चीनचे मनसे.
💬 प्रतिसाद
(141)
व
विजुभाऊ
Wed, 12/22/2010 - 07:18
नवीन
पुण्यात तरी ९९ टक्के पाट्या देवनागरी मराठीत दिसतात. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे.
महाराष्ट्रात मुम्बई आणि ठाणे नावाची दोन गावे आहेत. तेथे दुकानाच्या पाट्या / फलक मराठीत हवेत अशी आंदोलने मनसे आनि शिवसेनेला करावी लागतात. शासकीय नियम असूनही तसे करायला गेले की हिन्दी भाषीक लोक आणि त्यांचे कैवारी त्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती असल्याप्रमाणे मराठी विरोधात एकत्र गोंधळ घालतात हे ठाऊक नाही वाटते आपल्याला.
नक्की कुठल्या भूभागावर राहता ?
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 12/22/2010 - 07:26
नवीन
मी पुण्यात राहतो. :-)
गेले अनेक दिवस याबाबतीत काही बातम्या वाचनात आल्या नाहीत त्यामुळे हा वाद मिटला असावा असे वाटले. मला वाटते पाट्या-फलक मराठीत - पक्षी देवनागरीत - आल्याने हिंदी भाषकांचा फायदाच होणार आहे. पुरेसे शिक्षण न मिळाल्याने अनेक युपी बिहारी लोकांना इंग्रजी वाचता येत नाही मात्र देवनागरीतल्या पाट्या मात्र त्यांना चोख वाचता येतील. किंबहुना मराठी देवनागरीतल्या पाट्या या त्यांच्या हिताच्याच आहेत हे लाई चना वगैरे कार्यक्रमात श्री. ठाकरे (ठाकरे कुटुंबियांपैकी सध्या जे कोणी पदावर असतील त्यांनी) हिंदी भाषकांना समजावून सांगणे आवश्यक आहे.
मला तर वाटते हा मराठी पाट्यांच्या विरोधातला कट हा हिंदी भाषकांचा नसून गुजराती भाषकांचा आहे. विरेन शाह वगैरे शाह मंडळी या कटाच्या अग्रभागी आहेत. (फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन व रूपम ग्रुप)
(तुम्ही मुंबई असा मराठमोळा शब्द असताना बम्बईपासून प्रेरणा घेऊन मुम्बई असा शब्द का बनवला? मराठीत शक्यतो अनुस्वार लिहिला जातो.)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Wed, 12/22/2010 - 07:46
नवीन
मराठीत शक्यतो अनुस्वार लिहिला जातो.)
तुमचे व्याकरण कच्चे असावे असा संशय होता. आतातर इतिहास देखील कच्चा आहे असे वाटायला लागलेय.
लो. टिळकानी एकदा संत हा शब्द सन्त , सनत ( यीतील न चा पाय मोडलेला समजावा ) असा लिहीला होता.
व्याकरणदृष्ट्या तीनही शब्द बरोबर आहेत.
मुंबई हा शब्द मुम्बई किंवा मुम्बै असा लिहीला तरी बरोबर आहे.
देवनागरी लिपीतील अक्षर हे उच्चाराचे चित्र प्रातिनीधीत्व करते.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 12/22/2010 - 07:54
नवीन
माझे व्याकरण कच्चेच आहे त्यामुळे मराठी संकेतस्थळांवर येऊन मी व्याकरण शिकायचा प्रयत्न करतो.
असो.
संत, सन्त किंवा सन्त असे शब्द पुलंनी 'आम्ही सूक्ष्मात जातो' मध्ये वापरल्याचे आठवते. (त्यात या शब्दांच्या जोडीला नम्र, नम्र, नम्र हेही होते)
मी माझ्या वाक्यात 'शक्यतो' हा शब्द वापरला होता. मुंबई हा शब्द मुम्बअि असाही लिहिता येतोच की.)
हा हा म्हणजे प्रत्येक शब्द हे 'अक्शर्चिन्ह' असते असे सतीश रावले म्हणतात तसे का?
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Wed, 12/22/2010 - 08:01
नवीन
मुंबई हा शब्द मुम्बअि असाही लिहिता येतोच की
"मुम्बअि" शब्दात " अ" अक्षरावर्ची वरची वेलान्टी दीर्घ हवी
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 12/22/2010 - 08:59
नवीन
नोंद घेतली आहे. आता मुम्बअी असे लिहीत जाईन.
- Log in or register to post comments
ट
टारझन
Wed, 12/22/2010 - 09:03
नवीन
=)) =)) =)) वरिल भाषिक उहापोहाला करवंदना केलेली आहे... =))
- Log in or register to post comments
प
पंगा
Fri, 12/24/2010 - 18:18
नवीन
अहो पण टिळकांनी तो शब्द तसा केवळ दिपोटींशी पंगा घेण्यासाठी लिहिला होता. (शेवटी मूळचे पुण्याचे नसले तरी रेट्रोअॅक्टिव इफेक्टने वाण नाही पण गुण लागायचाच. असो.) त्यानंतरच्या महाराष्ट्राच्या उभ्या इतिहासात (म्हणजे, महाराष्ट्राचा बसलेला इतिहास पाहिलेला नाही. तसेही आपण इतिहासतज्ज्ञ नाही. असो.) तो तसा तीन वेगवेगळ्या प्रकारे (एकाच वेळी किंवा वेगवेगळ्या वेळी सुटा) लिहिला गेल्याची उदाहरणे (वर आजानुकर्ण यांनी म्हटल्याप्रमाणे पु.लं.चा अपवाद वगैरे वगळता) फारशी नसावीत. (नाही म्हणायला हा शब्द 'सन्त' असा लिहिणारे तुरळक खाजाळू असतीलसुद्धा, परंतु 'सन् त' - मधली रिकामी जागा वगळून - असा लिहिणारे महाभाग टिळकांअगोदर किंवा नंतर झाल्याचे ऐकिवात नाही.)
असो.
(अवांतर: बाकी, टिळकांची संतत्रयीची किंवा 'मी शेंगदाणे खाल्लेच नाहीत'वाली गोष्ट काय किंवा गांधींची 'केट्ल'च्या स्पेलिंगची गोष्ट काय, या गोष्टी या कोणीतरी उठवून दिलेल्या वावड्या असाव्यात, अशी मला दाट शंका आहे.)
- Log in or register to post comments
ज
जागु
Wed, 12/22/2010 - 07:31
नवीन
पण खरच मराठी जपलीच पाहिजे. महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारी तसेच निमसरकारीही कामांचे दस्ताऐवज मराठीतुन केले पाहीजे.
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Fri, 12/24/2010 - 16:03
नवीन
you are absolutely right. I agree with you.
- Log in or register to post comments
ग
गवि
Wed, 12/22/2010 - 07:58
नवीन
भाषा आपोआप जपली गेली तर जगते. नियम, सक्ती, कायदे असे काही करुन सोवळ्याचे फडके बांधून लोणच्यागत टिकवली तरी फार काळ तग धरेल असे नाही.
