भटकंती

तोरण्याविषयी माहिती हवी आहे

Primary tabs

नमस्कार, आम्ही मित्रमंडळी मागे प्रतापगडावर जाणार होतो, त्यासंबंधी फारच उपयुक्त माहिती आपण दिली होती. आता अनेक चर्चांनंतर तोरणा किल्ल्याला जायचे ठरत आहे. त्याबाबत मला काही माहिती हवी आहे काही मिळाली आहे. तोरणा किल्ला हा पुण्यापासून ५५ किमी अंतरावर आहे एस टी बस वेल्हा या गावापर्यंत जाते. पुण्याहून साधारण २ तास लागतात. तेथे जाऊन रात्री मुक्काम करण्याचा बेत आहे. आता प्रश्न असा की तोरण्याला वरती रहायची काही सोय आहे का ? वरती पिण्याचे पाणी मिळेल का ? वरती जेवणाची काही सोय आहे का ? नसल्यास खाली एखादी चांगली खाणावळ आहे का ?(हाय फाय हॉटेल नकोच आहे) कुणी खाणावळ वाले १५, २० जणांचे जेवण वरती पोचवू शकतात काय. किल्ला किती उंच आहे, चढायला कितपत वेळ लागेल. या उप्पर काही सुचना असल्यास कराव्यात!
मोदक

>>>तोरण्याला वरती रहायची काही सोय आहे का ?
देवीचे बंदिस्त मंदिर आहे.. बांधकाम व्यवस्थीत आहे.

>>>वरती पिण्याचे पाणी मिळेल का ?
भरपूर पाणी मिळेल, पण जवळही पाणी बाळगा. पाण्याचे टाके उघड्यावर असल्यामुळे अचानक काहीही अडचण येवून (प्राणी / पक्षी मरून पडणे, कचरा असणे) पाणी पिण्यायोग्य नसण्याची शक्यता १% गृहीत धरा.

>>>वरती जेवणाची काही सोय आहे का ?
बहुदा नाही.

>>>खाली एखादी चांगली खाणावळ आहे का ?(हाय फाय हॉटेल नकोच आहे)
वेल्हा गावात पोलीस स्टेशन जवळ एक खाणावळ आहे, आधी ऑर्डर द्यावी लागेल..

>>>कुणी खाणावळ वाले १५, २० जणांचे जेवण वरती पोचवू शकतात काय.
माहीत नाही.

>>>किल्ला किती उंच आहे, चढायला कितपत वेळ लागेल.
तोरणा - पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च ठिकाण आहे, चढायला सोपा परंतू थोडा दमवणारा किल्ला आहे. अधिक माहिती गूगल वर मिळेल.

आशु जोग

खाणावळ वाल्यांचा मोबाइल मिळेल का ?

म्हणजे आधी बोलुन ठेवता येइल

मी-सौरभ

वेल्ह्यात मोबाईलला रेंज नसते फक्त रिलायन्स्ला काही ठिकाणी आणि BSNL ची अधून मधून सेवा उपलब्ध आहे.
फोन नं नैय्ये पण तिथे गेल्यावर सुद्धा जेवण मिळायला फार वेळ लागणार नाही.

थोडा अवांतर वाटेल पण फार महत्वाचा आहे. (अर्थात तुमच्या आणि मिपा दोन्हीच्या दृष्टीने.)

तुमचे लग्न झाले आहे का हो ?

मालोजीराव

तोरण्याला वरती रहायची काही सोय आहे का ?
वरती पिण्याचे पाणी मिळेल का ?

किल्ल्यावर मेंगाई देवीचे मंदिर आहे १५ जण राहू शकतात,
मंदिरासमोरच स्वच्छ पाण्याचे टाके आहे.

किल्ला किती उंच आहे, चढायला कितपत वेळ लागेल.

