जे न देखे रवी...

पाऊस - स्पर्श पहिला

Primary tabs

मयूर मी व्हावे
मन प्रान्गणी असे नाचावे

वेशीपल्याड त्याने यावे
मृद् गन्धाने मी ओळखावे

गावातून घराघरान्वरून
अन्गणी माझ्या हळूच उतरावे

नयनान्वरी माझ्या हात ठेवावे
कळत नकळतसे बरसावे

उससण्या आधीच हळूवार स्पर्शावे
पहिल्या स्पर्शाने अन्तर्बाह्य भिजवावे

नहालेल्या वाफाळलेल्या माझ्या
केसान्वर मोत्यान्ना उधळावे

पहिल्या वहिल्या भेटीने असे
पिसार्‍यावर हिरे पाचू बरसवावे

विसोबा खेचर

वा! कविता छानच आहे!

अवांतर -

कविता चांगली जमली य पण शुदधलेखनाकडे लक्ष द्या.

स्वप्नीलराव, लहानपणापासून तुम्ही जे शिकलात, जसं शिकलात, जसं आजपर्यंत लिहीत आलेला आहात तसंच लिहा. सोकॉल्ड शुद्धलेखनाची भीड स्वत:वर मुळीच पडू देऊ नका. तुम्हाला जसं जमेल, जे सहजसोपं वाटेल, अगदी तसंच लिहा. तुम्ही मिपावर आहात एवढं लक्षात ठेवा! शुद्धलेखन, व्याकरण, शुधीचिकित्सक हा आचरटपणा इथे नाही! तेव्हा अगदी निर्धास्त रहा, निवांत, स्वान्तसुखाय लिहा, एवढीच विनंती!

शुद्धलेखनाच्या नावाखाली कुणाकडूनही चार शब्द ऐकून घेऊ नका व असा दहशतवाद माजवू पाहणार्‍यांचा वेळीच बिमोड करा! ठराविक एका पद्धतीने केलेलं लेखनच शुद्ध असतं असं नाही व कागदावर जे जे उमटतं, मग ते अक्षर असो, काना असो, मात्रा असो, वेलांटी असो, ते ते सर्व शुद्धच असतं असंच मिपा मानते! कागदावर उमटणारी प्रत्येक गोष्ट ही भाषाच असते व ती नेहमी शुद्धच असते, त्यात अशुद्ध असं काही नसतं! एखादं चित्र कुणाला आवडू शकेल, नावडू शकेल हा भाग वेगळा, परंतु चित्रकलेत कधी काही अशुद्ध असतं का हो? :) एखादं गाणं कुणाला आवडू शकेल, नावडू शकेल हा भाग वेगळा, परंतु गाण्यात कधी काही अशुद्ध असतं का हो? :)

तसंच भाषा हेदेखील अभिव्यक्तिचंच एक माध्यम आहे व तिच्यातही अशुद्ध असं काही नसतं! तिच्यामार्फत व्यक्त केलेले विचार कुणाला आवडतील, नावडतील, पटतील, पटणार नाहीत, हा भाग वेगळा!

असो, तुमची कविता फार आवडली! तित व्यक्त केलेल्या भावना छान आहेत, आवडल्या! :)

अजूनही लेखन येऊ द्या, ही विनंती!

तात्या.

पक्या

मयूर मी व्हावे
---
वेशीपल्याड त्याने यावे----
अन्गणी माझ्या हळूच उतरावे ----
नयनान्वरी माझ्या हात ठेवावे---
नहालेल्या वाफाळलेल्या माझ्या
केसान्वर ----

नेमेके कळत नाहीये नायक मयूर आहे की नायिका? जरा समजून सांगाल का?

नायिका कविता म्हणते आहे. आणि मयूर ही उपमा आहे.

मग मयूरी हा शब्द वापरायचा....!