लवचिक भाषा जगतात.
बाहेरच्यांना अजिबात प्रवेश न देणार्या. शब्दांची जराही मोडतोड न होऊ देणार्या कडक नियमवाल्या भाषा काळाच्या धुरळ्यात गडप होतात. किंवा फक्त म्यूझियम / ऐतिहासिक व्हॅल्यूच्या (ममिफाईड) बनतात. उदा संस्कृत.
जे शब्द सहज रुढ होताहेत ते गुलामगिरी, परभाषा वगैरे असे जुने संदर्भ न आणता सामील करुन घ्यावेत हे हिताचे.
टिकण्यायोग्य असते ती भाषा टिकतेच.
मराठीचे तरी काय?:
अगदी पहिले सापडलेले मराठी वाक्यः
"चामुंडरायै सुत्ताले करवियले. श्री गंगरायै सुत्ताले करवियले"
नंतर बखरींमधे..
"जैसे भडबुन्जे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात व्हावा तसा एक धडाका जाहला.."
या भाषेपेक्षा तुम्ही आम्ही बोलतोय ती (या लेखाची आणि प्रतिक्रियांची धरुन) मराठी भाषा यांत लिपी सोडून काय साम्य आहे?
त्यावेळची मराठी संपली. पण आता वेगळे रुप जिवंत आहे.
- Log in or register to post comments
त
तिमा
Wed, 12/22/2010 - 08:21
नवीन
चीनचे एवढे कौतुक नको. काही वर्षांनी आपल्या इथे पण सगळ्या पाट्या चायनीज भाषेतच लागणार आहेत. आणि त्या सक्तीने वाचाव्या पण लागतील.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Wed, 12/22/2010 - 08:50
नवीन
धाग्याचे जे मूळ कारण आहे "चिनी भाषेची प्युरिटी राखण्यासाठी त्या सरकारने उचललेले पाऊल...", त्याविषयी मत व्यक्त करीत आहे.
त्या बातमीवरून (तसेच या धाग्यावरून) असे वाटण्याची शक्यता आहे की चीनची इंग्लिश भाषेशी दुश्मनी आहे. पण प्रत्यक्षात तसे नसून तो आदेश काढण्याचे कारण "लिपी" आहे. म्हणजे असे की, चिनी वर्तमानपत्राला आता बातमीत वा लेखात English Word वा Phrase द्यायची असेल तर ती 'चिनी लिपीत' देता येणार नाही. उदा. आपण महाराष्ट्र टाईम्स वा सकाळ या वर्तमानपत्रात असे वाचू शकतो की "वर्ल्ड कप फूटबॉल" साठी आयोजनासाठी भारत उत्सुक. चीनचे वर्तमानपत्रही ही बातमी देणार असेल तर या शीर्षकातील "वर्ल्ड कप फूटबॉल" त्याला 'चिनी लिपी' त देता येणार नाही. हा एवढाच शब्द World Cup Football असा देऊन त्याचा चिनी भाषेत कंसात अनुवाद द्यावा लागेल.
चिनी लिपी ही खरे तर चित्रलिपी असल्याने वर्तमानपत्रांना बातमीमध्ये एखादेवेळी इंग्लिश संक्षिप्त रूपे UNO, GDP, WTC, NBA द्यायची असल्यास ते चिनी लिपी वापरत (जसे आपण मराठीत 'युनो, जीडीपी, एनबीए' वापरली असती), त्यामुळे त्या लिपीतील इंग्लिश शॉर्टफॉर्म्सचे अनेकविध अर्थ निघू शकतात (इथे भाषेच्या Purity चा प्रश्न आला होता).....हे त्या सरकारच्या The General Administration of Press and Publication या विभागाच्या लक्षात आल्याने त्यानी "इंग्रजी शब्दांची संक्षिप्त रूपे देऊ नयेत" असा जरी आदेश जरी जारी केला असला तरी त्यात 'If necessary' ची एक पळवाट ठेवली आहेच अन् ती म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे शब्दाचे पूर्ण रूप देऊन त्याचा चिनी भाषेतील अनुवाद कंसात देणे.
इन्द्रा
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 12/22/2010 - 09:36
नवीन
दुर्दैवाने मराठी आणि हिंदीची लिपी एकच असल्याने विजुभौंना भीती वाटणारे हिंदी शब्द ओळखण्यास अंमळ अडचण येणार आहे.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Wed, 12/22/2010 - 10:12
नवीन
अडचण येणार नाही असे वाटते. सम मोअर इक्वल शब्द लगेच ओळखता येतील की? जसे की एखाद्याला तू किती बिझी आहेस हे विचारताना मी त्याला "तेरा व्यस्त प्रमाण काय आहे?" असे विचारीन. हिंदी शब्द मराठीत आल्याने काही अडचण होणार नाही असे मानून हेही वाक्य चालून जाईल असे वाटते.
"गर्वाने सांगा हम मराठी आहे"
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 12/22/2010 - 12:54
नवीन
चालणार नाही. किंबहुना हे तुमच्या प्रतिसादाइतकेच अर्थहीन वाक्य आहे. वाक्यरचना योग्य नसल्याने ती समोरच्याला समजणार नाही. तो तुम्हाला वेडा समजण्याचा धोका इथे नमूद करावासा वाटतो.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Wed, 12/22/2010 - 13:23
नवीन
चालणार नाही. किंबहुना हे तुमच्या प्रतिसादाइतकेच अर्थहीन वाक्य आहे. वाक्यरचना योग्य नसल्याने ती समोरच्याला समजणार नाही. तो तुम्हाला वेडा समजण्याचा धोका इथे नमूद करावासा वाटतो.
यू सेड इट. वर कोणीतरी हिंदी शब्द मराठीत आल्यामुळे काय बिघडतं असे विचारले होते. तिथे हा चोप्य पस्ते करावा असा विचार करतो आहे.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 12/22/2010 - 13:25
नवीन
अहो महाशय,
स्वतःला पटणारे सोयीस्कर उदाहरण घेऊन सिद्धता होत नसते. तुम्ही चुकीच्या ठिकाणी हिंदी काय अगदी संस्कृत शब्द घातला तरी तिथे बिघडणारच. याउलट योग्य ठिकाणी हिंदी शब्द चालूनही जाईल. थोडा विचार करा.
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
गुरुवार, 12/23/2010 - 02:44
नवीन
तुम्हाला काय म्हणायचंय ते कळतंय. जसे फारसी, अरबी आणि संस्कृत शब्द मराठीत आले तसे काही हिंदी शब्द आले तर काहीच हरकत नाही हे तत्वतः मान्य आहे. परंतु तुम्ही जर आजकाल वर्तमानपत्रात, दूरदर्शनवर दिसणारी आणि बर्याच लोकांच्या तोंडी असणारी भाषा पाहिलीत तर योग्य तेच हिंदी शब्द मराठीत येत आहेत असे म्हणाल?
