कलादालन
एक ठुमरी, एक भावना, एक राग : अनेक कलाकार.
Primary tabs
लग्नानंतर नववधूला “बिदा” करणे हा भारतीय कुटूंबामधला एक अतिशय नाजूक ,कोवळा , भावोत्कट क्षण ! आयुष्याचा एक अध्याय पूर्ण करून नवा अध्याय सुरु करायला सासरी निघालेली मुलगी. आई –आणि ती मुलगी रडून आपल्या भावना व्यक्त करतात . पण दुर्दैवाने सगळ्यांनाच असे रडून मोकळे होता येत नाही. मग हया भावना व्यक्त करण्यासाठी कविता गाण्यांचा आधार घेण्यात येतो. “दाटून कंठ येतो” हे सिनेमा मधले गाणे किंवा “दमलेल्या बाबाची कहाणी” सांगणारे भावगीत सामान्यांच्या ह्याच अव्यक्त भावना स्पष्ट करतात आणि आपल्याला भावतात.
हिंदी चित्रपटात तर हया बिदाई प्रसंगाचा इतका अतिरेक झाला आहे कि त्यामधील भावना न दिसता अती सामान्य मेलोड्रामा उभा राहतो. असो.
ह्याच भावना व्यक्त करणारी एक प्रचलित ठुमरी आहे.”बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए”. आपल्या पैकी जाणकारांनी ही अनेक वेळा ऐकली असेलच आणि त्यांना परात ऐकायला निश्चित आवडेल. ज्यांनी हयापूर्वी ऐकली नसेल , त्यांना ही ठुमरी नक्की आवडेल.
बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए ( मी आता माहेरा पासून दूर जाते आहे )
चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें (चौघा भोयांनी डोली घेतली आहे )
मोरा अपना बेगाना छुटो जाए ( मी आता परकी होणार )
ही ठुमरी गाण्याचा मोह सगळ्या गायकांना पडणे अगदी साहजिक आहे. आपण तिचा / चौघांना ऐकूया !
पंडीत भीमसेनजीनी पहा कशी मुलायमपणे उलगडून दाखवली आहे.
गिरिजा देवी हया एक प्रसिद्ध ठुमरी गायिका. बनारसी ढंगाने जाणारी त्यांची हीच ठुमरी , ह्याच भावना पण पूर्णपणे वेगळा आविष्कार.
http://globalmarathi.com/Music.aspx?SearchText=Bhairavi%20Thumri%20Babul%20Mora
ही ठुमरी भैरवी रागातील आहे. भैरवी हा पाण्या सारखा राग , ज्या भावना टाकल त्याचा पूर्ण न्याय होणार. थोडा
कातर, थोडा पर्युत्सुक !
एव्हाना तुम्ही अंतरा ऐकला असेलच.
आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश
जाए बाबुल घर आपनो मैं चली पीया के देश
( ज्या अंगणात मी खेळले बागडले ते आंगण आता माझ्या साठी “पर्वता” सारखे दुरून दिसणार , कठीण होणार आणि देहरी – देवडी / उंबरठा हा परदेस होणार. मी माझे माहेर सोडून “पिया” च्या घरी जाणार ).
तू नळी, स्नीप वर तुम्हाला हया ठुमरीचे, वेगवेगळया गायकांचे खूप दुवे मिलातीत , प्रत्येक गायकाने काही तरी वेगळे करून दाखवलेले तुम्हाला जाणवेल.
आता येथे एका तरुण कलाकार आरती नायक यांची ठुमरी ऐका. तीचभावना , तोच राग , तेच शब्द त्याच भावना कश्या नव्याने फुलून आल्या आहेत !
काही जुने म्हणून होत नाही , आपल्या संगीताची हीच तर खासियत आहे.
भीमसेनजी च्या गायनाचा हा दुवा
http://www.youtube.com/watch?v=8R2yZ6y3hh4
गिरिजा देवींची ठुमरी तेथे ऐकावी
http://globalmarathi.com/Music.aspx?SearchText=Bhairavi%20Thumri%20Babu…
ह्यांच्या ह्या भैरवी ठुमरीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. ही एक दमदार तरूण गायिका आहे, तिच्याकडून अपेक्षा आहेत.
दुव्यांबद्दल धन्यवाद! असेच आणखी राग आणि गान प्रकारांबद्दल माहिती द्या.
लेखातील मूळ दुवे नीट केलेत आणि माझ्यातर्फे सैगलचं "बाबुल मोरा"...
दुव्यांबद्दल धन्यवाद! असेच आणखी राग आणि गान प्रकारांबद्दल माहिती द्या.
अन माझ्याकडुन याच भावनेन ओथंबलेल आणखी एक गाण.
डग्गा काय घुमलाय या गाण्यात्...ऐकाच
पु. ले. शु.
