चीन सरकारचे मनापासुन अभिनंदन..
मध्यंतरी चीनी लोकांनी इंग्लिश शिकावे म्हणुन सरकारी प्रयत्न पण चालू होते असे समजले. पण त्यांनी दोन्ही गोष्टित गल्लत केलेली नाही हे स्पृहणीय.
मातृभाषेला सन्मान देणाऱ्या लेखात शुद्धलेखनाच्या खालील चुका सापडल्या. मातृभाषेला योग्य सन्मान देण्यासाठी त्या सुधारण्यात याव्यात अन्यथा हे नक्राश्रू आहेत असे मानण्यास हरकत नसावी.
चीन सरकारने एका अध्यादेशाद्वारे चिनी भाषेत इतर भाषीक शब्द येवून त्यामुळे चिनी भाषेत भेसळ होऊ नये म्हणून इतर भाषीक शब्दाची सरमिसळ करण्यास मनाई केलेली आहे.
http://www.bbc.co.uk/hindi/news/2010/12/101221_china_english_ak.shtml
हे भाषेची जपणूक करण्याचे आदर्ष उदाहरण ठरेल. किंवा चीन सरकार्ची प्रषंसा केली जाईल. मराठी लोकानी असे केले तर ते म्हणे नतद्रष्तपणाचे ठरते.
मराठीवर हिंदी भाषेचे जे आक्रमण चालले आहे ते पहाता मराठी भाषेला सर्वात मोठा धोका इंग्रजीपासून नाही तर हिन्दी भाषे पासून आहे.
गुजरातमध्ये देखील गुजरात सरकारने दुकानांचे फलक गुजरातीमध्येच असणे आवश्यक आहे नियम केला आहे.
अहमदाबाद मध्ये दुकानदारांवर याची सक्ती केली जात आहे.
कर्नाटक सरकारने तर कन्नड भाषी सक्ती प्राथमीक शाळेपासून केली आहे.
सगळे तेज खबर वाले या बाबत आळीमिळी साधून आहेत
महाराष्ट्र सरकारने असे काही केले तर सरसकट देशद्रोही ठरवले जाते.
हा दुजाभाव मराठी माणूस का सहन करतो?
बाय द वे
मातृभाषेला योग्य सन्मान देणार्या आनि मातृभाषेला संरक्षण देवून जपणूक करणार्या चीन सरकारचे अभिनन्दन.
मातृभाषेला सन्मान देणाऱ्या लेखात शुद्धलेखनाच्या खालील चुका सापडल्या. मातृभाषेला योग्य सन्मान देण्यासाठी त्या सुधारण्यात याव्यात अन्यथा हे नक्राश्रू आहेत असे मानण्यास हरकत नसावी.
मी इथे आलो
मी इथं आलो
म्या इडं आलु
म्या इत्तं आलु
हे मराठीतील वाक्य नाहीत का?
केवळ प्रमाणलेखनानुसारच बोलणे आणि लिहिणे म्हणजेच मातृभाषेबद्दल प्रेम का?
(अवांतर - माझ्या माहिती नुसार विजुभाउंची मातृभाषा मराठी नाही, पण मला जेवढे मराठीबद्दल प्रेम आहे तितकेच त्यांना आहे याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे)
एवढे जर तुम्हाला कळते तर मग मराठीत हिंदीतले शब्द आल्याने नक्की काय फरक पडतो हे समजावून सांगा.
साधे उदाहरण घ्या मी "लहानपणी गर्वाचे घर खाली" असा धडा शिकलो होतो. त्यात गर्व असणे / गर्विष्ठ असणे हा वाईट गुण आहे मानसाने गर्व करू नये. नम्र असावे अशी शिकवण दिली होती.
हिन्दी भाषेने मात्र गर्वाला फार आदराचे स्थान दिले. त्यामुळे आपण गर्वाने म्हणतो मी मराठी आहे.
अशी अनेक उदाहरणे आहेत.
भाषा जपली संस्कृती जपली. भाषा संपली संस्कृती संपली
तु "ब्रिटिश टिंगी" शी सहमत आहेस की "ब्रिटिश टिंग्या" शी ? हे असं बोलतोय कारण की ह्यात जी गल्लत होते आहे ती भाषेचा अभ्यास वाढवुन कमी करता येणार नाहीये.