शिवाय मराठीत आधीच त्या अर्थाचे अनेक शब्द असताना (भले ते पुर्वी इतर भाषेतून आलेले असो) विनाकारण नवीन प्रतिशब्द आयात करून जुने शब्द विस्मरणात घालवायची किंवा त्यांचे अर्थ बदलायची गरज काय?
वरती पुपे म्हणाले तसं, "मी व्यस्त आहे", "मला गर्व आहे", "माझी मदत कर"इत्यादी चुकीचे वाक्यप्रयोग आणि प्रेक्षकांसाठी दर्शक असे चुकीचे शब्द आजकाल सर्रास वापरले जातात.
इतकाच जर हिंदीचा सोस आहे तर हिंदीच बोलूया ना. कशाला पाहिजे मराठीतरी? ज्याला शब्दांचा पोत, छटा आणि रुप पाहता येते त्याला थोड्या छटेच्या फरकानेही खडा लागल्यासारखे होते. इथे तर ढळढळीत काहीही शब्द वापरले जातात आणि वर भावना पोचल्या म्हणजे झाले ना अशी रंगसफेती केली जाते. जर भावना पोचणेच फक्त महत्त्वाचे असेल तर माकडेही एकमेकात संवाद साधतात त्या आणि इतर भाषांमध्ये फरक काय?
- Log in or register to post comments
स
सुनील
Wed, 12/22/2010 - 15:47
नवीन
हे जपानी भाषेने ह्यापूर्वीच अंगिकारले आहे.
जपानीत मूळ जपानी शब्द हे कांजी ह्या चीनकडून आयात केलेल्या लिपीत लिहिले जातात तर, जपानीबाह्य शब्दांसाठी काताकाना ही लिपी वापरली जाते.
सुनील-सान
- Log in or register to post comments
स
सुधीर काळे
Wed, 12/22/2010 - 17:40
नवीन
'हिरागाना' राहिली कीं!
- Log in or register to post comments
प
पंगा
Fri, 12/24/2010 - 17:54
नवीन
स्वतःस उल्लेखताना 'सान'प्रत्यय लावण्याची जपानीत प्रथा नसावी, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Sat, 12/25/2010 - 02:30
नवीन
शेमत
केवळ दुसर्याचा आदारार्थी उल्लेख करतानाच 'सान' लावतात,
कळाले का, सुनील सान.
- Log in or register to post comments
स
सहज
Wed, 12/22/2010 - 09:51
नवीन
चीन ने देश में अख़बारों, पत्र-पत्रिकाओं और वेबसाइटों पर विदेशी शब्दों और विशेष रूप से अंग्रेज़ी के शब्दों का प्रयोग करने पर पाबंदी लगा दी है.
मुळ लेखात 'अन्य भाषीक' ऐवजी विदेशी शब्दों और विशेष रूप से अंग्रेज़ी असा स्पष्ट उल्लेख असताना इथे विशेष टिप्पणी करताना, मराठीत हिंदी मग हळुच कन्नड, गुजराथी भाषा व त्या प्रातांचे नियम इ. काढून देशांतगर्त भाषिकांमधेच दुरावा निर्माण करायचा प्रयत्न तर नव्हे? मराठीत इंग्रजी अथवा अन्य विदेशी भाषांबद्दल बोलत असाल तर एकवेळ तो समान धागा असेल. बाकी सध्या महाराष्ट्रात रुळलेल्या मराठीत अन्य भाषेतले (देशी, परदेशी) शब्द बिल्कुल नाहीत असे आपले म्हणणे आहे का?
चीन मधे देखील वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी भाषा बोलणारे लोक आहेत. 'कोणतीही भाषा बोला पण जितक्या चांगल्याप्रकारे बोलता / वापरता येईल तितकी बोला / वापरा' हे जगातल्या कोणत्याही भाषा बोलणार्याला तत्वता पटेल असेच आहे. चीन मधील दोन प्रांतांच्या सीमावर्ती भागात, तसेच मोठ्या शहरात रहाणारे लोक चीन मधे बोलल्या जाणार्या अन्य भाषेतले शब्द वापरत नाहीत असे आपले ठाम म्हणणे व वस्तुस्थिती आहे काय?
खरे तर मराठी भाषा बोलणार्यांनी हिंदीच्या वाटेला जाउ नये असे कोणत्याही हिंदीभाषकाला मनापासून वाटेल :-)
तुमने कभी अस्सल मराठी मानुस हिंदी बोल्तेहूए ऐक्या है क्या? वो एक कणेकर लेखक करके है एकजन, उनकी लिही हुवी वाक्ये वाचो कभी|
तरी मराठीला धोका हिंदीपासुन वगैरे वक्तव्ये खोडसाळ वाटतात.
भारतात ज्या प्रांतात आपण रहातो तेथील भाषा, हिंदी व इंग्रजी भाषा (अगदी क्वचित प्रसंगी सरमिसळ, संभाषण कळावे म्हणुन ) वापरुन संभाषण करण्यात, सरकारी काम करण्यात कोणाला कसली अडचण नसावी.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Wed, 12/22/2010 - 10:13
नवीन
भारतात ज्या प्रांतात आपण रहातो तेथील भाषा, हिंदी व इंग्रजी भाषा (अगदी क्वचित प्रसंगी सरमिसळ, संभाषण कळावे म्हणुन ) वापरुन संभाषण करण्यात, सरकारी काम करण्यात कोणाला कसली अडचण नसावी.
राज ठाकरे देखील हेच म्हणतात. पण आपले थोर सबसे तेज चॅनेलचे रीपोर्टर्स महाराष्ट्राच्या मुख्यमन्त्र्यानासुद्धा हिन्दीत बोला असे सांगतात तेंव्हा त्या माजुर्डेपणाला काय म्हणायचे?
पुण्यात राहूनही मराठी न येता माझे काही अडत नाही असे अभिमानाने म्हणणारे हिन्दीभाषीक मराठी भाषेला कमी लेखतात . त्याना तुम्ही ही वाक्ये का नाही समजून सांगत?
वर पुन्हा हिन्दी ही राष्ट्रभाषा आहे . ती सर्वानी बोलायलाच हवी असा वृथा तोरा मिरवतात.
मी मराठी बोलणारच नाही . मला कळावे म्हणून तुम्हीच हिन्दीत बोला हा अट्टाहास कशाला?
आमच्या देशात्/प्रान्तात यायचे इथेच जगायचे पैसे मिळवायचे आणि वर आम्हालाच शहाणपण शिकवायचे हा माजुर्डेपणा मराठी माणसाने कशासाठी सहन करायचा.
मराठी माणसाने या बाबतीत तमीळ लोकांचा आदर्श समोर ठेवावा.
- Log in or register to post comments
स
सहज
Wed, 12/22/2010 - 10:33
नवीन
माजुर्डेपणाला सडेतोड उत्तर द्यायला मराठी माणसाचे हात कोणी बांधले नाहीत. की अश्या माजुर्डेपणाचे समर्थन कोणीच करणार नाही.
