बरोबर मला एक अॅडिशन करायची आहे
* ज्या ठिकाणी थांबायचे आहे एक्झॅक्ट त्या ठिकाणी गाडी आल्यावर "इथे थांबव इथे थांबव" असा अचानक आदेश देणे. दोन मिनिटे अगोदर सांगणे वगैरे अशी काही पद्धतच नसते
सालं ब्रेक मारायची पंचाईत आणि पुढे जायची ही पंचाईत.........
(१) नवर्याला सुंदर बाई दाखवून विचारणे की ही १० च्या पट्टीवर किती सुंदर आहे. म्हणजे पडला ना नवरा पेचात :-D
(२) किंवा मग जाडी बाई दाखवून विचारणे मी हिच्याइतकी जाडी नाही आहे ना? :P
(३) "तुला एक विचारू" अशा गंभीर खोल आवाजात सुरुवात केली की नवरा म्हणतो "नSSSSSको." कारण त्याला अनुभवाने माहीत असतं पुढे काय वाढून ठेवलं आहे ते. :-D ..... ५ महीन्यांपूर्वीचा काहीतरी संवेदनशील मुद्दा जो नवर्याच्या डोक्यावरून गेलेला असतो तो निघणार असतो.
(४) लग्न झालं की पुरुष बस/रेल्वेमधली खिडकीशेजारची जागा विसरतातच बिचारे =))
(५) रर्विवारी सुद्धा नवर्याने ढॅण ढॅण युद्धाचे सिनेमे लावले की यांचं (बायकांचं) मस्तकशूळ उठतं कारण यांना ते संगीत आणि हिंसाचार आवडत नाही. बरं आवडत नाही तर आतल्या खोलीत बसावं ना मुकाट्यानी पण नाही नवर्याबरोबर बाहेर जायचं असतं, गप्पा मारायच्या असतात एकूण काय नवर्याला तो सिनेमा पाहू द्यायचा नाही ;)
(६) आता जो मुद्दा सांगणार आहे तशी मी वागत नाही पण काही बायका वागताना पाहील्या आहेत. बिचार्या नवर्याचे ठराविक विनोद असतात जे तो दर सामाजिक प्रसंगी सांगत असतो आणि हशा वसूल करत असतो. खरं तर बायको तो विनोद ५० व्या वेळेला ऐकत असते. पण सौजन्य म्हणून तिने सर्वांबरोबर हसायचे असते :) ....... काही बायका हसत तर नाहीतच पण जरा कंटाळतात देखील. हा हा!! व्हेरी व्हेरी बॅड!!!
(७) नवर्याच्या उनाड मित्रांचा सूक्ष्म दुस्वास करणे. म्हणजे अगदी आमने सामने हातापाई नाही पण गनिमी काव्याने सुचविणे की या मित्रांना काही कामधंदा नाही का, हे का पडीक असतात? आपल्याला एकांत मिळत नाही आदि ;) ....... हे नवर्याच्या जानी मित्रांबरोबरचं विळी-भोपळ्याचं सख्य आयुष्यभरचं बरं का.
रात्री ढाराढुर मोठ्याने घोरत झोपणे...
स्वतःचे खरे करणे..खायला काय करु? पोहे कि शीरा? विचारायचे..
पोहे म्हटले कि....सारखे काय पोहे? आज शिराच करते....
शीरा म्हटले कि..सारख काय गोड? आज पोहेच खा...
आयला मग विचारते कशाला?
बाहेर जायचे म्हटले कि आपण तयार होवुन बसतो..हि मात्र तयार होण्याच्या नावाखाली किमान १/२ तास ताटकळत ठेवते..
आपल्या हातात पेपर पाहिला कि हिला हि "आज पेपर वाचायचा राहुनच गेला "अशी आठवण होते.
कसे वागावे याच्या सारख्या सुचना..
>>>पोहे म्हटले कि....सारखे काय पोहे? आज शिराच करते....
शीरा म्हटले कि..सारख काय गोड? आज पोहेच खा...<<<
मी तर कुठलाही प्रश्न ऐकला की आधीच विचारून घेतो-
"हा ट्रीक प्रश्न आहे का?"
आमच्या पेंटंट विषयावर अतिक्रमण केल्या बद्दल निषेध.
उ. न. क. चे आम्ही संस्थापक आहोत. उपेक्षीत नवरे कमिटीच्या मुंबई शाखेच्या पहिल्या मिटींगचा रिपोर्ट http://adijoshi.blogspot.com/2010/03/blog-post.html
आपल्या शहरात उ. न. क. ची शाखा काढण्यासाठी गरजुंनी व्य. नि. करावा.
