवेश नाही. आरक्षण नसते तरी मला प्रवेश मिळालाच नाही. लिस्टमधला माझा क्रमांक एकूण जागांच्या जवळपासही नव्हता. नंतर तो "सर्व विद्यार्थ्यांसाठी समान असलेले आय आय टी-एम टेकचे शिक्षण" घेऊन आणि "सर्वांना समान असलेली परीक्षा" देऊन एमटेक झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
ग
गवि Wed, 12/08/2010 - 07:32 नवीन
वरील सर्व चर्चेत बर्‍याच जणांना "आरक्षण असलं म्हणून काय झालं? इतर संधी आहेतच आणि त्या शोधल्या पाहिजेत, हिंमत पाहिजे, मूव्ह ऑन.." असं वाटतंय हा त्यांच्या कर्तबगारीचा आणि उमदेपणाचा पुरावाच आहे. मूळ प्रश्न होता (जसाच्या तसा): मग आरक्षणाच्या ऐवजी दलित समान संधीच का मागत नाहीत? ते तर बाजूलाच पण आता मराठा समजही आरक्षण मागू लागला आहे....अशाने काय होणार? आणि आरक्षण मागून स्वतःच आपल्यात काहीतरी कमी आहे अन बाकीचे आपल्यापेक्षा उच्च आहेत हेच नाही का कबुल करत? मला वाटतं यातून बहुधा असे समानार्थी प्रश्न निघत होते की: "आरक्षण असावं का?", "योग्य आहे का?","ठराविक जातीचे म्हणून किंवा ठराविक वर्गात जन्माने आहोत म्हणून काही सवलती मिळाव्यात आणि इतरांना त्याच कारणाने (ठराविक जातीचे म्हणून किंवा ठराविक वर्गात जन्मान) त्या मिळू नयेत हा न्याय करण्याचा बेसिस योग्य आहे का?" सूडगत न्याय हा प्रकार (तू माझी गाय मारली म्हणून मी तुझी गाय मारतो.. किंवा तुझ्या बापाने माझ्या बापाच्या घरी चोरी केली म्हणून मी तुझ्या घरी करणार आणि तीही कायद्याने) भारतीय दंडसंहितेत तरी अग्राह्य आहे हे सर्वांनाच कबूल असेल. मग आताच्या चालू चर्चेचा रोख पाहून, चर्चा ही "मुळात आरक्षण आहेच" हे गृहित धरून मग त्याचं प्रमाणच कसं कमी आहे, इतर काय काय उपाय करुन "अनारक्षित" वर्गाने स्वतःचे समाधान करावे किंवा मार्ग काढावा , किंवा अशीही त्यांना ती संधी मिळालीच नसती, आरक्षणामुळे नाही काही गेली ती संधी, मुळुमुळू रडत बसू नका, आपले भविष्य आपण घडवू. वगैरे या वळणावर कशाला? मग ती वेगळीच चर्चा होईल ना : विषय" आरक्षणाला कसे स्वीकाराल / तोंड द्याल" कसे? :)
  • Log in or register to post comments
म
मधुकर Wed, 12/08/2010 - 10:25 नवीन
आरक्षणामुळे मागच्या ५०-६० वर्षात दलित समाजाचा बराच विकास झाला. पण दलित समाजाची लोक संख्या पाहता मिळणारं आरक्षण फारच कमी आहे. दलिताना मुख्य प्रवाहात सामावुन घेणे देशाच्या हिताचं काम आहे. काहि बामणाना देशाचं हित नको आहे. म्हणुन ते दलितांच्या विकासाचे मार्ग बंद करण्याच्या मार्गाने प्रयत्नशिल असतात. या देशाचं नुकसान करणारा समाज म्हणजेच ब्राह्मणी समाज ज्यानी दलितांची, मागासलेल्या वर्गाची निर्मीती