बाकी चीनने इंग्रजी भाषा की अन्य चीनी बोली भाषेबाबत फतवा काढला आहे ते लिहले नाहीत.
'मराठीवर अन्य भाषांचे आक्रमण' हा एक न संपणारा विषय वाटतो आहे.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 12/22/2010 - 12:51
नवीन
महाराष्ट्रातील मराठी लोक मराठी बोलत नाहीत, मराठी चित्रपट पाहत नाहीत, मराठी लिहीत नाहीत याला उत्तरेकडच्या वाहिन्या किंवा उत्तरेतून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेले हिंदीभाषक जबाबदार कसे काय असतील. मराठी लोकांनी मराठीत बोलू नये म्हणून त्यांनी तोंडे धरून ठेवली आहेत का?
हिंदी वाहिनीने हिंदीत बोला असे मुख्यमंत्र्यांना सांगणे हे त्या वाहिनीचे काम असावे. (हिंदी वाहिनीचा प्रेक्षकवर्ग हिंदी जाणणारा असतो) पण मुख्यमंत्र्यांनी मराठीतच उत्तर द्यायला काय हरकत आहे. मराठीत न बोलण्याचा दोष मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाच आहे.
- Log in or register to post comments
ग
गणपा
Wed, 12/22/2010 - 14:19
नवीन
या मुद्यावर आजानुकर्णाशी बाडिस (माफ करा ) १००% सहमत.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Wed, 12/22/2010 - 10:04
नवीन
तरी मराठीला धोका हिंदीपासुन वगैरे वक्तव्ये खोडसाळ वाटतात.
हिन्दी भाषेने बर्याच भाषा गिळंकृत केल्या आहेत.
राजस्थानी ही भाषा पूर्वी हिन्दीची पोटभाषा मानली गेली. पण आता तर त्या भाषेचा अस्त होऊ लागलाय.
तीच गत हरयाणवी ची , मैथीली अंगीका या भाषांची.
मराठीवर हिंदीचे हळूहळू आक्रमण होतच आहे.
वर्तमानपत्रातल्या /टीव्हीवरील जहीरातीतील भाषा पहा// तुम्हाला जाणवेल
मराठी सीरीयल्स मधील पात्रे चुकीचे ( हिन्दी धाटणीचे ) शब्द प्रयोग करू लागलीत.
उदा :मला मदत करशील हे वाक्य ( मेरी मदद करोगे?) या प्रमणे माझी मदत करशील असे बोलतात.
"गर्व " या शब्दाबद्दल अगोदरच लिहीले आहे.
" सकाल प्रहर पासून एकसारख्या ताजगी साठी " अशी जहीरात करणार्याला मराठीत सकाळ हा शब्द आहे आणि त्यासाठी प्रहर हा शब्द वापरावा लागत नाही. " ताजगी " या ऐवजी "उत्साह , ताजेपणा" हे शब्द आहेत हे माहीत नाही. लोक तेच चालवून घेतात आणि हळूहळू चुकीचे शब्द बरोबर आहेत असे लोकाना वाटू लागते.
ही वस्तुस्थिती आहे त्यात खोडसाळ पणा काय झाला. मराठीला मराठीचे हिन्दीकरण होण्याचा धोका आहेच.
भाषा जगली संस्कृती जगली. भाषा संपली संस्कृती संपली
- Log in or register to post comments
स
सुहास..
Wed, 12/22/2010 - 13:17
नवीन
राजस्थानी ही भाषा पूर्वी हिन्दीची पोटभाषा मानली गेली. पण आता तर त्या भाषेचा अस्त होऊ लागलाय.
तीच गत हरयाणवी ची मैथीली अंगीका या भाषांची.
हम्म ! आता कस ?
विजुभाऊंशी १००% सहमत !
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 12/22/2010 - 13:23
नवीन
श्री. विजुभाऊ तुमची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. पण हा मुद्दा शेवटी प्रमाणलेखनाशीच निगडित आहे ना. हळूहळू चुकीचे शब्द बरोबर वाटण्याचा प्रकार अशुद्ध शब्दांनीही होणारच ना. तुम्ही 'सकाळ' या शब्दाचा 'सकाल' असा उच्चार चुकीचा असल्याचे लिहिले आहे. पण 'नलाच्या बाजूच्या तलातल्या खोलीतल्यांचे' उच्चार असेच असणार ना. मग मी शुद्धलेखनाचा मुद्दा काढला तो चुकीचा कसा काय?
- Log in or register to post comments
स
सुहास..
Wed, 12/22/2010 - 13:36
नवीन
आजानुकर्णजी
बोलीभाषेत आणि लेखी भाषेत बरीचशी गल्लत होते आहे आपली असे वाटते आहे
बाकी चालु द्या
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Wed, 12/22/2010 - 13:38
नवीन
हो पण विजुभाऊंचा हा चर्चाप्रस्ताव हा 'लेख'च आहे ना. मी चर्चाप्रस्तावाच्या लेखी भाषेबाबतच माझा मुद्दा मांडला होता. विजुभाऊंनी पॉडकास्टवर ही चर्चा उपलब्ध करून दिली असेल तर सपशेल माफी मागतो.
- Log in or register to post comments
स
सुहास..
Wed, 12/22/2010 - 13:48
नवीन
आपण त्याच्यां भावनांना समजायचे होते, आपण तर त्यांच्या भावनेला आपले समजायला लागलो आहे . ;)
असो
- Log in or register to post comments
प
पंगा
Fri, 12/24/2010 - 08:12
नवीन
साफ चूक!
'आपण त्यांच्या भावना समजून घ्यायच्या होत्या'!
- Log in or register to post comments
स
सुहास..
Fri, 12/24/2010 - 16:19
नवीन
साफ चूक!
'आपण त्यांच्या भावना समजून घ्यायच्या होत्या'! >>>
पंगोपंत !! त्याच करिता मुद्दामुन टाकले होते. पण चिकित्सकांनी भ्रमनिरास केले मला. ;)
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Wed, 12/22/2010 - 11:04
नवीन
"....भाषा जगली संस्कृती जगली. भाषा संपली संस्कृती संपली...."
वरील वाक्यातील भावार्थ जसाचा तसा घेऊनही मी असे म्हणतो की, इतकी शेणगोळ्यासम लेचीपेची मराठी संस्कृती आहे का, की भाषेत (देशातीलच) दुसरी भाषा, व्यवहाराकरीता, आली म्हणून तिला उर्ध्व लागावा? भाषा हे सुशिक्षित तसेच अशिक्षित माणसांमधील संवादाचे माध्यम आहे (लिपीचा इथे विचार करीत नाही) तर विविध ढंगी भाषांचे महत्त्व भारतासारख्या बहुभाषी देशात विशेषच आहे. घटनेने देशात कुणालाही कुठेही प्रवासासाठी, रोजीरोटीसाठी मुभा दिली असल्याने त्या त्या प्रांतातील भाषेचे अनेकविध कंगोरे आपल्या भाषेत अवतरणारच, पण त्यामुळे आपली भाषा "भ्रष्ट" झाली असे मानण्याचे काही कारण नसते.