लग्नाची बिदाई हा एक अर्थ आहे. याचा अजुन एक अर्थ म्रुत्यु (?) शय्ये वरचा माणुस हे गातोय असा पण होउ शकतो... चार कहार मिल.. म्हणजे खांदा देणारे चार लोक... बाकीची रचना पण हा अर्थ सांगते...
ही ठुमरी अवध- लखनौ चे नबाब वाजीद अली यांची आहे.. त्यांचे संस्थान इंग्रजानी १८५६ साली खालसा केले. आणि त्याना लखनौमधून हाकलून बाहेर काढले. तेंव्हा त्यानी लिहिलेली ही रचना आहे.
Devanagari Lyrics
बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए
बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए
चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें (उठायें)
मोरा अपना बेगाना छूटो जाए | बाबुल मोरा ...
आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश
जाए बाबुल घर आपनो मैं चली पीया के देश | बाबुल मोरा ...
[edit]Urdu Lyrics
بابُل مورا، نیہر چھُوٹو ہی جائے
بابُل مورا، نیہر چھُوٹو ہی جائے
چار کہار مِل، موری ڈولِیا سجاویں (اُٹھایّں)
مورا اَپنا بیگانا چھُوٹو جائے ، بابُل مورا۔۔۔
آںگنا تو پربت بھیو اؤر دیہری بھیی بِدیش
جائے بابُل گھر آپنو میں چلی پیّا کے دیش ، بابُل مورا ۔۔۔
किशोरी अमोणकर
अलिशा चिनॉय ... यात वायोलिन की सारंगी जे काही आहे ते अप्रतिम आहे.
अप्रतिम! वाचनखुण साठवली आहे.
दोन्ही ठुमरी एकापाठोपाठ ऐकल्यावर तर तो फरक आणि ती समानता - दोन्ही ठळकपणे समजतात. असेच अजून लेख येउद्या !
जे पी
प्रदीप : ही ठुमरी कोणत्या मैफिलीत कानावर पडेल सांगता येत नाही . आरती नायक ह्यांचे गाणे मलाही आवडते. अजून प्रत्यक्ष ऐकलेले नाही . नव्या गायकांचे "रेकॉर्डिंग"" उत्तम असते , पण प्रत्यक्ष ऐकताना "वेगळे" वाटते.
उलट जुने गायकांचे रेकॉर्डिंग इतके सुमार असते की ह्यांना एवढे मोठे का मानायचे ?असा प्रश्न पडावा.
पैसाताई : दुवे नीट काळ्या वाद्दल आभार . सैगल चे गाणे मी फार ऐकलेले नाही आणि म्हणून हया दुव्याबद्दल आभार. मस्तच !
अपर्णा अक्षय : आपला दुवाही आवडला.
अनुप : आपण म्हणता तो ही अर्थ शब्दातून प्रतीत होतो पण कोणाच्याही गाण्यातून होत नाही - हे माझे मत !
जागो मोहन प्यारे : हया माहिती बद्दल आभार !
बी.का. / जे.पी : उत्तेजना बद्दल आभार !
वेगवेगळ्या प्रथितयश गायकांनी गायलेली भैरवीतील एकच बंदिश ऐकण्याची संधी दिल्याबद्दल आभार.
बडोदे संस्थानचे राजगायक, आफ्ताबे मौसिकी ( संगीताचा सूर्य ) मरहूम उस्ताद फैयाझ्खान, यांनी त्यांच्या अनोख्या ढंगाने गायलेली हीच बंदिश येथे ऐका .या बंदिशीमध्ये अहिले वतन सोडून जाण्या विषयी आणखी एक कडवे आहे असे वाटते. उर्दूची जाणकारी नाही. जागोमोहनप्यारे हे यावर प्रकाश टाकू शकतील असे त्यांच्या वर दिलेल्या प्रतिसादावरून वाटते.
http://www.parrikar.org/music/bhairavi/fhk.mp3
वेगवेगळ्या प्रथितयश गायकांनी गायलेली भैरवीतील एकच बंदिश ऐकण्याची संधी दिल्याबद्दल आभार.
बडोदे संस्थानचे राजगायक, आफ्ताबे मौसिकी ( संगीताचा सूर्य ) मरहूम उस्ताद फैयाझ्खान, यांनी त्यांच्या अनोख्या ढंगाने गायलेली हीच बंदिश येथे ऐका .या बंदिशीमध्ये अहिले वतन सोडून जाण्या विषयी आणखी एक कडवे आहे असे वाटते. उर्दूची जाणकारी नाही. जागोमोहनप्यारे हे यावर प्रकाश टाकू शकतील असे त्यांच्या वर दिलेल्या प्रतिसादावरून वाटते.
http://www.parrikar.org/music/bhairavi/fhk.mp3
मला उर्दु येत नाही. ते विकिपेडियावरुन कॉपी पेस्ट केले आहे.