- भेंडीश वांग्या
छोटी टिंगीशी सहमत व्हावे.
अवांतरः हा टारझन माझ्याशी फार वाईट वागतो. मला सारखे खाली दाखवतो (हे हिंदीतील "निचा दिखाना" चे मराठीकर्ण आहे). असो. हिंदी शब्द आले म्हणून कुठे बिघडले आहे ?
अहो हिंदी शब्द मराठीत वापरताना मराठीत त्याचा काय अर्थ होतो हे तरी लक्षात घ्या की.
ऑल हिंदी वर्डस् कमिंग टू मराठी आर ईक्वल बट सम आर मोअर इक्वल.
(वाह इतके सगळे इंग्रजी शब्द पण मराठीत आले तर मराठी कशी जागतिक भाषा होईल नै!)
गर्व से कहो हम हिंदी हई.
सांभाळून हो!
नाही म्हणजे, इथे 'हिंदी हैं हम, वतन है हिंदोस्ताँ हमारा' याचा अर्थसुद्धा कोणी 'हिंदुस्थान हिंदीभाषकांचा, तस्मात् हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर कोणीही हिंदुस्थानात राहू नये'* असला काहीतरी लावायचा, तिथे तुमच्या वाक्याची काय कथा?
(*बाकी या असल्या भाषांतरास प्रॉपगांडा व्हॅल्यू मजबूत आहे, नाही? ;-))
हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर कोणीही हिंदुस्थानात राहू नये'* असला काहीतरी लावायचा, तिथे तुमच्या वाक्याची काय कथा?
सहमत आहे. असाही अर्थ मत्प्रिय उप्र, भिहारवासी हिंदी बांधव लगाते असतात.
हिंदीभाषकांव्यतिरिक्त इतर कोणीही हिंदुस्थानात राहू नये'* असला काहीतरी लावायचा, तिथे तुमच्या वाक्याची काय कथा?
सहमत आहे. असाही अर्थ मत्प्रिय उप्र, भिहारवासी हिंदी बांधव लगाते असतात.
पंगा /पुपे हा अनुभव मलादेखील आला आहे. एकाला मी हिन्दी ही राष्ट्रभाषा नाहिय्ये असे सांगितले तेंव्हा तो म्हणाला की मग या देशाचे नाव हिंदुस्थान कशाला आहे.
त्या बेण्याला तिथेच एक खॅळ्ळ खॅटॅक करून त्याच्या तोंडातले फर्निचर बाहेर काढावेसे वाटले.
देशाची भाषा आणि देशाचे नाव यांचा काही संबंध नसावा. अनेक हिंदू हिंदी न वापरताही हिंदू आहेत. देशाचे नाव हिंदुस्थान/हिंदीस्तान नाही. हिंदुस्तान आहे. हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांनी सोडलेले पिलू आहे.
देशाची भाषा आणि देशाचे नाव यांचा काही संबंध नसावा
सहमत. पण हे मत्प्रिय उप्र, भिहारी बांधवको पता नसते.
हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांनी सोडलेले पिलू आहे.
वा म्हणजे अरब हिंदुत्ववादी होते तर.
हो पण त्यांच्या मूर्खपणामुळे आपणही मूर्खासारखे वागलेच पाहिजे असे थोडी आहे.
काहो दुसर्याचे अज्ञान दूर करना मूर्खपणा है असं आपको वाटता है का?
देशाचे नाव हिंदुस्तान आहे. हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांचे पिलू आहे.
स्तान आणि स्थान यात अर्थाच्या दृष्टीने फारसा फरक नसल्याने आमच्या वाक्यातही फारसा फरक पडत नाही.
समजले का? काळजीपूर्वक वाचल्यास असा प्रसंग येणार नाही.
अर्थ लक्षात घेऊन वाचल्यास फारसा फरक नाही. तरीही सूचनेचा विचार करू.
हिंदुस्थान हे हिंदुत्त्ववाद्यांनी सोडलेले पिलू आहे.
याबद्दल साशंक आहे.
