कलादालन

सायंकालीन छटा....

Primary tabs

सायंकालीन छटा आजकाल तीच्या चेहर्‍यावर प्रतिबिंबित होत असतात आणि त्या छटा पाहुन मला अग्निज्वालांनी होरपळत असलेल निर्वात अंतरिक्ष स्वप्नात दिसते आणि मी जागा होतो आणि कुणा मदमत्त जोडप्याला हवी हवीशी रात्र मला भयाण वाटु लागते आणि मी ती स्मशान शांतता भंग पावु नये म्हणुन तोंडावर हात ठेवुन मी आक्रोश करु लागतो आणि शेवटाच्या विश्वापर्यंत जाउन येतो आणि त्याच वेळेला देवळाच्या गाभार्‍यात माझ नाव घुमत असत आणि विश्वेश मात्र शांतपणे बसलेला असतो बेहेरे मकरंद ११०२२०८०

परत त्येच... गल्ली चुकल कि वो पुन्ना ... ह्ये कविता असतय ना,त्ये कि नै 'जे न देखे रवी' ला टाका हो... नविन आलासा वाटतं मि.पा.वर स्वागत हो तुमचं :-)

कविता जबरदस्त लिहिली आहेस मित्रा!!! आणखी येऊ देत.
कवितेचा शेवट आवडला.

पियुशा

@ वल्ली काय हे ?
गद्यामध्ये 'एण्टर' पेरुनि
मुक्तछंद लिहिणार

त्याना मार्ग दाखवा जरा ;)

प्रचेतस

त्यांचा मार्ग त्यांनीच शोधून काढायला हवा आता. ;)

गवि

आणि त्या छटा पाहुन
मला अग्निज्वालांनी
होरपळत असलेल
निर्वात अंतरिक्ष
स्वप्नात दिसते
आणि मी जागा होतो
आणि कुणा मदमत्त जोडप्याला
हवी हवीशी रात्र
मला भयाण वाटु लागते
आणि मी ती स्मशान शांतता

"आणि" शब्दाचा अतिरेक झाला आहे. बाकी काही समजले नाही हा वाचकाचा, पक्षी माझा दोष असणार.

-जे देखे कवि, ते न देखे गवि.