मराठी भाषेचा अभिमान बाळगणार्या व्यक्तीच्या मुलीला "डॉक्टर" जावई सांगून आला तर तो आपल्या पाहुणे-परिवारात "माधवीच्या लग्नासाठी वैद्य मुलगा आलाय" असे सांगेल का? तिथे मात्र अभिमानाने "डॉक्टर" असे इंग्रजी नामच वापरण्याची ती व्यक्ती काळजी घेईल. असे शब्द आणि ते ज्यातून येतात त्या भाषा म्हणजे संस्कृतीचाच एक पूल असतो. इंग्रजीचे स्थान जसं भारत भ्रमणात महत्वाचे ठरते तद्वतच माझ्यासारख्या पक्क्या मराठी नागरिकाला पोटासाठी पंजाब वा हरियाणा इथे जावे लागते त्यावेळी 'हिंदी' चा (भले कितीही मोडकातोडका का असेना) आधार घ्यावाच लागतो. या दोन्ही प्रांतातील (शीख आणि जाट) व्यावसायिक बंधू माझे कोल्हापुरी हिंदी ऐकून ("मेरे पीठको घाम आयाला है"...पद्धतीचे) बेशुद्ध पडलेले नाहीत किंवा "ओये पुत्तर पंजाबी सिख लेना जल्दी जल्दी....!" अशी प्रेमळ धमकीदेखील देत नाहीत.
अमृतसर, गुरुदासपूर, लुधियाना, फिरोझपूर, बर्नाला आदी मेट्रो शहरे तर सोडाच पण अगदी आतील ग्रामीण भागातदेखील हिंदी भाषा बोलून कुणी व्यवहार करीत आहे हे पाहून गावकर्याची भुवई वक्र होत नाही...किंबहुना रोहटक आणि अंबाला या दोन हरियाणवी जिल्ह्यात तर परक्या व्यक्तीने (इथे मी...) बोललेले हिंदी कळत नसले तरी तो दुकानदार्/कंडक्टर्/बॅन्क कर्मचारी थोडावेळ थांबून समजून घेऊन योग्य ते मार्गदर्शन करतोच करतो....अशावेळी त्यांच्या मूळच्या भाषेचा तिथे काही अवमान होत आहे असे त्याला वाटत नाही.
"महाराष्ट्रातून चार लोक येऊन पंजाबी भाषा आणि संस्कृतीवर घाला घालत आहेत..." अशी समजूत तिथे कुठे रुजल्याचे मला आजअखेर आढळलेले नाही.
'भाषेच्या अस्मितेचा प्रश्न' हे मनसेच्या राजकारणातील अस्तित्वासाठी एक प्रभावी शस्त्र आहे....त्याचा संबंध आपण भाषावृद्धी आणि संस्कृती यांच्याशी जोडू नये.
इन्द्रा
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
Wed, 12/22/2010 - 11:26
नवीन
अति अति अवांतर :
आताच एक मित्राबोबर ह्या विषयी चर्चा करीत होतो, त्या पट्ठ्याने एक नवीनच माहिती दिली.
Sentence of the year :
बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बिहारी जनतेने विकासाला जो अभूतपूर्व कौल दिला, त्याला खरे कारणीभूत कोण ? त्यांची निद्रावस्थेत गेलेली अस्मिता जागृत करण्याचे कार्य केले ते 'राज ठाकरे' यांनी.
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Wed, 12/22/2010 - 11:31
नवीन
बिहारींबद्दल काय समजूत आहे तिथे?
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Wed, 12/22/2010 - 13:24
नवीन
श्री.धमु....
पंजाब असो वा हरियाणा, या दोन्ही प्रांतांची देशभर ओळख आहे ती मुख्यत्वे करून शेतीउद्योगाशी आणि काही प्रमाणात कारखानदारीच्या क्षेत्रातील त्यांची भरारी. इथे २४ तास राबणारा शेतकरी जसा दिसतो (जो गव्हाच्या रूपाने सोन्याची पैदास करतो असे म्हटले तरी अतिशयोक्ती नाही) तसाच लुधियानाच्या घराघरातून चाललेले कारखानदारीशी संबंधित कुटिरोद्योग पाहिले तर अन्य प्रांतियांनासुध्दा तिथे "नोकरी" निमित्ताने येण्याची गरज वाटावी. पण आलेच (आणि तसे बिहारी आले असले तरी का कोण जाणे पंजाबी लोक त्याना 'परके' मानत नाहीत....किंबहुना त्याला काही ऐतिहासिक कारणदेखील असू शकेल) तर ते इथल्या मातीत असे मिसळून गेलेले आहेत की, आपल्यासारख्या महाराष्ट्रीयानास असेच वाटेल की ते मुळचेच इथले आहेत. भाषा-वेषभूषा-खाण्याच्या पद्धती-राहणीमान, सणवार अगदी त्या मातीतीलच. (हे महाराष्ट्रात आलेले बिहारीदेखील करीत असतील तर वादाचा मुद्दाच राहणार नाही). पण असे आहे म्हणून त्यांच्यापेक्षाही घाम गाळून काम करतात ते स्थानिक लोक. बाहेरच्यांची गरज भासणार नाही अशी जबरदस्त वातावरण निर्मिती शीख आणि हरियाणवी युवक-युवतीच काय पण प्रौढानीसुद्धा (स्त्री-पुरुष) निर्माण केली आहे; पण म्हणून जे आले आहेत त्याबद्दल (मला तरी) कुठे असंतोष खदखदत आहे असे दिसलेले नाही (अर्थात माझी झाडाझडती फक्त दोन-तीन जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे, हेही इथे नमूद करणे आवश्यक आहे). सतत कामात असतात हे लोक, शिवाय अमुक एक काम 'हलके' वा 'माझे नव्हे' अशीही भावना कुठे दिसत नाही. माझ्यासमोर ट्रॅक्टर चालविणारा कदाचित त्या गावातील लखपती आणि मुखियादेखील असू शकतो, पण पेहेरावावरून तो आपल्याकडील रामा-शिवा-तुक्या सारखाच दिसतो.....खाण्यातही बिलकुल नखरे नसतात. दालरोटी तसेच चनाभटोरा, लस्सीचा ग्लास समोर आले की गडी खुश !