म्हणजे 'हिंदोस्ताँ'करिता मराठीत 'हिंदुस्थान' हा शब्द नेमका कधी वापरला जाऊ लागला, कोणी बनवला याबद्दल कल्पना नाही, परंतु जुन्या (म्ह. आमच्या आजोबांच्या वगैरे) पिढीपासूनच्या लोकांच्या तोंडून (आणि लेखी वापरातसुद्धा) हा शब्द सरसकट असाच ऐकलेला (आणि वाचलेला) आहे. असा वापर करणारांपैकी अनेकांचा 'हिंदुत्ववादा'शी दूरान्वयानेही संबंध नसावा (किंवा असलाच तर विरोधापुरता असावा).
किंवा कदाचित याचे मूळ 'हिंदुत्ववाद्यां'त (म्ह. कोण? सावरकर वगैरे?) असेलही, परंतु हा शब्द मराठीतील सामान्य वापरात ('हिंदुत्ववाद्यां'मध्ये आणि इतरांमध्येसुद्धा) अशाच स्वरूपात गेल्या किमान तीनचार पिढ्यांत तरी रुळलेला आहे, आणि तो मराठीत 'हिंदुस्तान' असा कधीही म्हटलेला किंवा लिहिलेला निदान माझ्या तरी ऐकण्यापाहण्यात आलेला नाही. मग म्हणणारा/लिहिणारा 'हिंदुत्ववादी' असो वा नसो.
उलटपक्षी, मराठीखेरीज इतर भाषांत हा शब्द 'हिंदुस्थान' असा लिहिलेला किंवा म्हटलेला (अगदी 'हिंदुत्ववाद्यां'कडूनसुद्धा) वाचण्यात किंवा ऐकण्यात आलेला नाही.
त्यामुळे हा शब्द मराठीत 'हिंदुस्थान' तर इतर भाषांत 'हिंदुस्तान/हिंदोस्ताँ' असा असावा, आणि वापरणार्याच्या 'हिंदुत्वा'शी (किंवा 'हिंदुत्व'वादाशी) संबंध नसावा, अशी निदान माझी तरी धारणा आहे. (कदाचित मराठीतील 'हिंदुस्थान' हे 'हिंदोस्ताँ'चे अपभ्रष्ट रूप असू शकेल. मुंबईत एकदा 'रिचर्डसन अँड क्रूडास' या कंपनीचे नाव 'रिचर्डसन अँड गुरदास' असे सामान्यजनांकडून ऐकलेले आहे, तद्वत.)
(बाय द वे, माझ्याच घरातील उदाहरण घ्यायचे झाल्यास, हा शब्द माझ्या घरात नेहमी 'हिंदुस्थान' असाच वापरण्यात आलेला आहे. माझ्या आजोबांबद्दल कल्पना नाही, परंतु माझे वडील 'हिंदुत्ववादा'चे कट्टर विरोधक होते आणि मीही 'हिंदुत्ववादी' नाही.)
बाय द वे, हिंदुस्थानाकरिता तुर्की भाषेत 'हिन्दिस्तान' असा शब्द असावा असे वाटते. हवे तर तुर्कस्थानातील* भारतीय वकिलातीच्या वेबसाइटीस भेट देऊन खात्री करून घ्यावी.
*पुन्हा स्थान!
तसेही 'हिंदी' या शब्दाचा अर्थ 'हिंदचा (म्ह. हिंदुस्थानचा) रहिवासी' असा आहे, आणि योगायोगाने हिंदुस्थानच्या एका मोठ्या भागात बोलल्या जाणार्या भाषेचेही ते नाव आहे, असे वाटते.
तसेही भौगोलिकदृष्ट्या 'हिंदुस्थान' हा शब्द वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थांनी, कधी 'आसिंधुसिंधुपर्यंत' अर्थाने, कधी 'ब्रिटिश इंडिया' अशा अर्थी, कधी 'भारतीय गणराज्य' अशा अर्थी तर कधी केवळ उत्तरेकडील मैदानी प्रदेशासाठी (पहा: 'हिंदुस्थानचे मैदान') वापरला जातो, असे वाटते.
तसेही 'हिंद' किंवा 'हिंदोस्ताँ'चा मूळ अर्थ 'उत्तरेकडील गंगायमुनांच्या खोर्यांतील मैदानी प्रदेश'** असा काहीसा लक्षात घेता, ऐतिहासिकदृष्ट्या 'हिंदची (किंवा हिंदोस्ताँची) भाषा ती हिंदी (किंवा हिंदोस्तानी)', यात काहीही गैर नाही. 'हिंदोस्ताँ'(या संज्ञे)ची व्याप्ती नंतर वाढली, त्याला कोण काय करणार?