उंची सुमारे ४६०० फुट आहे, उन्हाच्या वेळी किल्ला चढणे म्हणजे दमछाकीचे काम आहे (वाटेत गारवा,झाडी नसल्याने)

कुणी खाणावळ वाले १५, २० जणांचे जेवण वरती पोचवू शकतात काय.

होय पोचवू शकतात, ST जिथे थांबतात तिथे २-३ हॉटेल आहेत तिथे चौकशी करा.

या उप्पर काही सुचना असल्यास कराव्यात!

किल्ल्यावर ब्रम्हराक्षसाचा दगड आहे, अमावस्या पोर्णिमा असेल तर त्याच्या वाटेला रात्री जाऊ नका...चकवा लागेल !

- मालोजीराव

आत्मशून्य

होय, किल्ल्यावर मुंज्या आहे, लोकांना चित्रविचीत्र भास होतात. तर्‍हेतर्‍हेचे आवाज येतात. भर् दुपारी उन्हामधे कमालीची थंडी वाजु लागते म्हणून रात्री तिथें कोणीही थांबत नाही अशी वदंता आहे. योग्य ती काळजी घ्या अथवा विषाची परीक्षा घेण्यापुर्वी ओक साहेबांकडुन व्हेरीफिकेशन करणे उत्तम.

आशु,
तोरण्यावरती मेंगाई मंदिरात राहायची चांगली सोय होऊ शकते. बंदिस्त देऊळ आहे.

मंदिराशेजारच्या खोकड टाक्यात प्यायचे पाणी मिळू शकते. पण पाणी पिण्यापुर्वी एकदा चेक करा कारण ह्या महिन्यात पाणी एकदम तळाला गेले असते आणी खराब असू शकते. तेव्हा क्लोरीवॅट किंवा तत्सम वॉटर प्युरीफायरचे ड्रॉप जवळ ठेवा. जर का खोकड टाक्यात पाणी नसेल तर मग कठीण आहे..कारण बालेकिल्ला, झुंजार बुरुज आणी आसपास खोकड टाके सोडले तर पाण्याची सोय कुठेही नाही. ईथे नसेल तर तुम्हाला एकदम बुधला माचीवर पाणी मिळु शकेल.

किल्ल्यावर जेवायची सोय नाही पण तुम्ही स्वतः घेऊन जाऊ शकता. पायथ्याच्या सुरेश कदमांच्या तोरणा विहार मध्ये जेवायची व नाश्त्याची उत्तम सोय होते. मला माहीत माही की ते गडावर पण जेवण पोचवतात की नाही. त्यांचा नंबर माझ्याकडे होता. शोधूवा लागेल.

किल्यावर चढताना झाडी अजिबात नाही आणी किल्ला बर्‍यापैकी उंच असल्याने चंगलीच दमछाक होते. साधारणतः २ ते ३ तास लागू शकतात किल्ल चढायला.

वरती एकदा मुक्काम केला आहे पण कुठलाही अनुभव आलेला नाही. पुर्वी दिवेकरांचे भूत वगैरे दिसते अशी माहीती होती पण आम्हाला तरी असा अनुभव आलेला नाही.

प्यारे१

>>>पुर्वी दिवेकरांचे भूत वगैरे दिसते अशी माहीती होती पण आम्हाला तरी असा अनुभव आलेला नाही.

त्याचं डेप्युटेशन संपलं असेल. ;)
बादवे, हे असं खरंच असतं का? चकवा, मुंजा तत्सम.
ऐकिव माहिती नको आहे.
प्रत्यक्ष अनुभव असल्यास वेगळा धागा काढून उपकृत करावे ही णम्र विनंती. (अशा गोष्टी ऐकाय ला, वाचायला कंटाळा येत नाही)
गवि सारख्या व्यक्तीने आपली टंचनिका इतरांसाठी पुरवावी जेणेकरुन इतर जन आपले अणुभव लिहू शकतील.
ही देखील णम्रच विनंती. :)