त्यामुळे परिस्थिती अशी आहे की; अशा मेहनतीच्या/कारागिरीच्या कामासाठी बाहेरचे हवेतच असे चित्र जरी नसले तरी जे बिहारी आता गेली २०-२५ वर्षे झाली त्या दोन राज्यात आहेत त्याना हुसकाविण्यासाठी काही चळवळी दिसत नाहीत (असल्या तर त्याबद्दल मी अनभिज्ञ आहे असे म्हणतो). काही बॅन्किंग आणि सरकारी नोकरीनिमित्य येणे झाले म्हणून आले आणि कायमच्या वास्तव्यासाठीदेखील राहिलेले आहेत. माझ्यासारखे काही तुरळक महाराष्ट्रीयन दिसत असले तरी ते कायमच्या वास्तव्यासाठी नसून तेथील काही संस्थांशी भागिदारीचे छोटेमोठे व्यवहार झालेले असतात या कारणासाठीच.
या किंवा अशाच कारणामुळे या दोन राज्यातील जनतेला अन्य राज्यातून आलेल्या भय्यांमुळे कसलीही चिंता वाटत नाही असेच चित्र आहे. त्यातही मुंबईसारखेच बिहारी बाबूंना "नवी दिल्ली" चे आकर्षण आहे पण 'अमृतसर' वा 'चंदिगड' चे तितके नाही असे म्हटले तरी अतिशयोक्ती नाही.
इन्द्रा
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Wed, 12/22/2010 - 13:39
नवीन
तर ते इथल्या मातीत असे मिसळून गेलेले आहेत की, आपल्यासारख्या महाराष्ट्रीयानास असेच वाटेल की ते मुळचेच इथले आहेत. भाषा-वेषभूषा-खाण्याच्या पद्धती-राहणीमान, सणवार अगदी त्या मातीतीलच. (हे महाराष्ट्रात आलेले बिहारीदेखील करीत असतील तर वादाचा मुद्दाच राहणार नाही).
इंद्रा तुम्हीच कारणही लिहीले आहे. विचार करून बघा. आपल्या आजूबाजूच्या महाराष्ट्रातील महानगरांमधे ही परिस्थिती आहे का? ४ मराठी माणसांमधे १ बाहेरचा माणूस असेल तर त्याच्यासाठी सर्वांनी का म्हणून हिंदी बोलावे. आणि हा एकटा असलेला माणूस तुम्ही हिंदीत बोला असे म्हणायला धजावतो हा त्याचा माजुरडे पणा आहे ज्याला आजकाल काही लोक शूरपणा संबोधत असले तरीही. मी अशाप्रकारे समजा ४ इतरभाषिकांच्यात असलो असतो तर त्यांना माझ्यासाठी हिंदीत बोला हे कधीच सांगितले नसते. याचे कारण शारीरीक वा मानसिक दौर्बल्य हे नसून मला त्या लोकांच्या भाषाप्रेमाचीही कदर आहे . आणि असा मोठ्यामनाने वागण्याचा संस्कार माझ्यावर आहे. पण माझ्या शहराची, गावाची व्यवहार भाषा जर बदलत असेल तर तो बदल थांबवणे हे माझे कर्तव्य आहे असे मी मानतो . आणि ते सर्वांच्या प्रयत्नातूनच शक्य आहे. त्यासाठी मित्रांचे प्रबोधन करतो. आणि त्यासाठी योग्य तिथे बोलतो, इतर मराठी मित्रांना मराठी बोलताना मदत करतो. ते वापरत असलेल्या हिंदी शब्दाला योग्य तो मराठी शब्द सांगतो.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Wed, 12/22/2010 - 14:23
नवीन
"....पण माझ्या शहराची, गावाची व्यवहार भाषा जर बदलत असेल तर तो बदल थांबवणे हे माझे कर्तव्य आहे असे मी मानतो...."
श्री.पु.पे. तुमच्या या मताचा मी नि:संशय आदर करतो इतके ते निखळ आहे. मी पाहिलेल्या (तसेच काम करीत असलेल्या काही) राज्यातील परिस्थिती मात्र अशी आहे की, त्या राज्याचे कायमचे रहिवासी झालेल्या बिहारी लोकांनी जशी स्थानिक बोलीभाषा आत्मसात केली आहे तद्वतच जर ते एखाद्या वेळी एखाद्या 'सिंग' बरोबर संवाद साधताना हिंदीचा आसरा घेत असतील तर ते सिंग याना खटकत नाही (नसावे....तसे पाहिल्यास शीख समाजालाही पंजाबीइतकीच उर्दु आणि हिंदी प्रिय आहे, हेदेखील कारण असू शकेल.). आत्ता लुधियाना (पॉवरफुल इंडस्ट्रियल बेल्ट) शहरात आणि तालुका पातळीवर मात्र अलिकडे निर्माण झालेल्या अशांततेच्या वातावरणामुळे छोट्यामोठ्या संघटना बांधून राहण्याची हे बिहारी बाबू दक्षता घेत आहेत आणि हिंदीशिवाय संवाद करीत नाहीत. (त्यासाठी नकळत वा छुप्या मार्गाने का होईना बिहार सरकारचादेखील पाठिंबा आहे). याला प्रत्युत्तर म्हणून लुधियानामधे शिखांच्या संघटनांनी आता हात सरसावले आहेत. (अर्थात ही परिस्थिती फक्त लुधियानामध्ये असल्याने पंजाबच्या अन्य जिल्ह्यात अजून परराज्यातील मायग्रंट्समध्ये भीतीसम वातावरण नाही.)
मात्र महाराष्ट्रातच हे बिहारी (संघटनेच्या जोरावर) उर्मटपणे 'हिंदी' भाषेतूनच आपले व्यवहार करीत असल्याचे दिसत असल्याने त्यावर 'मनसे' चे जे काही उपाय असतीत ते असो, पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे निदान पहिली पायरी म्हणून का होईना मराठी लोकानीच रोजच्या व्यवहारात त्यांच्याशी बोलण्याचा प्रसंग आलाच तर जाणीवपूर्वक मराठीचाच पाठपुरावा करणे हा एक सरळमार्गी आणि प्रभावी उपाय होऊ शकेल.
इन्द्रा
- Log in or register to post comments
स
सुहास..
Wed, 12/22/2010 - 14:50
नवीन
महाराष्ट्रातच हे बिहारी (संघटनेच्या जोरावर) उर्मटपणे 'हिंदी' भाषेतूनच आपले व्यवहार करीत असल्याचे दिसत असल्याने त्यावर 'मनसे' चे जे काही उपाय असतीत ते असो, >>>
धन्यवाद !
विषय संपला !
कुत्सीत हास्य >> मागची पिढी << संपले.
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 12/22/2010 - 16:04
नवीन
८/१० दिवसांपूर्वीची गोष्ट. मी चष्मा घ्यायला बँकेच्या खालीच भर पणजी बाजारात एका दुकानात गेले, आणि "मातसो चष्मो दाखय मरे" म्हणून दुकानदाराला सांगितले. पठ्ठ्या मला म्हणतो," वो सब मुझे आता नहीं"म्हणजे 'कोकणी' हा शब्द सुद्धा तोंडातून काढायची तयारी नाही. तुम्ही कुठले म्हणून विचारताच "बिहार से" म्हणून उत्तर आलं.