** दख्खनचे पठार हे 'हिंदोस्ताँ' संज्ञेच्या मूळ व्याप्तीच्या बाहेर होते असे विकीवरून कळते. चूभूद्याघ्या.
असाही अर्थ मत्प्रिय उप्र, भिहारवासी हिंदी बांधव लगाते असतात.
माझा रोख 'हिंदी इतर भाषांना गिळंकृत करून राहिली आहे'-छाप अपप्रचार करणारांकडे होता. अशा अपप्रचारकांकरिता अशा (मुद्दाम लावलेल्या) अर्थास बरीच प्रॉपगांडा-व्हॅल्यू आहे, असे म्हणायचे होते.
बाकी उत्तर भारतवासी हिंदीभाषक बांधवांच्या याबद्दलच्या (आपण म्हणता तशा) विचारांबद्दल बोलायचे झाल्यास, होय, याचाही थोडाफार अनुभव आहे. (म्हणजे अगदी बिगर-हिंदीभाषकांनी हिंदुस्थानात राहू नये वगैरे इतकी नव्हे, पण बिगरहिंदीभाषकांबद्दल - विशेष करून हिंदी पट्ट्याच्या दक्षिणेकडील रहिवाशांबद्दल - एकंदर तुच्छतेची भावना वगैरे पाहिलेली नाही असे नाही. दिल्लीच्या बसेसमध्ये 'भारत की सभी भाषाएं हमारी अपनी भाषाएं हैं' अशी 'सरकारी' घोषणा मुद्दाम लावावी लागते हे चित्र पुरेसे बोलके आहे. अर्थात ही परिस्थिती सार्वत्रिक नाही, पण नाही असेही नाही.) पण त्याची दखल घेण्याची गरज आहे असे वाटत नाही. भारताच्या एका छोट्या भागातील मर्यादित लोकांना उर्वरित भारतीयांबद्दल काय वाटते यावरून त्या उर्वरित भारतीयांचे भारतीयत्व ठरू नये, आणि त्या उर्वरित भारतीयांनी तर ते तसे मुळीच ठरवून घेऊ नये. गेले उडत!
आणि तशीही इतरप्रांतीयांबद्दल तुच्छता ही एकंदर भारताचीच (किंवा कदाचित मानवजातीची) खासियत असावी. खुद्द महाराष्ट्रात, दक्षिणेकडील हेल काढून बोलणार्या लोकांबद्दल आणि त्यांच्या भाषांबद्दल विनाकारण तुच्छतेची - किमानपक्षी टिंगलटवाळीची - भावना परवापरवापर्यंत - अगदी आमच्या आईवडिलांच्या पिढीपर्यंत किंवा कदाचित आमच्याही पिढीपर्यंत - होती, आणि कदाचित अजूनही असल्यास आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना, (केवळ भाषेच्याच नव्हे, तर इतरही बाबतींत) भक्कम परस्परतिरस्काराच्या मजबूत बांधणीवर भारत टिकून आहे, असे म्हटल्यास बहुधा वावगे ठरू नये.
मी या खोडसाळ आणि वैयक्तिक प्रतिसादाला दिलेले परखड उत्तर संपादित झाले. मात्र हा एकांगी आरोप संपादित झाला नाही याचे आश्चर्य वाटते. वर मी हिंदी शब्द आल्याने काय तोटा होतो हे स्पष्ट करण्यास सांगितले तर या महाशयांनी स्वतःकडे मुद्दे नसल्याने 'अभ्यास वाढवा' असा चोमडेपणाचा सल्ला दिला आहे. तो सल्ला आणि वरील प्रतिसाद संपादित व्हावा ही संपादन मंडळाला विनंती.
आजकाल मिपावर शुद्धलेखन वगैरेचे चिकित्सा व्हायल लागलेली बघुन गहिवरुन आले.
+ १ मला तर गदगदुन आले आणि माझे डोळे पाणावले
तात्पर्य काय : मिपा उपक्रमी आनि मनोगती होणार
शुद्धलेखन आनि मातृभाषेला योग्य सन्मान देणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
एक सांगा
व्हता हा शब्द अशुद्ध आहे. मग नव्हता हा शब्द शुद्ध कसा?
