पाककृती

टॅमरिंड राईस/ पुलिओदराई/ चिंचेचा भात

Primary tabs

Image removed. साहित्यः २ वाटया तांदळाचा शिजवलेला भात पाऊण ते एक वाटी जाडसर चिंचेचा कोळ (आपल्याला आबंटपणा किती हवे, त्याप्रमाणे कमी-जास्त करणे) १ टीस्पून चणाडाळ १ टीस्पून उडदाची डाळ १ टीस्पून मोहरी १/२ टीस्पून हळद १/२ टीस्पून हिंग ७-८ कढीपत्ता २-३ लाल सुक्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टेस्पून शेंगदाणे ३ टीस्पून तीळ व १ टीस्पून मेथीदाणे कोरडेचे भाजून त्याची एकत्र पुड करून घेणे मीठ चवीनुसार तेल Image removed. पाकृ: भांडयात तेल तापवून मोहरी, चणाडाळ व उडदाच्या डाळीची फोडणी करावी. Image removed. डाळींचा रंग बदलला की त्यात कढीपत्ता, लाल- सुक्या मिरच्या व हिंग घालावे. Image removed. मग त्यात शेंगदाणे व हळद घालून परतावे. Image removed. चांगले परतले गेले की त्यात चिंचेचा लागेल तसा कोळ घालावा. त्यात मीठ व तीळ+मेथीदाणेपूड घालावी. (कोळ फार पातळ नको नाहीतर भात ओलसर होतो.) Image removed. साधारण एक उकळी आली की त्यात शिजवलेला भात घालून एकत्र करणे. Image removed. भांडे झाकून एक वाफ द्यावी. गरमा-गरम टॅमरिंड राईस तयार. आवडत असल्यास त्यात धणे-पावडर ही घालू शकता :) Image removed. प्रवासात नेण्यासाठी सोयीचा होतो, चवीला छान लागतो :)
मानस्

सुंदर पाककृती ..झकास छायाचित्रे.
बेंगलोरला असताना खुप खायचो हा भात्.आवडता नाश्ता. :)

गवि

अहाहा.. नाश्त्याला हा भात असला की परमानंदम्..

पाककृतीबद्दल धन्यवाद. फोटोही एकदम खास.

इरसाल

पाकृबद्दल काय बोलू?
स्वप्नीलचा फोटो पाहणे अत्यावश्यक झाले आहे. कधी डकवताय ?

मैत्र

एम टी आर चा रेडीमेड मसाला वापरून एकदम सोपा वाटतो. इतक्या डिटेल मध्ये इतका मस्त हा भाताचा प्रकार बनवणं फारच अवघड...
पहिला आणी शेवटचा सेम फोटो अप्रतिम आहे...
एकच सुधारणा... पुलिओदराई नव्हे... पुलिओगरे... किंवा आंध्राकडे पुलिहोरा असंही म्हणतात...

स्मिता.

पुलिओगरे हा माझाही लिंबू भात (लाईम राईस) नंतरचा आवडता प्रकार! एकदम चटपटीत मस्त लागतो हा भात. बंगलोरला असताना बर्‍याच वेळा खाल्लाय. बरी आठवण करून दिलीस.
पण एवढे उपद्व्याप करण्यापेक्षा MTR चा तयार मसाला हे माझ्याकरता जास्त सोयीचे आहे ;)
(चला, आता पुलिओगरे मसाला शोधणे आले....)

चिंचभाताची पाककृती आणि छायाचित्र मस्तच आहे. लवकरच करून पाहावा म्हणतो आहे. धन्यवाद.

एक विचार मनांत आला आहे. चिंचभातात गूळ घातला तर? कारण आंबट चिंचेला गुळाची जोड (प्रमाणात) चांगली वाटते.

मोहनराव

खुप मस्त भाताचा प्रकार आहे हा!!!
बंगलोरला असताना खाल्लाय!!!
छायाचित्र मस्त काढली आहेत!!! तोंडाला अगदी पाणी सुटला हो!!! ;)

रेवती

मस्त फोटू!
हा प्रकार सगळ्यांचा आवडता आहे.
मीही अश्याच पद्धतीने करते.
पेठकरकाका, कृपया गूळ अज्जिबात घालू नका.

