शुचि वगळता आतापर्यंत एकाही बाईने आपली ट्रेड शिक्रेट सांगितली नाहियेत! इतक्या सहज ती तुमच्या हाती कशी लागतील हो?
उलट नवर्यांच्या वाईट सवयींबद्दल मी ५० मुद्दे सांगू शकेन. पण ते माझ्या नवर्याने वाचलं तर मी त्यांचा वापर नंतर आताच्याएवढ्या यशस्वीपणे करू शकणार नाही, तस्मात "मौनं सर्वार्थसाधनं|"
बायका सगळी गुपीते किती लपवून ठेवतात नै & बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही
यावाक्यांत काहीही विरोधाभास नाही... कारण जी काही बडबड करतात ती अगदीच वायफळ प्रकारची असते...
अन गुपीत म्हणजे गुप्प्पीत म्हणजे गुप्प्पीत म्हणजे गुप्प्प्पीत हो ते कसं बरं फुटणार एखादीकडून...
असं आहे तर अन तुम्हाला वाटते मजाक ऐ...
१. कुथल्याही फाल्तु विशयाव्र बडब्ड करने. दुसर्याने ति षान्त ऐकुन घेने, अस आगरह करने.
०२. थोडा काइ वाद झाल्यास दिवसभर मला बरपुर काम असते. माज्यावर जलु नका असे सान्गते.
०३. सविस्त्र नन्तर.
हजारो वर्षांपासुन आगतिक पुरुषवर्गावर होणार्या र्निघ्रुण निर्दय अत्याचारांना वाचा फोडणारा लेख आणि त्यावरील तितक्याच उत्कट प्रतिक्रिया,
पहिल्या पाना वरुन वाहुन जाउ नये म्हणुन
आमच्या येथील केस पूर्णपणे लिहायची तर बी आर चोप्राना इहलोकात बोलावून म्हा भा.............रत अशी सीरीज काढावी लागेल.
तो विषय विस्ताराने इथे दिला तर मेमरी चा इशू होईल यास्तव मालकानी समज दिली आहे.
म्हणूनच आंम्ही नवीन पुरुष सिरिअल्स काढण्याचे योजले आहेत.
आमच्या नव्या सिरिअल्सची नावे=>
१> चार दिवस नवर्याचे, (सासर्याचे जुने आहे, नवर्याचे लेटेस्ट!)
२> नव'वरु', (नवीन लग्न झालेल्या पतीची कथा)
३> कुल 'वरु', (पतीजात रुढीने जगणार्या पतींची गाथा)
४> सांभाळ रे, ('मरशील नाहीतर' हे सबटायटल!)
५> आल्या घरी तु निट रहा, (पुरुषाला उद्देशून ;) )
६> बे-ताल, (धर पाय न्हायतर सोस हाल)
७> हा भास हा! (नव मुलीं पाहण्याचा)
८> ह्या गोजिरवाण्या गुत्त्यात, (रमणीय क्षण)
८> दोन चपट्या दोघे आपण, (रमणीय क्षण पार्ट-२)
९> एकाच या जन्मी टळू, (भांडणकल्लोळ/ वास्तवदर्शी मालिका)
१०> पिंजरा (फॉर मेन)
११> सासरा पण कधी जावई होता. (नवीन मराठी आवृत्ती)
१२> एका लग्नाची तिसरी बायको (डॉक्टरसाहेब स्पेशल सुखांत सिरिअल)=> (न स्थिरावलेला सुखी पुरुष!)
१३> पुढच पाऊल (मागे जाताना)
१४> बांध बायकोचे (पतीमर्यादा)
१५> मुक्तीबंधन (एक केविलवाणा ध्यास)
१६> होम मिनिस्टर (पती स्पेशल= सुत्रधार होम मिनिस्टर 'राखी सावंत')
(सुचना:- राखी सावंत चालणार नसेल तर तसे आमच्या चॅनलला व्यनी करुन कळवा. आंम्ही तात्काळ तिच्या जागी नवीन स्वस्तातली होम मिनिस्टर निवडू! ;) )
सध्या एक चित्रपट काढायचाही विचार आहे. त्याचे नाव "कामाच्या नंतर लग्गेच घरात!" असं आहे.
तरी पुरुष ऑडीशन्स साठी नावे देऊ शकतात. पिडीत व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल तसेच
पिडून हैराण झालेल्या व्यक्तीला विशेष हिरोचा रोल राखीव ठेवण्यात आला आहे. याची नोंद घ्यावी!
(लोहे को लोहाच काटता है म्हणून चॅनेलचा मुहुर्त आमावस्येलाच ठेवण्यात आला आहे.
सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे. घरुन पोट भरुन जेऊन या येथे जेवणाची अपेक्षा करु नका.)
कामाच्या नंतर लग्गेच घरात!" असं आहे.
तरी पुरुष ऑडीशन्स साठी नावे देऊ शकतात. पिडीत व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल तसेच
पिडून हैराण झालेल्या व्यक्तीला विशेष हिरोचा रोल राखीव ठेवण्यात आला आहे. याची नोंद घ्यावी!
ह्यी आडीशान घेयाची म्हंजी त्येची लाईन क्व्यवढी लागंल ? वरळी पासून सुरू हून शान पार चांदोबा वरील sea of tranquility पातुर वाडंल .
आनी त्येना सम्द्याना घरचा धाक लइ . तवा येकत्र तारका कया म्यीळनार ?
गेले अनेक महिने माझ्या मनात 'पुरुष अधिकार समिती ' स्थापन करावी असा विचार आहे.एकंदरीत बघितलं तर पुरुषांची स्थिती सध्या अतिशय दयनीय आहे.आपल्यावर वर्षानुवर्षे होणाऱ्या अन्यायाची पुरुषांना जाणीव नाही.जर असेल तर त्याविरुध्द आवाज उठवण्याची त्यांची ताकद नाही.घरी-दारी,जळी-स्थळी,बस- ट्रेन-रस्ता सगळीकडे स्त्रियांकडून पुरुषांचा मानसिक छळ होत असतो.कधी गोड बोलून, कधी आवाज चढवून , कधी डोळ्यातून अश्रूंची टाकी रिकामी करून,तर कधी जगातल्या सर्वात गरीब आपणच अस दाखवून त्या पुरुषांचे मानसिक संतुलन बिघडवतात.समस्त पुरुषांना ह्या अन्यायाच्या दलदलीतून बाहेर काढायचे असेल तर समिती स्थापन करणे गरजेचे आहे.
मी स्त्री आहे मग मी पुरुषांच्या बाजूने का आहे.असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित आला असेल.तर समस्त पुरुष वर्गाचे एका बाबतीत स्त्रियांवर अनेक उपकार आहेत.ती म्हण्जे शिक्षण...अगदी स्वामी विवेकानंद ते फुले,कर्वे सगळ्यांनीच आम्हाला साक्षर करण्याच जे काम केल आहे त्याची परतफेड म्हणून मी सर्व पुरुषांचे मन:पूर्वक आभार मनात आहे.
लपु नका.अस लपुन चालणार नहि. तुम्हाला पुढे यायलाच हव.सध्या नवर्यावर होणाऱ्या अत्याचारांची मी साक्षीदार आहे.बायको, आई आणि काम यांमध्ये होणार त्याच ३ इन १ sanadwich बघवत नाही रे.
घरोघरी मातीच्या चुली हि म्हण काही उगीच आली नाही.मी ह्या समितीसाठी मेंबर गोळा करतीये.पण लोकलज्जेस्तव कोणी पुढे येण्यास तयार नाही.पण हळूहळू जनजागृती होत आहे.दिवसांमागून दिवस जातील आणि पुरुषहि आपल्या मनातल्या भावना स्पष्ट बोलू शकतील अशी मला आशा आहे.
नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या बर्याच सवयी आहेत.
प्रेषक शुचि Fri, 24/12/2010 - 10:03 यांच्या प्रतिक्रियेशी मी एकदम सहमत आहे.
रघू सावंत
१> चार दिवस नवर्याचे, (सासर्याचे जुने आहे, नवर्याचे लेटेस्ट!) २> नव'वरु', (नवीन लग्न झालेल्या पतीची कथा) ३> कुल 'वरु', (पतीजात रुढीने जगणार्या पतींची गाथा) ४> सांभाळ रे, ('मरशील नाहीतर' हे सबटायटल!) ५> आल्या घरी तु निट रहा, (पुरुषाला उद्देशून ;) ) ६> बे-ताल, (धर पाय न्हायतर सोस हाल) ७> हा भास हा! (नव मुलीं पाहण्याचा) ८> ह्या गोजिरवाण्या गुत्त्यात, (रमणीय क्षण) ८> दोन चपट्या दोघे आपण, (रमणीय क्षण पार्ट-२) ९> एकाच या जन्मी टळू, (भांडणकल्लोळ/ वास्तवदर्शी मालिका) १०> पिंजरा (फॉर मेन) ११> सासरा पण कधी जावई होता. (नवीन मराठी आवृत्ती) १२> एका लग्नाची तिसरी बायको (डॉक्टरसाहेब स्पेशल सुखांत सिरिअल)=> (न स्थिरावलेला सुखी पुरुष!) १३> पुढच पाऊल (मागे जाताना) १४> बांध बायकोचे (पतीमर्यादा) १५> मुक्तीबंधन (एक केविलवाणा ध्यास) १६> होम मिनिस्टर (पती स्पेशल= सुत्रधार होम मिनिस्टर 'राखी सावंत') (सुचना:- राखी सावंत चालणार नसेल तर तसे आमच्या चॅनलला व्यनी करुन कळवा. आंम्ही तात्काळ तिच्या जागी नवीन स्वस्तातली होम मिनिस्टर निवडू! ;) )
सध्या एक चित्रपट काढायचाही विचार आहे. त्याचे नाव "कामाच्या नंतर लग्गेच घरात!" असं आहे. तरी पुरुष ऑडीशन्स साठी नावे देऊ शकतात. पिडीत व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल तसेच पिडून हैराण झालेल्या व्यक्तीला विशेष हिरोचा रोल राखीव ठेवण्यात आला आहे. याची नोंद घ्यावी! (लोहे को लोहाच काटता है म्हणून चॅनेलचा मुहुर्त आमावस्येलाच ठेवण्यात आला आहे. सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे. घरुन पोट भरुन जेऊन या येथे जेवणाची अपेक्षा करु नका.)