अवांतर" आणि हा शब्द टंकताना तो आनि असा टंकला गेला यात शुद्धातेपेक्षा कळफलक आणि घाई गडबड जबाबदार आहे.
टिळकानी संत हा शब्द सन्त सनत असा तिन्ही प्रकारे लिहीला होता.
सदाशिवपेठी पुणेरी मराठी हीच प्रमाण मराठी मानायची हा पुणेकरांचा अट्टाहास असतो.
त्याच पुण्यात सदाशिव पेठेपासून हडपसर कडे थोडे दूर गेलो की " कुठे "या शब्दाचा उच्चार "कुढं" पुढे या शब्दाचा उच्चार "फुडं" अस केला जातो.
त्याच पुण्यात खडकी दापोडी भागात येवू र्हायला जावू र्हायला असे शब्द वापरले जातात.
मॉडेल कॉलनीत , आयडीयल कॉलनीत " मराठी वर्ड्स रीमेम्बर करायला डिफिकल्ट जाते"
फुले मंडैत इकडे तिकडे वावरताना हिकडं तिकडं होते.
ही तर्हा आहे महाराष्ट्रावर प्रमाणभाषेचा तोरा मिरवणार्या पुणेकरांची
व्हता हा शब्द अशुद्ध आहे. मग नव्हता हा शब्द शुद्ध कसा?
हा फुलराणीतला डायलॉग आहे वाटतं.
बरं हे देशद्रोही नक्की कोण ठरवते? महाराष्ट्रात पूर्वीपासूनच मराठी पाट्यांची सक्ती आहे. पुण्यात तरी ९९ टक्के पाट्या देवनागरी मराठीत दिसतात. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे.
>>महाराष्ट्रात पूर्वीपासूनच मराठी पाट्यांची सक्ती आहे. पुण्यात तरी ९९ टक्के पाट्या देवनागरी मराठीत दिसतात. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे
प्रॉब्लेम असा आहे की पुण्याबाहेरही महाराष्ट्र आहे. मुंबईत येऊन बघा. आणि पुण्याची आजची स्थिती पाहता आपण काही नाही केले तर आज जे मुंबईत होते आहे ते १०-१५ वर्षात पुण्यात होणार(If not earlier)
सदाशिवपेठी पुणेरी मराठी हीच प्रमाण मराठी मानायची हा पुणेकरांचा अट्टाहास असतो.
त्याच पुण्यात सदाशिव पेठेपासून हडपसर कडे थोडे दूर गेलो की " कुठे "या शब्दाचा उच्चार "कुढं" पुढे या शब्दाचा उच्चार "फुडं" अस केला जातो.
त्याच पुण्यात खडकी दापोडी भागात येवू र्हायला जावू र्हायला असे शब्द वापरले जातात.
मॉडेल कॉलनीत , आयडीयल कॉलनीत " मराठी वर्ड्स रीमेम्बर करायला डिफिकल्ट जाते"
फुले मंडैत इकडे तिकडे वावरताना हिकडं तिकडं होते.
ही तर्हा आहे महाराष्ट्रावर प्रमाणभाषेचा तोरा मिरवणार्या पुणेकरांची
हे धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड .... आले आले वरिजनल विजुभौ आले !!
हे धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड .... आले आले वरिजनल विजुभौ आले !!
अजून वरिजनल विजुभौ हायेत. त्यांनी नवीन वर्षापासुन (म्हणजेच २०११ आहे हे गृहीत धरले आहे) पुणे आणि पुणेकरांना नाव ठेवणार नाही असा "पण" केला आहे.
जाउ देत परा. शेवटचे ४-५ दिवस राहीलेत. त्यामुळे दुर्लक्ष कर आत्ता.
" कुठे " चे "कुढं" किंवा "फुडं" झाले तरी किंवा येवू र्हायला जावू र्हायला असे शब्द वापरले तरी पुण्यात मराठीचाच वापर होतो हे तुम्ही सिध्द केल्याबद्दल मंडळ आभारी आहे. (बंबईया भाषेबद्दल न बोलणे चांगले)
बाकी लो.टिळकांबरोबर स्वत:ची तुलना करण्याचा प्रयत्न करून आपल्या चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रकार भारी होता.
प्रतिक्रिया