गोव्यातले लोक मराठी लोकांपेक्षा गरीब स्वभावाचे. त्यानी रस्त्यात दिसलेल्या कोणाही नवीन लोकांबरोबर निमूट राष्ट्रभाषेत बोलायला सुरुवात केलीय हल्ली!
- Log in or register to post comments
च
चिंतामणी
Fri, 12/24/2010 - 19:34
नवीन
शक्यता नाकारता येत नाही. (मी एव्हढेच लिहून थांबणार नाही.) हा कोकण रेल्वेचा एक तोटा आहे असे म्हणावेसे वाटते.
या कोकण रेल्वेच्या सर्व स्टेशनवर केटरींग कॉन्ट्राक्टर बिहारीच असतो आणि काम करणारे सुद्धा.
कोकण रेल्वेमुळे कोकण आणि गोवावासियांना प्रवास सोपा झाला एव्हढाच फायदा झाला असे नाईलाजाने म्हणावे लागेल.
- Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर
गुरुवार, 12/23/2010 - 11:17
नवीन
तुमचे सद्यपरिस्थितीचे वर्णन कदाचित बरोबर असेल. परंतु खलिस्तान चळवळ नक्की काय होती? तेव्हा पंजाब व्यतिरिक्त अन्य भारताबाबत शत्रुत्व नव्हते काय? नक्कीच होते. पंजाबमधील शीखांना हरयाणा, राजस्थान आणि त्याहीपेक्षा जास्त युपी, बिहार, बंगाल हे आपली लुबाडणुक करतात असेच वाटत होते. पंजाब चळवळीच्या सुरुवातीच्या काळात तरी शीखांवर भावनिक्-सांस्कृतीक-धार्मिक अतिक्रमण होते आहे, लुबाडणुक होते आहे ही भावना नक्कीच होती. जसजसा त्या चळवळीचा जोर ओसरला तसतशी ती भावना कमी होत गेली असेलही कदाचित.
दुसरे म्हणजे पंजाबमधे मराठी माणसांकडे पाहण्याच्या दृष्टीकोणाबाबतचा मुद्दा. मराठी माणसांकडे पंजाबी, काश्मिरी किंवा आसामी जनता शत्रुत्वाने पहात नाही हे खरेच आहे. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे या राज्यांमधे फुटिरतावादी वृत्ती जोर धरत होती तेव्हा महाराष्ट्रातील (आणि केवळ महाराष्ट्रातील) लोकांनी त्यांच्याबरोबर समान पातळीवर भावनिक नाते स्थापन करण्याचा प्रयत्न हेतुपुरस्सर केले. तुम्ही आणि आम्ही एकाच देशाचे भाग आहोत, आपले प्रश्न समान आहेत. बिहार, बंगाल सारख्या राज्यांची परिस्थिती वेगळी असली तरीही ती या देशाचेच भाग आहेत आणि त्यामुळे आपण त्यांना समजावुन घेणे भाग आहे असा विचार या राज्यांत जाऊन तेव्हा केवळ मराठी माणसांनी दाखवला. याच संबंधांमुळे या राज्यांमधील माणसांचे महाराष्ट्राशी वेगळे भावनिक नाते आहे. दुर्दैवाने गेल्या दोन दशकात महाराष्ट्रातीलच परिस्थिती बदलत गेली आणि तेव्हा पंजाब, आसाममधील अनेक लोक करत तसा विचार मराठी माणसेही करु लागली.
तरीही महाराष्ट्रात पंजाब, हरयाणाबद्दल संताप नाही. पंजाबी, हरयाणवीबद्दल राग देखील नाही. इथे लोकांमधे संताप आहे तो केवळ युपी, बिहार आणि हिंदीबाबतच.
- Log in or register to post comments
स
सुहास..
गुरुवार, 12/23/2010 - 11:26
नवीन
महाराष्ट्रात पंजाब, हरयाणाबद्दल संताप नाही. पंजाबी, हरयाणवीबद्दल राग देखील नाही. इथे लोकांमधे संताप आहे तो केवळ युपी, बिहार आणि हिंदीबाबतच. >>>
एकदम सहमत. उगाच नाशकात एकदम चार सिटं लागली ..पब्लीक कुठल्या बाजुला वळतय हे देखील समजत नाही काही लोकांना...
म्हणतात ना डोळे मिटुन...
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
गुरुवार, 12/23/2010 - 15:01
नवीन
श्री.प्रसन्न जी...
थोडा सविस्तर खुलासा करणे क्रमप्राप्त आहे.
'खलिस्तान' चळवळीच्या इतिहासाचा मागोवा घेतल्यास एक गोष्ट प्रखरपणे समोर येते की, देशाच्या स्वातंत्र्याची पहाट अगदी दोन-तीन आठवड्यावर आली होती आणि ज्यावेळी सिरिल रॅडक्लिफ ब्रिटिश-इंडियातील अवाढव्य अशा पंजाबच्या फाळणीचा नकाशा तयार करण्यात मग्न होते; त्यावेळीही जवळपास सर्वच शीख आणि त्याप्रांतात बहुसंख्येने असणार्या हिंदुना (अखंड पंजाबात हिंदू टक्केवारीने जास्त होते) असे वाटत होते की 'लाहोर' सह एकच पंजाब तयार होईल....लाहोर हे त्या काळातही पूर्णपणे 'मुस्लिम डॉमिनेटिंग सिटी' नव्हते आणि आजही तिथे उर्दु आणि पंजाबी भाषा गुण्यागोविंदाने नांदतात. पण फाळणी झाली आणि पुढे हिंसेचे जे काही रामायण घडले तीत फटका बसला होता तो प्रामुख्याने शिखांना (या विषयात जास्त खोल जात नाही). त्यामुळे झाले असे की, अगदी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी असो वा अकाल तख्त, यांच्यात 'आता जो काही पंजाब राहिला आहे तो हिंदू आणि मुस्लिम यांच्याशिवाय टिकविला पाहिजे' हा विचार बळावला आणि अगदी 'भारतीय प्रजासत्ताक घटना समितीने' तयार केलेल्या पहिल्या खर्ड्यात शीख प्रतिनिधीने त्यावेळी (सन १९४९) लेखी स्वरूपात त्यातील तरतुदीविषयी समस्त शीख समुदायाच्यावतीने विरोध दाखल केला होता. घटनेच्या त्या खर्ड्यानुसार घटक राज्यातील शीख, जैन आणि बुद्ध धर्मीयांना 'हिंदू' असेच ओळखले जाईल अशी तरतुद होती. म्हणजे अल्पसंख्य जैन आणि बुद्धांना त्याबद्दल तक्रार नसली तरी शीख 'ते' लेबल मान्य करतील अशी परिस्थिती नव्हती आणि पुढे तर ज्यावेळी फाळणीनंतर अस्तित्वात आलेल्या पंजाबमधुन हिंदूंचे प्राबल्य असलेल्या जिल्ह्यांना वेगळे करून अनुक्रमे हरियाणा आणि हिमाचल प्रदेशाची निर्मिती झाली त्यावेळी तर राहिलेल्या 'पंजाब' चे स्वतंत्रच अस्तित्व का असू नये असे शिखांतील जहाल गटाला वाटू लागले आणि तिथून सुरू झाली ती 'खलिस्तान' चळवळ; जिला अकाली तख्ताचे आशीर्वाद होतेच पण अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये मोठ्या संख्येने स्थायिक झालेल्या धनवान शीखांचे आर्थिक पाठबळ लाभले; त्यासाठी वा त्या दरम्यान तिथे जाऊन जगजितसिंग चौहानाने केलेल्या प्रभावी भाषणबाजीचाही हातभार लाभला. अगदी 'खलिस्तान'चे स्वतंत्र चलन आणि झेंडादेखील तयार करण्यापर्यंत त्या चळवळीने मजल मारली होती....पुढे भिन्द्रनवाले यांचा उदय आणि अंत, रक्तरंजीत इतिहास, ऑपरेशन ब्ल्यू स्टार...इंदिराजींची हत्या....या ठळक घडामोडी तर सर्वांनाच माहिती आहेत. सांगायचा मुद्दा असा की, पंजाबचे 'त्या' अर्थाने भारतातील अन्य राज्यांशी शत्रुत्व नव्हते...(म्हणजे युपी, बिहार, बंगाल आदी राजे हे आपली लुबाडणूक करतात असे वाटणे). त्यांची - खलिस्तानची - चळवळ ही 'स्वतंत्र अस्तित्व' यासाठीच होती आणि या घडीला ती अत्यंत क्षीण जरी झाली असली तरी ती पूर्णपणे संपुष्टात आली आहे असे नवी दिल्लीदेखील मानत नाही.