करुन एका संपन्न देशाला देशो धडिला लावलं, ते परत आरक्षण बंदिचा कट रचुन परत एकदा देशाला अंधारात नेण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील बहुसंख्य समाज हा दलित समाज आहे, आणि ज्या देशाचा एक मोठा समाज मागासलेला असेल तो देश पुढे जाणार नाही हे उघड आहे. ईथे आर्थिक निकषाला पुढे करुन संवर्णाना मलाई वाढण्याचा कावा दिसतोय. हे संवर्ण इन मिन ३% आहेत. या बामणानातिल जवळपास सगळेच संपन्न आहेत. समजा संपुर्ण ३% बामण भिकेला लागले असे जरी गृहित धरले तरी देशाच्या प्रगतीवर काहिच बाधा येणार नाही. मग उगीच या तिन मधिल काहिना आर्थिक निकषावर का म्हणुन आरक्षण दयावे. पण दलित, बहुजन समाज जो देशातील बहुसंख्य समाज आहे त्यांचा विकास महत्वाचा आहे. किंवा हा समाज मागे राहिला तर त्या मुळे येणारं परिणाम हे मोठ्या प्रमाणत असेल. आणि हा परिणाम देशाचं नुकसान करेल. अगदी याच्या उलट ३% वाल्यांचा परिणाम आला तरी तो जाणवणार नाही. म्हणुन कुठल्याच किमतीत आर्थिक निकषाला पुढे करुन इतराना आरक्षण देऊ नये. कारण या इतरांमुळे देशाच्या कुढल्याच घटकावर फारसा प्रभाव पडणार नाही. पण बहुजन समाज मागे राहिला तर सगळ्याच घटकांवर प्रभाव पडेल आणि परत देशाचं (जो आता कुढे सावरायल लागला) वाट्टोळं होईल.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Wed, 12/08/2010 - 11:07 नवीन
आपण बामण शब्दाऐवजी ब्राह्मण असा योग्य शब्द वापरलात तर आख्या समाजावर उपकार होतील. बामण हा शब्द जसा ब्राह्मणांना हिणवण्यासाठी वापरला जातो तसाच तो इतर जातींना हिणवण्यासाठी देखील वापरला जातो. या शब्दाचा उगम बा + म्हण या दोन शब्दांत आहे. म्हणजे जो आपला बाप म्हणण्यासारखा असतो तो बामण. शब्द कुठल्याही अर्थाने वापरला गेला तरी तो हिणकस जातिवाचक शब्द आहे आणि त्यामुळेच अयोग्य आहे. आपण आपला प्रतिसाद संपादित करुन योग्य त्या सुधारणा केल्या तर बरे होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुकर
ट
टारझन Wed, 12/08/2010 - 11:31 नवीन
आपण बामण शब्दाऐवजी ब्राह्मण असा योग्य शब्द वापरलात तर आख्या समाजावर उपकार होतील.
बा आणि ब्रा मधे खुप फरक असल्यामुळे ब्राम्हण हाच शब्द योग्य वाटतो असे सुचवु इच्छितो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Wed, 12/08/2010 - 13:06 नवीन
तुम्ही बा च्या जागी ब्रा घालता हे वाचुन बरे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Wed, 12/08/2010 - 14:50 नवीन
आम्ही घातल्यावर आपल्याला बरे वाटते हे पाहुन डॉळा पाणावला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ग
गणेशा Wed, 12/08/2010 - 10:23 नवीन
आरक्षण ही समाजाला लागलेली कीड आहे .. बाबासाहेबांनी घेतलेली निर्णय योग्य होता .. कालावधी ठरवुन घेतलेले आरक्षण योग्य होते .. परंतु राजकारणं करुन तसेच जे आरक्षण उपभोगत आहेत त्यांनाच या गोष्टीची पर्वा नाहीये ... त्यांनाच या महामाणवाचे शब्द आठवत नाही .. तर यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते ? मराठा समाज आरक्षण मागत आहे .. हे मान्य असले तरी सगळ्या मराठ्यांना आरक्षण नको आहे. आरक्षण मागणार्यांनी सर्वांची मते गृहीत कशी धरली हेच कळत नाही . एक मराठा असुनही मला ह्या असल्या लोकांची घ्रूणा आहे.. स्वताच्या भल्यासाठी .. स्वताला मोठे करण्यासाठी आपल्या जातील लोक कसे उपेक्षित रहात आहे हे चित्र दाखवुन हे स्वताला बाबासाहेब समजु लागले आहेत असे वाटते .. सामान्य माणुस आदराने जगु इच्छितो .. मात्र धर्मांद माणसे अआणि राजकारणी यांनीच .. ब्राम्हण कसा श्रेष्ठ .. मराठा कसा मोठा .. दलीत कसे पिडीत .. हे अमके अआणि तमके .. असले प्रश्न निर्माण केले आहेत .. वाईट वाटते .. पण काहीच करु शकत नाही . ह्याचा खेद आहेच .. पण कोठे अश्या चर्चा झाल्याकी माझे म्हणने कसे बरोबर ह्यावर्च भांडन होताना पाहिले आहे .. ते ही वाईटच .. माणसाने माणुस म्हणुन जगावे असे खुप वाटते .. पण जणावरांना कीतीही घरात घेतले तरी ते आपली तंगडी वर करणारच .. काय करणार .. सवय ही अशीच असते ..
  • Log in or register to post comments
म
मधुकर Wed, 12/08/2010 - 11:28 नवीन
मृत्युंजय, तुम्ही तुमचा अर्थ घ्यावा, मी माझा घेतो. आणि माझा अर्थ असा आहे. ब्राह्मण = एक जात. बामण= जातियवादी म्हणुन संबोधताना वापरण्यात येणारा शब्द. काय आहे, बामणानी भुतकाळात ईतकी पापं केलीत ना, की त्याचे परिणाम उभ्या देशाला भोगावे लागत आहेत. त्यानी हे सगळं केलं नसतं तर आज सगळे समान असेत, म्हणजे आरक्षणाची गरजच पडली नसती. आता काहिजण असा युक्तिवाद करतील की, त्यांच्या नावाने आजुन किती दिवस खडे फोडणार? पण त्यावर मला असे म्हणायचे आहे की, ठिक आहे मग तुम्ही आरक्षणाच्या नावाने खडे फोडु नका. बामणी व्यवस्थासुद्धा त्यांच्या समाजाला फायदा पोहचविण्याच्या हेतुने (वाईट मार्गाने ) काम करत होती (आणि संधी मिळाली तर आजही तसेच वागेल). जर त्यावर बोलायचे नको तर मग आरक्षण ( जो चांगल्या हेतुने) राबविल्या जाते त्यावर बोट उचलण्याचेही कारण नाही. काही नाही, बहुजनांचा विकास डोळ्यात खुपतं, आजुन काय नाही.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 12/08/2010 - 11:54 नवीन
काय आहे, बामणानी भुतकाळात ईतकी पापं केलीत ना, की त्याचे परिणाम उभ्या देशाला भोगावे लागत आहेत.
वाह बामणांना निदान भुतकाळ तरी होता हे एकुन आनंद झाला :) विशेषतः ज्यांना भुतकाळच काय तर वर्तमान देखील मान्य न्हवता म्हणुन ज्यांनी धर्म बदलला त्यांच्या तोंडुन तर हे ऐकुन अजुन आनंद झाला. एखाद्या जातीच्या नावाने इतक्या खालच्या दर्जाला जाउन टिका होत असताना देखील संपादक शांत आहेत हे बघुन आश्चर्य वाटले. हिच टिका 'बामणेतरांवर' अथवा इतर धर्मावर असती तर आतापर्यंत बर्‍याच कारवाया झाल्या असत्या :) असो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुकर
अ
अवलिया Wed, 12/08/2010 - 13:11 नवीन
>>>>एखाद्या जातीच्या नावाने इतक्या खालच्या दर्जाला जाउन टिका होत असताना देखील संपादक शांत आहेत हे बघुन आश्चर्य वाटले. हिच टिका 'बामणेतरांवर' अथवा इतर धर्मावर असती तर आतापर्यंत बर्‍याच कारवाया झाल्या असत्या चालायचेच. असो. ज्याची त्याची जाण समज अक्कल हेतु इत्यादी... पण असो... शांतता ठेवायची आहे आपल्याला आणि ती सुद्धा एकतर्फी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मृत्युन्जय Wed, 12/08/2010 - 13:04 नवीन
तुमच्या बामण या उपाधीत मग अन्याय करणारे मराठा (पक्षी क्षत्रिय) आणी वैश्य लोक सुद्धा येतात का? सवर्णांमध्ये हे पण येतात आणु चातुर्वर्ण्य पद्धतीचा लाभ / दुरुपयोग यांनी पण केला. शिवाय बामण हे ब्राह्मण लोकांबद्दलच केवळ बोलतात हे न कळण्याएवढे मुर्ख तुम्ही असाल असे वाटत नाही. (चुकीचे असेल तर माफ करा एक डाव). पुर्वी हे असे झाले म्हणुन आज त्याच्या उलटे व्हायला पाहिजे ही सुलतानी पद्धत झाली. शिवाय पुर्वी एखाद्याने विवक्षित जातीवर्गावर अन्याय केला म्हणुन आज त्याच्या वंशजांना जातिवाचक अपशब्द वापरणे योग्य आहे असा तर्क तुम्ही कुठुन लढवता आहात हे कळाले तर आनंद होइल. अन्याय करणारे सगळे ब्राह्मण म्हणजे बामण असा तर्क तुम्ही कुठल्या मुद्द्यावर लढवता आहात तेही कळु देत. अजुनही काही लिहिणार होतो पण प्रतिसादांना पंख लागतील आणि समोरचा माणूस हिणकस प्रतिवाद करतो म्हणुन मी पण करतो असा कोणाचा समज होउ नये म्हणुन अधिक काही लिहित नाही. बाकी संपादक मंडळ योग्य ती दखल घेत आहे अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुकर
र
रन्गराव Wed, 12/08/2010 - 15:10 नवीन
>>काय आहे, बामणानी भुतकाळात ईतकी पापं केलीत ना, की त्याचे परिणाम उभ्या देशाला भोगावे लागत आहेत. त्यानी हे सगळं केलं नसतं तर आज सगळे समान असेत, म्हणजे आरक्षणाची गरजच पडली नसती. एक महत्वाचा मुद्दा सांगतो इथं. फक्त एका जातीला ह्या साठी वेठीस धरणे चुकीच आहे. कारण स्वतःला उच्च म्हणवणार्या सर्व जातींनी हात धुवून घेतले आहेत. महाजनांना गावाबाहेर काढण्या इतक प्रभुत्व ब्राह्मणांकड कधीच नव्हतं. फार तर मंदीरात कुणाला घ्यायच आणि कुणाला नाही इतकाच अधिकार त्यांच्याकडे असावा. आणि त्यांनी तस शिकवलं म्हणून क्षत्रिय तस वागले आणि व्यापारी वर्गानं त्यांची साथ दिली हा युक्तीवाद हा मूर्खपणाचा कळस आहे. क्षत्रिय आणि व्यापारी वर्गानं आपली डोकी कुठ गहान ठेवली होती? आणि आज जे आरक्षण आणि इतर कायदे वगैरे सुधारणा झाल्या आहेत त्या घडवून आणायला काही ब्राह्मणनांनीच पुढाकार घेतला होता. अगदी आंबेडकरांना प्रेरणा देणारे त्यांचे गुरुजीही