साहित्यः
१ वाटी शिळा भात
२-३ टेस्पून बारीक चिरलेला कांदा
२ टेस्पून बारीक चिरलेली कोथींबीर
१ टीस्पून जीरे
१ टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१ टीस्पून बारीक चिरलेले आले
१ टीस्पून बारीक चिरलेला कढीपत्ता
मीठ चवीनुसार
२-३ टेस्पून बेसन
तेल तळण्यासाठी
पाकृ:
एका बाऊलमध्ये भात, कोथींबीर, कांदा, हिरवी मिरची, कढीपता, जीरे, आले व मीठ एकत्र करा.
हाताने चांगले ५-७ मिनिटे एकत्र कालवा म्हण्जे थोडा चिकटपणा येईल.
त्यात लागेल तसे २-३ चमचे बेसन घाला.कोरडे वाटल्यास थोडे पाणी शिंपडून चांगले मळा.
मिश्रणाचे चपटे पेढे करून घ्या.
मध्यम आचेवर तेलात सोनेरी रंगावर डीप फ्राय करा.
कुरकूरीत असे भाताचे पकोडे टोमॅटो सॉस किंवा कुठल्याही चटणी बरोबर सर्व्ह करा.
छान! अता पावसाळ्यात भजी/पकोडे प्रकारात एक नविन 'अॅडिशन - फॉर अ चेंज' :)
पावसाळ्याची सगळी तयारी झाली पण पावसाचाच पत्ता नाहि... ये रे बाबा अता..
( @पाऊस : तुला नेहमी कंटाळा येतो ना त्याच त्याच पावसाळ्यातल्या कांदा/बटाटा भज्यांचा म्हणुन बघ सानिकाने ह्यावेळेस छान 'भाताचे पकोडे' केले आहेत.. अता तरी ये ना! :( )
यावेळचे सादरीकरण मजेदार.
पाकृ छान आणि सोपी.
पूर्वी (आमच्याकडे फ्रीज नसताना)उन्हाळ्यात भात उरला की जेवणे झाल्यावर आजी असा भात कुस्करून त्यात मीठ, जिरे घालून ताटात सांडगे घालायची . दोन दिवसात वाळले की छान कुरकुतीत तळून नवे तोंडीलावणे तयार. तुझ्या पाकृने त्या आठवणीला उजाळा मिळाला.
आजच बनविली जाईल.
अमृत

छान आयडिया..ट्राय करणारच..
पण भात तेल नाही पीत? शिवाय भात कढईत पटकन जळण्या-करपण्याची भीती नसते का? त्यासाठी काही खास खबरदारी/
सुपर्ब आयडीया
सुपर्ब आयडीया
अफलातून आयडियाची कल्पना! :)
हे आठवलं.
यातलाच प्रकार आहे पण उरलेल्या पदार्थांपासून बनणारा..
फार मस्त लागतात हे.
आजच केले जातील
ओ सानिका तै,
मागच्या वेळच्या प्रश्नाचे उत्तर द्या ना.. मी तुमच्याकडे पाहुणा म्हणुन येऊ का? थोडेच दिवस गॉड प्रॉमिस :)
यावेळचे सादरीकरण मजेदार.
पाकृ छान आणि सोपी.
पूर्वी (आमच्याकडे फ्रीज नसताना)उन्हाळ्यात भात उरला की जेवणे झाल्यावर आजी असा भात कुस्करून त्यात मीठ, जिरे घालून ताटात सांडगे घालायची . दोन दिवसात वाळले की छान कुरकुतीत तळून नवे तोंडीलावणे तयार. तुझ्या पाकृने त्या आठवणीला उजाळा मिळाला.
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
असो.
शेवटच्या फटुतील हात स्वप्नीलचा आहे का?
शॅलो फ्राय केलेत तरी चालते. छान होतात
भाताची भजी खाऊन बघायला हवीत.. :)
अरे कुणीतरी बोलवा रे मला.. ;)
मस्त
शिर्षक मात्र खटकले
मस्त आहे आयडीयाची कल्पना ...भावली