आपला (उपेक्षीत नवरा)
आदि जोशी
लग्नाला वर्ष होतंय अजून त्यामुळे अजूनतरी तिडीक उठत नाही
नेमक्या कोणाच्या?
(स्पष्टीकरण:कृपया हा प्रश्न 'नेमक्या कोणाच्या डोक्यात तिडीक उठत नाही?' असा वाचावा, 'नेमक्या कोणाच्या लग्नाला वर्ष होतंय अजून?' असा नव्हे, ही नम्र विनंती.)
- (अनुभवी) पंगा.
५) पडले तरी नाक वर.
आधी तर चूक कबूल करायचीच नाही. जर यदाकदाचित पद्धतशीरपणे वाद घालून तुम्ही कोंडीत पकडले आणि दाखवून दिले, की तिचीच चूक आहे, तर- नुसते गप्प बसणे, अशृशस्त्र उपसणे, तिथून तरातरा निघून जाणे, असे असंख्य उपाय केले जातात. "सॉरी, माझे चुकले" असे शब्द किती वेळा बायकांकडून ऐकले आहेत?
शत प्रतिशत सहमत. आणि यामुळेच हा अवगुणधारी काही स्त्रिया पुरुषांपेक्षा मागे पडतात हे आमचे स्पष्ट मत आहे!
शत प्रतिशत सहमत. आणि यामुळेच हा अवगुणधारी काही स्त्रिया पुरुषांपेक्षा मागे पडतात हे आमचे स्पष्ट मत आहे!
लोल्स! फक्त पत्नीनीनेच हे करायची गरज नाही काही, सर्वच नात्यांमध्ये स्त्रीया असं करतात.
लोल्स! फक्त पत्नीनीनेच हे करायची गरज नाही काही, सर्वच नात्यांमध्ये स्त्रीया असं करतात
।हॅ ।हॅ ।हॅ
अनुमोदन
तुने मेरी मन कि बात छीन ली इंट्या ....
अजून एक दुर्गुण....
पुरुषांकडून वारेमाप गिफ्ट उकळायची, आणि स्वतः मात्र, 'मीच तुझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे' असे म्हणून त्यांची बोळवण करायची
(आणि अगदी कधीच गिफ्ट दिलं तर ते १००:१ या रेशो मध्ये असतं...)
-लवगुरू स्पावड्या
सहमती बद्द्ल आभारी आहे!
पुरुषांकडून वारेमाप गिफ्ट उकळायची, आणि स्वतः मात्र, 'मीच तुझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे' असे म्हणून त्यांची बोळवण करायची
(आणि अगदी कधीच गिफ्ट दिलं तर ते १००:१ या रेशो मध्ये असतं...)
हेच म्हणतो.. पण अश्या दुर्मुखलेल्या जीवांकडुन काही न स्वीकारणेच योग्य. कशाला कोणाची 'डेब्ट' ठेवा?
-
(चाणाक्ष) इंट्या
१)माहेरी जाताना अथवा येताना नवरा म्हणजे हक्काचा हमाल असे गृहीत धरून पिशव्या वगैरे घेणे.
२) बाजारात बरोबर चालत असताना एखादी गोष्ट /वस्तु दिसली की नवर्याला आपल्या डोक्यातले विचार आपोआप कळतात अशी समजूत करून घेऊन अचानक यू टर्न किंवा उजवे डावे वळण घेऊन चालत सुटणे. आणि अशा वेळी आपण ही आपल्या बरोबर आहे या समजूतीने एकटेच बोलत चालत असतो. अथवा अरेच्च्या ही आत्ता तर इथे होती...अचानक गायब कुठे झाली या विचाराने आणखीनच बावळट चेहेर्याचे होतो.
अवांतरः हा धागा "गुंतवणुक" या सदरात का दिलेला आहे
काय बोललात विजुभाऊ!
यावरून आठवले-
बरोबर कुठे चालत असतांना आपल्या वेगा इतका यांचा वेग कधीच नसतो. बहुदा त्या मागे रहातात. मग आपण वेग हळू करतो, जेणे करून त्या आप्ल्याबरोबर येतील. पण लगेच त्यांचा वेग आणखी हळू होतो. मॅच कधीच होत नाही. पुन्हा वर "तुम्हाला माझ्या बरोबर रहायचे नाही तर आलात कशाला बरोबर?" हे आहेच.
मला वाटते, मुद्दाम आपल्या मागे राहून नवर्यावर लक्ष ठेवीत असाव्यात!
प्रतिक्रिया