ब्राह्मणच होते. आजची तुमची ही प्रतिक्रिया बाबासाहेबांनी जर वाचली असती तर शरमेने मान खाली झुकली असती त्यांची. त्यांनी ब्राह्मण द्वेष कधीच केला नाही. ह्याचा एक ठळक पुरावा म्हणजे त्यांनी आपल आम्बेडकर हे ब्राह्मणी आडनाव कधीच बदलल नाही. >>आता काहिजण असा युक्तिवाद करतील की, त्यांच्या नावाने आजुन किती दिवस खडे फोडणार? पण त्यावर मला असे म्हणायचे आहे की, ठिक आहे मग तुम्ही आरक्षणाच्या नावाने खडे फोडु नका. Two wrongs don't make a right ! >>बामणी व्यवस्थासुद्धा त्यांच्या समाजाला फायदा पोहचविण्याच्या हेतुने (वाईट मार्गाने ) काम करत होती (आणि संधी मिळाली तर आजही तसेच वागेल). जर त्यावर बोलायचे नको तर मग आरक्षण ( जो चांगल्या हेतुने) राबविल्या जाते त्यावर बोट उचलण्याचेही कारण नाही. संधी मिळालेकी सगळेच फायदा घेतात. त्याला बहुजनही अपवाद नाहीत. काही जण आज तिसर्या पिढीतही आरक्षणाचा फायदा घेतात. अजून असे बरेच बहुजन आहेत ज्यांना हा फायदा कधीच मिळाला नाही. मग शिकलेले आणि आर्थिक परिस्थिती चांगले असेलेल लोक ती अडमीशन किंवा नोकरी इतर जास्ती गरज असलेल्या बहुजनांसाठी का नाही सोडत? अपवाद आहेत पण फार कमी. म्हणजे बघा बहुजनांमधेच आरक्षाणामुळे काही ब्राम्हण तयार नाही का झाले. तुमच्या मतानुसार फार वाईट झालं नाही का? विरोध मुळात आरक्षणाला नाही आहे. त्याचा जो गैरवापर होतो त्याला आहे. >>काही नाही, बहुजनांचा विकास डोळ्यात खुपतं, आजुन काय नाही. स्वार्थ, द्वेष आणि इतर कुठली ही भावना अगदी त्याग सुद्धा जात बघून निपजत नाही. जाती व्यवस्था चुकीची होती, त्याच्या पलिकड जावून विचार करणं गरजेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुकर
ब
बेसनलाडू Wed, 12/08/2010 - 19:05 नवीन
काही नाही, बहुजनांचा विकास डोळ्यात खुपतं, आजुन काय नाही. हाहाहाहा .. भारी!! सकाळी सकाळी हापिसात चाय-काफी घेताना असं काही हसू आणणारं वाचलं की किती छान वाटतं! पुढचा सगळा दिवस छान जाणार याची खात्रीच पटते. (चाकरमानी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुकर
ग
गवि Wed, 12/08/2010 - 11:39 नवीन
सर्व मान्य करु म्हणतानाही: आता काहिजण असा युक्तिवाद करतील की, त्यांच्या नावाने आजुन किती दिवस खडे फोडणार? पण त्यावर मला असे म्हणायचे आहे की, ठिक आहे मग तुम्ही आरक्षणाच्या नावाने खडे फोडु नका. या लॉजिकविषयी संभ्रमित झालो. तपशील आवश्यक वाटल्यासः त्यांच्या नावाने आजुन किती दिवस खडे फोडणार? याच अन्यायकर्त्यांच्या पूर्वजांच्या नावाने खडे फोडण्याचे कायदेशीर रूप "आरक्षण" हे असेल तर मग तुम्ही आरक्षणाच्या नावाने खडे फोडु नका. हे म्हणजे प्रोग्र्याम लूपमधे फसल्यासारखे झाले.
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Wed, 12/08/2010 - 12:38 नवीन
विषय आरक्षणावरून ब्राम्हण बॅशिंगकडे वळल्यामुळे ह्यावर बोलणं थांबवत आहे. आजकालच्या युगात ब्राम्हणांना भटे, बामन म्हणून हिणवलेलं चालतं. पण ब्राम्हणांनी कुणाला महार चांभार म्हणलं की मात्र कायदेभंग होतो. कलियूग आहे, चालायचंच. सगळ्या क्षेत्रात आंधळं आरक्षण राबवल्याचे परिणाम आपण बघतोच आहोत. इति लेखन सीमा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा