कलादालन
असे कुणीतरी यावे.....
Primary tabs
असे कुणीतरी यावे,
जिच्यात आपण हरवूनी जावे ।
शोधिता अपुल्यास अपुल्यात अपुल्याला,
तिचेच दर्शन व्हावे ।
हे असे कुणीतरी यावे.....
ओठांतले ते शब्द तिने मग,
अलगद झेलुनी घ्यावे ।
अबोल अश्या ह्या डोळ्यांतले ते,
भाव समजोनी जावे ।
हे असे कुणीतरी यावे.....
मौन धरिले तिनेच जरका,
मी अस्वस्थ असावे ।
अश्या क्षणिमग बोलुनी काही,
मौन तिने सोडावे ।
हे असे कुणीतरी यावे.....
बोल लाविले तिला कुणी तर,
घाव मलाच मिळावे ।
घाव लागता अंगी माझ्या,
आईग... असे तिने म्हणावे ।
हे असे कुणीतरी यावे.....
वाद जाहले अमूच्यात तरी मग,
मीच मला रोखावे ।
माझी असो वा तिची चूक ति,
मीच " सॉरी " म्हणावे ।
हे असे कुणीतरी यावे.....
हरलो जरी मी भांडणात तिच्याशी,
तिने हसत जिंकावे ।
हसू पाहता तिचे असे ते,
मी नेहमीच हरावे ।
हे असे कुणीतरी यावे.....
हे असेच कुणीतरी आले तर मग,
स्वप्न कशास म्हणावे ।
स्वप्न उतरिले सत्यातच जरका,
सत्य ते फसवे नसावे......।
हे असे कुणीतरी यावे.....
हर्षद अ प्रभुदेसाई.....
किती हो बोल्ड लिहीता तुम्ही ? :)
- (सर्किट) हर्षद वाराणसी
सर्किट.....?
मनातल स्पष्ट बोललो म्हणुन....
ठिक आहे...धन्यवाद...प्रतीक्रीया दिल्या बद्दल....
असेच वाचत राहा......
डोंबिवलीत सुनामी आली की काय?? तुम्ही एक्दम काव्यविभागातून कलादालनात येवून पडलात म्हणून बोल्लो.
काव्यविभागातून कलादालनात येवून पडलात
काव्यलिहीने ही एक कलाच आहे की.
प्रत्येक चित्र एक काव्यच असते.
एक चित्र हजार शब्दांची कहाणी सांगते असे शेक्सपीअर म्हणायचा. शेक्सपीअर काय किंवा किंवा जॉर्ज बुश काय हे नेहमी काहीतरी म्हणत असायचे. माणसाने प्रसंगे अखंडीत म्हणत जावे असे जाताजाता रामदास म्हनून गेले. रामदास स्वामींच्या कुबडीत गुप्ती नावाचे शस्त्र असायचे . त्या शस्त्राच्या जोरावरच त्यानी बुडाला औरंग्या पापी असे लिहीले आहे. औरंगजेबाला औरंग्या तोपर्यन्त कोणीच म्हणाले नव्हते त्यामुळे हे आपल्याला उद्देशून म्हंटले आहे हे त्याला कळाले नाही.
जेंव्हा तो बुडायच्या बेतात आला त्यावेळेस तो औरंबागादला होता. मिपावरचे काही लोक मूळचे औरंगाबादनिवासी आहेत. ते पुण्याहून औरंगाबादला ठाणे मार्गे जायचे. हल्ली ते अमेरीकेत असतात एक्झॅक्ट बोलायचे तर पृथ्वीवर च्या गोलावर नांदेड्च्या विरुद्ध बाजूस. नांदेडला गेल्या महीन्यात भुकंप झाला. जपानमध्येही त्सुनामी आली. त्यामुळे न्यूक्लीअर रीअॅक्टर फुटला. त्या भीतीने जैतापूर ला अणूवीजप्रकल्प नको असे लोक म्हणू लागलेत .लोकाना काय ते काहीही म्हणतात. मनसे ने वीजप्रकल्प हवा असे सांगीतले म्हणून शिवसेना तो नको असे म्हणते. शिवसेना ही उत्तरभातीय लोकाना शिवजी की सेना असे वातते. शिवजयंतीला इकडे भांग पितात. भांगात सिम्दूर टाकतात. जिसकी शादी जितनी मुश्कील से जमती है वो उतनी ही बडी मांग भारती है असेही म्हणतात. भांगेची झाडे तुळशीच्या झाडासोबत उगवतात. तुळसा मावशी ची भुमीका जयमाला इनामदारानी फार उत्तम वठवली होते. त्यानी विच्छा माझी पुरी करा मध्ये फार मस्त काम केले होते. विच्छा खरे गाजले ते दाकोंडके यांच्या मुळे. दादा कोम्डकेंच्या " ए आये" या डॉयलॉग ला लोक फार दाद द्यायचे. शोलेचे डायलॉग खूप लोकप्रीय झाले होते.
शोले तील सर्वात अन्याय झालेली भूमीका आहे रामलाल ची आणि हरीराम नायी ची.
केश्तो मुखर्जी ने केलेला हरीराम नायी हा लक्षात रहातो. लक्ष्या बेर्डेने इतक्या भूमीका केल्या पण बहुतेक सर्व साचेबद्ध होत्या. अपवाद एक होता विदुषक. एक होता विदुषक मधील दिलीप प्रभावळकर एक्झॅक्ट शंभुराजे देसाईंसाअरखे दिसतात. शंभुराजे देसाईनी पाटण तालुक्यात बरेच काम केले आहे.
पाटण तालुक्यातील बरेचसे लोक मुम्बईतील ग्यांगवॉर मध्ये सामील असायचे. ग्यांगवॉर पिक्चर फ्लॉप का झाला याचे कारन कोणालाच माहीत नाही.
माहीतीचा अधिकार या संदर्भात काय करू शकतो याची माहिती मिळवायला हवी.
जे नवं ते हवं असे कोणत्यातरे शोरूमचे बोधवाक्य आहे.
सत्यमेवजयते हे बोधवाक्य सर्वप्रथम कोणी उच्चारले? अर्थात कोणी उच्चारले या पेक्षा उच्चारले याला महत्व आहे? शेवटी नावात काय आहे असे शेक्सपीअर म्हणतोच ना
सहमत आहे.
श्रिखंड आवडले
अगागा
=)) =))
सदर प्रतिसाद हा माननीय विजुभाऊंच्या नावाने सन्मान्न्नीय टार्झन यांनि लिहिला असावा असा दाट संशय आहे.
सगळ मिसळपाव करुन टाकल(मुळ विषयाला फाटा फोडुन)
कविता चांगलि आहे.
प्रेमळ नवर्याच्या मनातील भाव चांगले मांडले आहेत.
माझी असो वा तिची चूक ति,
मीच " सॉरी " म्हणावे ।
हे असे कुणीतरी यावे..
तुमची ही इच्छा पूर्ण होण्याचे मात्र फुल्ल चान्सेस दिसतात.. ;)