विशाखा राऊत

गुळ अजिबात नको.. मेथी आणि चिंच एकदम सही लागते :)

बाकी तुझ्या पाककृतीला रितीप्रमाणे उत्तम, अप्रतीम, तोपासु वगैरे बिगैरे :)

५० फक्त

भात हाच मुळात जीव की प्राण आहे माझा,

त्यात हा प्रकार म्हणजे सोलापुरच्या बालाजीच्या देवळात प्रसादाला असतो, माझं लग्न झाल्यावर तिरुपतीला जाणं शक्य नव्हतं म्हणुन सोलापुरच्याच देवळात भल्या पहाटे अभिषेक केला होता आणि त्यानंतर तिथल्या पुजा-यानं एक टोपलं भरुन हा भात प्रसाद दिला होता, एरवी जर मिळाला तर मुठभरच मिळायचा, त्याची चव आयुष्याच्या शेवटपर्यंत जिभेवर जपण्यासाठी त्यानंतर कधीच पुलिहोरा खाल्लेला नाही, खाण्याची इच्छा पण नाही.

सकाळी साडेपाच वाजता पत्रावळीत वाढलेला गरम गरम पुलिहोरा, नव्या नवरीच्या बाजुला बसुन खाण्याचं सुख हे कल्पनेपलीकडचं होतं, त्यात तेंव्हा बायकोला भात आवडायचा नाही ही दुधात साखर होती. त्या भाताला येणारा कापराचा वास आणि चव आता लगेच अ‍ॅक्टीव्हेट झालेत मेंदुत.

असो, पाकृच्या आणि फोटोंच्या उत्तमतेबद्दल पुन्हा पुन्हा तेच काय लिहीणार, वेगळं लिहायची गरज नाही आणि शक्यही नाही, एक शंका मात्र आहे, सानिकातै तुमच्याकडे भांड्याना व्हायब्रेटर बसवले आहेत का ओ हल्ली, नाही म्हणजे चमचे न दिसता फोडणी वगैरे हलवली जाते असं दिसतंय.

गवि

५०फक्त.

खूप सुंदर आठवण सांगितलीत. मला अक्षरशः डोळ्यासमोर दृष्य आणि वातावरण उभं राहिलं. तिथे जाऊन असा प्रसाद खायची इच्छा होतेय.

अशा छोट्या वाटणार्‍या आठवणीच खूप जास्त महत्वाच्या असतात.

शुचि

पुलिहारा हा भात खूप चविष्ट लागतो.

पिंगू

पुलियोगरे खायला जाम आवडतो ब्वा...

- पिंगू

Mrunalini

मस्तच गं.... ह्यांचा लेमन राइस पण एकदम असतो. कॉलेजला असताना एक south indian friend हा लेमन राइअस आणायची. त्याची आठवण झाली. धन्स. :)

सुहास झेले

ज ह ब ह र ह द ह स्त !!

फोटो तर जबरी आलेत, तोंडाला पाणी सुटले :) :)

सूड

लै झाक रेशिपी. बाकी असे फोटु आम्हाला काढता येतील तोच सुदिन !!
५० फक्त, अहो आहे की चमचा, वरुन सातवा फोटो. भांड्यात भात घातल्यानंतरचा. इफ आयाम नॉट राँग तो लाकडी चमचाच आहे.

पल्लवी

मस्तच.. :) :) :)
आमच्या मातुश्री अप्रतिम बनवतात हा भात.. पाकृ डिट्टो !!

प्राजु

जबरदस्त!!! एम टी आर चा मसाला आणून हा भात करते मी नेहमी..
जाम आवडतो हा भात.

:)

ऋषिकेश

तुमच्या तपशीलवार आणि त्यातील भारतात सहज मिळणार्‍या पदार्थांनी तयार होणार्‍या पाकृ वाचुन आपणही करू शकु अस विश्वास वाटतो :) हा भात अनेकदा तमिळ मंडळींकडे खाल्ला आहे. प्रचंड आवडतो. मात्र स्वतः करायची हिंमत केली नव्हती. आता येत्या विकांताला हा भात नक्की!

पण मी अजुन हा भात एकदाही खाल्ला नाही...

करुनच पहाते....कन्येला आवडला म्हणजे बास.

मितान

मस्त रेसिपी आणि फोटो तर जबरदस्त ! :)
खूप आवडता भात आहे हा माझा ! वर थोडी ओल्या नारळाची पखरण असेल तर अजूनच बहार !!!

गणपा

आजवर केवळ ऐकुन आहे या प्रकारा बद्दल. कधी चाखण्याचा योग आला नाही.
आता करून पहावा म्हणतो. :)

कच्ची कैरी

पाकृ. व फोटो छानच आहे याबद्दल पुन्ह सांगायला नको पण तु आणि गणपा आता एकाच माळेचे मणी झालेत अस म्हणायला हरकत नाही.

खादाड

फोटो एक नंबर !! पुलियार सादो !! हे मझ्या माहितीतल्या तामिळी कुटुंबात म्ह्टले जाते !!!

भलती भोळे

अनेक वेळा या भाताबद्दल ऐकले आहे, आता नक्की करून बघणार, फोटो छानच आलेत . :)