साबु

मला एकदा मित्राने एक फाइल पाठवलेली...त्यात बर्याच गड किल्ल्यान्ची माहिती आहे..
मी ती गुगल डौक्स वर शेअर केली आहे.. उतरवुन घ्या... काही मदत झाली तर चान्गलेच आहे...

https://docs.google.com/open?id=0BwZ6FsqVzHm6Y2hfelU0SnRSaS1FWWYtaW44X0…

sagarpdy

तोरण्याच्या वाटेवरील झाडीत 'pit viper' जातीचे विषारी साप आढळतात. कुठेतरी हात घालू नका.

आशु जोग

माहिती टिपून घेत आहे

भूताखेतांना घाबरवण्याचा विचार नाही.

माकडांचाही बराच उपद्रव आहे म्हणे चढण्याच्या वाटेवर

आशु जोग

तोरणा ट्रेकला मजा आला
वानरांनी दर्शन दिले पण आम्ही दुर्लक्ष केल्याने फार त्रास झाला नाही

भुते बहुधा आम्हाला घाबरून लपून बसली

मेंगाई मंदिरात राहण्याची सोय झाली
रात्रीचे जेवण दुसर्‍या दिवशीचा नाश्ता नेला असल्याने अडचण आली नाही

बुधला, झुंजार माची पाहिली,

राजगडाकडे जाणार्‍या मार्गाचे दर्शन घेतले पुढील वेळी हा मार्गही तुडवायचा आहे हा निश्चय करून.

पौर्णिमेनंतरचा दुसरा तिसरा दिवस असल्याने रात्री वर चढताना आणि वरती पोचल्यावर
इकडे तिकडे बागडताना चंद्रप्रकाशाचा फायदा घेता आला.

वर चढत असताना फारसा वारा लागला नाही कारण डोंगरामुळे अडला होता
पण
वर पोचल्यावर प्रचंड वारे नि थंडी जाणवू लागली. तापमानातील हा फरक सहन करण्यापलिकडला होता.

वेल्हे गाव देखील फार छान वाटले. गावात बस स्टॉपजवळ चांगली हॉटेले आहेत.

तेथील रेट्स आणि वर्दळ भरपूरच म्हणावी लागेल.

--

वर चढताना अनेक छोट्या मोठ्या टेकड्या, पठारे पार करावी लागतात.
घाइ गडबड केल्यास वाट चुकण्याची बरीच शक्यता असते.

आमच्या ग्रुपमधे बहुतेक सर्वजण स्पोर्टशूज इ घालून आले होते.

दुसरा एक ग्रुप तिथे आला होता तो अगदी साधा, बहुतेकांच्या पायात
प्लॅस्टिकच्या पावसाळी म्हणाव्या अशा चपला होत्या

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लोकांचा चढण्या उतरण्याचा स्पीड इतरांच्या दुप्पट तिप्पट होता.
यांच्या पाठीवर स्वयंपाकाचे प्रचंड सामान होते तरीही स्पीड हेवा वाटावा असा.

एकूण राजगडाच्या मानाने तोरण्याकडे वर्दळ कमी आहे.

मंदिरात पोचल्यावर लगेच झोप घेण्याचा विचार कुणाच्याच मनात आला नाही.
थोरल्या महाराजांनी आरंभलेले कार्य पुढे कसे नेता येइल याचीच चिन्ता सर्वांना लागून राहिली होती.

असो

छत्रपती शिवाजी महाराज की जय ! !!

शैलेन्द्र

"मंदिरात पोचल्यावर लगेच झोप घेण्याचा विचार कुणाच्याच मनात आला नाही.
थोरल्या महाराजांनी आरंभलेले कार्य पुढे कसे नेता येइल याचीच चिन्ता सर्वांना लागून राहिली होती."

वा छान!.. काय ठरलं मगं?

आशु जोग

आणि ही राजगड तोरण्याला जोडणारी वाट.