पण एक आहे की कोणत्याही अनुकुल्/प्रतिकुल परिस्थितीत पंजाबने आपली 'कष्टकरी' ही प्रतिमा डागाळून घेतलेली नाही. अगदी भिन्द्रनवाले यांच्या 'टेरर' काळातदेखील पंजाबात उत्पादन झालेला गहू सार्या देशाला पुरत होता. तीच गोष्ट लुधियाना बेल्टची, जिथे तंत्रज्ञानाशी निगडीत व्यापारउदीम फोफावला आहे....आणि इथे मात्र बिहारी अन्य राज्यांतील नागरिकांपेक्षा मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. (त्यामुळे त्या जिल्ह्यात दोन गटात होऊ घातलेल्या झगड्याविषयी चर्चा झालेलीच आहे, त्याची द्विरूक्ती इथे करत नाही).
तुम्ही प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे 'मराठी' माणसाबद्दल तेथील हवेत भावनिक नाते आहेच आहे. महाराष्ट्रातून आलेली व्यक्ती ही त्याना 'आपली' का वाटते याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न मी गेल्या दोन वर्षातील तिथल्या भेटीदरम्यान घेतला असता असे आढळते की, एकतर 'शिवाजी' हे नाव पंजाबला अगदी देवासम वाटते (एक गंमतीची गोष्ट सांगतो : गुरुदासपूरमध्ये तर महाराजांची दाढी आणि जिरेटोप यांचे पंजाब्यांना आदरमिश्रीत कौतुक वाटते, इतके की त्या पेहरावामुळे ते त्याना आपल्यातीलच एक वाटतात, इतकेच नव्हे तर महाराजांप्रमाणे आताचा मराठा समाज दाढी का राखत नाही याचेही कुतहूल वाटतेच)....कारण अर्थातच शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याला दिलेली यशस्वी टक्कर, शिवाय मुघलांचा खर्या अर्थाने अखेरचा सम्राट 'औरंगजेबा' चा मृत्यु झाला तो त्याच्या दख्खन स्वारीत, महाराष्ट्रातच. सैन्यातही शीख आणि मराठा रेजिमेंटस यांनी लढवय्ये म्हणूनच ओळखले जात असल्याने आर्मीत दोन्ही जमाती अगदी बंधूसम वागताना दिसतात. या बाबी पंजाबच्या इतिहासाला आवर्जुन नोंदाव्याशा वाटल्या आहेत. शिवाय फाळणीनंतर "मुंबई" ने शीखांना जी जवळीक दिली (जो आजही आहे) त्याचाही कुठे ना कुठे तरी संबंध आहे. त्यामुळेच असेल कदाचित मला (एक मराठा या नात्याने) त्या भागात कधीही परके वाटलेले नाही, किंबहुना तेथील स्थानिकांनी तसे कधीही जाणवूनही दिलेले नाही.
इन्द्रा
- Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर
Fri, 12/24/2010 - 12:46
नवीन
मी जे लिहिले होते ते ८०च्या दशकात मी जे अनुभवले, पाहिले आणि त्यानंतरही माझे शीख समाजाशी जे संबंध राहिले त्यावर आधारित होते. पाकिस्तान निर्मिती, पंजाबची फाळणी आणि भारतातील खलिस्तान चळवळीचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. (कॅनडामधे तसा तो लावला गेला पण तो फक्त अनेक युद्धे केलेल्या पाकिस्तानशी हातमिळवणी करण्याचे समर्थन होते.) हा इतिहास भिंद्रावाले यांनी कधीही सांगीतलेला नाही किंवा त्यांच्या आधिच्या निहंग नेत्यांनीही सांगीतलेला नाही. हरयाणाचा संदर्भ होता तो अबोहर-फाजिल्का, चंदीगढ पुरताच. तेथेही स्वातंत्योत्तर भारतातील आर्थिक विषमता हाच भाग मोठ्या प्रमाणात होता.
सैन्याबाबत व अन्य दलांबाबत बोलायचे तर तेथे असंतोष होताच आणि ऑपरेशन ब्ल्यु स्टार नंतर तो अधिकच वाढला. याचे अनेक दाखले आहेत. ते देण्यासाठी ही योग्य जागा आहे असे मला वाटत नाही.
सिव्हिलियन्समधे सध्या जी शीख-मराठी जवळिक दिसते ती ८० च्या दशकात महाराष्ट्राने घेतलेल्या पुढाकारामुळेच. आणि या जवळिकीबाबत सर्वाधिक समानत्व दिसते ते संत नामदेवांमुळे आणि गुरु गोविंदसिंहांमुळे.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Fri, 12/24/2010 - 13:23
नवीन
".....ते देण्यासाठी ही योग्य जागा आहे असे मला वाटत नाही....."
~ त्या दाखल्यांच्या निमित्ताने खूप चांगली चर्चा करता आली असती त्या विषयावर....पण तुम्ही म्हणता तसे "ही योग्य जागा आहे..." असे मलाही वाटत नाही. [सध्याच्या मिपावरील हवेत तर ते शक्यच नाही.]
थॅन्क्स
इन्द्रा
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »